Jan 29, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 12

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 12बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 12

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........


सोनल, वैभव दादा, आई सगळे ऐकत होते बाबा काय बोलता आहेत आक्का आत्यांशी....

"काय झालं हो, का आला आक्कांचा फोन एवढय़ा रात्री, भांडत होत्या का त्या ",........ आई

"संतोष ची आपण तक्रार केली, तर राहुलचा भाऊ रमेश दादा ते इन्स्पेक्टर आहे ना, ते गेले होते संतोष च्या गावाला, संतोष ला त्यांनी दम द्यायला , परत येतांना त्याच्यावर कोणीतरी हल्ला केला, त्या गुन्ह्यात संशयित म्हणून संतोष त्याच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे, तर आक्का मला म्हणत होती की तुमच्या मुळे झाल हे, तुम्ही जाऊन संतोष वर केलेली कंप्लेंट मागे घ्या",...... बाबा

" बापरे काय खराब मुल आहेत ते, आक्का ही पाठीशी घालतात संतोष ला",..........आई

वैभव दादा ने पटकन रमेश दादा ला फोन केला...... " कुठे गेले होते तुम्ही, कसा काय झाला हल्ला ",.....

" संतोष च्या गावाला गेलो होतो चौकशी साठी, संतोष आणि त्याचे मित्रांना दम दिला, येतांना झाडी च्या रस्त्यात बरोबर पकडल मला गुंडांनी ",..... रमेश

" जास्त लागला आहे का तुम्हाला? मी ऐकलं की संतोष आणि त्याच्या मित्रांना अटक झाली ",...... वैभव

" हो संशयित म्हणून आताच केली अटक, हल्लेखोर ही सापडले आहेत, पण मूळ सूत्रधार बहुतेक संतोष अन त्याचे मित्रच असतील कारण संध्याकाळी मी त्यांना ओरडलो होतो, तेव्हा ते मूल चिडले होते माझ्यावर, बघू आता सकाळी काय होते ते, बहुतेक काही पुरावा सापडला नाही तर संतोष ला सोडव लागेल, ज्या नंबर वर सुपारी आली होती तो फोन नंबरही बंद आहे ",...... रमेश

" ठीक आहे काळजी घ्या , मी येवू का तिकडे मदतीला, आमच्या मुळे झाल हे",...... वैभव

" नाही हो तुमच्या मुळे कश्याला, आमच्या मागे चालतच हे हल्ले वगैरे, लोक बदमाश असतात, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, शक्यतो एकटे बाहेर पडू नका अजून धोका आहे आपल्याला",...... रमेश

सोनाली ने राहुल ला फोन केला,....." रमेश दादा वर हल्ला झाला आहे, आता इकडे आक्का आत्या चा फोन आला होता, विशेष लागलं नाही पण घाबरू नको, मला वाटल तुला माहिती आहे की नाही म्हणून फोन केला ",..

राहुल घाबरून गेला,....." काय कस काय झाल हे सगळ, कुठे आहे दादा आता, तुम्हाला कस समजल ",..

" अरे संतोष च्या आईने सांगितल , त्यामुळे आम्हाला समजलं आणि रमेश दादा वर हल्ला करण्याच्या संशयित म्हणून संतोष आणि त्याच्या मित्रांना अटक केली आहे",..... सोनल

ठीक आहे मी बघतो दादा ला फोन करून, राहुल ने रमेश दादा ला फोन केला,....." दादा काय झाल जास्त लागलाय का, मला आता समजल हल्ला झाला ते ",..

"नाही राहुल तू काळजी करू नकोस, आणी अजिबातच घराबाहेर निघू नको, मला विशेष लागलेला नाहीये, तुझ्या वहिनीला सांगू नको, मी येतो जरा वेळाने घरी",...... रमेश दादा

तरी सुद्धा राहुल आणि त्याचे बाबा पोलीस स्टेशनला आले, बाबा घाबरून गेले होते, रमेश दादा त्याच काम करत होता, वैभव दादा ही पोलिस स्टेशन ला आला

" अरे तुम्ही सगळे एवढी काय काळजी करता आहात, मी एकदम ठीक आहे, बाबा हे घ्या पाणी, काका चहा सांगा सगळ्यांसाठी",...... रमेश दादा
........

संतोष आणि त्याच्या मित्रांना लॉक अँप मध्ये टाकलं,

"लवकर सांगा हल्ल्याची सुपारी कोणी दिली होती",..... इंस्पेक्टर

"आम्हाला काहीच माहिती नाही इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आम्हाला उगीच अटक केली आहे ",.... संतोष

ते गेल्यानंतर संतोष च्या चेहऱ्यावर हास्य होते,......" बरं झालं चांगला धडा शिकवला त्या इंस्पेक्टर रमेश ला, जास्त हुशारी दाखवायला जात होता, पण किती लागला आहे त्याला हे माहिती नाही, आता ते लोक जास्त हुशार होतील, आपल्याला आता वेगळा प्लॅन तयार करावा लागेल",..

"हो करू प्लॅन आपण, पुरून उरु त्यांना ",..... प्रशांत
......

राहूल आणि बाबा... रमेश दादाला बळजबरी ने दवाखान्यात घेऊन गेले, मलम पट्टी करून घरी आले घरी आले, तर राहुल ची आई पुढेच काळजी करत बसली होती, रमेश दादा ला बघून त्यांना बर वाटल, वहिनी बाहेर आली ती ही घाबरून गेली होती",

" चला मी निघतो आता रमेश दादा, तुम्ही काळजी घ्या, उद्या येतो मी ",...... वैभव दादा

" हा मित्र आहे का तुझा रमेश ",........ आई

" नाही तो सोनल चा भाऊ आहे ",....... रमेश

" कोण सोनल",..... आई

" आपल्या राहुलची मैत्रीण, आई बाबा राहुल आणि सोनल एकमेकांना पसंत करतात त्यांना लग्न करायचं आहे ",....... रमेश

आई बाबा राहुल कडे बघत होते.....

"ठीक आहे उद्या बोलू आपण त्या विषयावर आता जा रमेश आराम कर ",...... आई

" हो मला एक फोन करायचा आहे मग झोपतो",..... रमेश

रमेश दादाने पोलिस इन्स्पेक्टर ला फोन केला,....." पकडले का संतोष आणि त्याच्या मित्रांना",...

हो.....

"काही बोलले का कोणी",..... रमेश

" नाही अजून कोणी काही बोलले नाही, त्यांना काही माहिती नाही अस वाटतय",...... इंस्पेक्टर

" अच्छा मग जाऊ द्या समजेल नंतर, उद्या सकाळी सोडून देवू त्यांना",...... रमेश दादा

" तुम्हाला काय वाटतंय, खरच सोडायच त्यांना पण ते मूल बदमाश आहेत सर, अजून पुढे त्रास देतील, समज द्यायला हवी त्यांना ",...... इंस्पेक्टर

" हो ते तर आहेच, पुरावे तर नाहिये त्यांच्या विरुद्ध बघू सकाळ पर्यंत, तुम्ही इकडे या सकाळी तीन बदमाश लॉक अप मध्ये आहेत, बोलू आपण त्यांच्याशी ",....... रमेश

ठीक आहे...

वैभव दादा घरी आला, आई बाबा सोनल वाट बघत होते

" कसा आहे रमेश दादा आता, फार लागलय का, संतोष ने केला का हल्ला ",...... सोनल

"माहिती नाही काही कोणी हल्ला केला ते , रमेश दादा ठीक आहे , थोड लागल आहे, झोपा आता सकाळी जाऊ आपण त्यांना भेटायला ",..... वैभव दादा
...........

संतोष प्रशांत त्याचे इतर मित्र लॉक अप मध्ये बसले होते

"काय होणार तर नाही ना आपल्याला प्रशांत ",..... संतोष

" काहीही पुरावा ठेवला नाही मागे, काहीही होणार नाही, फक्त सकाळी एक करायचा एकदम पडून रहायचा, उठायच नाही, आजारी असल्यासारख दाखवायच संतोष तू, मग बघ मी आपली सुटका कशी करून घेतो ",....... प्रशांत

" ठीक आहे ",...... संतोष

सकाळ झाली संतोषला बरं नाहीये असं प्रशांतने हवालदार काकांना सांगितलं, त्यांनी इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलं, त्यांनी लक्ष दिलं नाही, थोड्यावेळाने संतोष चे बाबा डबा घेऊन आले,

" तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही, द्या तो डब्बा इकडे, इंस्पेक्टर साहेबानी परमिशन दिली तर देवु त्यांना खायला",...... हवालदार काका

"पाच मिनिट भेटू द्या मुलांना, थोडं नाश्त्याला आणला आहे" ,..... बाबा विनवण्या करत होते

तसं संतोषने अजूनच खाली झोपून घेतलं

" काय झालं आहे संतोषला"?,..... बाबा विचारत होते

" त्याला बरं वाटत नाहीये काका, आम्ही सकाळ पासून सांगतो आहे ह्या लोकांना कोणी ऐकत नाही, रात्री थोडा ताप ही होता संतोष ला ",...... प्रशांत

संतोष चे बाबा इंस्पेक्टर साहेबांना विनवणी करत होते,
..... " सोडा हो संतोष ला, ताप ही होता त्याला रात्री, काही केल नाही त्याने ",...

" काही झाल नाही संतोष ला काका, काळजी करू नका ",....... इंस्पेक्टर

" ठीक आहे मी बघतो काय करता येईल ते ,नाही सोडत ना तुम्ही संतोष ला, मी येतो थोड्या वेळाने",..... बाबा खूप काळजीत होते

बाबा डबा घेवून घरी आले,......

"भेटला का संतोष, खाल्ला का शिरा संतोषने ",..... आक्का विचारत होत्या

" नाही, त्याला भेटू नाही दिल, लांबूनच बघितलं पण तो झोपलेला होता, बहुतेक बरं नाही वाटत आहे त्याला",..... बाबा

" काही केलं तर नसेल ना पोलिसांनी त्याला रात्री, माझ्या मुलाने काहीही केलेल नाही हो, काय हे मला खूप भीती वाटते, काही तरी करा ",...... आक्का रडत होत्या

" हो ना, मला ही खूप काळजी वाटते आहे",...... बाबा

" आहे का कोणी ओळखीचे आपल्या बघा जरा ",..... आक्का

" हो आहे, तालुक्याचे पुढारी अण्णा ओळखीचे आहेत, त्यांना लगेच फोन लावतो",........ बाबांनी फोन लावला, सगळं काय झालं आहे ते सांगितल.......

" ठीक आहे मी बघतो चौकशी करून, तुम्ही काळजी करू नका, तुमचा पोरगा नीट येईल घरी हा माझा शब्द आहे ",.... पुढारी अण्णा यांनी इन्स्पेक्टर साहेबांना फोन लावला........ " काय आहे मॅटर संतोष आणि त्याच्या मित्रांच",......

" ते बाजूच्या गावाचे इन्स्पेक्टर आहेत ना, त्यांच्यावर हल्ला झाला आहे म्हणून संशयित म्हणून त्या मुलांना ताब्यात घेतल आहे ",...... इंस्पेक्टर

"एक काम करायचं ताबडतोब सोडायचं मुलांना, जेव्हा नंतर चौकशी असेल तेव्हा बोलवता येईल ",..... अण्णा

" अहो पण सर",.......

" एक नाही दोन नाही ताबडतोब सोडायचं म्हणजे सोडायचं, पुरावा नाहीये ना त्यांच्याविरुद्ध, फक्त चौकशी करायची आहे ना ",...... अण्णा

" हो सर मग ",....... इंस्पेक्टर

" जेव्हा चौकशी करायची असेल तेव्हा बोलवुन घ्या त्यांना , आता घरी जाऊ द्या ",...... अण्णा

"तुम्हाला माहिती नाही काय झालंय, ते मूल बदमाश आहेत, आता असच सोडल तर पुढे मोठा गुन्हा करतील, ऐका माझ, तुम्ही आमच्या कामात मध्ये मध्ये करू नका",......इंस्पेक्टर

" सरकारचे नियम तुम्ही आम्हाला शिकवणार का आता?, कोण दोषी आहे अजून सिद्ध झाल नाही, तुमच्या वरच्या साहेबांना फोन करायला सांगू का?, चांगल्या घरची मुल आहेत ही, सोडा पोरांना लगेच, आणि या पुढे अशी चूक करू नका ",....... अण्णा

" ठीक आहे सोडतो",...... इंस्पेक्टर

संतोष आणि त्याचे मित्र घरी आले, संतोष डायरेक्ट रूम मध्ये मध्ये चालला गेला, जावून झोपून घेतल,

आक्का काळजीने मागे गेल्या,...... "संतोष उठ काहीतरी खाऊन घे, आंघोळ कर आवर आता ",...... आक्कांनी स्वतःच्या हाताने संतोष ला शिरा भरवला,

नाश्ता झाल्यानंतर संतोष झोपला त्याचे मित्र घरी गेले
............

रमेश दादा सकाळी आवरुन रेडी झाला

"आता कुठे चालला आहेस तू दादा, बर वाटतय का तुला ",..... राहुल

"कुठे म्हणजे काय ड्युटीवर, एकदम ठीक आहे मी ",..... रमेश

" हेच मी सांगते आहे यांना की आज सुट्टी नाही घेता येणार का",....... वहिनी काळजीत होती

"दादा.... वहिनी बरोबर बोलते आहे, तुला एवढ लागल आहे, काल पाय सुजला आहे आज घरी थांब ",...... राहुल

" नाही थांबता येणार घरी, मी ठीक आहे सांगतोय ना, काहीही झाल नाही मला , बाजूच्या गावातले पोलीस इन्स्पेक्टर आज इकडे येणार आहेत, ते तीन हल्लेखोर आहे त्यांची जबानी घ्यायची आहे, बरेच काम आहेत असं घरी राहून कसं चालेल आणि तुम्ही दोघे जरा माझी काळजी कमी करा, मी आत्ता येतो",...... रमेश दादा

वहिनीने चहा नाश्ता दिला

आई-बाबा आले पुढे,....." काय झालं रमेश? तू आज लगेच ड्युटीवर निघाला का ",

" हो आई खूप काम पेंडिंग आहे, सुट्टी नाही घेता येणार ",...... रमेश दादा

"घरी नाही का थांबता येणार, काळजी घे पण आणि तू काल काय म्हणत होता सोनल बद्दल, कोण सोनल",....... आई

"राहुल तू सांगणार आहेस का",..... रमेश दादा

"हो दादा सांगतो",...... राहुल वहिनी कडे बघत होता

" राहुल भाऊजी सांगा सगळ",...... वहिनी

राहुल आई जवळ येवून बसला

" आई बाबा सोनल आमच्या कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला शिकते आहे, तिची माझी ओळख कॉलेज मध्ये झाली, सहा महिने झाले आम्ही एकमेकांना ओळखतो, आम्हाला लग्न करायचं आहे",...... राहुल

" काय एवढी घाई आहे ? अजून तर तुला नोकरी ही नाही, आम्हाला एकदा भेटाव लागेल सोनल ला",....... आई

"आता लग्न जमवून ठेवु एका वर्षाने लग्न करू, कारण सोनल चा आत्ये भाऊ संतोष आम्हाला सगळ्यांना खूप त्रास देतो आहे, जर माझं आणि सोनल च लग्न जमलं तर तो एक त्रास कमी होईल, असा विचार आहे आमचा, पुढे मी परीक्षा देणार आहे, नौकरी हवी मला चांगली ",...... राहुल

"ठीक आहे मग केव्हा जायचं आपण त्यांच्याकडे ",.... आई

"तसा राहुल खूप खुश झाला मी बोलतो सोनलशी आणि मग सांगतो, तुमची काही हरकत नाही ना ",...... राहुल

"नाही, आता तुम्ही मुलांनी सगळी पसंती केली आहे तर आम्ही काय बोलणार",...... आई

"तुम्हाला नाही आवडलं का आई-बाबा, सोनल खरच खूप चांगली आणि हुशार मुलगी आहे, तुम्ही भेटा एकदा तिला",.... राहुल

" नाही रे अस काही नाही, आम्ही गंमत करत होतो तुझी, जाऊया आपण त्यांच्याकडे, लग्न ठरवून ठेवु तुमचं",....... आई

" रमेश दादा आणि वहिनी यांना माहिती होत, तुम्हीच राहिले होते आज तुम्हाला सांगून बरं वाटलं",..... राहुल
..........

बघु पुढच्या भागात काय होतय ते.....

संतोष आला जेल बाहेर, आता काय असेल त्याची पुढची चाल,..........
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now