Dec 08, 2021
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 11

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 11

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 11

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........

संतोष आणि त्याचे बाबा पोलिस स्टेशन हून घरी आले, बरोबर चार पाच मित्र होते, रस्ताभर बाबा संतोष आणि त्याच्या मित्रांना रागवत होते, ही अशी वेळ त्यांच्यावर या आधी कधीच आली नव्हती, आक्का रडून-रडून अर्ध्या झाल्या होत्या , घाबरून गेल्या होत्या त्या , संतोष ला बघून त्या शांत झाल्या

" काय झालं हो, आपल्या संतोषल का बोलवलं होत पोलिस ठाण्यात",...... आक्का

"सोनलला धमकीचे फोन करतो हा संतोष , त्यामुळे देशमुखांनी कंप्लेंट केली होती, या वेळी सोडल पोलिसांनी दम देवून ",..... बाबा परत संतोष कडे रागाने बघत होते

" हा भाऊ म्हणायचा की वैरी, स्वतःच्या बहिणीच्या मुलाची कम्प्लेंट करतो म्हणजे काय ",....... आक्का

" तुला काही समजत नाही का संतोष ची आई, पहिली गोष्ट आपणच कशाला त्यांचं नाव घ्यायचं, संतोषला समजत नाही का? त्याने कशाला धमकीचे फोन करायचे, मागेही मी बोललो होतो संतोषला की त्या सोनल चा नाद सोड तरी त्याचं तेच सुरू आहे आणि तू संतोष ला बोलायचं सोडून तुझ्या भावाला काय बोलते की कम्प्लेंट केली, जरा तू संतोषवर वचक ठेव, मी आधीच सांगितले आहे आपल्या कामाशी काम ठेवा, त्यांच नाव घेवू नका, आज पोलीस स्टेशनला बोलावण आलंय, उद्या त्याला आत मध्ये सुद्धा टाकतील, संतोष तुला समजत आहे का मी काय म्हणतोय ते? जरा वागणं-बोलणं सुधार, उद्या पासून दुकानात लक्ष दे जरा, मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा एकट्याने शेतीची कामे करायचो ",....... बाबा रागाने आज चालले गेले

संतोष त्याचे मित्र बाजूला उभे होते, आक्कांनी मीठ मोहरी घेऊन संतोषी नजर काढली,....." कोणाची नजर लागली आहे काय माहिती माझ्या पोराला, एकही गोष्ट त्याच्या मनासारखी होत नाही, चल जेवून घे संतोष, तुझ्या आवडीची भाजी केली आहे, केव्हाचा उपाशी आहे तो, माई ताट करा पोरांचे, चला रे मुलांनो",......

संतोष त्याच्या मित्रांसोबत आत जेवायला गेला

जेवण झालं

"आई मी येतो अर्ध्या तासात, माझ्या मित्रांसोबत आहे",....... संतोष

"लवकर ये घरी, बाबा ओरडतील नाहीतर, पैसे हवे का संतोष",...... आक्का संतोष गेला तिकडे काळजीने बघत होत्या

"संतोष कुठे गेला आता ",...... संतोष चे बाबा चिडले होते

"येतो तो एवढ्यात ",........ आक्का

"हे बघ मी तुला आधीच सांगून ठेवतो आहे, जरा संतोष च्या वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर एक दिवस आपल्याला हे सगळं प्रकरण खूप महाग पडेल, मी सांगतो आहे ते ऐका जरा तुम्ही, त्याचे अति लाड कमी कर, डोळे उघड, अति प्रेमाची डोळ्यावरची पट्टी ती काढ आता",...... बाबा

" अहो तो येथेच उभा आहे बाहेर, येतो पाच मिनिटात, मी समजावते त्याला, आणि तुम्ही सारख का संतोष ला बोलत असतात त्याच्या मित्रांसमोर, जरा प्रेमाने वागत नाही तुम्ही त्याच्याशी ",...... आक्का

"प्रेमाने वागू म्हणजे काय करू त्याच्या चुकीच्या गोष्टीला समर्थन करू का, त्याची काळजी आहे मला म्हणूनच म्हणतो आहे ना मी की चुकीच्या गोष्टी पासून दूर राहा",....... बाबा

" कुणावर प्रेम करणार चुकीच आहे का ",..... आक्का

"जर समोरच्या व्यक्तीच आपल्यावर प्रेम नसेल तर खरंच चुकीच आहे, नाही ना त्या सोनल ची इच्छा संतोषशी लग्न करायची, मग गावात काय बाकीच्या मुली नाही आहेत का? कशाला तिच्या मागे मागे जातो, तिला धमकावतो नाही नाही ते बोलतो ",...... बाबा

"मी बोलली काल संतोषशी बोलले, तो बोलला आता त्याला सहा महिने लग्न करायचं नाही, तो जरा शेतीच्या कामात लक्ष देणार आहे, दुकानावर येणार आहे ",..... आक्का

"ते बरं राहील त्याच्यासाठी ही आपल्यासाठी ही ",....... बाबा
..............

संतोष मित्रांसोबत बाहेर पडला....

" बघितलं का प्रशांत या लोकांची कुठपर्यंत मजल गेली, नुसता फोन काय केला त्या सोनल ला की लगेच पोलीस कम्प्लेंट केली, त्यांना काय वाटल मी लगेच खूप घाबरून जाईल की काय, खर सांगू का मला एवढा राग येतो आहे ना आता, मी अजिबात तिचा पिछा सोडणार नाही ",....... संतोष

" तूच बघ आता संतोष, आम्ही कधीच सांगतो आहोत तुला, आता काहीतरी ॲक्शन घ्यायची वेळ आलेली आहे",....... प्रशांत

संतोष बराच वेळ मित्रांशी बोलत होता...... आता त्याला बर वाटत होत,......" बाबा किती बोलले मला आज की सोनल चा पिछा सोड कामावर लक्ष दे, मी लक्ष देणार आहे शेतीवर, मला करायच आहे सगळ काम, पण आता माझ लक्ष सोनल वर आहे, तिला मिळवण महत्त्वाच आहे आता, नाही तर तो राहुल आहेच मागे, आधी राहुल आणि त्याच्या भावाकडे बघायला पाहिजे, फार जास्त झाल आहे त्या दोघांना, मला बोलला का पोलिस स्टेशन वर, प्रशांत काय करायचा आहे आता",...... संतोष

"तू काळजी करू नको मी बघ आता काय करतो ते, आधी या लोकांना धडा शिकवायला हवा, आपल्याला बोलवतात का पोलिस स्टेशन ला",..... प्रशांत

प्रशांतने एक फोन फिरवला, बर्‍याच वेळ तो फोन वर काही तरी बोलत होता,..... "संतोष एक दहा हजार रुपये होतील का अॅडजेस्ट",

"होतील ना केव्हा हवे आहेत",...... संतोष

" आता लगेच",..... प्रशांत ने संतोष ला सगळा प्लॅन सांगितला

"तू घरी जा आता आक्कांन जवळ थांब, मी बघतो काय करायच ते पुढे",..... प्रशांत

संतोष घरी निघून आला, बाबा आक्का जेवत होते, संतोष येवून आक्कांन जवळ बसला, आक्काच्या चेहर्‍यावर समाधान होत, जेवण झाल संतोष बाहेर गेला नाही, घरी टीव्ही बघत बसला
..............

पोलिस ठाण्याच काम झाल, रमेश दादा घरी जायला निघाला, बराच उशीर झाला होता, दोन गावच्या मध्ये थोडी घनदाट झाडी होती दोन तीन किलोमीटर ची, रमेश दादा मोटर सायकल वर जात होता, अचानक गाडी दोन तीन लोकांनी अडवली, त्या भागात विशेष स्ट्रीट लाइट नव्हते, आणि कोण आहेत हे लोक हे ही रमेश दादाच्या लक्ष्यात येत नव्हत,

"कोण हवय? कोण आहात तुम्ही" ? ,....... रमेश दादा

तेवढ्यात मागून येवून कोणी तरी रमेश दादा ला धक्का दिला, तसा रमेश दादा गाडीवरून पडला, तेवढ्यात सावध होऊन तो उठला पोलीस इन्स्पेक्टर आहे तो, त्याला अशा हल्ल्यांची सवय होती, उठून त्याने ताकदीने एक ठोसा मागच्या माणसाच्या तोंडावर ठेवला, त्या गुंडाला एका हाताने धरून ठेवला, समोरचे दोन मनुष्य चाल करून आले, त्यांना लातेने मारले,

"बोला कोणी पाठवला आहे तुम्हाला ? लवकर बोला?",..... रमेश दादा

खाली पडलेले ते दोन मनुष्य परत चाल करून आले, तस रमेश दादाने तिसऱ्या गुंडाला पुढे केल, त्या गुंडाने मारलेली ठोसा तिसऱ्या गुंडाच्या तोंडावर बसला, तो कळवळून ओरडला, तो खाली पडला, त्याला उठवायला एक जण खाली वाकला, तेव्हा रमेश दादाने तिसरी गुंडाला त्या दोघांवर पाडलं आणि खाली दाबलं

" लवकर सांगा कोणी पाठवला आहे तुम्हाला", ?........ रमेश दादा

तेवढ्यात चान्स मिळाला, तिघ गुंडांना खूप लागल होत, ते तिघे ओरडत होते, रमेश दादा ने त्यांना तस दाबून ठेवल

रमेश दादा ने पोलिस स्टेशनला फोन केला,....... "माझ्यावर हल्ला झाला आहे, लवकर इकडे मदत पाठवा",

त्यांची झटापट सुरू होती तेव्हा गावातली एक गाडी तिथून जात होती, त्यातले दोन तीन लोक पटकन गाडीतून उतरले आणि त्यांनी गुंडांना पकडून धरलं, सगळ्यांनी मिळून त्या तिघांना गाडीतल्या दोरीच्या साह्याने झाडाला बांधल, तेवढ्यात पोलिसांची गाडी आलीच, तिघांना बेड्या ठोकल्या आणि पोलिस स्टेशनला घेऊन गेले,

या झटापटीत रमेश दादाच्या हाताला आणि पायाला थोडं लागलं, रमेश दादा डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेला, त्याने संतोष च्या गावाच्या पोलीस स्टेशनमध्ये फोन करून सांगितल,.... "आत्ताच माझ्यावर हल्ला झाला आहे, बहुतेक हे काम संतोष आणि त्याच्या मित्रांच असेल, तुम्ही आत्ताच जाऊन तिकडे चौकशी करा",...

" हो..... एवढी मजल त्यांची, या बदमाश मुलांचं काही तरी करायलाच पाहिजे, मी आत्ताच संतोष आणि त्याच्या मित्रांना अटक करतो, तुम्ही सकाळी या",.. इंस्पेक्टर

ठीक आहे....... रमेश दादा

हल्लेखोरांची फोन पाकीट सगळे हवालदार काकांनी जप्त केलं, रमेश दादा आत गेला लॉक अप मध्ये, तिघे हल्लेखोर आत बसले होते,......" तुमचे तुम्ही सांगणार का कोणी दिली हल्ला करायची सुपारी? की मी आमची पद्धत वापरू, बऱ्या बोलाने सांगणार आहात का तुम्ही", ?

तिघे काही बोलले नाहीत, तसा रमेश दादा ने ऐकाला सणसणीत थोबाडीत ठेवून दिली, बाकीचे दोन घाबरले,

"आम्हाला माहिती नाही साहेब, आम्हाला फोन आला होता, आम्हाला सोडा",.....

"या मुलांचा फोन आणा इकडे हवालदार काका",...... रमेश दादा

"दे रे फोन नंबर",....... रमेश दादा हल्लेखोरांन वर ओरडला

दिलेल्या नंबर वर फोन लावून बघितल, फोन स्विच ऑफ येत होता, नंबर कोणाचा ते चेक केल पण नाव ओळखीच वाटत नव्हतं,

संतोष च्या घरी रात्री पोलिस पोहोचले, ते जोरा जोरात दार वाजवत होते, आवाजाने बाबा उठले, त्यांनी दार उघडल दारात पोलिस बघून ते घाबरून गेले

"आता काय झाल इंस्पेक्टर साहेब",...... बाबा

"इंस्पेक्टर रमेश सरांवर आता घरी जातांना हल्ला झाला आहे, दोन तीन गुंडांनी त्यांना अडवलं खूप मारामारी झाली तिकडे, हे अस बर आहे का? त्यांचा संशय संतोष आणि त्याच्या मित्रांवर आहे आम्हाला संशयीत संतोषला ताब्यात घ्यावे लागेल",...... इंस्पेक्टर

" रात्रीचा जेवण झाल्यापासून संतोष घरातच आहे कुठे गेला नाही, तो माझ्या डोळ्यासमोर आहे , तो नव्हता मारामारी त तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे",....... बाबा

" हो आमचा संतोष घरी होता, इथे बसला आहे तो समोर, तुम्ही जा बर ",..... आक्का

" असे डोळ्यासमोर राहणारे फार बघीतले आहेत, हे असे बदमाश मुलं सुपार्‍या देऊन काम करुन घेतात आणि साळसुदा सारखे घरी बसून राहतात, मला माफ करा काका पण आम्हाला संतोषला ताब्यात घ्यावाच लागेल",...... इंस्पेक्टर

"पण तुमच्याकडे पुरावा आहे का काही", ?....... बाबा

" हल्लेखोरांनी काही फोन नंबर दिले आहेत, आम्ही या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतो आहोत, जर काही त्याच्याविरुद्ध निघाला नाही तर उद्या सकाळी सोडून देऊ माझ्यावर विश्वास ठेवा काका, जर संतोषने काही केले नसेल तर त्याला काहीही होणार नाही आणि जर संतोषने हल्ला घडवून आणला असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही एका पोलीस इन्स्पेक्टर वर हात उचलला हा एक फार मोठा गुन्हा आहे",...... इंस्पेक्टर

संतोष बाहेर आला, त्याच्या मित्रांना आधीच पोलिसांनी पकडलं होतं, संतोष येऊन जीप मध्ये बसला, आक्का आत्या रडत होती, पोलिसांना विनवणी करत होती,

" काका काकूंना घरात न्या, काय चाललय हे ",....... इंस्पेक्टर

सगळे मित्र एकमेकाकडे बघत होते, जीप पोलीस स्टेशनला आली, सगळ्या मित्रांना लॉकअपमध्ये टाकले, जीपच्या मागून संतोषचे बाबा पोलिस स्टेशनला आले

" तुम्ही कशाला आले काका इथे? संतोष जर खरंच निर्दोष असेल तर त्याला काहीही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घरी जा काका, या पोरा मागे तुमचा वेळ वाया घालवू नका, या बदमाश गँग ला एकदा चांगला हिसका दाखवला पाहिजे, तेव्हा सुतासारखे सरळ होतील ते",...... इंस्पेक्टर

बाबा जड पावलांनी घरी गेले, घरी आक्का आत्या रडत बसली होती,....." काय हो काय झालं? तुम्ही कसे वापस आले? , संतोष कुठे आहे? ",...

" येईल तो सकाळी काळजी करू नकोस, चल झोपून घे",...... बाबा आत गेले

" मला खरचं झोप लागणार नाही, पोरगा तिकडे जेल मध्ये, काय करणार मी एकटी हे ऐकत नाहीत, सरळ त्याला एकट्याला सोडून घरी आले तिकडे तुम्ही ",...... आक्का आत्या

आक्का आत्या ने सोनलच्या वडिलांना फोन लावला,........" चांगले पांग फेडले भाऊ तू, बरं वाटलं ना तुला माझ्या संतोष चा जेलमध्ये टाकून"?,..

"काय झालं आहे आक्का नीट सांग, एवढ्या या रात्री का फोन केला, कोणाला पोलिसांनी पकडल",..... सोनल चे बाबा

"जस तुला काहीच माहिती नाही का भाऊ, आधी कंप्लेंट करायची, नंतर असं दाखवायचं की काहीच माहिती नाही, आत्ताच पोलीस येऊन संतोष ला अटक करून गेले, पण मी सांगते भाऊ त्या पोलीस इन्स्पेक्टर वर माझ्या संतोषने हल्ला केलेला नाही",..... आक्का रडत होत्या

" कुणावर हल्ला झाला इन्स्पेक्टर रमेश वर का",...... बाबा

" हो रमेश वर, जसं तुला काहीच माहिती नाही का भाऊ, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जा आणि संतोष च्या वर केलेली केस मागे घे",...... आक्का आत्या

" पण आमची केस धमकी देण्याची होती हल्ला झाला ती केस आम्ही कशी मागे घेणार, आणि नंतर मला जरा बोलायचा आहे तुझ्याशी आक्का, काय वागण त्या संतोष च या पुढे जर माझ्या सोनल च्या वाटेला तो संतोष गेला तर माझ्याहून कोणी वाईट नाही सांगून ठेवतो, इकडे फोन करायचा नाही आम्हाला सांगून ठेवतो ",...... बाबा

"अरे नुसत फोन वर बोलला तो तर काय गुन्हा केला का? आहे ओळखीची सोनलशी वह्या पुस्तक बद्दल केली असेल चौकशी, तर तुम्ही लोकांनी दुसर टोक गाठल",....... आक्का आत्या

" अगं आक्का तू अगदी अशक्य आहेस, तुला खरच कळत नाही का की संतोष कसा वागतो ते, आणि मला खरंच माहिती नाही काय झाला आहे ते आणि आम्ही धमकी द्यायची कम्प्लेंट केली होती, वागतो संतोष खराब एवढ, आणी काय हे इंस्पेक्टर रमेश वर अटॅक झाला ते माहिती नाही मला , मी बघतो काय प्रकरण आहे, पण तू संतोष ला जरा समजाव ",...... बाबा

" हो ठीक आहे भाऊ पण जरा बघ रे संतोष पोलिस स्टेशन मध्ये एकटा आहे",...... आक्का आत्या परत रडत होत्या

"मी बघतो काय करता येईल, पण तरी आक्का तू डोळ्यावर जी संतोष च्या प्रेमाची पट्टी बांधली आहे ती काढ, आज पोलिसांनी पकडून नेल त्याला म्हणजे काय, त्याला समजवून सांग, हातचा जाईल पोरगा अश्याने, त्याच काय हे वागण, सोनल शी कस वागतो तो ",...... बाबा

"हो भाऊ, मी बघते ",...... आक्कांनी फोन ठेवला

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now