Dec 01, 2021
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 10

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 10

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 10

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........

संतोष प्रचंड चिडला होता.... तो खूप बोलला सोनल ला, मी पाहिजे ते करू शकतो सोनल, पण मला हे सगळ खुशीत व्हायला हव आहे, माझ्याशी नीट वागायच समजल ना........

"तुला जे करायचा ते कर संतोष, मी पण तयार आहे तुला उत्तर द्यायला ",...... सोनल बोलली खरं संतोष शी पण आता तिला समजत नव्हत काय कराव, हे सगळ राहुल ला सांगायला पाहिजे, तिने राहुल ला फोन केला, एकदम रडायला आलं तिला, हात पाय गळाले होते

Hello राहुल......

" काय झालं सोनल, असा काय आवाज येतो तुझा, अग सांग, ",..... राहुल घाबरून गेला होता,

" आता इकडे संतोषचा फोन आला होता, तो मला खूप धमकी देत होता, मला खूप भीती वाटते आहे पुढे काय होईल त्याची, काही होणार नाही ना पुढे",........ सोनल

"अति झाल आहे आता संतोष च, एक काम कर ना तू आणि तुझा दादा मिळून पोलीस स्टेशनला जा आणि रमेश दादाकडे त्याची कंप्लेंट करून टाक, मग दादा बघेल काय करायचं ते, एकदा संतोष ला धडा शिकवायला हवा ",...... राहुल

" हो चालेल मी वैभव दादा घरी आला की त्याच्याशी बोलते",..... सोनल

" आणि तू सोनल कुठल्या गोष्टीच टेन्शन घेऊ नको, काय म्हणत होता तो"?,...... राहुल

" बोलत होता की तुला चांगलं सांगून समजत नाही का, मला हो बोल, आता बघ मी काय करतो ",...... सोनल

" धमकी देतो का तो, मी सांगतो दादाला सगळं, काय करता येईल ते बघतो",...... राहुल

आई बाबा आले तेवढ्यात बाहेर,......" मी फोन ठेवते राहुल, आई बाबा आले आहेत",

" हो आणि रडू नकोस, चांगल पुरून उरु आपण त्या संतोष ला, अस हळवी झाली तर कस होईल, मला तुझी काळजी लागून राहील ना ",...... राहुल

" हो मी घेईन काळजी, बर वाटल तुझ्याशी बोलून",....... सोनल

...........

आई-बाबांनी निशा साठी सोनल साठी साड्या घेतल्या, दोघींसाठी एक एक दागिना घेतला, बाकीची थोडी खरेदी झाली, आई घरी आली, बाबा कामासाठी बाहेर गेले

सोनल घरात बसून होती, आई आली तिने पाणी दिला, चहा ठेवला

"काय झालं सोनल असा काय चेहेरा उतरला तुझा",..... आई

"आई थोड्या वेळापूर्वी संतोषचा फोन आला होता, खूप धमकी देऊन बोलत होता, काय करावं त्या मुलाचं काही समजत नाही, मी म्हटलं होतं ना तुला की तो बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, त्याला बहुतेक समजल असेल मी घरात एकटी आहे, कोणी तरी पाळत ठेवत आहे आपल्यावर ",....... सोनल

"हो तू बरोबर बोलते आहेस, आपण सावध राहायला हव, तू काही काळजी करू नकोस, आपण बाबा आले घरी की बघु काय करता येईल त्याच",........ आई

" आई मला आता काहीही फरक पडत नाही संतोष काही जरी म्हटला तरी, मी आता त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं आहे",...... सोनल

" तेच योग्य राहील आपल्यासाठी",...... आई
............

संध्याकाळी वैभव दादा ऑफिसहून आला, सोनल ने दादाला संतोष चा फोन आला होता त्याबद्दल सगळं सांगितलं

" त्याची एवढी हिम्मत, बोलायच नाही तू त्याच्याशी , ठेवून द्यायचा फोन, त्याच्याबद्दल पोलिसात कंप्लेंट करायची का आपण",..... वैभव दादा

" हो चालेल दादा तू राहुल च्या भावाला रमेश दादा ला फोन करतोस का, आपण लगेच जावून भेटू त्या दादा ला, संतोष ला समजल पाहिजे तो आपल्या शी हव तस वागु शकत नाही ",..... सोनल

हो,.......

वैभव दादा आणि सोनल पोलीस स्टेशन ला निघाले

रमेश दादा पोलीस स्टेशनमध्ये हजर होते, सोनल आणि वैभव दादा आत गेले, रमेश दादा ला सोनल ला भेटून छान वाटल, वैभव दादा आणि सोनलने सांगितल्याप्रमाणे संतोष विरुद्ध सगळी कंप्लेन त्यांनी लिहून घेतली,

"सारख धमकी देतो तो, त्याच्या माझा काही संबंध नाही, त्याला माझ्या पासून दूर रहायला सांगा दादा",..... सोनल

"काय करता येईल संतोष हे प्रकरण वाढतच चालला आहे,",....... वैभव दादा

"साधी कच्ची कंप्लेन करू, मी जाऊन त्या गावाच्या पोलीस स्टेशन मध्ये त्याला हजर राहायला सांगतो आणि त्याला तंबी देतो मग बघू तरी त्याने ऐकल नाही तर चांगली अ‍ॅक्शन घ्यावी लागेल, पण तुम्ही दोघे जण सावध रहा, आता तो संतोष खूप चेकाळेल",..... रमेश दादा

हो.....

" राहुलही सावध राहायला सांगा",...... सोनल
......

सोनल वैभव दादा घरी आले, आई बाबा टेंशन मध्ये होते

" काय झाल, केली का कंप्लेन ",..... बाबा

हो........ दादा ने सगळ सांगितल

" संतोष ला अद्दल घडवली ते बर झाल, पण किती ऐकेल तो माहिती नाही",..... आई

रात्रीचे जेवण झाले आई बाबा बोलत बसले होते

" अहो मला खूप काळजी वाटते सोनल ची, संतोष का अस तिच्या मागे लागलाय, आज बघितल कसा फोन केला त्याने, धमकी देतो तो आपल्याला ",...... आई

"अग हो आणि शेतातील अण्णा सांगत होते आपण गेल्यावर कोणी मुलगा आला होता घराकडे, पगार इथे राहतात का विचारत होता, नक्कीच कोणी तरी पाळत ठेवत आहे आपल्यावर ",....... बाबा

"कोण होत? संतोष होता का तो? ",..... आई

"नाही, अण्णा ओळखतात संतोष ला ",..... बाबा

" मग कोण आल होत चौकशी साठी? ",..... आई

" माहिती नाही, आपण आता नीट लक्ष ठेवून राहायला हव ",...... बाबा

आई बाबा दोघांच्या चेहर्‍यावर काळजी होती

" जाऊ दे विचार सोड आता, आपण उद्या निशा कडे जावून येवू मग बघू पुढच पुढे ",..... बाबा
.......

दुसर्‍या दिवशी सकाळी सगळे निघाले, गाडीत बाबा पुढे बसले होते गाडी वैभव दादा चालवत होता, मागे आई सोनल मस्त गप्पा मारत होत्या, सगळे खूप खुश होते, रस्त्यात काका काकूंना सोबत घेतल, निशा च्या घरी पोहोचले

छान बंगला होता निशा च्या घरच्यांचा , घरी आई बाबा आजी भाऊ असे होते, भाऊ लहान होता, सगळे आत गेले, निशा च्या आई-बाबांनी सगळ्यांची ओळख करून दिली, मस्त प्रसन्न वातावरण होतं...

सगळे बसले

वैभव दादा इकडे तिकडे बघत होता, निशा ला शोधत होता तो

सोनल ला आतून बोलवण आल, सोनल आत गेली, अतिशय छान जांभळी साडी नेसली होती निशा वहिनी ने, खूप सुंदर दिसत होती ती, लांबसडक केस खूप छान शोभत होते, प्रसन्न चेहरा, बोलके डोळे, मस्त आहे वहिनी अगदी फोटो पेक्षा ही जास्त सुंदर

"वहिनी खूप सुंदर दिसते आहेस तू आज",...... सोनल

तशी निशा लाजली

सोनल आणि निशा वहिनी ची ओळख झाली, दोघींचा स्वभाव छान जुळला, पाच मिनिटात खूप बोलून झाल, थोड्या वेळाने आई आत आली, तसं निशाने उठून आईच्या पाया पडल्या, आता निशाला बाहेर बोलवण आल होतं, निशा तिच्या एका चुलत बहिणीसोबत आरती सोबत बाहेर आली, आई सोनल नाही बाहेर येऊन बसल्या, बघण्याचा कार्यक्रम झाला, पसंती तर आधीपासूनच होती,

वैभव दादा आणि निशा बोलायला म्हणून गच्चीवर गेले, त्यांच्यासोबत सोनल आणि आरती त्या पण होत्या,

"आरती चल मला घर दाखव",...... म्हणून सोनल तिच्याबरोबर मुद्दाम निघून गेली

वैभव दादा आणि निशा वहिनी बऱ्याच वेळ गच्चीवर बोलत होते

" मग हो सांगायचं ना खाली जाऊन",..... वैभव

.... तशी निशा लाजली

" लग्नाची तारीख लगेच काढायचं म्हणता आहेत ते, तुझी काही हरकत नाही ना निशा, काही तरी तर बोल",..... वैभव

"नाही काही हरकत नाही",...... निशा

वैभव आणि निशा दोघं खूप आनंदात होते, वैभवने गुपचूप निशा साठी गिफ्ट आणलं होतं, ते त्याने गच्चीवर निशाला दिलं

"काय आहे यात ",...... निशा

" तूच बघ ",.... वैभव

निशान गिफ्ट उघडलं, आत खूप सुंदर अंगठी होती

" मला असं वाटत आहे की आपल्या नात्याची सुरुवात तुझ्या होकारा पासून व्हावी, तुझा होकार आहे का",..... वैभव

" हो माझा होकार आहे",..... निशाने अंगठी स्वीकारली

"आज मी खूप खुश आहे निशा, thank you होकार दिला त्या बद्दल" ,...... वैभव

दोघं जण खाली आले निशा आत चालली गेली

" दादा काय म्हटली वहिनी? होकार आहे ना तिचा "?,...... सोनल

" हो तिने अंगठी घेतली, छान झालं सोनल तु मला ही आयडिया दिली" ,....... दादा खूप खुश होता

सोनाली आणि वैभव दादा आत मध्ये गेले, दोन्हीकडची पसंती होती लगेच सुपारी फोडून घेतली

पुढची लग्नाची तारीख सवडीने ठरवू, आईने गाडीतुन खरेदी केलेली साडी आणि नेकलेस सेट आणला, सोनल आणि वैभव दादा आश्चर्यचकित झाले, कधी घेतली आई-बाबांनी साडी वगैरे,

खूप सुंदर साडी निशाला दिली, निशा नवीन साडी नेकलेस घालून आली, वैभव निशा ने सगळ्यांच्या पाया पडल्या, जेवण झाले

बराच वेळ सगळे गप्पा मारत बसले होते,

"चला आता आम्हाला निघावे लागेल",...... बाबा

सगळे बाहेर सोडायला आले

वैभव निशा छान बोलत होते, आरती सोनल त्यांच्यात सामील झाल्या

"चल येतो आम्ही वहिनी",...... निशा सोनल भेटल्या

घरी जातांना काका काकूंन कडे गेले ते सगळे, जरा वेळ बसले, पुढची तारीख कधी धरायची हे ठरवल, बाबांनी काकांना सोनल आणि राहुल बद्दल सांगितल, राहुल च्या घरचे येतील तेव्हा तुम्ही ही या, काका काकूंना आनंद झाला, सगळे घरी आले,

दादा ला विश्वास वाटत नव्हता की त्याच लग्न जमलय,
निशा खूप छान होती, किती महत्वाचा आहे आयुष्यात चांगलं मनुष्य असण, ऐका मनुष्य मुळे आयुष्याला चांगला अर्थ प्राप्त होतो, किती आनंद देऊन जातात काही काही नाती,

माझं ठरल लग्न, आता सोनल च ही चांगलं होऊ दे, त्या संतोष च्या संकटापासून आपली सुटका होऊ दे...... वैभव दादा विचार करत होता,

वैभव दादा ने रमेश दादा ला फोन केला,..... "झाल का संतोष शी बोलण, त्याचे मित्र त्यांना ही दम द्या जरा " ,

"हो आता तिकडे आलो आहे मी, देतो आता चांगला दम त्याला तुम्ही काळजी करू नका" ,....... रमेश दादा

खूप आभार तुमचे........
..........


संतोष ला पोलिस स्टेशन हून फोन आला,...... "संतोष आता पोलिस ठाण्यात ये नाही तर आम्ही तिकडे येवुन तुला अटक करू",......

"पण झाल काय इंस्पेक्टर साहेब ",...... संतोष

" ये इकडे मग सांगतो काय झालं ते",....... इन्स्पेक्टर

संतोष त्याच्या दोन मित्रांनो सोबत पोलिस ठाण्यात गेला, तिथल्या इन्स्पेक्टर बरोबर राहुलचा भाऊ रमेश दादा बसलेला होता

"कोण आहे ह्यातला संतोष",..... इंस्पेक्टर

संतोष पुढे झाल्या......

" तुम्ही चमचे का बाकीचे ? इंस्पेक्टर साहेब संतोष च्या मित्रांना बोलत होते, तुम्हाला समजत नाही का काही ? हा खराब वागतो आणि तुम्ही त्याला सपोर्ट करतात, असे कसे मित्र तुम्ही , चांगल्या गोष्टीला सपोर्ट करायला हवा, जरा चार चांगले शब्द सांगा संतोष ला, यापुढे तुम्हा मुलांची एक जरी कंप्लेन आली तरी माझ्याहुन कोणी वाईट नाही, निघा आता",....... इंस्पेक्टर

तसे सगळे जायला निघाले

" संतोष तुला नाही जायला सांगितलं तू थांब",....... इंस्पेक्टर

तसा संतोष थांबला, किंचित चेहरा घाबरल्यासारखा वाटत होता,

" तुझा विषय संपला नाहीये संतोष, तू बाजूच्या गावच्या मुलांना मुलींना धमक्या देतो, जास्त झाले आहे का तुला, किती कंप्लेन येतात तुझ्या, तू नीट नाही वागायचं असं ठरवलं आहे का",...... इंस्पेक्टर

"तुम्ही काय बोलता आहेत इन्स्पेक्टर साहेब, मी अस काही केल नाही, चुकीची माहिती दिली, कोणी तरी मुद्दाम मला त्रास देण्यासाठी हे अस करत आहे ",....... संतोष

" तुला पुरावा हवा आहे का संतोष, हे जे आहेत ना ते राहुलचे भाऊ आहेत, तुझ्याविषयी सोनल आणि तिच्या भाऊ वैभव यांनी धमकावण्याचे कम्प्लेंट केली आहे",...... इंस्पेक्टर

संतोष रमेश दादा कडे रागाने बघत होता

"बघीतल का कस बघतोय ते, स्वतः जे केलय त्याच्या त्याला जरा ही पस्तावा नाही ",....... रमेश दादा

"ऐ खाली बघ इथे पोलिस स्टेशन ला शहाणपणा नकोय, हा पेपर आहे याच्यावर लिहून दे की यापुढे तू सोनल आणि तिच्या घरच्यांना त्रास देणार नाही, नाहीतर तुझी कच्ची कंप्लेन आहे ती पक्की करू आणि तुला आत टाकू",....... इंस्पेक्टर

संतोषला पोलीस स्टेशनला बोलवले आहे तोपर्यंत ही बातमी घरी कळली, आक्का आत्या खूप घाबरून गेल्या

" अहो जाऊन बघा ना पोलिस स्टेशन ला, काही तरी गैरसमज झालेला दिसतोय, नाही तर आपल्या संतोष ला का बोलवतील अस",...... आक्कांच्या डोळ्यात पाणी होत

" हो जातो, बघतो मी काय केला आहे पराक्रम पोराने , काय आहे हे प्रकरण ",..... बाबा रागात होते

संतोष चे बाबा घाईने पोलीस स्टेशनला आले, संतोष इन्स्पेक्टर समोरच बसलेला होता तेवढ्यात संतोष च बाबा आत आले

" काय झालय इन्स्पेक्टर साहेब काय केला आहे संतोषने",....... बाबा थरथर कापत होते, त्यांना टेंशन आल होत

" काका तुम्ही एवढे चांगले आणि हा संतोष बघा कसा वागतो आहे, हे घ्या पाणी, टेन्शन घेऊ नका, बाजूच्या गावचे सोनल देशमुख आणि तिच्या भावाने संतोष विरुद्ध कंप्लेंट केली आहे, हा त्या फॅमिलीला त्रास देतो, त्यांना फोन करून धमक्या देतो, त्या सोनल च्या मागे लागला हा, आजच तिला धमकी दिली त्याने , लग्न कर म्हणून मागे लागलय हा तिच्या, त्या लोकांना गावात फिरणे मुश्कील झालं आहे, याला काही हक्क नाही आहे त्यांना त्रास द्यायचा, अजून कंप्लेंट कच्ची आहे, जर संतोष च वागणं सुधारलं नाही तर कंप्लेंट पक्की करू आणि त्याला खडी फोडायला आत पाठवू ",...... इंस्पेक्टर

तसेच संतोष चे बाबा घाबरले,......." नाही नाही मी तुमच्या पाया पडतो, असं काही करू नका",...... त्यांनी तिथल्या तिथे संतोषला दोन-तीन फटके मारले, कशाला रे त्रास देते दुसऱ्यांना.....

" काका तुम्ही खूप चांगले आहात, सांगा याला काही तरी, आता नीट रहा संतोष, हे बघा आम्ही संतोष कडून लिहून घेतला आहे की तो आता सोनल आणि तिच्या घरच्यांना त्रास देणार नाही, तुम्ही याला घेऊन जा आणि घरी जाऊन नीट समजावा, त्या गावात जाऊन तिकडे दंड भरा",........ इंस्पेक्टर

........

पुढच्या भागात...

काय होईल पुढे, सोनल ने आपल्या विरुद्ध तक्रार केली ही गोष्ट संतोष पचवू शकेल का?, काय असेल त्याची पुढची चाल, की संतोष नीट वागेन??........


❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now