Dec 01, 2021
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 9

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 9

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 9

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........

राहुल घरी आला तो चिडलेला होता.....

रमेश दादा घरी आला, आवरुन आला, ......" बोल राहुल काही अडचण आहे का",...

" हो दादा थोड बोलायच होत, दादा तुला माहिती आहे का माझ्या आणि सोनल बद्दल",...... राहुल

" हो मला माहिती आहे, सोनल देशमुख ना ",..... दादा

"तेच बोलायचं आहे, मला आणि सोनल ला लग्न करायच आहे पण त्यात एक अडचण आहे, सोनलचा लांबचा आत्येभाऊ संतोष तो आम्हाला दोघांना खूप त्रास देतो आहे, त्याच्यापासून आम्हाला धोका आहे ",...... राहुल

" काय करतो तो मुलगा आपल्या गावातला आहे का ",.....दादा

"नाही तो बाजूच्या गावाचा आहे पण आमचं सगळ्यांचं कॉलेज एकच आहे ",..... राहुल

" आता काय झालं राहुल, काय त्रास देतो आहे तो, काही बोलला का तुम्हा दोघांना ",..... दादा

" आज कॉलेजला काय झालं, संतोषने त्याला कसं धमकावलं हे सगळ सांगितलं, त्या संतोष ला सोनल शी लग्न करायच आहे, तो नेहमी आमच्या मागे असतो, काल तिच्या घरी आई बाबांना घेवून गेला होता तो लग्न जमवण्यासाठी ",..... राहुल

" एवढी मजल गेली का त्याची आणि तू एवढं काय ऐकून घेतलं, सोनल च्या घरच्यांचा पाठींबा आहे ना तुम्हाला, सोनल चा भाऊ वैभव त्याला माहिती आहे का सगळ",..... दादा

" हो दादा, वैभव दादा ला माहिती आहे त्याला काही हरकत नाही, संतोष आहे ना दादा तो नेहमी गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी घेरलेला असतो, संतोष श्रीमंत आहे, तो त्या मुलांना पोसतो, त्याच्याशी मारामारी किंवा बोलण्यात मला इंटरेस्ट वाटत नाही, त्याचे मित्र त्याला सपोर्ट करतात म्हणून माजला आहे तो",..... राहुल

"सोनल च काय म्हणणं आहे",..... दादा

" तिला माझ्याशीच लग्न करायचं आहे आणि यासाठी आम्हाला तुझी मदत हवी आहे, तिच्या घरच्यांचा होकार आहे आमच्या लग्नाला ",..... राहुल

" काय करायच आता पुढे काय प्लॅन आहे",..... दादा

दोघ बोलत असताना वहिनी मध्ये आली ति चहा ठेवून जात होती

" वहिनी एक मिनिट बस ना, तूला पण सांगायच आहे मला सगळ ",.... राहुल

" काय बोलत आहात तुम्ही दोघं",.... वहिनी

"अगं आपल्या राहुलने एक मुलगी पसंत केली आहे त्याच्याच कॉलेजचे आहे, त्याबद्दलच बोलतो आहे, त्यांच्या कहाणीत एक विलन आला आहे, त्यालाच मला सरळ करायचा आहे",.... दादा हसत होता.....

" दादा तुला वाटतं तेवढं हे प्रकरण सरळ नाही, खूप पोहचलेला आहे तो संतोष, मुद्दाम त्रास देतो तो सोनल ला",..... राहुल

"नसू दे ना सरळ, मी बरेचसे वाकडे लोक बघितले आहे, असा सरळ करतो त्या पोराला, आपल्या गावात पाय नाही ठेवणार तो राहुल",..... दादा

राहुल ला जरा बरं वाटत होतं

" घरी कधी सांगता आहात राहुल भाऊजी",..... वहिनी

" वहिनी तुम्ही मदत करा ना, मी काय सांगणार तुम्ही बोला ना आई-बाबांशी वहिनी",.... राहुल

"ठीक आहे आपण ठरवू",.... वहिनी

"ठरवू नाही, लवकर करायच आहे हे, आई बाबांशी बोलल पाहिजे ",..... राहुल

"एवढी घाई झाली आहे का राहुल भाऊजी लग्नाची",.... वहिनी

"नाही वहिनी, मी नौकरी लागल्या वर करणार आहे लग्न, हे लग्न एकदाच ठरवुन ठेवलं तर संतोष चा होणारा त्रास कमी होईल म्हणून",..... राहुल

"हो बरोबर बोलतो आहे तो",...... दादा बोलला,..... "ठरवू आपण काहीतरी राहुल तु टेंशन घेऊ नको",...

राहुल ला आता बर वाटत होत, त्याने सोनल ला फोन करून सगळ सांगितल

सोनल खुश होती,..... "तू तुझ्या आई बाबांना सांगितल की सांग मला राहुल",

"हो वहिनी करणार आहे मदत मला ",..... राहुल

" तू दादा वाहिनीला सांगितल का संतोष बद्दल ",...... सोनल

" दादा बघणार आहे बेत त्या संतोष चा ",...... राहुल
..........

सोनल च्या घरी आईचा फोन वाजत होता

" आई तुझा फोन आहे",...... सोनल

आई आत आली, अगं आक्का आत्यांचा फोन आहे,.....
" बोला आक्का" ,..........

" झालं का वहिनी घरी बोलण तुमच सगळ्यांच, काय ठरलं ग",........ आक्का आत्या

" हो झालं आक्का",....... आई

" काय ठरलं मग तुमच्या सगळ्यांच",...... आक्का

"तुम्हाला माहिती आहे ना आक्का, आम्हाला एवढ्यात सोनल च लग्न करायचं नाही",...... आई

" अगं वहिनी तुला समजत नाही का, एवढ चांगल स्थळ का जाऊ देता तुम्ही, लग्न ठरवून ठेवू",....... आक्का

" तुम्ही बरोबर बोलत आहात आक्का, पण सोनल ला संतोष पसंत नाही, हे तुम्हाला माहिती आहे ना, मग मुलांच्या मर्जी विषय शिवाय आपण कसं पुढे जाणार",...... आई

"कारण काय नापसंत करायला, इकडे पैशाची कमी नाही, मी काही त्रास देणार नाही सोनल ला, संतोष तर बघता तुम्ही किती प्रेम करतो सोनल वर, तुम्हाला तुमच्या मुलीच चांगल झाल ते नको आहे वाटत ",...... आक्का

" हे बघा आक्का मला आता जास्त बोलता येणार नाही, पण तुम्ही एक काम करा तुम्ही आमच्या स्थळाचा विचार डोक्यातून काढून टाका आणि तुम्हाला जर दुसरं स्थळ करायचं असेल तर तुम्ही करून घ्या ",...... आई

" काय अस वहिनी नीट विचार कर ग",....... आक्का

" आम्हाला आमच्या सोनलच तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न करायचं नाही आणि सोनल ला संतोष पसंत नाही, एवढच कारण आहे",...... आई

"ठीक आहे तुम्ही लोकं परत एकदा विचार करा पण एवढंच सांगते आमच्यासारखे चांगलं स्थळ तुम्हाला मिळणार नाही",...... आक्का

सोनल सगळं ऐकत होती,......" बर झाला आई तू त्यांना स्पष्ट सांगितलं ",

" हो मग काय,... हो नाही करण्यात काही अर्थ नाही, झाली का भेट राहुल शी",..... आई

" हो आई",.... सोनल

सोनल ने आई ला काय बोलण झाल ते सांगितल,.... "राहुल बोलणार आहे त्याच्या आई-वडिलांशी आणि मग ते आपल्याकडे येणार आहेत भेटायला",..... सोनल

" काही हरकत नाही, लवकर ठरवा काय ठरवायचं ते", ......आई

बाबा घरी आले,....." आज अण्णांनी निरोप आणला आहे की आपल्याला रविवारी निशा च्या घरी जायच आहे, पसंती असली तर सुपारी फोडून घेऊ",..

" खूप आनंदाची बातमी दिली तुम्ही",..... आई

सोनल ऐकत होती तिने वैभव दादाला बातमी दिली, दादा निरोप आला आहे वाहिनीच्या घरून, दादा खुश होता

आईला तर खूप आनंद झाला होता,..... "अहो आता बरेच काम आहेत आपल्याला खरेदी करावी लागेल थोडी",..

"अगं पण आधी मुलीला बघून येऊ आपण, घाई नाही का होत आहे खरेदीची",...... बाबा

" फोटोत खूप छान दिसते आहे ती निशा आणि वाटत आहे की वैभव ला ही ती आवडली आहे, जर दोन्ही बाजूंनी होकार असला तर सुपारी फोडायला काय हरकत आहे, मग उगाच वेळेवर धावपळ होईल त्यापेक्षा एखादी साडी नेकलेस वगैरे गाडीच असला तर लगेच वापरता येईल ",...... आई

" ठीक आहे आपण दोघे उद्या जाऊन थोडीशी खरेदी करू, पण कोणाला बोलू नको हे नाहीतर त्यांना वाटायचे की आपण दोघं खूपच उतावळे झालेला आहोत ",...... बाबा

" हो चला जेवून घेऊ",..... आईने ताट केले, सोनलने पाणी घेतलं, सगळे जेवायला बसले

" तू कुठे बाहेर गेली होती का सोनल आज",.... बाबा

" हो बाबा मी आज राहुल ला भेटायला गेले होते ",..... सोनल

" काय झालं मग सांगितलं का त्यांना आपल्या घरी काय झाल ते ",...... बाबा

" हो बाबा सांगितलं मी कि संतोष घरी येऊन गेला ते , राहुल आज-उद्या मध्ये त्याच्या आई-बाबांना माझ्या बद्दल सगळं सांगणार आहे, मग ते लोक येतील आपल्याला भेटायला, चालेल ना बाबा ",..... सोनल

"हो चालेल बेटा पण मला तुला एवढंच सांगायचं आहे की कुठल्याही गोष्टीचा टेन्शन घेऊ नको, होईल सगळं व्यवस्थित, आता हल्ली तू खूप काळजीत असते आम्ही आहोत तुझी काळजी घ्यायला ",..... बाबा

" हो बाबा",..... सोनल

दादा सगळं नीट ऐकत होता....." मला खरच काल आक्का आत्या संतोष चा खुप राग आला होता, किती घाण दिसत होता तो संतोष , काय ते वागण बोलण, हिम्मत कशी होते पण ",...

" जाऊ द्या हे सगळ, संतोष चा विषय नको, दादा पण तुझी बातमी खूप आनंदाची आहे",..... सोनल

दादा आनंदात होता, त्याला जेवणच जात नव्हत, परत आनंदाचं वातावरण झालं घरात, बाबा येताना गुलाबजाम घेऊन आले होते, त्यांनी जेवताना डबा मध्ये ठेवला

" काय आहे डब्यात",..... आई

" गुलाबजाम आणले आहे येताना, एवढी आनंदाची बातमी घेऊन घरी जातो आहोत म्हटलं काही तरी गोड पदार्थ हवा जेवणात",..... बाबा

जेवण झालं आईने सोनल ला रूम मध्ये बोलवलं,.... "सोनल सगळी तयारी बाकी आहे, आपल्याला कपड्याच ठरवायला हव, आता दोन दिवस राहिले आहेत",......

" तू कुठली साडी नेसणार आहेस",..... सोनल

आईने दोन तीन साड्या दाखवल्या एक साडी सोनल ने पसंत केली

" मी अनारकली ड्रेस घालू का",..... सोनल

"हो छान आहे तो ड्रेस",...... आई

"बांगड्या आहेत का ग तुझ्या हातात ",...... आई बघत होती

"हो आई, आज राहुल ने दिल्या मला ",..... सोनल लाजत होती

" खूप छान दिसता आहेत तुला, वापर मस्त",..... आई

आई सोनल कडे कौतुकाने बघत होती

सगळ आवरल.....

आई बाबांच्या रूम मध्ये गेले

"उद्या खरेदी करून घेवू आपण ",...... बाबा

"हो जाऊ दुपारून, मी काय म्हणते सोनल साठी पण बघायची का हो एखादी साडी, कारण आता त्या राहुलच्या घरचे येतील तर सोनलला नवीन फॅशनचे चांगली साडी हवी, लगेच तिच्यासाठी ब्लाऊज शिवून घेऊन सेट तयार करून ठेवु",..... आई

"चालेल काही हरकत नाही, उद्या जे लागतं ते घे",.... बाबा

" आता दोघी लग्नाची तयारी करावी लागेल ",....... आई
.........

दादा ऑफिस च काम करत होता.....

" दादा तू खुश आहेस ना, कस वाटतय सांग ना ",..... सोनल

दादा छान हसत होता, काही बोलला नाही तो

" बोल ना दादा प्लीज, काही तर सांग, सगळे निशा वहिनी कडे जाण्याच्या तयारीत आहेत, तुझा होकार आहे ना ",....... सोनल

" मी आज फोन केला होता निशा ला",..... वैभव दादा

" काय बोलतोस दादा, काय म्हटली वहिनी",...... सोनल आनंदात होती

"कोणाला बोलू नकोस",..... वैभव दादा

"नाही, काय म्हटली वहिनी ",.... सोनल

" सगळ्यांनी आमचं लग्न ठरवायचय आधी आम्हाला एकमेकींशी बोलायचा होत, आज आम्ही भेटलो होतो ",..... वैभव दादा

" कुठे आणि कधी दादा, पण बर केलेस भेटले तुम्ही दोघ ते, झाल का बोलण",...... सोनल

" मी ऑफिस मधून हाफ डे घेतला, निशा ने हाफ डे घेतला लंच केल आम्ही सोबत ",...... वैभव दादा

" कशी वाटली वहिनी",...... सोनल

" खूप चांगला आहे स्वभाव निशा चा, आमचे मत जुळतात आधी आम्ही दोघ गप्प होतो, काय बोलाव सुचत नव्हतं, मग जो बोलायला लागलो दोन तीन तास कसे गेले समजल नाही, ती लग्नानंतर नौकरी करणार आहे आणि गव्हर्नमेंट जॉब साठी प्रयत्न सुरू आहेत",...... वैभव दादा

"खूप छान वाटतय आहे तुमच्या दोघां साठी दादा, दोघांचे विचार जुळले अजून काय हवं ",..... सोनल

" हो ना सोनल, तुला पसंत आहे ना निशा ",..... वैभव दादा

" हो दादा छान आहे वहिनी, अगदी तुला शोभेल अशी, हुशार सुंदर",......... सोनल
.........

दुसर्‍या दिवशी सकाळी आवरुन झाल, दुपारचं जेवण झालं आज सोनल ने तिचे कपाट आवरायला काढलं होतं प्रिया आली होती भेटायला

" प्रिया तू आहे का जरा वेळ सोनल सोबत, आम्हाला थोडं बाहेर खरेदीला जायचं आहे",...... आई

"हो काकू मी थांबते ",..... प्रिया

" असं काही नाही ग प्रिया, तुला जायचं होतं ना, तू जाऊ शकतेस, मी घाबरत नाही कुणाला, मी दार व्यवस्थित लावून घेईन आतून, आई तू जाऊन ये बाहेर",...... सोनल

आई बाबा खरेदीला बाहेर पडले, जाता जाता त्यांनी शेतावर काम करणाऱ्या गडी अण्णा यांना घरावर लक्ष ठेवायला सांगितलं...

आई बाबा घरून निघाले,..... "कटकट झाली आहे आता त्या संतोषची, कुठे जायचं धोका वाटतोय",.. आई

"होईल सगळं नीट तू काळजी करू नको, सोनल आहे आपली हिमतीची",..... बाबा

" हो ते आहेच, पण संतोष चे विचार काही चांगले नाहीत, आपण सोनल आणि राहुल ला सांगू तुम्ही ही लग्न करून घ्या मग शिकत बसा पुढच",......... आई

" हो ते लोक येतील आपल्या कडे तेव्हा बोलू सविस्तर, तू काळजी करू नकोस ",........ बाबा
..............

सोनल आवरत होती....

प्रिया च्या आई चा फोन आला,..... "सोनल मी निघू का",

"हो चालेल ",...... सोनल

"आम्हाला बाहेर जायच आहे, थोडी खरेदी करायची आहे ",..... प्रिया

" हो जा तू, सांग ग काय काय आणल ते ",..... सोनल

" हो",....... प्रिया निघून गेली

आई बाबा प्रिया सगळे गेले सोनल एकटी होती, संतोष चा मित्र अविनाश लक्ष देवून होता, त्याने संतोष ला फोन केला,...... "सोनल एकटी आहे घरी, सगळे बाहेर गेले ",...

" जा बर जावून बघ तू तिच्या घरापर्यंत, काही प्रॉब्लेम नसेल तर मी येतो ",.... संतोष

तसा अविनाश आत आला, अण्णा बसलेले होते झाडाखाली,...... "कोण पाहिजे आहे? , काय काम आहे"? ,.....

"कोणी नाही पगार इथेच राहतात का" ?,...... अविनाश

"नाही ते बाजूला राहतात" ,..... अविनाश बाहेर निघून आला

"संतोष पहारेकरी बसलेले आहे कोणीतरी, तू इकडे येऊन काही उपयोग नाही",...... अविनाश

" ठीक आहे, एवढे घाबरले का ते मला, लक्ष देत रहा",.......संतोष

सोनल च्या फोन वर अनोळखी नंबर हून फोन आला

सोनल ने फोन उचलला

"मी संतोष बोलतो आहे सोनल ",..... संतोष

"संतोष तू कश्याला केलास इकडे फोन, तुला माहिती आहे ना मला तुझ्याशी नाही बोलायचा, मग का त्रास देतोस ",........ सोनल

" पर्वा मी तुमच्या कडे आलो होतो तेव्हा ही आपल बोलण झाल नाही, तुला माहिती आहे ना मी का आलो होतो तुमच्या कडे ते, एकदा विचाराव काय म्हणणं आहे तुझं, तुला मी पसंत आहे का? म्हणुन फोन केला, सोनल एकदा सगळ बाजूला ठेव आणि फक्त माझा विचार कर प्लीज.... मी खूप प्रेम करतो तुझ्या वर, मला तुझ्याशी लग्न करायचा आहे, खूप खुशीत ठेवेन मी तुला, माझ्या वर विश्वास ठेव ",....... संतोष

" Shut up, जरा बोलतांना विचार करत जा संतोष, आणि परवा कशाला आला होतास माझ्या घरी तुझ्या आई बाबांना घेऊन, कोणी बोलवलं होत तुला, कॉलेज मध्ये बोलली होती मी तुला की माझ्या मागे मागे करू नकोस, आणि तू कितीही सांगितल तरी माझा नकार आहे ",....... सोनल

" सोनल प्लीज एकदा ऐकून घे, काय हवय तुला तस करू आपण, तू म्हणशील ते ऐकेन मी, एक शब्द खाली पडू देणार नाही, पुढेही मी तुझ्या घरच्यांना खूप सपोर्ट करेल, तुला माहिती आहे आपल्याकडे कुठल्याही गोष्टीची कमी नाही, तुला वाटतं तेवढा वाईट मुलगा मी नाहीये, एक चान्स दे ",...... संतोष

" तू चांगला आहेस ना, मग माझा पिछा सोड, कुणाच्या मनाविरुद्ध त्यांच्याशी नात आपण जोडू शकत नाही, आणि माझ्या घरचे खाऊन पिऊन सुखी आहेत तुझ्या सपोर्ट ची त्यांना गरज नाही ",...... सोनल

" मी तुझा पिच्छा सोडणार नाही, तेवढ सोडून बोल, मला तू हवी आहेस, मग तू हो बोल की नको, तू माझीच होणार, तुला नीट सांगून समजत नाही का सोनल? मी नीट बोलतोय तेव्हा ऐक माझ, समजल का? आणि मला होकार दे नाहीतर माझ्याहून कोणी वाईट नाही",....... संतोष

" तू मला धमकी देतो आहेस का? हे असंच करणार का तू आयुष्यभर, जर मी तुला होकार दिला तर,? मला पडायचं नाही आहे त्या फंदात तुला जे करायचं ते कर मी नाही घाबरत",...... सोनल

" ठीक आहे , तुला माहिती नाही मी काय करू शकतो ते, हे चॅलेंज मी स्विकारतो",....... संतोष

" धमकी देऊन उपयोग नाही संतोष, मला जे योग्य वाटेल तेच मी करणार आहे, तू किती जरी माझ्या घरी आला स्थळ घेवून, ओरडुन बोल प्रेमाने बोल माझ्याशी, तरी मला फरक पडणार नाही, माझ्या आयुष्यात तुझ्या साठी काहीही जागा नाही, हे किती वेळा सांगितलं आहे मी तुला, यापुढे मला फोन करू नको, माझ्याशी नाही बोलले तरी चालेल",...... सोनल

" मग कोण आवडत तुला तो राहुल का ",..... संतोष

" हो तोच आवडतो",...... सोनल ने रागाने फोन ठेवून दिला
................

पुढच्या भागात बघु पुढे काय होतय ते.....

त्रासदायक लोकांमुळे आयुष खराब होवुन जात, दुसर्‍या शी वागतांना सांभाळून वागल पाहिजे.......❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now