Dec 01, 2021
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 8

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 8

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 8

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........

दुसऱ्या दिवशी राहुल चा पेपर होता सोनलने सकाळी त्याला ऑल द बेस्ट मेसेज पाठवला, दुपारी राहुल चा पेपर झाला त्याचा फोन आला

"कसा गेला पेपर राहुल",...... सोनल

" सोपा गेला ",.... राहुल

"तू काय हुशार आहेस, कस वाटत आहे एक्झाम झाली तर ",...... सोनल

" छान वाटत आहे, आज भेटणार का मला",..... राहुल

"हो, मला पण तुझ्याशी बोलायचं आहे थोडसं",...... सोनल

"काय झाल काही टेंशन, संतोष बद्दल का" ?,...... राहुल

"हो आणखी काय ",..... सोनल

" वाटलच होत मला आणखी काय विषय असणार आहे आपल्यामध्ये, मी आता घरी गेलो की तुला घ्यायला येईल, मग जाऊ आपण देवळात चालेल ना",...... राहुल

" हो चालेल पण तू पण काळजी घे आता, संतोष जास्त चिडलेला आहे, गाफील राहू नकोस",....... सोनल

" ठीक आहे",..... राहुल

" आई राहुल येतो आहे जरा वेळाने मी त्याच्यासोबत देवळात जाऊ का? येते अर्ध्याएक तासातच",..... सोनल

" हो चालेल, पण मी काय म्हणते आहे सोनल जरा काळजी घे बाई आता, काल बघितलं ना तू, आक्का ते मामा बाबा किती चिडलेले होते, बहुतेक रस्त्याने जातांना त्यांनी आपल्या विषयी बडबड केली असणार, संतोष मनात डुख धरुन असणार",....... आई

" हो आई माझं पण तोच विचार होतो आहे, नक्कीच त्या आक्कांनी संतोष ला अजून भडकावल असेल, तेच मला राहुल शी बोलायचं आहे की काय करू या पुढे , मी आज राहुल ला सांगितल की तू पण जरा काळजी घे,

" हो ते बर राहील",.... आई

"काय ही कटकट उगीच मागे लागली, माझ्याच बाबतीत का अस आई? मी नाही म्हणते आहे हे त्या संतोषला समजत नाही का? मला माझा जोडीदार निवडण्याचा हक्क नाही का? माझ्या बाबतीत सगळे निर्णय बाकीचे लोक घेणार आहेत का? मी अस होवु देणार नाही आई, उगीच मी नाही म्हणते आहे म्हणून अजून माझ्या मागे येतो आहे तो संतोष, मुद्दाम त्रास देतोय तो मला ",...... सोनल

" मलाही तसंच वाटत आहे, आता हा त्याने स्वतःच्या मानपानाचा प्रश्न करून घेतला आहे, तो परत प्रयत्न तर नक्की करणार, त्या आधी ठरवून घे ग सगळ नीट ",....... आई

" असं का असतं आई या जगात मुलींनी काही ठरवण्याचा प्रयत्न केला की लगेच तो हाणून पाडला जातो, संतोष ला माहिती आहे मला राहुल आवडतो मग तो बाजूला का नाही होत, तो संतोष म्हणेल तसेच मी का करायचं? मी मुळीच दुबळी नाहिये, तो कोणत्या ही बाबतीत अजिबात ऐलीजेबल नाहिये माझ्या साठी, मला मुळीच तो आवडत नाही, चांगल वागण, विचार असे नाहीत त्या संतोष चे, सगळे पुरुष आपले दादा... बाबा सारखे का नाही आहेत, एकदम छान आणि समजूतदार",...... सोनल

" खरं आहे तुझे, जगात अश्या असंख्य स्त्रिया या अशाच पुरुषी त्रासाला बळी पडलेले आहेत त्यांचं लग्न झालेलं असो किंवा नसो या लोकांना काहीच फरक पडत नाही, फक्त त्रास देण हाच एक उद्देश असतो त्यांच्या, एखाद्याचा जिवन आपण खराब करतो याच त्यांना काही वाटत नाही, आपणच खंबीर राहिला हव येईल त्या संकटाला तोंड द्यायचं, नाही तर संकट येवू द्यायच नाही हा आधी प्रयत्न करायचा, ",........ आई

"हो ना आई काही तरी करायला हव ",...... सोनल

" तुझ्या बरोबर किती लोक आहेत तुझे बाबा, तुझा दादा, राहुल, राहुलचा इन्स्पेक्टर भाऊ रमेश, तरीसुद्धा त्या संतोष ची हिम्मत होते तुला त्रास द्यायची म्हणजे तो किती निडर आहे",..... आई

"खरंच आपल्या आजूबाजूला चांगले लोक आहेत, राहुल बोलणार आहे त्या रमेश दादा शी आमच्या बद्दल, त्या दादा ला सांगणार आहे आम्ही संतोष प्रकरण, आई तू बोल ना त्या आक्का आत्यांशी, सांग त्यांना किती त्रासदायक आहे संतोष ",.....सोनल

" हो मी तोच विचार करत होती, बोलणार आहे मी त्यांच्याशी ",....... आई

" खरच आयुष्यात चांगले लोक असण महत्त्वाचे आहे ",...... सोनल

" तुझे बाबा एवढे चांगले आहेत त्यांनी कधीच त्यांचे विचार आपल्यावर लादण्याचा प्रयत्न केला नाही नेहमी आपल्याला प्रत्येक गोष्टीची सूट दिली, आणि वैभव दादा किती चांगला आहे, त्याची होणारी बायको एकदम लकी असेल ",....... आई

" खर आहे आई आपण खूप लकी आहोत, बाबा खूपच प्रेम करतात आपल्या वर आणि दादा तर खूपच जेंटलमॅन आहे" ",...... सोनल

..........

जरा वेळाने राहुल घ्यायला आला, त्याने फोन केल्यावर सोनल बाहेर गेली, ते दोघं राहुल च्या गाडीने मंदिरात गेले

" राहुल कसा गेला तुला पेपर ",..... सोनल

" आजचा पेपर जरा अवघड होता, पण चांगले मार्क मिळतील, मी आता नोकरीसाठी प्रयत्न करणार आहे सोनल, तुला काय वाटत आहे याबद्दल, तू काय म्हणतेस काय बोलायचं होतं, काय झाल आहे ",...... राहुल

" काल आमच्याकडे संतोष त्याचे आई बाबा मामा सगळे आले होते लग्न ठरवायला ",...... सोनल

" काय बोलतेस, मग पुढे काय झालं, त्या संतोषला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का? सरळ आई-वडिलांना घेऊन घरी येतो म्हणजे काय? आणि तू अजिबात त्याच्याशी बोलायचं नाही की चहापाणी येऊनही पुढे जायचं नाही",....... सोनल

" नाही मी नाही गेली चहा पोहे घेऊन त्यांच्या पुढे, काल आमच्या मुलींचं छोटस गेट-टुगेदर ठरलं होतं, मी तयारीच करत होते तिकडे जायची, तेवढ्यात बाहेर गाडी थांबली आणि संतोष त्याच्या आई-बाबांसोबत आला मी नंतर निघून गेली गेट-टुगेदर साठी, संतोष ची आई म्हणजे आक्का आत्या बाबांना खुप फोर्स करत होत्या आमचं लग्न जमवण्यासाठी, पण बाबांनी सांगितलं सोनलच्या मनात जे असेल ते होईल, आम्ही तुम्हाला कळवु नंतर, तर त्या आत्या खूप भांडत होत्या बाबांशी की तुम्ही आमचा अपमान केला आमच्याकडे कुठल्या गोष्टीची कमी नाही, मुलांना खूपच जास्त सूट दिली आहे तुम्ही आणि माझ्या बद्दल म्हणत होते की आम्ही आलो आहोत तरी सोनल कशी कशी बाहेर गेली, पुढे सोनल च लग्न कस होत तेच बघते मी ",...... सोनल

"त्या कोण लागुन चालल्या एवढय़ा, इथे जाऊ नको तिथे जाऊ नको अस काय, मग आता तुझे आई-बाबा काय म्हटले",...... राहुल

" मी काल रात्री बाबांना आपल्या बद्दल सगळं सांगितलं, त्यांनी सगळ ऐकुन घेतल, बहुतेक त्यांना माहिती होत आधी ",...... सोनल

" हो का आपल्याला लग्न करायच आहे ते ही सांगितल का",........ राहुल

" हो, सगळ स्पष्ट बोलले मी",..... सोनल

" पुढे काय म्हटले ते ",...... राहुल

" त्यांनी तुला भेटायला बोलवलं आहे",...... सोनल

" हे छान झाल, मी येईन घरी",..... राहुल

" होईल सगळ ठीक, तू बघ नौकरी च, पण तुला मोठ्या पोस्ट साठी ट्राय करायच होत ना ",...... सोनल

" हो मी नौकरी सोबत देईन पुढच्या परीक्षा, काही तरी करायला हव, आता हे संतोष च प्रकरण पुरे झाल, मला नाही आवडल त्याच अस तुमच्या कडे येण, अगदी मठ्ठ आहे तो संतोष, काय म्हटला तुमच्या कडे आला होता तर येत का त्याला बोलता चार चौघात, मी त्याला सोडणार नाही आता ",..... राहुल

" हे बघ राहुल तू उगीच भांडायला जाऊ नको त्याच्याशी, त्याचे मित्र चांगले नाहीत, मला काळजी वाटते ",...... सोनल

" पण तुझी त्याच्या बरोबरी आहे का, अस कस मागे मागे करतो तो ",...... राहुल

" नाही अजिबात नाही, काहीच नाही बोलता येत त्या संतोष ला चार चौघात, तो गप्प बसून नुसता सगळीकडे बघत होता, जेव्हा मला आक्का आत्यांनी बाहेर बोलावलं तेव्हा संतोष एकदम कसतरी माझ्याकडे बघत होता, मला त्याची नजर अजिबात आवडत नाही राहुल, फार भीती वाटते त्याच्या नजरेची, मी होती तोपर्यंत तो कोणी काही जास्त बोललं नाही, नंतर मला वैभव दादाने सगळं सांगितलं",...... सोनल

" काय कटकट आहे ही आपल्या मागे, निदान आपल्याला हवं तसं सुद्धा आयुष्य जगता येत नाही",....... राहुल खूप चिडला होता

" अगदी असह्य होत मला तो संतोष दिसला की, आणि आता तर त्याच्या विचाराने खूप घाबरते मी राहुल, मला तुझ्या सोबत राहायच, मला नाही आवडत संतोष",..... सोनल

" संतोष कडे जरा बघायलाच पाहिजे, तू सगळ्यांसमोर त्याच्या एक कानफटात मारायला पाहिजे होती, तुझ्या कडे वाकड्या नजरेने बघतो का, कोणाला हक्क नाही आहे अस तुझ्या मनाविरुद्ध तुझ्याकडे बघण्याचा, अगदी मलाही नाही, खूप घाण वागतो आहे संतोष, हे तर मोठ टेन्शन आहे, आता तु नकार दिला तर तो खूपच संतोष खूपच चिडला असेल, आपल्याला खूप सावध राहायला हवं मी आता आजच घरी जाऊन आई-बाबांना आणि माझ्या दादाला तुझ्याबद्दल सगळं सांगतो आपण लग्न ठरवून घेऊ ",...... राहुल

" चालेल, मला सांग काय म्हटले ते, राहुल सगळं ठीक होईल ना? संतोष ची मला खूप भीती वाटते, तो नक्की काही तरी विचारात असणार की आपल्याला आता परत कसा त्रास देता येईल, त्याच घाणेरड वागण त्रासदायक होवु शकत आपल्याला, आणि तुझ्याशिवाय कुणाला सांगू ही शकत नाही सावध रहा तू ही ",...... सोनल काळजीत होती

" तू काहीच काळजी करू नको सोनल आपण वाटलं तर लग्नानंतर शहरात राहू चालेल अशा टेन्शनमध्ये मी नाही राहू शकत",.... राहुल

" जाऊ दे सोड त्या संतोष चा विषय आपण आता हल्ली फक्त संतोष बद्दल बोलतो नेहमी, हे घे तुझ्या साठी",..... राहुल ने सोनल साठी गिफ्ट आणल होत

"काय आहे यात",.... सोनल खुश होती

" तू बघ आवडत का",...... राहुल

सोनल ने गिफ्ट उघडल आत सुंदर अश्या मेटल च्या आॅक्सिडाईज बांगड्या होत्या, बारीक छान डिझाईन च्या, सोनलने लगेच त्या हातात घातल्या, एकदम परफेक्ट आल्या, ना छोट्या ना मोठ्या

" राहुल किती छान आहेत बांगड्या, आज पहिल्यांदा मी अश्या बांगड्या वगैरे घालते आहे",........ सोनल ,

"कश्या वाटल्या ",..... राहुल

"छान आहेत, कुठून आणल्या",..... सोनल

"कॉलेज जवळून घेतल्या, तुझ्या साठी चॉकलेट घ्यायला गेलो होतो, तिथे दिसल्या आवडल्या लगेच घेवून टाकल्या",...... राहुल

" खूप छान केलस, असच मला नेहमी गिफ्ट देत चल",........ दोघ हसत होते,... "चॉकलेट कुठे आहे पण",?

"अरे हो, हे घे" ,.... सोनल खुश होती, ती सारखी हातातल्या बांगड्या शी खेळत होती, दोघ खूप खुश होते

" मला वाटल तू घालतेस की नाही ज्वेलरी",........ राहुल

" एवढ्या प्रेमाने आणल्या वर कोण नाही घालणार ",..... सोनल

राहुल सोनल कडे बघत होता, किती छोट्या छोट्या गोष्टीत खुश होते ही, सोनल ला समजल राहुल तिच्या कडे बघतो आहे, ती छान हसत होती,..... " चल मला घरी सोड",...

...........

राहुल सोनल बोलत होते तेव्हा संतोष च्या मित्राने अविनाश ने त्यांना दोघांना बघितलं त्यांचे फोटो काढून संतोषला पाठवून दिले

"हे बघ हे दोघं मस्त फिरता आहेत, राहुल ची परीक्षा झाली तर कसे भेटत आहेत",..... अविनाश ने मेसेज केला

राहुल सोनल चे सोबत चे फोटो बघून संतोष खूप चिडला,...... "हे बघ प्रशांत काय चाललं आहे",

"मग तू कधी डिसीजन घेणार आहे संतोष",...... प्रशांत

"मला लवकरात लवकरच आता डिसिजन घ्यावा लागेल, हे अजिबात सहन होत नाही, सोनल शी कोणी बोललेलं आता आवडत नाही, त्या राहुल ची परीक्षा झाली म्हणजे आता रोजच भेटतील ते आणि पुढे लग्नही ठरवतील त्याआधी मला माझा नंबर लावायला पाहिजे ",...... संतोष

संतोष ने अविनाश ला फोन केला,...." कुठे दिसली होती सोनल",

" ती राहुल सोबत गाडीने कुठून तरी आली दोघा बराच वेळ देवळा समोर बोलत होते",..... अविनाश

"आता सोनल घरी गेली का",..... संतोष

"हो निघाले ते दोघ ",..... अविनाश

"ठीक आहे मी बघतो काय करायचं ते, लक्ष ठेव सोनल वर काही वाटलं सोनल कुठे गेली की मला कळव",..... संतोष

" ठीक आहे संतोष ",..... अविनाश
..........

राहुल ने सोनल ला घरी सोडलं, तो ती घरात जाईपर्यंत तो बाहेर उभा होता, मोकळं नीट वावरता ही येत नाही या संतोष मुळे, सदोदित त्याचा धाक आमच्या मागे , आज मी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतोच म्हणून राहुल ने त्याच्या भावाला फोन केला

" दादा तू केव्हा येणार आहेस घरी, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे",.....राहुल

" येतोच मी अर्ध्या तासात, का रे काय झाल",..... दादा

"काही नाही थोड काम होत तू घरी आलास की बोलू आपण ",........ राहुल

" तू कुठे आहेस आता घरी आहेस का ",...... दादा

"नाही घरी नाही, मी सोनलच्या घराजवळ आहे",...... राहुल

"मी पण येतोच घरी",..... दादा

राहुल घरी जायला निघत होता, अविनाश आला समोरून

" काय राहुल झाली का परीक्षा ",..... अविनाश

" हो, तू काय करतोस इकडे तू मंदिरच्या त्या बाजूला राहतोस ना ",.... राहुल

" मला काय आता गावात फिरायची बंदी आहे का, इकडे काय करतो म्हणजे ",..... अविनाश

" म्हणजे तू आमच्या मागे येतो आहेस का? पाठलाग करतो का आमचा?, काय चाललय अविनाश हे, तो संतोष चुकीच वागतो आणि तुम्ही फालतू मित्र त्याला सपोर्ट करतात त्यामुळे त्याला असं वाटतं की तो बरोबर करतो आहे, तुम्ही लोकं त्याला समजून का नाही सांगत, की तो चुकतो आहे, त्याच्या पैशावर तुम्ही मजा मारतात म्हणून तुम्ही त्याच्या कुठल्याही गोष्टीला सपोर्ट करतात",...... राहुल चिडला होता

" एक काम का नाही करत तू राहुल, तू कशाला सोनल आणि संतोष च्या मध्ये येतो ते लोक नातेवाईक आहे त्यांचं लग्न जमलेल्या सारखंच आहे, तूच मध्ये मध्ये करतो आहेस आणि मला फुकटचे सल्ले देण बंद कर, मी काहीही करेल कोणाशी बोलेल कोणालाही सपोर्ट करेल आणि गावात कुठेही फिरेन, तुला काय त्याच ",..... अविनाश

" हे बघ अविनाश पहिली गोष्ट मी तुझ्याशी बोलत नव्हतो, मी माझ माझ जात होतो इथून, तूच माझ्याशी बोलायला आलास ",...... राहुल

" हो ना मग बोलून झाले असेल तर निघा आता, मी तुला हेच सांगत होतो की सोनल संतोष यामध्ये मध्ये करू नको, तुला माहिती नाही संतोष मोठी पार्टी आहेत उगाच मी तुला सावध करतो आहे ",...... अविनाश

" आम्ही आमच बघून घेऊ अविनाश थँक्यू सल्ला दिल्याबद्दल, तू जरा चमचे गिरी कमी कर, बाय",........ राहुल
..........

सर्व वाचकांचे आभार...... ❤️

संतोष चा काय असेल प्लॅन, राहुल घरी सांगेल का सोनल बद्दल, ठरेल का लग्न राहुल सोनल च, काय होतय पुढे.......

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now