Dec 01, 2021
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 7

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 7

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 7

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........

सोनल वैभव दादा कडे बघत होती,...... "बोलू का दादा मी आता बाबांशी",

"हो बोल",...... वैभव दादा

" बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे" ,...... सोनल

" बोल ना बेटा",..... बाबा आईकडे बघत होते

"बाबा मला माझ्या आणि राहुल विषयी तुमच्याशी बोलायचं आहे, मी आणि राहुल एकमेकाला पसंत करतो",........ बोलता बोलता सोनल अडखळली,

"सोनल बेटा जे बोलायच आहे ते नीट सांग, इथे काही कोणी परक नाही आहे ",....... बाबा

"बाबा मी आणि राहुल एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्हाला लग्न करायचं आहे, राहुल आमच्या कॉलेज मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आहे, म्हणजे यंदा तो शेवटच्या वर्षाला होता, बाबा राहुल खूप चांगला मुलगा आहे, तो खूप छान वागतो माझ्याशी, अगदी तुमच्या सारखा आणि दादा सारखा चांगला आहे तो बाबा, मी खूप कम्फर्टेबल आहे त्याच्या सोबत ",...... सोनल

बाबा नीट ऐकत होते......

" बाबा आज संतोष ने कॉलेज मध्ये खूप तमाशा केला, तो बर्‍याच दिवसांपासुन त्रास देतोय मला , आजही कॉलेज मध्ये खूप त्रास दिला मला संतोष ने, मी नाही ऐकल त्याच तर घरी आला तो आत्यांना घेवून, संतोष आणि त्याचे मित्र अजिबात चांगले मुल नाहीत, नुसतेच श्रीमंत आहेत ते, बाकी पूर्ण खराब आहे तो वागायला, त्याचे मित्र त्याला सपोर्ट करतात, बाबा आत्या संतोष स्थळ घेऊन आले होते ते मला बिलकुल पसंत नाही, तुम्हाला जर काही हरकत नसेल तर राहुल तुम्हाला भेटायला येणार आहे",...... सोनल

" त्या संतोष ला आक्का ने लाडावून ठेवल आहे, तिच्यामुळे पूर्ण वाया गेला आहे तो पोरगा, काहीही करत नाही तो, उगीच त्रास देतो सगळ्यांना ",....... बाबा

"मला ही संतोष अजिबात आवडत नाही, राहुल च्या घरचे छान शिकलेले लोक आहेत, इंस्पेक्टर रमेश माझ्या ओळखीचे आहेत ",..... वैभव दादा

" हो मी पण ओळखतो त्यांना, तू राहुल ला बोलवून घे भेटायला, तुझी पसंत चांगलीच असेल, मला का हरकत असणार आहे, बोलाव त्याला भेटायला, कुठे भेटले तुम्ही बेटा, कधी पासून ओळखतात एकमेकांना ",....... बाबा आई कडे बघत होते, आई ने मानेने होकार दिला

" बाबा राहुलची माझी ओळख कॉलेज मध्ये झाली , म्हणजे राहुल ने आधी मला पसंत केल, त्याने माझ्या शी बोलायचा प्रयत्न केला, मी नकार दिला होता त्याला आधी, मी आधी बोलत नव्हते त्याच्याशी, थोडे दिवस बघितल मी राहुल वागायला खूप चांगला आहे, अभ्यासात हुशार आहे, मी नकळत त्याच्याशी बोलायला लागले",..... सोनल

बाबा दादा आई तिघे सोनल ची स्टोरी ऐकत होते,

" मी उद्या भेटणार आहे राहुल ला तेव्हा सांगेन मी त्याला की बाबांना भेटायला ये, आम्हाला आहे अजून एक वर्ष लग्न करायला, पुढे शिकायचं आहे आम्हाला, पण तुम्ही म्हणत असाल तर ठरवुन ठेवू सगळ",..... सोनल

" हो चालेल, काही हरकत नाही ",..... बाबा आई कडे बघत होते,

आईने होकार दिला,....." खरच संतोष पेक्षा राहुल खूप छान आहे, मला काळजी वाटते संतोष अजून काय काय करेल काय माहिती, त्या आधी लग्न ठरवुन टाकू यांच, किंवा करून टाकू लग्न, नंतर आरामात शिक काय शिकायच ते ",...

" संतोष चा त्रास वाढत चालला आहे, आपण सांगू रमेश दादाला त्याच्या बंदोबस्त करू, तू काळजी करू नकोस आई ",..... वैभव दादा
.......


संतोष त्याचे आई बाबा मामा सोनल च्या घरून निघाले, सगळे खूप चिडलेले होते, आक्का पूर्ण वेळ गाडीत बडबड करत होत्या ,

" हे बघ आक्का तू काळजी करू नकोस, सोनल तुझी सून होईल मी शब्द देतो, करू आपण काही तरी, आपला मुलगा चांगला आहे ",...... मामा

" अरे भाऊ तू शब्द देवून काय उपयोग, सोनल हो बोलत नाही आणि वैभव आणि त्या भाऊने सोनल ला डोक्यावर बसुन ठेवल आहे, बघितल ना आपण गेलो तर घरी सुध्दा थांबली नाही ती, काय तर म्हणे पार्टी होती, हे अस वागण आहे त्यांच ",..... आक्का आत्या

"एकदा येवू दे आपल्या कडे त्या सोनल ला चांगली सरळ करतो तिला, आणी तिच्या भावाला, आता करू दे नखरे त्यांना करायचे तेवढे, नंतर गाठ आपल्याशी आहे त्यांची, आता सुरुवातीला मी शांत आहे आई , त्या वैभव ला तर मी सोडणार नाही ",...... संतोष चिडला होता, आक्का, मामा कौतुकाने त्याच्या कडे बघत होते

" कधी होईल ते? कधी? आज खूप अपमान झाला आपला तिकडे, एवढे चांगले चांगले स्थळ सांगून आले या संतोष ला, ह्याला काय तीच मुलगी हवी काय माहिती, या संतोष मुळे आपल्याला त्यांच्या दारात जायला लागल ",...... आक्का आत्या

" तू काळजी करू नको आई, सोनल माझी होणार, आज ते लोक एवढे आढेवेढे घेता आहेत, उद्या तेच लोक येतील आपल्या दारात हात जोडत ",..... संतोष खूप चिडला होता

" कधी होणार हे अस काय माहिती ",...... आक्का

घर जवळ आल होत,........

" आई मी जरा येतो जावून दहा मिनिटात", .... संतोष

"गाडी थांबवा, गाडी थांबवा बोललो ना, समजत नाही का",....... ड्रायवर काकानी गाडी थांबवली

" संतोष आता घरी चल, नको जाऊ कुठे",..... आक्का काळजीत होत्या

" आई मी येतो थोड्या वेळाने घरी",..... संतोष

" आता कुठे चालला संतोष? हे बघ डोक्यात राग घालून घेवू नको, घरी चल आता ",..... आक्का आत्या काळजीत होत्या

"येतो थोड्या वेळा त",..... संतोष

"अहो तुम्ही सांगा संतोष ला, मला भिती वाटते, उद्या सकाळी जा मित्रांना भेटायला ",..... आक्का

" संतोष घरी चल आता कुठे जातो आहेस",........ बाबा

"आलो बाबा मी मित्रांना भेटायला जातो आहे, काळजी करू नका ",...... संतोष

" पैसे आहेत का? देवू का? ",...... आक्का

" नको आहेत माझ्या कडे",..... संतोष निघून गेला

संतोष....... संतोष अरे ऐक, ...... आक्का रडायला लागल्या,...... "कस झाल माझ पोर, किती काळजी लागून राहिली त्याला, कुठे जाणार तर नाही ना हा, काय ते लोक तो वैभव, भाऊ, सोनल कसे वागत आहे संतोष बरोबर",...

" अरे पण मग तुम्ही कशाला जात आहे सारखे त्यांच्या दारात स्थळ घेऊन, इतर स्थळांची काही कमी आहे का, समजत नाही का तुम्हाला, कशाला त्रास करून घेतात ",.... बाबा

"अहो पण संतोषला सोनलच आवडते, त्याच्या मनाप्रमाणे करायला काय हरकत आहे, असे कितीदा गेलो तिकडे आपण, थोड फार चालायचं ",..... आक्का संतोष गेला तिकडे वाकून बघत होत्या

" हो मग उगीच काही बोलू नकोस, संतोष च वागणं चुकत आहे, जर त्या मुलीचा नकार असेल तर बळजबरी करण्यात काही अर्थ नाही, आणि तू सुद्धा चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देत जाऊ नकोस, समजून सांग जरा संतोषला, आता आपण गेलो होतो देशमुखांकडे तर त्यांच्या वागण्यावरून असंच वाटलं की त्यांना संतोष चा प्रस्ताव पसंत नाही तर बळजबरी करण्यात काहीही अर्थ नाही आणि पुरे झाला आता हे सोनल प्रकरण, जरा काही काम आहे की नाही, संतोष ला जरा दुकानात लक्ष द्यायला सांग आता ",...... बाबा चिडले होते, चला गाडी चालवा.....

" तू काळजी करू नकोस आक्का, मी बघतो संतोष कुठे गेला आहे ते ",..... मामांनी फोन लावला.... हा पिंट्या..... कुठे आहेस तू.... संतोष वर दुरून लक्ष ठेव,.... हो हो रागात आहे तो जरा,.... सांभाळ जरा,.... हो आत्ताच्या आत्ता जा तिकडे....... आणि फोन कर.....

आता आक्कांना बर वाटत होत

" हे बघा असे साथ देतात तुझे भाऊ तुला, तुम्ही त्या पेक्षा समजून सांगा तुमच्या बहिणीला त्या पोरी चा नाद सोडा आणि आपल आपल काम करा",...... बाबा

गाडी पुढे निघाली तशी आक्का अजून टेन्शन मध्ये होत्या पोरानी डोक्यात राग नको घालून घ्यायला

"काही होणार नाही तु घाबरू नकोस, तो त्याच्या मित्रांना भेटतो आहे तू टेन्शन घेऊ नको ",..... मामा

" एकुलता एक पोरगा आहे माझं मला खूप काळजी वाटते आहे त्यांची",..... आक्का

"तो केवढा लेचापेचा नाहीये तू अजिबात काळजी करू नको आक्का",..... मामा
.......

संतोष ने थोड पुढे जावून मित्रांना फोन लावला

प्रशांत ने फोन उचलला

" कुठे आहे प्रशांत तू आत्ताच्या आत्ता मला मंदिराजवळ येऊन भेट",..... संतोष

" काय झाल आहे संतोष, काही प्रोब्लेम आहे का",...... प्रशांत

" माझ ना डोकं सटकल, सांगतो भेटल्यावर ये लवकर तू मी थांबतो आहे ईथे",....... संतोष

दहा मिनिटात प्रशांत तिथे आला, संतोष मंगेश बरोबर बोलत उभा होता

" काय झालं संतोष काही प्रॉब्लेम झाला का",..... प्रशांत

संतोष ने तिकडे काय झालं ते सगळ सांगायला सुरुवात केली ....... "आपल ठरल तसं मी आज सोनलच्या घरी गेला होतो",.....

" मग काय झालं पुढे",...... प्रशांत

" काय होणार आहे, सोनल ने आणि तिच्या घरच्यांनी मला नकार दिला, तिचा भाऊ खूप बोलला मला, एवढ डोकं फिरलं आहे ना माझं, असं वाटतं काय करून काय नाही, स्वतःला काय समजतात ते लोक, चांगली अद्दल घडवायची आहे त्यांना, मला कमी समजतात का, त्या वैभव दादा सारखे दहा ऑफिसर नौकरी ला ठेवू शकतो आम्ही ",...... संतोष खूप चिडला होता

"आता डोक्यात राग घालून घ्यायची वेळ नाही, काहीतरी करायची वेळ आहे, शक्ति पेक्षा उक्ती वापर करायला पाहिजे आता, तू चिडू नको बर संतोष ",...... प्रशांत

" चिडू नको म्हणजे काय, पुढे करता येईल आता, तू तिथे हवा होता, तू बघायला हव होत माझ काय झाल तिथे ते ",..... संतोष

" तुला सोनल हवी आहे ना",..... प्रशांत

" हो मला तिच्याशीच लग्न करायचं आहे, ती हो म्हटली काय किंवा नाही म्हटली तरी मला फरक पडत नाही, आता काय करता येईल",....... संतोष

प्रशांत एकेक गोष्ट सांगत होता संतोष मंगेश नीट ऐकत होते

" पण असं करता येईल का",...... संतोष

" हो मग नाही करता येणार, आता मागे हटायच नाही, आता तू हार मानली तर सोनल हातची जाईल, आणि त्यानंतर तू सोनल शी लग्न करणार आहेस ना",...... प्रशांत

" हो प्रश्नच नाही, मला सोनल शी लग्न करायचा आहे", तिच्या घरचे ते नाक घासत आले पाहिजे माझ्या मागे ", ....... संतोष

"मग काय हरकत आहे रिस्क घ्यायला, ती तुझी होणारी बायको आहे, तुझ्याबरोबर आधी राहिली काय नंतर राहिली काय",...... प्रशांत

"पण थोडी जरी गडबड झाली तरी जेल ची हवा खावी लागेल",...... संतोष थोडा घाबरला होता

" तुला कोण अटक करणार, एवढे श्रीमंत तुम्ही, तुझ्या घरून एक फोन गेला की घरी आणून सोडतील तुला ",..... प्रशांत

संतोष जरा चेहरा जरा उजळला होता, आता त्याला थोडं बरं वाटत होतं, काहीतरी होवु शकत, संध्याकाळी तर एकदमच असं वाटत होतं की सगळं हातचं गेलं, आता जरा आशा आहे, तो जरा वेळाने घरी गेला..

आक्का आत्या पुढे बसून संतोष ची वाट बघत होत्या, संतोष घरी आल्यावर त्यांना बरं वाटलं, संतोष जाऊन आई जवळ बसला

" हे बघ संतोष तू खूप विचार करू नकोस, याच्या पेक्षा भारी भारी स्थळ मी तुझ्या साठी घेऊन येईन, सोनल पेक्षा सुंदर पोरी बघू आपण",...... आक्का समजावत होत्या

"आई मला आता सहा महिने लग्न करायचं नाही, नंतर बघू, मी आता आपल्या शेती कडे लक्ष देणार आहे, बाबांना मदत करणार आहे दुकानात, आणि तू सांगशील ते ऐकेन मी या पुढे ",........ म्हणून संतोष आत गेला

आक्का आत्यांना आता बरं वाटत होत, चला पोरगा टेन्शन मध्ये नाहीये, नंतर अजून चांगले स्थळ बघता येतील, आहेत बर्‍याच ओळखी, अश्या थाटामाटात लग्न करेन मी संतोष च सगळे बघत बसतील

माई ओ..... माई... संतोष आला त्याचा ताट करा, संतोष हात पाय धुवून ये, केव्हा च काही खाल्ल नाही त्याने.......

पण संतोष च्या मनात वेगळाच प्लॅन शिजत होता तो त्याच विचारात होता की पुढे काय करता येईल.......
.........

सोनल ला रात्री झोपच येत नव्हती, एकदा नाही म्हणून जाण्यासारखा संतोष नाहीये याची तिला पूर्ण कल्पना होती, आज तर तो गेला त्याच्या घरी पण उद्या तो तेवढ्याच ताकतीने वापस येईल, आपला दुश्मन खूप मोठा आहे ह्याची कल्पना तिला होती, संतोष ची नजर किती घाण, कसा बघतो तो माझ्याकडे, नकोस झाल आहे आता हे संतोष प्रकरण, राहुल शी लवकर करून घेवू का लग्न की संतोष ला एवढ घाबरायला नको, काय करू सुचत नाही,

उद्या कधी राहुल चा पेपर संपतो आणि त्याला सगळं सांगते असं तिला झालं होतं तोपर्यंत शक्यतोवर एकट्या-दुकट्या कुठे जायचं नाही असा सोनल ने विचार केला

जगात काही बाकीच्या मुली नाहीये का? संतोष ला माझ्याशीच का लग्न करायचा आहे?, एवढ काही प्रेम नाहीये त्याचं माझ्यावर, उगीचच मी नाही म्हणते म्हणून सुड घेतल्यासारखं माझ्या मागे लागला आहे, त्याला मी कशी सुखात राहील राहुल सोबत हे अजिबात पटत नाहीये अस वाटतय, पण माझ मत माझी आवड याला काही किम्मत नाही का, संतोष चा विचार करून सोनलच्या ऋदयात धडकीच भरली, पुढे काय वाढून ठेवलंय काय माहिती........ राहुल मला तुझ्या सोबत रहायच आहे, काहीतरी कराव लागेल....... मी काही संतोष ची प्रॉपर्टी नाही, तो त्याला हवं तसं माझ्याशी वागू शकत नाही, मी तेच करणार जे मला योग्य वाटतं,.... पॉझिटिव्ह विचार करून सोनल ला आता बरं वाटत होतं....

.....
बघु पुढच्या भागात काय होतय ते.....

चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करण कितपत योग्य आहे, जर संतोष च्या मित्रांनी त्याला सपोर्ट नसता केला तर तो व्यवस्थित वागला असता का ?? काय वाटतय.....


❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now