Dec 01, 2021
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 6

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 6

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 6

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........

वैभव दादा संतोषला बघून चिडला होता, तो आवरायला आत आत जात होता,

आत्याने हाक मारली,....." वैभव अरे ये इकडे येवून बस, जरा बोल आमच्याशी ",

" हो येतो आत्या फ्रेश होवुन ",...... वैभव

" आई एक मिनिट आत येतेस का",.....

आई आत आली

"कश्याला आले आहेत हे संतोष आत्या मामा आपल्या कडे आता ",...... वैभव

"बहुतेक सोनल ला बघायला आले आहेत, मुलांनी काही तरी ठरवल अस त्या आक्का बोलत होत्या ",....... आई

"सोनल कुठे आहे",..... वैभव

"ती गेली मैत्रीण कडे आज पार्टी आहे",....... आई

" सोनल ला माहिती आहे का? की हे लोक इथे आले आहेत ते ",...... वैभव

"हो ते आले तेव्हा घरी होती सोनल , आणि चिडली आहे ती खूप ",..... आई

"सोनल ला पसंत नाही हे स्थळ, तिला संतोष अजिबात आवडत नाही ",...... वैभव

" हो माहिती आहे मला ते, पण आता आले ते लोक तर काय करणार ",...... आई

" बाबांना सांगीतलं का जास्त बोलू नका म्हणा, चहा करून कटवुन द्या त्यांना",.... वैभव

"हो माहिती आहे त्यांना",.... आई
.....

आई चहा नाश्ता च बघायला आत गेली, वैभव दादा बाहेर येवून बसला, तसा संतोष थोडा घाबरला, त्या बाजूला मामा जवळ सरकून बसला

" संतोष काय कसे गेले पेपर, या वर्षी पास होणार ना",........ वैभव दादा

संतोष आणी आक्का आत्या त्याच्याकडे रागाने बघत होत्या , सोनल चे बाबा... संतोषचे बाबा कधी नव्हेत ते बोलायला मिळाल्या सारख गप्पा मारत होते

आई चहा घेवून आली

"भाऊ ऐ भाऊ आम्ही इथे सोनल चा हात मागायला आलो आहोत आधी ते बोलू, वहिनी तू ये ग बस अशी",..... आक्का आत्या

"हे काय आता नवीन आक्का, हे बघ आक्का सोनल च लग्न आम्हाला इतक्यात करायचा नाही",..... बाबा

"नका ना करू, पण ठरवून ठेवू, सुपारी फोडून घेवू कुठे आहे सोनल बोलवून घ्या तिला",...... आक्का आत्या

" काय करतोस तू संतोष फ्युचर प्लॅन काय आहे तुझा",..... वैभव

"मी शिकतो आहे दादा ",...... संतोष

" मग तू स्वतः आई बाबांवर अवलंबून आहेस तर इतक्यात का लग्न करतोस",...... वैभव

" कसली कमी आहे घरी, सगळ त्याच आहे ना वैभव, अजून काय करेल तो ",..... आक्का आत्या

"त्याला तर बोलू दे आत्या, तूच का सगळं बोलते आहेस, लग्न संतोष ला करायचा ना",..... वैभव

" इथे काय परीक्षा सुरू आहे का माझ्या मुलाची, काय करतोस काय शिकतोस",..... आक्का आत्या

" काही गोष्टीत आमचे विचार ठाम आहेत आत्या, त्याच म्हणून घर चालवायला काही कर्तव्य आहे की नाही, काय करतोस अजून तू संतोष माझ्या बहिणीला कस पोसणार ",..... वैभव

" घरच सगळ नीट असतांना मग काय बळजबरी नौकरी करेल का? एवढ सगळ असून सुद्धा सारख काय करतोस... काय करतोस अस सुरू आहे तुझ वैभव ",....... आक्का आत्या

" ते सगळं तुम्ही कमावलेलं आहे आत्या, वैभव ने काय केल? त्यात उद्या जर तुम्ही त्याला घराबाहेर काढलं किंवा काही संकट आल तर काय राहील त्याच्याकडे ",.... वैभव

" पण आम्ही कशाला त्याला घराबाहेर काढू? जे आहे ते सगळं त्याचंच आहे",.... आक्का आत्या

" पुढची वेळ सांगून येत नाही, आपले शिक्षण आपली हुशारी हीच आपली पुंजी असते तिच आयुष्यभर कामाला येते",.... वैभव

" मग तुला काय वाटतं वैभव, संतोष कमी हुशार आहे का? त्याला काहीही येत नाही का ",...... आत्या

" ते त्यालाच माहिती, हे असे विचार तुमचे आत्या, तू मला आणि संतोष ला काही बोलू देत नाही आहेस",...... वैभव

" वैभव एक मिनिट तू एवढ चिडू नकोस, आक्का अग हा लग्नाचा निर्णय एवढ्या घाईत नाही घेता येणार नाही आणि आमच्या साठी जे सोनल ठरवेल तेच आम्ही करू" ,..... बाबा

" अरे पण भाऊ तुझ्या मुलीच आमच्या कडे काही वाईट होणार नाही, एवढ काय तुम्ही लोक विचार करता आहात" ,.......आक्का आत्या

"आक्का अस नाही, हा निर्णय मोठा आहे असा अचानक नाही घेता येणार",..... बाबा

"भाऊ तू खूप अति सुट दिली आहे मुलांना, मुलांवर जरा कंट्रोल ठेव, बघितलं का वैभव कसा बोलत आहे आमच्याशी",....... आक्का आत्या

" आक्का तुला राग आला असेल तर मी तुझी माफी मागतो",.... बाबा

"काय गरज आहे बाबा माफी मागायची, मी थोडी काही चुकीचं बोललो आहे, माझी बहीण ज्या मुलाला द्यायची आहे तो मुलगा काय करतो हे विचारण माझं कर्तव्य आहे आणि त्यात काहीही चुकीचं नाही, आता यांचा संतोष काहीच करत नाही त्याला आपण काय करणार, तुम्ही संतोषला समजवायला पाहिजे, तो रोज कॉलेज ला काय करतो, कोणासोबत असतो, ते कधी विचारता का तुम्ही त्याला, ते सोडून तुम्ही आमच्या वरच का रागवता आहेत",..... वैभव चिडला होता

" वैभव जरा थांबणार का",..... आक्का आत्या

" का थांबू मी, तुमच्या मुला मुळे कॉलेज मध्ये इतर मुलींना किती त्रास होतो ",..... वैभव दादा

......... तसा संतोष घाबरला, सोनल ने याला सगळ सांगितलेल दिसतय,

" भाऊ वैभव ला काही सांग, किती बोलतो आहे तो संतोष ला ",..... आक्का आत्या

"काय चुकीच बोलतो आहे आम्ही आक्का, आपण नीट वागायला पाहिजे बाहेरच्या जगात, आपल्या मुळे इतरांना त्रास नको व्हायला, तुला माहिती आहे का आक्का संतोष कॉलेज मध्ये रोज सोनल आणि तिच्या मैत्रिणींना त्रास देतो, काय रे संतोष बरोबर बोलतो ना मी ",..... बाबा चिडले होते

तसा संतोष खूप घाबरला, तो आक्कांन कडे बघत होता

" कोणी काहीही सांगत आणि तू ऐकतो, दादा अरे कॉलेज मध्ये असत मोकळ वातावरण ",....... आक्का

" मला माहिती नाही का ते, पण सहज बोलण आणि त्रास देण यात फरक आहे ना, सोनल ला पूर्ण आयुष घालवायचा आहे तिचा निर्णय महत्त्वाचा आहे आणि वैभव पण बरोबर बोलतो आहे आम्ही चौकशी तर करणारच ना की संतोष काय करतो? काय रे संतोष पुढच्या पाच वर्षासाठी तुझे काय प्लॅन आहेत ",..... बाबा

" आधीही दिलेली परीक्षा तर पास होऊ द्या त्याला",..... वैभव

" वैभव दादा तू जरा थांब",..... बाबा

आक्का आत्या रागाने वैभव कडे बघत होत्या संतोषला तर असो झालं होतं कधी निघू तिथून, तो सारखा आक्कांन कडे बघत होता

"अरे मग भाऊ आमच्या घरी कसली कमी आहे, सोनल ची आत्या आहे मी, काही त्रास होणार नाही तिला आमच्या कडून, घरात गडी आहे कामाला, स्वैपाकाला बाई आहे, रोज भाजी जाते मार्केटला, पोल्ट्री फॉर्म आहे, सोनल हुशार आहे ती आणि संतोष बघतील सगळा कारभार, तिचं काही वाईट होणार आहे का? आता आम्ही संतोष च लग्न झाल की रिटायर होणार आहोत, सोन्याने मठवु तुझ्या पोरीला, केवळ आमच्या संतोष ला ती सोनल आवडली म्हणून हे सगळ सुरू आहे माझ, नाही तर एवढ मी कोणाच ऐकून घेत नाही, बर्‍याच गड्यांना पोसतो आम्ही, त्यांचे कुटुंब आमच्या वर अवलंबून आहेत, आम्ही असे तसे लोक आहोत का",..... आक्काचा तोंडाचा पट्टा सुरू होता

"आम्ही आत्ता निर्णय देऊ शकत नाही आक्का, आम्हाला आधी सोनल शी बोलावे लागेल",...... बाबा

" बोलवा मग तिला कुठे आहे ती, एवढ आम्ही आलो आहे ते आमच्याशी बोलायचं सोडून कसली ती पार्टी करत बसली आहे, कुठे गेली आहे ती हे तरी माहिती आहे का",..... आक्का

"हे बघा आत्या तुम्ही सोनल बद्दल काहीही बोलू नका बरं",..... वैभव

"वैभव तू थांब, आक्का आजच तिची ची परीक्षा संपली आहे, येईल थोड्या वेळात घरी मग बोलू आम्ही सगळे ",.... बाबा

" म्हणजे तुम्ही आम्हाला जा सांगता आहात, काही ठरत नाही आपल आज काही, आम्ही सुपारी फोडायच्या तयारीने आलो होतो, आमचा या पद्धतीने अपमान झाला आहे आज",...... आक्का आत्या

" त्यात काय झाला अपमान आक्का तू उगीच अंगावर ओढून घेते ",.... बाबा

" आमच्या संतोषला तालेवार घराण्यातले स्थळ येत आहेत, पण त्याला सोनल पसंत आहे म्हणून इथे आलो तुझ्या उंबरठ्यावर जोडे झिजवायला, तर तुम्हा लोकांना आमची किंमत नाही, बघतेच मी बाकी ठिकाणी कसं होतं तुझ्या मुलीचं लग्न, आता तर मला फारच राग आला आहे",..... आक्का आत्या

" आक्का हे बघ या लग्नाच्या गोष्टी योगा योगा च्या असतात, एका रात्री ठरतात का असा राग डोक्यात घालू नको, आली आहेस तर दोन घास खा शांत बस आणि आरामात जा उगीच चिडचिड करू नकोस ",..... बाबा

"नको तुझे दोन घास मला, अरे पण भाऊ संतोष ने आधीच सोनल ला पसंत केल आहे ना, ते तरी बघ",..... आक्का

" तुम्ही का बळजबरी करताय, सोनलची पसंती महत्त्वाची नाही का? तिलाही संतोष पसंत पडायला पाहिजे की नाही? एका बाजूने तर नाही ना होऊ शकत नात ",...... बाबा

" का मग तुमच्या मनात कोणत दुसरं स्थळ आहे, एवढं चांगलं स्थळ तुम्ही हातच जाऊ देत आहात आणि प्रेम काय लग्नानंतर ही होत, आपल्या वेळी कुठे भेटलो होतो आपण लग्नाच्या आधी एकमेकांना, काहो",...... आक्का संतोष च्या बाबांना विचारत होत्या

त्यांनी नुसती मान हलवली.....

" चला हो, चल संतोष आता इथे बसण्यात काही अर्थ नाही",..... सगळे उठले

वैभव दादा सगळ्यांकडे रागाने बघत होता तो आत निघून गेला,

" हे बघा आक्का राग मानू नका ",..... सोनल ची आई

" वहिनी तू समजूतदार आहेस, समजून सांग या तिघांना, एवढ ताठ असून चालत का?, तुला वाटत ना तुझ्या पोरीच चांगल व्हाव ऐक मग, मी करते तुला फोन उद्या वहिनी, तेव्हा बोलू ",...... आक्का

संतोष आई बाबा मामा निघून गेले दादाने
......

वैभव दादाने सोनल ला फोन केला,...... " ते लोक गेले आहेत, आणि भांडण झाल छोट इथे, ते बोलता आहेत की आमचा अपमान झाला ",

" बर झालं दादा ते लोक गेले, कोणी बोलावलं होत त्यांना आपल्या कडे स्थळ घेवून, उगीच न बोलवता स्वतः येतात आणि आपण कशाला अपमान करू त्यांचा, उलट तेच आपल्याला त्रास देतात , अजून काय म्हणत होते ते ",.... सोनल

"अपेक्षित होत त्याप्रमाणे तुझा हात मागायला आले आले होते ",.... वैभव दादा

"मग बाबा काय म्हटले",.... सोनल

" त्यांनी सांगितलं की ते तुझ्याशी बोलतील आधी, मग ठरवतील काय करायचं ते, बाबा रागवले संतोष ला",..... बाबा

" दादा मी बाबांना सांगून देवू का सगळ राहुल बद्दल , नाही तरी तुला आणि आई ला सांगितल आहे मी, तुला काय वाटतय? एकदा मोकळ सांगितल म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही पुढे",....... सोनल

"हो बोलून बघ, बाबा ऐकतील, बहुतेक माहिती असेल त्यांना, आईने सांगितल असेल ",..... वैभव दादा
..........

सोनल ने फोन ठेवला, इकडे मुलींची पार्टी खूप रंगात आली होती, मसाले भात असा मस्त झाला होता, मठ्ठा भजी मस्त एकदम, गप्पांना ऊत आला होता, एका बाजूला गाणी सुरू होती, मध्ये मध्ये रिनाच्या होणार्‍या नवर्‍याचा फोन येत होता, सगळ्या मुली तिला त्रास देत होत्या, ती सगळ्यांना न जुमानता फोन वर बोलत होती

पाहुणे गेले बाबांना आठवलं की आपण बोललो होतो सोनल ला की जिलेबी घेऊन जाऊ,.... "मी आलोच पाच मिनिटात",

" कुठे निघाला आहात तुम्ही दादा",.... वैभव दादा

" मुलींना बोललो होतो मी सात वाजता जिलेबी घेऊन येईल, आता जिलेबी नेऊन देतो, जेवण झाल नसेल त्यांच",........ बाबा

बाबा जिलेबी घेवून आले, सोनल ला बाहेर बोलावलं, बाबांनी जिलेबी दिली

"बाबा तुम्हाला लक्षात होत जिलेबीच",.... सोनल

" हो बेटा ",..... बाबा

"Thank you बाबा, तुम्ही माझ्या छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घेतात ना ",...... सोनल

"तुझ्या साठी काहीही बेटा ,..... बाबा

"गेले का बाबा आक्का आत्या आणि संतोष",...... सोनल

" हो बेटा गेले ते",...... बाबा

" का आले होते ते",..... सोनल

"बोलू बेटा तू घरी आली की",...... बाबा

" हो, बाबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे माझ्याबद्दल, एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगितली नाही ",....... सोनल
.
" ठीक आहे बेटा तू इथलं कार्यक्रम आटपून घे नंतर घरी आल्यावर बोलू ",...... बाबा

"ठीक आहे बाबा ",...... सोनल

सोनल जिलेबी घेऊन आत गेली, छान जेवण झालं सगळ्यांचं, खूप मजा आली, सगळं आवरल

खूप छान झाला आपला प्रोग्राम मुलींनो खूप मजा आली,

"चल प्रिया मी निघते मला बाबांशी बोलायच आहे जरा राहुल बद्दल , टेंशन येतय ग ",..... सोनल

" हो सगळ सांग नीट काकांना राहुल बद्दल, आणि संतोष किती घाण मुलगा आहे ते ही सांग, उद्या बोल राहुल शी आणि मेन म्हणजे एकटी कुठे फिरू नकोस, काही वाटल तर मला बोलाव मी येईन तुझ्या बरोबर ",...... प्रिया

सोनल घरी वापस आली, बाबा तिची वाटच बघत होते, आई आणि बाबा पुढे बसून टीव्ही बघत होते, दादा काही तरी करत होता

सोनल आत आली, आवरुन झाल, झालेल्या पार्टीबद्दल ती भरभरून बोलत होती, कोणी काय केल, कसा झाला होता स्वैपाक, सगळ सांगत होती, सोनल आल्यामुळे घरात एक आनंद भरून आला होता, आई, बाबा, वैभव दादा, सगळे कौतुकाने सोनल जे सांगेल ते ऐकत होते, किती बडबड करते ही सोनल, थोड्या वेळापूर्वी याच घरात आक्का आत्या मुळे मोठ भांडण झालं होतं हे ते तिघे विसरून गेले

बघु पुढे काय होतय ते......

.......

संतोष चा काय असेल प्लॅन? , सोनल ला काही धोका आहे का? , का तो सोनल ला नीट राहू देत नाही, हे प्रेम आहे का की त्याच्या अहंकार, तुम्हाला काय वाटतय मित्रांनो........

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now