Dec 08, 2021
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 5

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 5

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 5

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........

सोनल.... सोनल,

सोनल भराभर पुढे चालत होती,

"सोनल थांब एक मिनिट, मला बोलायच आहे तुझ्याशी",..... संतोष

"संतोष प्लीज मला तुझ्याशी बोलायच नाही, आज परीक्षा संपली नको ना मूड घालवूस",..... सोनल

तरी संतोष बोलत होता....

"कसे गेले पेपर सोनल , खूप बोर झाल मला घरी एवढय़ा दिवसात, मी सोडू का घरी तुला चल, थोड बोलायच आहे मला तुझ्याशी",...... संतोष

"नको संतोष, मी नाही बोलते ना, नको येवुस मागे, आम्ही बस ने जाऊ",...... सोनल

"मी तिकडे येतो आहे तुझ्या गावाला, मला यायच आहे घरी तुझ्या, तुझा हात मागायला आणि तुझ्याशी थोड बोलायच होत पर्सनल, प्लीज थोडा वेळ दे ना मला, चल सोबत जाऊ कार ने",....... संतोष

" हे बघ संतोष एक गोष्ट मी स्पष्ट सांगते, मला तुझ्यात काहीही इंट्रेस्ट नाही, उगीच तू मध्ये मध्ये करू नकोस आणि जर लग्नच विचारायला आला तर मी सगळ्यांन समोर तुला नकार देईल, माझ्या घरचे माझ्या मना विरुद्ध नाही वागणार तेव्हा नीट वागायचं आणि माझ्या पासून लांब रहायचा, मी केव्हाच बोलते आहे ना की नको मागे येवुस, नको बोलू माझ्याशी ",.... सोनल चिडली होती

" सोनल काय ग अस? माझ्या शी बोलू नको, हे नको, ते नको अस का करतेस, एकदा तू माझा नीट विचार करून बघ, अग काय नाही माझ्या कडे, एकुलता एक आहे मी, भरपूर शेती आहे आमची , दुकान, दूध डेअरी, पोल्ट्री फार्म, काय हवय अजून? मी राणी सारख ठेवेन तुला, किती मोठ्या मोठ्या घरचे स्थळ चालून येत आहेत मला, पण मला तूच हवी आहेस ",..... संतोष

" तू होकार देवू शकतो त्या स्थळांना , आणि पैसा सगळ काही नसतं संतोष, मन जुळायला हव, प्रेम वगैरे काही आहे की नाही",..... सोनल

" आहे ना मग माझ तुझ्यावर प्रेम",..... संतोष

" तेवढ् पुरेसे आहे का? माझ ही हव ना तुझ्यावर प्रेम आणि आपले विचार जुळत नाहीत, किती वेळा सांगू ",...... सोनल

" प्लीज मला एक चान्स दे तू म्हणशील तस करेन मी",......संतोष

"नाही संतोष तुला नाही जमणार नीट वागायला, आत ही बघ पान खावून किती घाण वास येतो आहे तुझ्या जवळ,
मला जाऊ दे प्लीज उगीच वाद नको",..... सोनल

संतोष बाजूला झाला

सोनल निघून गेली

" काय म्हटली सोनल, झाल का काही बोलण",...... प्रशांत

"बोलली प्रेम नाही तुझ्यावर, माझ्याशी बोलू नकोस, आपले विचार जुळत नाहीत वगैरे ",........ संतोष

" मग कोणावर आहे प्रेम तीच, तो राहुल की काय",...... प्रशांत

" माहिती नाही, माझ डोक चालत नाही, ती बोलते की लग्नासाठी दोघांचा होकार हवा , मी काय करू प्रशांत मला सोनल हवी आहे, माझ खूप प्रेम आहे तिच्यावर ",...... संतोष

" त्या राहुल ची परीक्षा उद्या संपेल ना? तो आज बिझी असेल, तू एक काम कर ना संतोष तू आज तुझ्या आई-वडिलांना घेऊन सोनल कडे जा आणि लग्नाचे बोलणे उरकून टाक, परीक्षा संपली की उगीच सोनल राहुल भेटतीलच आणि काहीतरी ठरवतील त्यापेक्षा तिच्या आई-वडिलांच्या मनात तुझ्याविषयी सॉफ्ट कॉर्नर तयार कर, आजच तुमचं लग्न ठरव ",...... प्रशांत

" हो असंच करतो मी, पण सोनलचे आई वडील त्या वैभव दादा सारखे नको निघायला ",..... संतोष

" निघू दे रे जसे निघायचे तसे, तुला सोनल शी लग्न करायचा आहे ना, त्या बाकीच्यांन शी जास्त संबंध येणार नाही तुझा, आणि एकदा लग्न जमल की होतात सगळे नीट ",...... प्रशांत

"हो ते ही आहेच, आणि आमच्या कडे कसली कमी नाही सोनल सुखात राहील, तिच्या आई बाबांना हेच हव असेल ",........ संतोष स्वतःलाच चांगल म्हणवुन घेत होता

" मग मिळेल तुला सोनल बायको म्हणून, आणि जरी तिच्या घरच्यांनी नकार दिला तुला तरी एक वेळ अशी येईल की तिचे आई बाप पाया पडतील तुझ्या की सोनल शी करा लग्न",..... प्रशांत

" अस होवू शकत का? पण कस सांग तरी", ....... संतोष खुश होता

" सांगेन मी तुला वेळ आली की, माझ्या कडे एक प्लॅन आहे, चल कॅन्टीन मध्ये भूक लागली आहे, आधी तू आई बाबांना घेऊन तिच्या घरी जाऊन ये, तरी ते सोनल च्या घरचे नाही म्हटले तर मी सांगतो काय करायचं ते ",...... प्रशांत

"ठीक आहे",..... संतोष आता खुश होता
......


बस आली सोनल, प्रिया, रीना, मीनल बसमध्ये बसल्या....

"किती बकवास आहे हा संतोष, त्याला तू एकदा सांगितल ना मागे येवू नको म्हणून, तरी का त्रास देतो तो आणि त्याचे ते मित्र किती खराब आहेत वागायला, ते उकसवत असतात त्याला, मला अस वाटत आहे सोनल तू आज घरी जाऊन संतोष बद्दल सगळं सांगून दे घरी, खूप वाढत चालली आहे त्याची दादागिरी ",.... प्रिया

"अग सांगितला आहे बऱ्याच वेळा घरी, त्यादिवशी पण सांगितलं मी बाबांना, बाबा बोलले की मी बोलतो आक्का आत्याशी, माहिती नाही त्यांनी आत्याला फोन केला होता की नाही, वैभव दादाला ही मी सांगितल आहे संतोष बद्दल, आज परत बोलावंच लागेल मला दादा शी",..... सोनल वैतागली होती

"नसतील बोलले बहुतेक काका तुझ्या आत्या शी, संतोष खूप वाया गेलेला आहे, हट्टी आहे, तुला धोका आहे त्याच्या पासून सोनल, काळजी घे",...... प्रिया

" हो जरा अति झालं आहे आता, उद्या राहुल ची परीक्षा झाली की मी त्याला भेटणार आहे, तेव्हा राहुल ला सांगते की रमेश दादा ला सांग जरा संतोष चा बंदोबस्त करायला ",...... सोनल

" बर होईल, राहुलचा भाऊ पोलीस आहे ना, त्यांना सांगाव लागेल की एकदा जरा चांगला हिसका दाखवून द्या त्या संतोष ला",..... प्रिया

" संध्याकाळी भेटायच ना आपण मुलीनी, आपल्या गेट टुगेदर च फिक्स आहे ना ",..... रिना

परत एकच उत्साह वाढला....

" हो मग नक्कीच आज पार्टी करायची, आणि ठरलेल सामान आणायच सगळ्यांनी पार्टी साठी ",.... प्रिया

हो..... सोनल

" परत उद्या तुला वेळ नाही सोनल, राहुलची परीक्षा होईल, तो असेल तुझ्या सोबत ",.... प्रिया हसत होती

" चूप ग, आम्ही काय दिवसभर सोबत असणार आहे का ", ..... मनातून सोनल खूप खुश होती

"पण आता खरच वेळ नका घालवू तुम्ही, राहुल आणि तू साखरपुडा करून घे ग लवकर",...... प्रिया

सोनल छान हसत होती, तिच्या मनात तेच होत, बरेच दिवस झाले राहुल भेटला नाही, उद्या राहुल भेटला की सांगू त्याला की आपण लवकरात लवकर लग्न जमवून ठेवू , विचार करून तिला छान वाटत होत, राहुल चा विचार केला की छान वाटतं, तेच संतोष चा विचार मनात आला की राग चीड भीती हेच वाटतं, किती फरक आहे दोघांमध्ये

"सगळ्यांनी सांगितलेले भांडी आणा आणि वेळेवर या, आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप धमाल करू या ",....... प्रिया

हो...... सगळ्या मैत्रिणी आनंदात होत्या

त्या 5-6 मैत्रीण मिळून स्वतः स्वैपाक करून जेवणार होत्या, मस्त मसाले भात, मठ्ठा, भजी चा बेत होता, तेवढच छोटस सेलिब्रेशन, आणि खूप सार्‍या गप्पा... बाकी काही नाही.....

सोनल घरी आली, आई बाबा कामात होते , परीक्षा झाल्या मुळे सोनल खुश होती

" आज एकदम रिलॅक्स वाटतय परीक्षा झाली तर, आई मोठ पातेल थोड सामान हव",..... सोनल पार्टी च्या तयारीला लागली

"कसा गेला ग पेपर सोनल, एवढी काय घाई आहे ग तुला, आधी घेवून घे ",...... आई

"चांगला गेला, अजून काय सामान हव मी प्रियाला विचारते",...... सोनल

"ठीक आहे घेवून जा सामान , कुठे आहे पार्टी",...... आई

"मीनल च्या शेतात ",..... सोनल

" बाजूला आहे तीच घर, मी जिलेबी आणून देतो सात वाजता",...... बाबा

"चालेल बाबा ",..... सोनल

सोनल ला अस झाल होत काय करू काय नाही ,......

" सोनल अग थोड जेवून घे आधी आणि दोन कप चहा टाक",....... आई

"हो आई ",...... सोनल

सोनल ने जेवून घेतल, सगळ सामान गोळा केल, एकदा आई ला रेसीपी नीट विचारून घेतली,

" भजी बनवताना नीट ग सोनल, लांब थांब गरम तेला पासून",...... आई

"हो आई, मीनल च्या शेतातील मावशी करणार आहेत मदत तळण करायला ",...... सोनल

" ठीक आहे ",..... आई

सोनल तयार व्हायला आत गेली

अर्धा एक तास झाला.....

बाहेर गाडी थांबली तेवढ्यात, सोनल ने वाकून बघितल संतोष त्याच्या आई वडिल मामा सोबत आला होता

काय कटकट आहे ही , का आले हे लोक आता, संतोष आता अति करतो आहे, सरळ घरी आला हा, त्याला काय वाटल त्याच्या आई बाबांना सोबत आणून त्याच काम होईल का, मी जाणार आहे माझी माझी गेट टुगेदर ला, एकदा नाही सांगून समजत नाही का त्याला

"आई मला जायच आहे पार्टी ला",...... सोनल

"हो मला माहिती आहे सोनल, जा ना मग",..... आई

"बाहेर बघ, आक्का आत्या संतोष ते आलेत, मला त्याच्याशी लग्न करायचं नाही, वचन देवू नको काही बाबांना हि सांग, आज दुपारी संतोष ने कॉलेज मध्ये खूप तमाशा केला, मी नकार दिला तर आता सरळ घरी आला ",...... सोनल

"सांगितलं नाही मग तू आल्यावर आणि आता कशाला आले ते लोक इथे ",..... आई

" काय सांगणार ग नेहमी नेहमी, खूप त्रास आहे संतोष चा ", ........ सोनल

" तरी सांगायच ग, एकटी किती सहन करणार तू, संतोषची ही हिम्मत आज अगदी घरी आला तो , मी बाबांना सांगते, त्यांना चहा पाणी करून घालवू बरोबर, तू काळजी करू नकोस ",...... आई

आई बाहेर गेली, बाबा संतोष आणि त्याच्या आई बाबांन सोबत आत आले, संतोष सोनल कुठे आहे ते बघत होता

" कसे गेले पेपर संतोष, दिली ना परीक्षा या वर्षी ",..... बाबा

" हो मामा, चांगले गेले पेपर ",...... संतोष

बाबानी बघितल एकदम चटपटीत शर्ट घातला होता संतोष ने, अगदी आता दुकानातून आणल्या सारखा नवीन, तोंडाला पानाचा वास येत होता, बाबांनी तोंड वाकडं केल ते आक्का आत्याने बघितल

" आज कसे काय आले इकडे, काही काम होत का ",...... बाबा

"अरे भाऊ आता या मुलांनी काही ठरवल आहे, तेच बोलायला आलो आहोत आम्ही",.... आक्का आत्या

"म्हणजे, कोणी ",..... बाबा

"तुला काही माहिती नाही का भाऊ",..... आक्का आत्या

"नाही", ..... बाबा

"बोलू त्यावर, सांगते आत तर येवू दे आम्हाला ",...... आक्का आत्या

चला...... बाबांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होत

"सोनल नाही का घरी ",... आक्का आत्या

"आहे ना, वैभव गेलाय ऑफिस ला",...... बाबा

वैभव दादा च नाव ऐकुन संतोष चा चेहेरा कसातरी झाला, बर झाल ऑफिस मध्ये आहे तो, लवकर नकोच यायला तो

" बोलवा सोनल ला",..... आक्का आत्या

सोनल बाहेर आली..... तस संतोषचा चेहरा उजळला, तो नीट उठून बसला, आक्का आत्या बघत होत्या संतोष कडे, त्या खुश होत्या

"ये ग बेटा इकडे बस, किती सुंदर दिसते आहे सोनल, बर्‍याच दिवसांनी बघितल हिला, आता ये ग बाई लवकर घरी, आता होत नाही माझ्या कडून काम , येवून सगळा व्यवहार घे बाई हातात, मग तू जाणे आणि सगळी कामे जाणे, मी आरामात राहणार आहे ",..... आक्का आत्या आई कडे बघत होत्या

सोनल गडबडली होती,

संतोष खूप खुश होता, तो खाली बघत होता, बाबा प्रश्नार्थक मुद्रेने आई कडे बघत होते

" मला बाहेर जायचा आहे, आमच मैत्रीण च गेट टुगेदर आहे",..... सोनल

" मैत्रीणींन सोबत रोज असते तू सोनल, आज बघ कोण आल आहे, बस जरा आमच्या जवळ आरामात ",..... आक्का आत्या

"आई काय आहे हे",.... सोनल चिडली होती

बाबा त्या दोघींकडे बघत होते

"सोनल तू जा",..... बाबा बोलले

संतोष ती गेली तिकडे बघत बसला, तो आक्का आत्यांनकडे बघत होता

" थांबू द्या ना सोनल ला इथे, आम्हाला तिच्याशी बोलायचा आहे ",..... आक्का आत्या

" हो येते सोनल थोड्या वेळात",.... बाबा

सोनल आत चालली गेली, नंतर ती सामान घेवून मैत्रीण कडे गेली, पण तरी तीच लक्ष लागत नव्हत, आई बाबा काय बोलत असतिल आत्याशी, आज संतोष ने कॉलेज मध्ये किती तमाशा केला, राहुल ला ही काही सांगता येत नाही, त्याच्या उद्या पेपर आहे, उगीच टेंशन घेईल, का माझ्या मागे लागला आहे हा संतोष, किती हा त्रास, वैताग आला आहे

"काय ग अशी बसलीस सोनल",...... प्रिया

"प्रिया अग घरी संतोष त्याचे आई बाबा मामा स्थळ घेवून आले आहेत यार, काय कटकट आहे बघ ना माझ्या मागे, सारख टेंशन",...... सोनल

"हो ना, तरी तू आज खूप बोलली होतीस ना संतोष ला, तरी काय घरी आला तो, तू नको प्रेशर घेवू, तू बोलली आहेस ना तुझ्या आई शी, त्यांनी सांगितल असेल बाबांना" ,...... प्रिया

" हो बोलली मी आई शी, आई बोलेल बाबांशी, तरी टेंशन आहे ग",...... सोनल

" नाही तरी तुझे बाबा तुला विचारल्या शिवाय पुढे काही ठरवणार नाही ना, काळजी करू नकोस ",..... प्रिया

" हो ते आहेच ",..... सोनल

" मग तू तेव्हा राहुल बद्दल सांगून दे सगळ तुझ्या बाबांना आणि संतोष आणि राहुल मधून कोणालाही राहुल आवडेल, काळजी करू नकोस आपण एन्जॉय करू पार्टी",..... प्रिया
.............

आक्का आत्या अजुन रागात होत्या......

" भाऊ आम्ही आलो तरी तू अस सोनल ला बाहेर पाठवून दिल, तुला माहिती आहे ना आम्ही का आलो आहोत ते ",...... आक्का आत्या

" मला नाही माहिती, काय झालं ",..... बाबा

तेवढ्यात वैभव दादा आला ऑफिस मधून, पाहुण्यांना बघून त्याच्या कपाळावर आठ्या होत्या, तो रागाने संतोष कडे बघत होता, ..........

......

काय होईल पुढे संतोष सोनल च लग्न जमेल का? की बाबा ही सोनल ची बाजू घेतील? ...... काय वाटतय तुम्हाला? हे असं एखाद्याच्या मागे बळजबरी फिरण चांगलं आहे का?❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now