Dec 01, 2021
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 4

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 4

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 4

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........

राहुल सोनल खूप आनंदात होते.......

"मी आजची ही संध्याकाळ कधीच विसरणार नाही सोनल, तुझा होकार माझ्या साठी खूप महत्त्वाचा होता, आपण एकमेकांनची साथ कधी सोडायची नाही",...... राहुल

"हो राहुल",...... सोनल छान हसत होती

"चल मी निघतो आता ",.......... राहुल घरी गेला, सोनल आत आली, दादा स्वैपाकाची तयारी करत होता

" दादा मी करू का मदत ",...... सोनल

" नको मी कुकर लावतो भाजी करतो आई करेल आल्यावर पोळ्या, तुला अभ्यास असेल तर कर तू ",...... दादा

" दादा thank you, तू खूप सपोर्ट करतो मला ",....... सोनल

"चांगला आहे ग राहुल, हुशार आहे, एक दिवस तो खूप मोठ्या पोस्ट वर असेल बघ, आणि मेन म्हणजे तो तुझ्या वर खूप प्रेम करतो तो , कायम साथ देईल तो तुला, आपल्याला अजून काय हवं, आयुष्यात एक चांगला जोडीदार असण खूप महत्त्वाच आहे ",...... दादा

" हो दादा, खूप मेहनती आहे राहुल आणि स्वभावाने खूप चांगला आहे ",...... सोनाली खुश होती

जरा वेळाने आई बाबा आले, पोळ्या झाल्या, जेवण झाल, सोनल अभ्यासाला बसली, ती तिच्या विचारात होती, सारखं राहुल शी, झालेल बोलण तिला आठवत होत, मला राहुल सोबत रहायच आहे, काहीही झाल तरी, मी माझ आयुष्य त्याच्या शिवाय दुसर्‍या सोबत घालवण्याचा विचार करू शकत नाही, आई बाबांना लवकर सांगायला हव आता राहुल बद्दल, वैभव दादाला तो आवडला म्हणजे आई बाबांना हि बहुतेक काही प्रॉब्लेम नसेल, आई आली आवरुन, सोनल अभ्यास करते आहे बघितल आणि झोपायला गेली

" लवकर झोप सोनल, उगीच जागत बसू नकोस",..... आई

" हो आई",...... सोनल
................

कॉलेज मध्ये सगळ शिकवून झाल होत, गरज असली तर कॉलेज ला या अस सांगितल सरांनी, सगळ्यांचा अभ्यास जोरात सुरू होता

आठ दिवसांनी.......

बाबा दुकानातून घरी आले, सोनल अभ्यास करत होती, आईने जेवणाची तयारी केली

" सोनल चल जेवून घे, चला सगळ्यांनी ",..... आईने ताट केले, दादा आला, बाबा आले

"परीक्षा जवळ आली ना सोनल कसा सुरू आहे अभ्यास",.... बाबा

"सुरू आहे बाबा, झाला आहे अभ्यास जवळ जवळ ",...... सोनल

"हुशार आहे बाळ माझ",...... बाबा

सोनल अजून बाबांन जवळ सरकून बसली, दादा आई कौतुकाने बघत होते सोनल आणि बाबांकडे.....

"बाबा आता परीक्षा आता खूप जवळ आली आहे ,आम्ही सगळे अभ्यासाला लागलो आहोत बाबा , फायनल सब मिशन होऊन प्रॅक्टिकल परीक्षा ही झाली, आता कॉलेजला फक्त फायनल परीक्षेसाठी जायच आहे",...... सोनल

"ठीक आहे बेटा नीट अभ्यास कर",...... बाबा
.......

कॉलेज जरी नसल तरी सोनल, प्रिया, रीना, मीनल मधून मधून एकमेकीला भेटत होत्या, कधी कधी एकमेकीकडे अभ्यासाला जात होत्या, छान एकत्र फिरून येत होत्या, तेवढच फ्रेश होत मन, आणि अभ्यासाला डबल हुरूप येतो

रविवारी रिनाला बघायला पाहुणे आले, सगळ्या मैत्रिणी दिवस भर रिना कडे होत्या, तीच लग्न जमल, परीक्षा झाली की लगेच लग्न आहे एका महिन्यात, छोटासा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम ही झाला,

आज काल रिना वेगळ्याच मूड मध्ये असते, प्रिया, सोनल स्वाती, माधुरी, मीनल सगळ्या मैत्रिणी सांगून सांगून थकल्या की अभ्यासावर लक्ष दे, तरी काही रिनाला लक्ष्यात येत नव्हत, दिवसभर ती एक तर फोन वर बोलत असायची किव्वा गाणे ऐकत बसायची...

"सोनल तुझ ही राहुल सोबत लग्न जवळ जवळ ठरल आहे, तुला ही असाच वाटत का ग, अभ्यास करू नये फक्त स्वप्नाच्या दुनियेत रममाण व्हाव वगैरे, तू सारखं राहुल चा विचार करतेस का, आणि फोन वर बोलतेस का नेहमी, आमच काही ठरलं नाही लग्न, आम्हाला हा अनुभव नाही अजून म्हणून विचारल ",...... प्रिया

"नाही ग बाई अस काही नाही, ही रिना अति करते, जाऊ दे नवीन नवीन लग्न जमल आहे करू दे एन्जॉय ",....... सोनल

" अग पण पास झाली तर बर आहे, लग्ना नंतर येईल का ती परीक्षेला, उगीच थोड्या साठी मार्क जातील",...... प्रिया

" कोणी काय करायचं आपण नाही सांगू शकत, पण तुझ बरोबर आहे, आधी अभ्यास नीट करायला हवा मी बोलते रिना शी ",...... सोनल

सोनल प्रिया जरा बोलल्या रिना शी,...." हे शेवटच वर्ष आहे आपल रिना , नंतर अभ्यास होणार नाही, थोड्या दिवसांचा प्रश्न आहे, अभ्यास कर छान" ,...... त्या नंतर रिना जोरात अभ्यासाला लागली
.........

आज बर्‍याच दिवसांनी राहुल ला भेटायला सोनल देवळात गेली होती,

" कसा सुरू आहे अभ्यास सोनल ",..... राहुल

" झाला आहे जवळ जवळ, तुझा कसा सुरू आहे अभ्यास ",...... सोनल

" माझा खूप आहे सिलॅबस , करतो आहे अभ्यास , काय करणार घरात बोर होत, बर झाल तु भेटायला आलीस ",..... राहुल

"हो ना, कॉलेज नाही तर बोर झाल आता",..... सोनल

"हो ना आपली भेट होत नाही, तुझी भेट झाली की मी रीचार्ज होतो, अजून अभ्यास करायला एनर्जी मिळते ",..... राहुल

" चल काही तरी तुझ",.... सोनल

" अग खर मी आज या संध्याकाळची एवढी वाट बघत होतो ",..... राहुल

दोघ मंदिरच्या मागच्या बाजूला गार्डन मधे बोलत बसले होते, सोनल ला राहुल बरोबर बोलताना बाजूच्या मावशींनी बघितलं

" राहुल या आमच्या बाजूच्या मावशी आहेत, त्या आता लगेच जाऊन सगळ आईला सांगतील काय करू मी",...... सोनल

"अजिबात घाबरू नको जर आईने विचारलं तर सांग की राहुल दिसला होता देवळात",....... राहुल

" मला निघावं लागेल, तू कधी भेटणार आहे आई बाबांना",...... सोनल

"आपली परीक्षा झाली की मी भेटणार आहे, आपल ठरल आहे ना तस ",...... राहुल

" हो... तरी टेंशन येत रे",..... सोनल

"तू जास्त विचार करू नको, आपण काही चुकीच नाही करत आहोत ",...... राहुल

सोनल घरी आली,

"काय ग देवळात गेली होती का सोनल",..... आई विचारत होती

" हो आई देवळात गेलो होतो फिरायला आम्ही मैत्रिणी आणि तिकडे मला राहुल भेटला होता ",...... सोनल

" राहुल कसा काय आलेला तिकडे ",..... आई

" आई अग आमचं देवळात भेटायचं ठरलं होतं",...... सोनल

आई सोनल कडे बघत होती....

" आई मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, दादाला सांगितलं आहे मी, मला राहुल आवडतो आणि परीक्षा झाल्यानंतर तो तुम्हाला भेटायला येणार आहे, तुझं काय म्हणणं आहे यावर",...... सोनल

" चांगला आहे ग राहुल, काही हरकत नाही माझी , जे काही कराल ते सांगून सवरून करा, तुझे बाबा बघितलं ना किती भोळे आहेत, एका गोष्टी ने ही ते आपल्याला ही आणि दुसऱ्याला दुखवत नाही त्यांना त्रास होईल असं काही वागू नकोस",...... आई

" नाही आई आम्ही परस्पर काहीही करणार नाही, राहुल त्याच्या आई-बाबांना सोबतच भेटायला येणार आहे आणि तुम्ही जे म्हणाल तसं होणार आहे आणि माझं बाबांवर खूप प्रेम आहे, मला माहिती आहे मी बाबांना त्रास होईल असं काहीही वागणार नाही आणि दादा म्हणतो तस पुढच्या परीक्षेची तयारी पण मी करते आहे लग्न झालं म्हणजे संपलं सगळं असं नाही ",...... सोनल

" चालेल तुम्ही दोघांनी काय विचार केला असेल तसं करा, माझी तर काही हरकत नाही, तू तुझ्या दादा आणि बाबांशी बोलून बघ ",.... आई

" तू ही तेवढीच महत्त्वाची आहेस माझ्या साठी आई, तुझ मत महत्त्वाच आहे, तुझी हरकत नाही ना",..... सोनल

" नाही ग राहुल चांगला मुलगा आहे, मला माहिती आहे त्याच्या घरच्यांची ",..... आई

"Thank you आई, मी परीक्षा झाल्यानंतर बोलणार आहे बाबांशी",..... सोनल

" ठीक आहे, चल जेवणाची तयारी करून जेवून घे आणि अभ्यासाला बस ",...... आई

आज आईशी बोलून सोनल ला खूप बरं वाटत होतं, बर झाला आईला सगळं स्पष्ट सांगून टाकलं, उगीच हो नाही करण्यात काही अर्थ नाही आणि गोष्टी लपवल्या तर चुकीचा अर्थ लावला जातो, त्या पेक्षा स्पष्ट बोलल ते बर

बाबा घरी आले जेवण झालं, सोनल अभ्यासाला बसली दादा ही ऑफिस च काम करत होता, आई बाबा त्यांच्या रूम मध्ये गेले

"अहो आज सोनल परत राहुल ला भेटली होती म्हणे देवळात",...... सोनल ची आई

"कोणी सांगितल तुला",...... बाबा

" बाजुच्या ताईं देवळात गेल्या होत्या त्यांनी सांगितल, नंतर सोनल ही सांगत होती की ती देवळात गेली तिकडे राहुल आला होता, तेव्हा भेट झाली",..... आई

"अग मग आला असेल तो देवळात, आता का त्याला गावत फिरायला बंदी आहे का ",...... बाबा

"अस नाही पण सोनल बोलत होती तिला राहुल आवडतो तिने तस वैभव ला ही सांगितल आहे म्हणे, परीक्षा झाल्यावर तो त्याच्या आई बाबांन सोबत येणार आहे आपल्या कडे बोलणी करायला ",...... आई

"चांगल आहे ना मग ही तर आनंदाची बातमी आहे ",.... बाबा

" काही हरकत नाही ना",..... आई

" नाही, काही प्रॉब्लेम नाही, चांगला आहे मुलगा, त्याच्या घरचे चांगले आहेत, शिकलेले लोक आहेत, काही हरकत नाही, पण तू हे सोनल ला सांगू नकोस आपल बोलण झाल ते ",...... बाबा

"ठीक आहे",...... आई

" आणि तू आता हल्ली एवढ टेंशन का घेते सगळ्या गोष्टीच, आज जेवणात ही तुझ लक्ष नव्हत ",...... बाबा

" नाही हो आता नाही घेणार टेंशन, पण अस वाटत पोरांच कस होईल ",...... आई

" काहीही प्रॉब्लेम नाही, मुल हुशार आहेत आपली, चांगल होणार त्यांच, मी आहे ना तू सगळ माझ्यावर सोडून मोकळ हो बर ",....... बाबा

" तुमच्याशी बोलून बर वाटत मला",...... आई

" एक सांगायच आहे तुला वैभव साठी एक चांगल स्थळ सांगून आल आहे, दुपारी अण्णा आला होता गावाहून बाजारात भेटला, त्याच काही तरी काम होत कोर्टात ",......बाबा

" घरी नाही आले का ते मग ",...... आई

" नाही घाईत होता तो",..... बाबा

" कोणत आहे स्थळ ",..... आई

"त्याच्या साडुची मुलगी आहे, डिटेल्स दिले आहेत, शिकलेली आहे मुलगी ग्रॅज्युएट आहे, आपण वैभव ला विचारू त्याचा काय विचार आहे ",..... बाबा

" अहो किती छान बातमी दिली तुम्ही ",......आई

दोघ खुश होते.....

"हे घे आजचे भाजीचे पैसे",..... बाबा

"आईने पैसे कपाटात ठेवून दिले",..... आई

दुसर्‍या दिवशी सकाळी.....

"दादा ऐ दादा, मला 500 Rs दे ना प्लीज",...... सोनल

का ग,........ वैभव दादा

"उद्या आमची मुलींची पार्टी आहे घरघुती, उद्या परीक्षा संपेल ना मग आम्ही मीनल कडे स्वैपाक करणार आहोत",....... सोनल

" अरे वा कश्याला करताय स्वैपाक, बाहेरून मागवा जेवण, अजुन घेवून जा पैसे",...... वैभव दादा

"नको दादा आमच ठरल आहे, स्वतः करायचा स्वैपाक, मजा येते तशी ",...... सोनल

" ठीक आहे अजून काही लागल तर सांग",...... वैभव दादा

हो...... सोनल

" झाला का अभ्यास उद्या चा ",....... दादा

" हो दादा all set आता जरी पेपर दिला तरी फूल मार्क्स येतील ",..... सोनल

गुड लक....... दादा

बाबा आले बाहेर, आई बाबा वैभव दादा जवळ येवून बसले

" वैभव अरे तुझ्या साठी एक स्थळ सांगून आल आहे, हे बघ डिटेल्स, बघून घे नीट, ते लोक बोलता आहेत आमंत्रण द्यायला येवू का, आज संध्याकाळ पर्यंत सांग ह, आत फोटो ही आहे ",..... बाबा

वैभव दादा एकदम गडबडला, आई बाबा सोनल त्याच्या कडे बघत होते,

सोनल खूप आनंदात होती,....... "दादाच लग्न, आई तू बघितला का फोटो वहिनी चा",..

आईने मानेने होकार दिला....

बघु मला.........

आई बाबा बाहेर शेतात काम सुरू होत तिकडे अंगणात गेले

सोनल आता वैभव दादा कडे हसून बघत होती, दादा पूर्ण गोंधळून गेला होता

" अभ्यास वगैरे काही नाही का तुला सोनल",..... दादा

"दादा बघु ना फोटो वाहिनीचा",...... सोनल

" चल जा ग",.... दादा

"अरे प्लीज दादा, आणि लाजतोस काय",... सोनल

"सोनल मी ओरडेन ह तुला जा ना",..... दादा

"दादा आपण दोघ मिळून बघु या का फोटो",..... सोनल

दादा ने पाकीट उघडल खूप सुंदर लाल साडीतल्या मुलीचा फोटो होता, छान दाट केस, हसरा चेहरा, पेपर वर डिटेल्स होते, नाव निशा, ग्रॅज्युएट होती, पुढे कॉम्प्युटर डिप्लोमा सारखा कोर्स करून एका कंपनीत होती कामाला, ती कंपनी इथून अर्धा तासात होती, तिकडून पुढे निशा चा घर अर्धा तासावर होत

"कशी वाटली वहिनी दादा",.... सोनल

तसा दादा उठून आवरायला निघाला,

सोनल मागे मागे गेली,..... "दादा सांग ना प्लीज",.....

"सोनल मला उशीर होतो ऑफिस ला जायला",..... वैभव दादा

"तसही तुझ आज ऑफिस मध्ये मन लागणार नाही, सुट्टी घेतोस का",...... सोनल

"परीक्षा जवळ आली ना, अभ्यास कर चूप चाप",.... वैभव दादा

दादा एनव्हलप घेवून ऑफिस ला गेला, ......

आई बाबा बाहेरून बघत होते, सोनल ने त्यांना इशारा केला, सगळे हसत होते

दिवसातून दोन तीनदा सोनल ने दादाला फोन करून विचारल,....." दादा सांग ना आवडली का वहिनी",

" सोनल तुला काही काम नाही का?, अभ्यास करत जा जरा",...... दादा ने फोन ठेवून दिला

संध्याकाळी दादा घरी आला, आई सोनल बाहेर बसुन त्याची वाट बघत होते, बाबा घाईने आत आले, दादा आवरुन आला, तिघे दादा कडे बघत होते

"अरे असे काय बघतात तुम्ही सगळे माझ्या कडे ",...... वैभव दादा

" तुला आवडली का निशा ",.... आई

" दादा काहीतरी तर सांग ",...... सोनल

हो..... तिघांच्या चेहर्‍यावर आनंद होता

"मग जाऊ या आपण रविवारी त्यांच्या कडे",.... आई

"सोनल ची परीक्षा झाल्यावर जाऊ",..... दादा

"चालेल मी तस कळवतो त्यांना ",.... बाबा

"दादा आज मी खूप खुश आहे, चांगला डिसिजन घेतलास तू, आई बाबा ही किती खुश आहेत ",........ सोनल
.......

आज शेवटचा पेपर ,सोनल प्रिया रिना, मीनल सगळ्या टेंशन मध्ये होत्या, विषय अवघड होता, पण पेपर छान गेला,

परीक्षे दरम्यान संतोष जरा ताळ्यावर होता, त्यामुळे सोनल ला ही बर वाटत होत, पेपर झाला सुट्टी लागली, सगळी कडे उत्साहाचा वातावरण होत, राहुल ची परीक्षा झाली नव्हती, दुसर्‍या दिवशी पेपर होता म्हणुन तो आला नव्हता, संतोष ला बर झाल, सोनल प्रिया रिना निघाल्या घरी यायला तसा संतोष मागे आला

सोनल...... सोनल.........

..................

बघु पुढच्या भागात काय होत ते......

राहुल आज नाही आला कॉलेज ला याचा फायदा घेईल का संतोष, बोलेल का तो सोनल शी.......

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now