बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 3

सोनल थांबली राहुल तिच्या जवळ आला सोनल ने त्याच्या हात हातात घेतला,......" मला तू खूप खूप आवडतो आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तुझ्या सोबत रहायच आहे, माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर, इतक की तुझ्या शिवाय मी कोणाचा विचार करू शकत नाही, I Love You ",...बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 3

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........

दुसऱ्या दिवशी सकाळी सोनल कडे परत तीच धावपळ झाली, परत सोनल ने घाई घाईने आवरल,

"सोनल लक्ष दे ग कॉलेज मध्ये, संतोष परत काही बोलला तर लक्ष दे, एकटी दुकटी कुठे फिरू नकोस ",...... आई काळजीत होती

" हो आई, आज बाबांना सांग आक्का आत्या शी बोलायला",......... सोनल

दादाने मोटर सायकल वर सोडल स्टैंड वर, यावेळी राहुल वेळेवर आलेला होता, दादा त्याच्याकडे बघत होता, राहुल ने हसून दादा ला नमस्कार केला, बस आली, सगळे बस मध्ये बसले,

" सोनल तुझी बरी हिंमत झाली दादाशी बोलायची",...... राहुल

"माझा दादा खूप छान आहे, तो नेहमी मला सगळ्या गोष्टी सपोर्ट करतो, दादा ची काही हरकत नाही पण दादा बोलत होता की तुला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, अभ्यासाकडे लक्ष दे",..... सोनल

"हो ते जरुरीच आहे, अभ्यास करिअर महत्त्वाचं आहे, आमच्या घरात पण शिक्षणाला खूप महत्त्व आहे",..... राहुल

सोनल ला आता खूप छान वाटत होतं, चला चांगला आहे शिकले-सवरलेले लोक आहेत, पुढे काही अडचण येणार नाही नौकरी केली तरी, पुढे कस असेल आपल आयुष याचा विचार करून सोनल आता लाजत होती

" तू दादाला जाऊन भेटून घे राहुल",...... सोनल

" हो..... कधी भेटू, मला नर्वस वाटतय ",...... राहुल

"वैभव दादा खूप चांगला आहे राहुल, काळजी करू नकोस, केव्हा ही भेट त्याला",...... सोनल
........

सगळे कॉलेजला आले, नेहमीप्रमाणे संतोष झाडाखाली उभा होता, तो सोनल कडे बघत होता, सोनलने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि ती वर्गात जाऊन बसली,

"काय मग संतोष आज जायच ना त्या राहुल च्या वर्गात ",...... प्रशांत

हो...

" चल मग कसली वाट बघतोस",...... प्रशांत

..........

संतोष ने ठरवल आज सोक्षमोक्ष लावायचाच, राहुल उगाच मधे विलन बनुन आला आहे, त्याला दूर करायला पाहिजे, मला सोनल हवी आहे काहीही झाल तरी, संतोष त्याच्या मित्रांसोबत तो राहुलच्या वर्गात गेला,

राहुल नुकताच वर्गात पोहोचला होता, तो त्याच्या गोड विचारात होता, बर झाल सोनल ने वैभव दादाला सांगितल माझ्या बद्दल, आपणही घरी थोड थोड बोलायला पाहिजे सोनल बद्दल, निदान दादा वाहिनीला तरी सांगायला हव, चान्स मिळाला की सांगू हळू हळू, एकदम धक्का बसेल त्यांना...

" राहुल जरा बाहेर ये मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे",.... संतोष

संतोष ला बघून राहुल च्या कपाळावर आठ्या आल्या, हा कश्याला आला आता इथे, काय कटकट आहे ही....

" हे बघ संतोष तु जा बर इथून , कुठल्याही विषयावर मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही, हे बघ वर्गात तमाशा नको, मला या गोष्टीसाठी अजिबात वेळ नाही, माझ आता लेक्चर सुरू होणार आहे, इथे गडबड नको, तु मला आणि सोनल ला त्रास देणं बंद केलं",...... राहुल

" ऐ राहुल तु घाबरतो का मला, संतोष आणि त्याचे मित्र मोठ्याने हसत होते, तू आणि सोनल म्हणजे काय, कोण लागते ती तुझी, हे बघ राहुल मला सोनल शी लग्न करायचं आहे ती माझ्या मामाची मुलगी आहे, दूर रहायच तिच्या पासून, समजल का ",..... संतोष

" बस एवढच आहे का तुझ कॉलिफिकेशन, की तु सोनल च्या नात्यातील आहे ? तू काय केल आहेस आयुष्यात संतोष? निदान सोनल ला आवडेल असं काहीतरी कर आणि मग तिला मागणी घाल, उगीच बळजबरी का मागे फिरतो तिच्या, पण पहिली गोष्ट जर आपण दुसऱ्याला आवडतच नाही आहोत तर का मागे मागे करायचं ",...... राहुल

" ये राहुल तू मला शहाणपणा शिकवू नको, मी फक्त तुला एवढंच सांगायला आलो आहे की तू सोनल बरोबर यापुढे दिसला नाही पाहिजे, नाहीतर माझ्याहून कोणी वाईट नाही समजल का ",...... संतोष धमकी देत होता

" तू मला बोलण्यापेक्षा सोनल ला विचार की तिला कोणासोबत राहायचं आहे, आणि असल्या फालतू गोष्टीसाठी मला वेळ नाही समजलं का, आणि हे असे मित्र सोबत घेऊन मला धमक्या वगैरे द्यायच्या नाहीत, माझ्यात काय धमक आहे ना मी तुला वेळेवर दाखवून देईन, यापुढे माझ्या क्लास मध्ये यायचं नाही, नीघ आता ",...... राहुल

संतोष मित्रांसकट रागाने निघून गेला, ते मुलं कॅन्टीन मध्ये जाऊन बसले........

"आता काय रे संतोष राहुल अजिबात ऐकत नाही आहे, बराच चिडला होता तो आज ",....... प्रशांत

"कसं नाही ऐकत नाही तो राहुल बघतो मी, त्याचे हात पाय तोडल्यावर त्याला सगळ समजेल",...... संतोष

"तुला माहिती नाही का संतोष, राहुलचा भाऊ रमेश पोलीस इन्स्पेक्टर आहे, आज राहुल नी घरी जाऊन तुझ्याबद्दल कंप्लेंट केली तर उद्या तुला त्याचा भाऊ जेलमध्ये टाकू शकतो",..... प्रशांत

" काय बोलतोस तु, मला माहिती नव्हतं, तरीच एवढ्या हिमतीने मला उलट उत्तर देत होता तो, काय करू या, म्हणजे हा मार्ग जवळ जवळ बंद झाला, आता दुसरा मार्ग काहीतरी निवडायला पाहिजे",..... संतोष

" मी काय म्हणतो संतोष, तुला सोनल शी लग्न करायच आहे ना, मग कशाला दुसऱ्या तिसर्‍या शी बोलतो, सरळ सोनलच्या घरी जा आणि तिला लग्नाची मागणी घालायला, सोबत आई-बाबांनाही घेऊन जा, कधीकधी आई-बाबा असले की काम सोपं होऊन जातं आणि तसं तुमच्याकडे कुठल्या गोष्टीची कमी नाही, आणि तुम्ही नात्यातले ही आहात ",..... प्रशांत

संतोष विचार करत होता ही आयडिया खूप चांगली आहे, उगाच सोनलच्या मित्र-मैत्रिणींशी बोलत बसण्यापेक्षा सरळ सोनल आणि तिच्या घरच्यांशी बोलायच आपण आता, तिच्या घरचे फार शहाणे आहेत पण, स्वतःला फार हुशार समजतात आणि मला मठ्ठ ......

" पण सोनल चा भाऊ वैभव दादा मोठा ऑफिसर आहे, खूप शिकलेला आहे तो, त्याच्या पुढे बोलताना माझी त त फ फ होते आणि तो खूप बोर आहे, तो जेव्हा भेटला ना तेव्हा अभ्यासाबद्दल परीक्षे बद्दलच बोलत असतो, आपलं काहीच ऐकून घेत नाही, त्याचं चालू असत, जेव्हा मी त्याला सोनल चा हात मागेल ना तेव्हा तो आधी मला विचारेल कि तू करतो काय ",..... संतोष

" बरोबर आहे ना संतोष, कोणी ही असच विचारेल, तू काहीतरी सांग की तू तुझ्या पप्पाच्या दुकानात बसतो, शेतीचा व्यवहार हँडल करतो, आणि आज पासून जरा घरात लक्ष द्यायला सुरुवात कर म्हणजे मग तिथे तुझे पप्पा म्हणतील की हो ह्याने कामाला सुरुवात केली आहे, तोपर्यंत आपली परीक्षा ही होईल आणि मग तू मागणी घालायला जा",...... प्रशांत
............

कॉलेज झाल, राहुल सोनल प्रिया रिना सगळे घरी यायला बस स्टॉप वर आले

" आज संतोष माझ्या क्लास मध्ये आला होता मला उगीच धमक्या देत होत्या ",........ राहुल

" आता अति झाल संतोष च, मग पुढे काय झालं",...... सोनल

" मग काय मी बोललो त्याला खूप, पण हे अस किती दिवस चालू राहणार, आपल्याला लवकरच काही तरी डिसिजन घ्यावा लागेल, आज माझ फार डोक खराब झाल आहे ",........ राहुल

" हो संतोष देतो खूप त्रास, मला तर अगदी तो डोळ्या समोर नकोसा वाटतो ",...... सोनल

" मी आधी वैभव दादा ला भेटतो, आणि आपण घरी ही सांगू, आणि ठरवून टाकू लग्न, वाटल तर तुझ शिक्षण झाल्यावर करू लग्न पण ठरवून ठेवू, मला आता संतोष पासून धोका वाटतोय, तुला काय वाटतंय सोनल ",........ राहुल

" ठीक आहे, बरोबर बोलतो आहेस तू ",..... सोनल लाजत होती
.........

सोनल घरी आली, आई बाबा बाहेर गेले होते, बाजूच्यांन कडून चावी घेतली, आत जावून आधी दार लावून घेतल, वैभव दादा ला फोन लावला

"दादा तू तेव्हा येणार आहेस घरी ",..... सोनल

" येतो अर्धा एक तासात, घरी कोणी नाही का, आई बाबा केव्हा येणार आहेत ",....... वैभव दादा

"त्यांना रात्र होईल, काहीतरी शेतीच काम आहे",....... सोनल

"ठीक आहे येतो मी लवकर, तू दार लावून घे, कोणाला दार उघडू नकोस, पण तू आज एवढी का घाबरते आहेस ",...... दादा

"दादा संतोष आज ही राहुल शी खूप भांडला, तो खूप धमकी देतो आहे, आता हल्ली आमच्या मागे असतो तो, म्हणून बाकी काही नाही ",...... सोनल

" त्या संतोषच काही तरी कराव लागेल, मी बघतो त्याला जरा",....... दादा
.........

वैभव दादा ऑफिस मध्ये काम करत होता, राहुल भेटायला आला त्याला

" तू इथे काय करतोस राहुल",....... वैभव दादा

" थोड बोलायच होत तुमच्या शी माझ्या आणि सोनल बद्दल, घरी आई बाबांना सांगितल की नाही सोनल ने ते मला माहिती नाही, म्हणून मी इकडे आलो तुमच्याशी बोलायला ",........ राहुल

" आज आई बाबा घरी नाही आपण जाऊ घरी, दहा मिनिट थांब",........ वैभव दादा
.............

एक तासाने वैभव दादा आला घरी , त्याचा सोबत राहुल होता, दोघांना बघून सोनल आश्चर्य चकित झाली

" कुठे भेटला राहुल तुला दादा ",...... सोनल

" आॅफिस मध्ये आला होता तो मला भेटायला, मी म्हटल घरी बोलू नीट म्हणून घरी आलो, थोडा चहा करते का",....... वैभव दादा

हो...

राहुल आत येवून बसला, सोनल ने दार लावून घेतल, ती किचन मधे गेली चहा करायला, दादा आवरायला आत गेला

राहुल किचन च्या दारात उभा होता,........"किती छान वाटत सोनल तुला अस बघून, तुला येतो का सोनल स्वैपाक वगैरे ",......

सोनल छान हसत होती,...... "हो बर्‍यापैकी येतो स्वैपाक , मी करते नेहमी आई ला मदत, वैभव दादा ला ही येत सगळ काम इतर वेळी दादा करतो घरात खुप मदत",.

" तुला येतो का स्वैपाक राहुल",...... सोनल

" हो थोडा येतो, मी ही घरी करतो मदत ",..... राहुल

" पोळ्या गोल येतात ना",..... सोनल मुद्दाम चिडवत होती

" हो, बर्‍यापैकी, पण त्या मुळे काही फरक पडणार आहे का? आपल्या लग्नाला तुझा होकार असेल तर ते ही शिकेन मी , तू अजून बोलली नाहीस सोनल, बोल ना हो की नाही ",....... राहुल
.......

दादा आला बाहेर, राहुल हॉल मध्ये जावुन बसला, सोनल आली चहा घेवून, तिने दादाला राहुल ला चहा दिला,

" चहा छान झाला आहे सोनल ",... राहुल

"बोला दोघ, काय म्हणणं आहे तुमच ",....... दादा

" दादा आम्हाला लग्न करायचं आहे ",....... राहुल

" राहुल तू आता पोस्ट ग्रॅज्युएट होशील ना",........ दादा

हो.....

"पुढे काय विचार आहे, जॉब वगैरे करणार का",...... दादा

"मी government जॉब साठी परीक्षा दिली आहे मी, बहुतेक होईल ते काम ",...... राहुल

"एवढ्यात लग्न करायचं आहे का तुम्हाला दोघांना ",....... दादा

"एक वर्ष थांबू आम्ही, तो पर्यंत जॉब ही मिळेल, पण लग्न ठरवून ठेवायच आहे आम्हाला, कारण संतोष आता खूप त्रास देतो आहे",....... सोनल

" हो दादा,.... मी दादा बोलल तर चालेल ना तुम्हाला",..... राहुल

"हो का नाही चालणार आणि अहो वगैरे नको म्हणू नुसत दादा म्हण",...... वैभव दादा

" ठीक आहे ",...... राहुल

"तू तुझ्या घरी सांग, मग मला कळव, मग आम्ही ही घरी बोलतो",...... वैभव दादा

" हो आता परीक्षा जवळ आली आहे, एकदा परीक्षा झाली की मी बोलतो घरी, मग येवू इकडे आम्ही काका काकूंना भेटायला",...... राहुल

" हो चालेल ",...... वैभव दादा

"चला मी निघतो आता ",..... राहुल

राहुल दारा पर्यंत गेला

" सोनल राहुल ला आपल शेत दाखव",...... वैभव दादा

" हो दादा",..... सोनल

" छोट आहे आमच शेत, तुमच्या शेता एवढ मोठ नाही ",....... वैभव दादा

" छान आहे शेत तुमच, नियोजन छान केलय छोट्या जागेत बरेच पीक घेतात तुम्ही ",...... राहुल

"बाबा बघतात ते सगळ",..... वैभव दादा
........

सोनल राहुल शेतात आले, दोघ खूप खुश होते, राहुल ने त्याच्या हात पुढे केला, सोनल ने त्याच्या हात धरला, दोघ हातात हात घेवून फिरत होते

" किती छान वाटतय ना अस राहुल, बर झाल आज तू दादा ला भेटलास, एक टेंशन कमी झाल",...... सोनल

" हो आज संतोषने खूप त्रास दिला, म्हणून घरी गेल्यावर लगेच तुझ्या दादा च्या ऑफिस ला गेलो मी, वाटल आज बोलून घेवू, हे सगळ आपल्याला लवकर ठरवायच आहे सोनल ",....... राहुल

" बर झाल तु आज भेटलास दादा ला", ,..... सोनल

"खरच आता एकदम बर वाटतय ",..... राहुल

हो......

" मी पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर थोडी पुढच्या परीक्षेची तयारी करणार आहे, त्या नंतर आपण करू लग्न ",....... राहुल

सोनल लाजली होती एकदम,...." हो चालेल, मला ही स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, मला ही थोडा वेळ हवा आहे पण लग्न ठरलं म्हणजे इतर त्रास कमी होतील",...... सोनल

"मला तुझ्या सोबत कायम रहायच आहे सोनल हे अस शांत निवांत, काहीही झाल तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही",..... राहुल

सोनल राहुल कडे बघत होती, किती चांगला आहे हा, अगदी मला हवा तसा, किती समजूतदार, हुशार आहे हा , माझी किती काळजी घेतो आणि शिक्षण ही भरपूर आहे, तरी गर्व नाही याला, किती फरक आहे याच्या मध्ये आणी संतोष मध्ये ,....." हो लवकरच येईल तो दिवस, आपण कायम च सोबत असू ",..

" एक विचारू सोनल तू अजून मला प्रेमाची काबुली दिली नाहीस, प्लीज एकदा बोल ना मनात काय आहे ते, मला माहिती आहे, तुझ्या डोळ्यात दिसत, पण एकदा ऐकायच आहे, प्लीज ",..... राहुल

" आपल्याला एकमेकाना काही सांगायची, प्रेम कबूल करायची गरज वाटली नाही कधी, राहुल मला तू किती आवडतो तुला माहिती आहे ते, आणि मला तुझ्या सोबत रहायच आहे, तुझ्यासोबत मला छान वाटत, आपले विचार जुळतात, मी खुश असते तुझ्या सोबत ",...... सोनल

राहुल ऐकतच राहिला, खूप खुशीत होता तो,

" परत एकदा सांग सोनल ",..... राहुल

तशी सोनल हात सोडून पुढे पळाली ,.....

" सोनल...... सोनल हे अस चालणार नाही, प्लीज बोल काही तरी ",..... राहुल

सोनल थांबली राहुल तिच्या जवळ आला सोनल ने त्याच्या हात हातात घेतला,......" मला तू खूप खूप आवडतो आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तुझ्या सोबत रहायच आहे, माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर, इतक की तुझ्या शिवाय मी कोणाचा विचार करू शकत नाही, I Love You ",...

राहुल खूप खुश होता.....

सोनल खाली बघत होती, तिच्या हाताला हलका कंप सुटला होता

"Thank you very much dear, love you too, aaj मी खूप खुश आहे",...... राहुल ने सोनल ला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला, पण ती पुढे पळून गेली

सोनल..... थांब ग जरा, हे अस चालणार नाही, एक मिनिट......... सोनल थांबली, राहुल तिच्या जवळ गेला,

"मला वाटल नव्हत तू एवढ छान बोलशील आज माझ्या बद्दल, thank you, पण नंतर तू दगा दिला यार, ",......राहुल

सोनल ला समजल राहुल काय बोलतो आहे ते, ती गडबडून गेली, राहुल छान हसत होता, सोनल लाजली......

" चूप रे राहुल, झाल असेल शेत बघून तर तू जा बर आई बाबा येतील",...... सोनल

दोघ बर्‍याच वेळ बोलत होते, राहुल घरी गेला

...........


बघु पुढच्या भागात काय होत ते........


🎭 Series Post

View all