बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 2

मला गरज नाही तुझ्या ऐशोआरामाची, मला राहुल सोबत राहायचं आहे, तू आमच्या मध्ये मध्ये काय करतो आहेस, जर एखाद्या मुलीने तुला सांगितलं की बोलू नको माझ्याशी तरी तूला समजत नाही का काही? तुला आत्मसन्मान वगैरे काही आहे की नाही, माझ्यावर हक्क दाखवायचा प्रयत्न करायचं नाही, सारखं काय मामाची मुलगी.. मामाची मुलगी करतो, एकदम लांबचं नातं आहे आपलंबंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 2
कधीही न तुटणारे
©️®️शिल्पा सुतार

............

लेक्चर झाले, सोनल, प्रिया, रीना, मीनल क्लास मधुन बाहेर आल्या , प्रिया रिना पुढे चालत होत्या, राहुल सोनल शी बोलायच म्हणून वाट बघत होती, राहुल मागून आला,

" सोनल, ऐ, सोनल....... बस ला वेळ आहे, कॅन्टीन मध्ये चलतेस का",...... राहुल

हो,..... सोनल ने मैत्रीणींन कडे बघितल,..... "मी येते दहा मिनिटात बस स्टॉप वर" ,

" सोनल राहुल ला सांग ना.. आज परत संतोष क्लास मध्ये आला होता ते",..... प्रिया

" काय झालं होतं सोनल? संतोष आज काही म्हटला का परत तुला ",...... राहुल

" हो रे राहुल नेहमीचच आहे त्याचं, खूप बोलला संतोष आज सोनल ला, तिची वाट अडवली होती",...... प्रिया

" प्रिया जाऊ दे त्याच, तो विषय आता नको ",...... सोनल

"पण काय बोलत होता तो, जाऊ दे का " ,...... राहुल

"उगीच भांडण नको, तो चांगला मुलगा नाही राहुल, मला बोलत होता की मी तुझ्याशी का बोलते",..... सोनल

" त्याला जर एवढी हिम्मत आहे तर तो माझ्याशी का नाही येऊन बोलत ",........ राहुल चिडला होता

"हे बघ राहुल आपल्याला भांडण नको आहे, तो बोलतो बोलू दे, अशा फालतू मुलांशी आपल्याला बोलायची गरज नाही ",...... सोनल

" हो बरोबर आहे पण तो का आगावू पणा करतो ",..... राहुल

राहुल सोनल कॅन्टीन कडे गेले, राहुल काळजीत होता, संतोष च काहीतरी कराव लागेल,

"काय घेतेस सोनल, कॉफी सांगू का ",....... राहुल

" हो चालेल",..... सोनल

राहुल ने दोन कॉफी सांगितल्या

" राहुल तू संतोष कडे लक्ष देवू नकोस, मी घरी सांगणार आहे आई बाबांना संतोष विषयी",........ सोनल

"हो आणि मी पण बोलणार आहे संतोष शी",....... राहुल

सोनल काळजीत होती....

"ते जाऊ दे संतोष च सोनल, आपल्या विषयी बोलू या, परीक्षा जवळ आली आता कॉलेज ही थोडे दिवस आहे, नंतर जास्त भेटता येणार नाही आपल्याला ",...... राहुल

" हो ना तुझ ही हे शेवटच वर्ष आहे ना",....... सोनल

" म्हणून मी म्हणतो तुझ्या मनात काय आहे ते सांग ना प्लीज, थोडे दिवस एकत्र घालवू आपण ",...... राहुल

सोनल ला खूप बोलायच होत राहुल शी, पण तिला काही सुचत नव्हत , काय करू बोलू का, कस पण, खाली मान घालून ती छान हसत होती.....

"सोनल बोल ना काही तरी, खरं तर आपल्यात आता एक छान बॉन्ड तयार झाला आहे, काही बोलायची गरजच नाही एवढ छान ओळखतो आपण एकमेकांना, तरी पण जस मी तुला सांगितल मला तू आवडते तस तू ही काही तरी बोलायला हव ना माझ्याशी, मी मदत करू का, ठीक आहे पत्र लिही तू मला",........ राहुल अतिशय तळमळीने सोनल शी बोलत होता,

सोनल राहुल कॅन्टीन मध्ये गेले ते संतोष च्या मित्राने बघितल, त्याने संतोष ला लगेच फोन करून सांगितलं.....

संतोष तावातावाने आत आला , राहुल आणि सोनल ला सोबत बघून तो खूप चिडलेला दिसत होता, दोघं समोरची खुर्ची ओढून त्यावर तो बसला

"सोनल मी तुला काय सांगितलं ते समजत नाही का, या राहुल सोबत का फिरत असते तू, किती वेळा सांगितले बोलू नको त्याच्याशी " ?,...... संतोष

" excuse me संतोष, तिच्याशी काय बोलतोस माझ्याशी बोल हिंमत असेल तर, तुझा काहीही संबंध नाही सोनल शी आणि माझ्याशी, इथून उठ, आम्हाला डिस्टर्ब करू नकोस ",...... राहुल

" हे बघ राहुल मला तुझ्याशी काही देण घेण नाहीये, मला तुझ्याशी बोलायच नाही, माझं फक्त सोनल शी काम आहे, ती माझ्या मामाची पोरगी आहे, सोनल तुला सांगितलेलं समजतं का? नाहीतर मी मामाला सगळ सांगून देईन",....... संतोष

" दे सांगून मी घाबरत नाही तुला, तू स्वतःला समजतोस कोण, चल राहुल याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही ",..... सोनल

सोनल राहुल बस स्टॉप वर आले, संतोष त्याच्या मित्रांसोबत मागे येत होता, बस स्टॉप वर राहुलचे मित्र उभे होते तो त्यांच्याशी बोलायला गेला, संतोष ला बर झाल, तो सोनल शी बोलायल आला

" सोनल बसने काय जातेस, गाडी आहे माझी, माझ्या सोबत राहत जा, एकदम राणी सारखा ठेवीन तुला ",...... संतोष

" मला गरज नाही तुझ्या ऐशोआरामाची, मला राहुल सोबत राहायचं आहे, तू आमच्या मध्ये मध्ये काय करतो आहेस, जर एखाद्या मुलीने तुला सांगितलं की बोलू नको माझ्याशी तरी तूला समजत नाही का काही? तुला आत्मसन्मान वगैरे काही आहे की नाही, माझ्यावर हक्क दाखवायचा प्रयत्न करायचं नाही, सारखं काय मामाची मुलगी.. मामाची मुलगी करतो, एकदम लांबचं नातं आहे आपलं ",...... सोनल फार चिडली होती

" जवळचं नातं जोडायला मी तयार आहे ",...... संतोष

सोनल ने राहुल कडे बघितल तो आला.... "संतोष मी आहे इथे अजून, का त्रास देतोस आम्हाला, काय बोलतोस तू असा, जा इथून ",..... राहुल

" हा बस स्टॉप तुझा आहे का, मी काहीही करेन, मी काय घाबरतो की काय तुला ",...... संतोष बोलत होता त्याचे टगे मित्र हसत होते

" किती घाण आहे हा अजिबात वागण्या बोलण्या ची पद्धत नाही, बाजूला हो वाट अडवू नको आमची सांगितल ना ",....... सोनल

बस आली राहुल सोनल प्रिया रीना मीनल बस मध्ये बसले राहुल संतोष कडे रागाने बघत होता,

संतोष सोनल गेली तिकडे बघत होता

"गेली यार सोनल घरी, आता काय करायचं दिवस भर, मला करमत नाही सोनल शिवाय ",....... संतोष

" काय करायचा त्या राहुल च हे बघ तू आधी, किती सोबत असतात ते राहुल सोनल, मी अस ऐकल आहे की राहुल ने सोनल ला प्रपोज ही केलय, ",...... प्रशांत

"काय बोलतोस तू, उद्या बघु त्या राहुल कडे जरा, जास्त शहाणपणा करतो, सोनल समोर मला बोलतो का, सोनल माझी आहे मी तिला अस सोडणार नाही",...... संतोष चिडला होता

बस मध्ये अजूनही राहुल चिडलेला होता......

"जाऊ दे ना राहुल, सोड आपण संतोष कडे लक्ष द्यायच नाही, आपण जेवढ बोलू तेवढ तो उलट बोलतो, मूर्खाचा नादी न लागलेले बर ",..... सोनल

" आपण सावध राहायला हव आता हल्ली त्रास वाढत चालला आहे संतोष चा, त्याच्या मुळे आज आपल बोलण ही झाल नाही ",........ राहुल

हो ना ...... सोनल विचारात होती काय करता येईल

" सांग ना सोनल हो की नाही ",..... राहुल

" राहुल इथे कुठे कोणी ऐकेल ना ",...... सोनल

"Please बोल ना काही तरी, नाही तर आपण संध्याकाळी भेटायचा का",...... राहुल

"नाही राहुल मला नाही जमणार, गावत सगळे ओळखीचे आहेत",...... सोनल

"काय अस सोनल मला please वेळ दे थोडा ",..... राहुल

सोनल छान लाजत होती, तिला राहुल चा हा हट्ट आवडत होता

बस स्टँड वर आली, सगळे घरी जायला निघाले, प्रिया बाजूला रहात होती ती आणि सोनल निघाल्या

" काय म्हणत होता राहुल ",..... प्रिया

" म्हणतोय की होकार दे",..... सोनल

" तुझ्या मनात काय आहे? खूप चांगला आहे पण राहुल ",..... प्रिया

"हो ना, मला ही तो आवडतो, बोलणार आहे मी त्याच्या शी",...... सोनल

सोनल घरी आली......

बाबा बाहेर गेले होते, आई शेतात होती, कोथिंबीर काढण्याच काम सुरू होत तिथे लक्ष् देत होती,..... "सोनल जेवून घे",..

सोनल आत गेली ताट घेवून आई जवळ येवून बसली

" कसा गेला आजचा दिवस बेटा, दिल्या का वह्या सरांना, का ग अशी दिसतेस काळजीत असल्या सारखी ",...... आई

" हो आई झाल सबमिशन, आई संतोषच काही तरी कराव लागेल, तो आता हल्ली सारखं माझ्या मागे असतो, मला इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, याच्याशी बोल त्याच्याशी बोलु नको अस करतो, अगदी नको नको झाल मला, तो आणि त्याचे उनाड मित्र ग, सारखा त्रास देतात ग आम्हाला ",........ सोनल

"का असा करतो तो, वर्गात तरी नीट बसतो का, एकदा सांगून दे तू त्याला, की माझ्याशी बोलत जाऊ नकोस, हा काय प्रकार आहे", ........ आई

" हो ना अस इतक्या सहज तो ऐकणार आहे का आई",...... सोनल

" मग काय करता येईल, उनाड आहे तो आणि त्याचे मित्र पाहिल्या पासून",....... आई

"कोण उनाड आहे",..... बाबा आले तेवढ्यात

"बाबा संतोष, उगीच कॉलेज मध्ये उनाड पणा करतो, माझ्या मागे असतो, सारख अडवत असतो, सगळ्यांना बोलतो मी हिचा आत्याचा मुलगा आहे, हिच्याशी माझ्या परवानगी शिवाय कोणी बोलायच नाही ",...... सोनल

"अजून पास झाला नाही का तो, किती वर्ष झाली कॉलेज ला आहे तो, आयुष्यात काही करायचा की नाही त्याला, का अस वागतो तो ",...... बाबा

" काय माहिती, काहीही झाल की बोलते मी तुझ्या घरी सांगेन ह सगळ ",...... सोनल

" त्याने त्याच्या कामाशी काम ठेवायचा ना",..... बाबा

"हो ना, मला बोलतो बसने नको जाऊ माझ्या गाडीने चल ",...... सोनल

" मी बघतो काय करता येईल, बोलतो त्याच्याशी, आणि आक्का शी, तू चिंता करू नकोस",..... बाबा

"राहुल आमच्या बरोबर असतो, त्याच्या त्याला राग येतो, मला बोलतो राहुलशी बोलु नको ",.... सोनल

" तू ताण करून घेवू नकोस, परीक्षा जवळ आली ना ",..... बाबा

" हो बाबा",....... सोनल

" अभ्यास वर लक्ष दे ",.... बाबा

सोनल उठून आत गेली......

" काय हो ते संतोषच बघा जरा काही तरी, बदमाश मुलगा आहे तो, हे काय अस मागे मागे येतो तो ",..... आई काळजीत होती

" हो मी बोलतो मोठ्या आक्काशी, तिने संतोष ला लाडावून ठेवल आहे, श्रीमंत घरचा बिघडलेला मुलगा आहे तो , त्याने त्याला हव ते कराव, आपल्या सोनल ला का त्रास देतो तो",....... बाबा

" हो ना, सोनल किती हुशार चांगली पोरगी आहे, त्या दोघांची बरोबरी होवू शकत नाही, बरोबर आहे आपल्या सोनल ला कश्याला त्रास द्यायचा, खर तर कोणाला त्रास नाही द्यायला पाहिजे त्याने , वागणुक नीट ठेवायला पाहीजे ",....... आई

" हो बरोबर आहे, हे असे मुल बाकीच्यां साठी त्रासदायक ठरतात ",...... बाबा

"आणि राहुल च काय हो?, आता हल्ली तो सोनल सोबत असतो, काही असेल का त्याच्या मनात",...... आई

"चांगला आहे राहुल, घरचे लोक शिकलेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आहे ना तो" ,....... बाबा

"हो, सोनल च्या कॉलेज ला आहे ",...... आई

" काही असल तरी प्रोब्लेम नाही, पण अजून बोलू नकोस तू सोनल ला, बघू काय विचार आहे तिचा ",....... बाबा

" ठीक आहे" ...... आई

बाजूचा शेतातील काका आलेच बोलवायला, येता का जरा थोड काम होत

" मी जरा जावून येतो",..... बाबा

"लवकर या",...... आई

हो..... बाबा

"ते कोथिंबीर च झाल की गाडी लोड करून घ्या, मी येतो अर्ध्या तासात " ,...... बाबा

" हो"...... गडी

सोनल आत आवारात होती, वैभव दादा आला ऑफिस मधून, सोनल ने चहा केला, आईला बाहेर नेवून दिला, दादा आला आवरुन

"दादा चहा",........ सोनल

"कसा गेला आजचा दिवस सोनल",...... वैभव दादा

"दादा मला बोलायचा आहे तुझ्या शी दादा थोड ",...... सोनल

"बोल ना काही अडचण आहे का ",...... वैभव दादा

" हो दादा, तो संतोष रोज माझ्या मागे मागे असतो, मला कॉलेज मध्ये अजिबात फ्री वाटत नाही, खूप काहीपण बोलतो तो रोज मला आणि माझ्या मित्र मैत्रिणींना, खूप कंटाळा आला आहे आता त्याच्या घाण स्वभावाचा ",......सोनल

" मी बघतो बोलतो त्याच्याशी ",....... वैभव दादा

" अजून एक दादा, राहुल ला बोलायचा आहे तुझ्याशी",..... सोनल

" पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आहे ना तो, तुझ्याच कॉलेजला आहे का तो? पुढे शिकायची इच्छा आहे का त्याला?, काही माहिती हवी आहे का? ",....... दादा

" हो ते ही आहेच, अजून माझ्या आणि राहुल बदल त्याला बोलायचा आहे ",...... सोनल

म्हणजे...... वैभव दादा आश्चर्याने बघत होता

" दादा आम्ही पसंत केलं एकमेकांना",....... सोनल

" तुला कॉलेज नंतर स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत लक्ष्यात आहे ना, की लगेच लग्न करणार ",....... दादा

"हो दादा, मी शिकणार आहे पुढे, पण तरी तू बोल ना राहुल शी आणि नंतर आई बाबांन शी आमच्या बद्दल, त्यांना सांगितल म्हणजे टेंशन नाही, हे अस राहुल बद्दल सगळी गोष्ट आई बाबांन पासून लपवण नाही आवडत मला ",....... सोनल

"मी बोलेल आई बाबांशी, पण तू तुझ जे ठरवल ते विसरू नकोस, गव्हर्मेंट जॉब मिळायला हवा, तीही मोठी पोस्ट ",...... दादा

" हो दादा मी करेन प्रयत्न ",....... सोनल

"विचार राहुल ला कधी भेटणार मग मला ",..... दादा

" हो दादा",...... सोनल खूप खुश होती

" पण लग्न होई पर्यंत जास्त भेटायच नाही ",...... दादा

" हो दादा मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करेन, लव यू दादा",...... सोनल

सोनल खूप खुश होती, तिने लगेच राहुल ला फोन लावला, दादाशी झालेल बोलण सांगितल,

" तुझा होकार आहे ना सोनल ",.... राहुल

" हो राहुल, म्हणून तर मी एवढी धडपड करते आहे आपल्या साठी",..... सोनल

" आज मी खूप खुश आहे सोनल, मी बोलेन वैभव दादाशी, आणि आपण ही भेटू उद्या, मला तुझ्या तोंडून ऐकायला आवडेल होकार दिल्या च",...... राहुल

सोनल ने फोन ठेवून दिला... ती खुशीत होती

प्रिया, रिना आल्या अभ्यासाला, तिघींनी मिळून अभ्यास केला, मधेच आईने चिवडा लाडू आणून दिल खायला, बाबा आले आवरायला आत गेले, आई स्वैपाकाला लागली होती

" सांगितल का घरी संतोष बद्दल सोनल, आज किती बोलला तो आपल्याला ",...... प्रिया

" हो सांगितल बाबांना ते बोलणार आहे संतोष च्या आई शी आणि दादा ला राहुल बद्दल ही सांगितल",...... सोनल

"काय म्हटला दादा",...... प्रिया

"दादा बोलणार आहे राहुल शी आणि संतोष शी, आई बाबांना ही राग आला आहे संतोष चा, बघु आता ती आत्या काय म्हणते ते ",...... सोनल

"तुझ काय ठरलं रिना लग्नाच, पाहुणे येणार होते ना ",..... प्रिया

" हो येणार आहेत रविवारी ",...... रिना लाजत होती

" चला म्हणजे आपल्या ग्रुप मधल पहिल लग्न लवकरच होईल ",....... प्रिया

"हो खूप मजा करायची आहे आपल्याला",...... सोनल

"काहीही काय प्रिया... सोनल, अजून कशात काही ठरल नाही",.... रिना लाजत होती

"ठरेल की मग रीना, आमची मैत्रीण किती छान आहे ",...... सोनल

हो ना.....
.....

बघू पुढे काय होतय ते..

वाचकांचे खूप आभार...

कसे असतात ना काही मुल, दुसर्‍यांना त्रास देणे हेच त्यांना काम असत त्यांच आणि या गोष्टीच त्यांना काहीच वाटत नाही.. की आपल वागण चुकत आहे ........ की आपल्या मुळे कोणाला त्रास होतो आहे....

🎭 Series Post

View all