Dec 01, 2021
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 1

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 1

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 1
कधीही न तुटणारे
©️®️शिल्पा सुतार

............

ही कथा फ्री मध्ये आहे.......

श्री स्वामी समर्थ

थोडस कथे बद्दल...........

हे आयुष्य माझं आहे, मला ठरवू द्या काय करायचं आहे ते, तुम्ही सगळ्यांनीच माझ्या वाटणीचे डिसिजन घेऊ नका,

एका कथा अशा मुलीची कहाणी आहे, जी तिच्या आयुष्यात खूप सुखी आहे, खुश आहे, जिला तीच आयुष्य वेगळच घडवायचं होतं, पण आयुष्यात आलेल्या एका उनाड मुलामुळे ते वेगळ्या वळणावर गेल,

आपल्या आजूबाजूला अश्या बर्‍याच मुली असतात ज्यांना इतर मुलं आपली प्रॉपर्टी समजतात, थोडे जरी त्यांच्याविरुद्ध आपण बोललो तर त्यांचा इगो हर्ट होतो आणि मग ते त्या मुलीला अशी काही शिक्षा देतात कि तीच आयुष्यच बदलून जातं,

हे चुकीच आहे, मुलींनाही जगू द्या, त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या, तुम्हाला तिच्यावर हक्क दाखवायचा काही अधिकार नाही.......

भाग 1
............

टुमदार छोट छान गाव, अतिशय शिस्तबद्ध, सुंदर स्वच्छ, गावातले लोक खूप चांगले होते, एका कुटुंबात प्रमाणे ते एकत्र रहात होते, सुख सुविधा होत्या गावत, गावात सध्या 10 वी पर्यंत शाळा होती, अजून कॉलेज आल नव्हत, गावातले बरेच मुल मुली जवळच्या मोठ्या गावात कॉलेज साठी जायचे,

त्यात सोनल ही होती, गावात सोनल आणि तीच कुटुंबियांचा छोट शेत होत, त्यात त्यांच टुमदार घर होत, देशमुख वाडा,

घरात सोनल तिचे आई-बाबा, वैभव दादा राहत होते, दादाच शिक्षण झाल होत, तो सरकारी नोकरी करायचा, ऑफिसर होता तो, खूप हुशार दादा ने स्पर्धा परीक्षा देवून हे यश मिळवले होत, आई-बाबा दोघं शेतात लक्ष द्यायचे, त्यांच बाजारात स्वतःच दुकान होत, शेतावर काम करायला मजूर लावलेले होते, शेतीत एका बाजूला समोरच्या भागात भाजी लावली होती, दुसऱ्या बाजूला थोडं पीक आलटून-पालटून घेत होते, खाऊन पिऊन सुखी होतं कुटुंब,

आई बाबा चांगल्या विचाराचे होते, प्रत्येकाच्या मताला घरात किम्मत होती, दादाही स्वभावाने खूप चांगला होता, घरात छान अभ्यासाच वातावरण होत , दादाला आता एक दोन स्थळ सांगून येत होते,

सोनल कॉलेजला होती, शेवटच्या वर्षाला, तिचं कॉलेज झाले की तिला पुढे शिकायचं होत, त्या नंतर ते तिचंही लग्न उरकून टाकणार होते ते, दादाच लग्न लगेच करायचा विचार होता त्यांच्या, त्या नंतर सोनल च लग्न करू अस आई नेहमी म्हणायची, पण सोनल चा याला विरोध होता मला ही दादा सारखी स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, मोठ ऑफिसर व्हायच आहे अस ती नेहमी सांगायची,

"सोनल ऐ सोनल उठ जरा, आवर काम पटापट",..... आई चहा करत होती, तिने बाबांना, दादाला चहा दिला

सोनल उठली, अतिशय सुंदर लांब केस तिने मागे बांधले, आज काय काय काम आहे, कोणता अभ्यास करायचा आहे याचा विचार करत ती बसुन होती, पांढर्‍या रंगाच्या नाईट गाऊन मध्ये ती असा विचार करतांना अजूनच गोड दिसत होती, अतिशय सालस चेहरा, नेहमी दुसऱ्याचं मन सांभाळण्याची वृत्ती, खूपच चांगली होती सोनल....

" उठली नाही का सोनल अजून, नंतर तीच घाई करते",.... दादा

दादा चा आवाज ऐकून सोनल आवरायला पळाली...

"हो उठली आहे ती , आवरते आहे, करते ति तिचं बरोबर, तुम्ही दोघं तिला सारख बोलत जाऊ नका",...... बाबांनी बाजू घेतली

सोनल बाबांची अतिशय लाडकी, काहीही केलं की बाबांचा पाठिंबा असायचा, फार कौतुक होतं बाबांना तिचं,

सोनल च आवरलं,ती येवून बाबांना प्रेमाने भेटली,..." माझे बाबा सगळ्यांत चांगले ",..

रोज पेक्षा आज आवरायला सोनल ला जरा उशीर झाला, इथून कॉलेज अर्ध्या तासावर आहे, घाई करायला पाहिजे, नाहीतर पहिलं लेक्चर सुरू होऊन जाईल , सोनलने पटकन वेणी घातली, साधा कॉटनचा ड्रेस तिच्यावर खूप छान दिसत होता, मुळातच खूप सुंदर सोनल काहीही तयारी न करता फार छान दिसायची, वागा बोलायला खूप चांगली होती ती त्यामुळे कॉलेज मध्ये खूप मैत्रिणी होत्या तिला, अभ्यासात अतिशय हुशार, एकपाठी, हुशारीच एक छान तेज होत तिच्या चेहर्‍यावर,

"आई डबा झाला का ग", ?...... सोनल ने आई कडुन डबा घेतला, आणि पळतच बाहेरच्या खोलीत गेली

"सोनल ए सोनल काय घाई असते या मुलीला, नाष्टा तरी कर, चहा तरी घे, काहीतरी खावून घे ग",..... आई

" आई मी निघते, मला खूप उशीर होत आहे, पहिलं लेक्चर सुरू होऊन जाईल",..... सोनल

"अगं मग जरा लवकर उठायचं सकाळी, किती वेळा सांगितले आहे",...... आई

"अगं काल रात्री जर्नल लिहीत बसली होती, म्हणून उशीर झाला, आज सबमिशन आहे ",...... सोनल

" घेतल्या का ग सगळ्या वह्या सोबत, नाही तर येवढं लिहिलं आहे आणि घरी विसरून जायची वहि",....... आई

"हो घेतल आहे सगळं, दादा कुठे आहे आई ?, दादा.. दादा.. मला सोडून येना स्टॅन्ड वर, उशीर होतो आहे मला, माझी बस जाईल प्लीज ",...... सोनल

" तुला लवकर आवरायला काय होतं सोनल",...... वैभव दादा

" हा घे शर्ट, ही घे गाडीची चावी, चल लवकर ",...... सोनल

दादाने मोटरसायकल स्टार्ट केली, सोनलला स्टैंड वर सोडलं

" सोनल हे घे",....... दादा दादाने शंभर रुपये दिले

" काय दादा कशाला आता पैसे",...... सोनल ने आनंदाने पैसे घेतले,

" नको आहेत का आण इकडे",..... दादा

" राहू दे... राहू दे... Thank you दादा, love you",....... सोनल

सोनल चा दादा आहे तसा एवढा छान, त्याचा सोनल वर खूप जीव होता, सोनल काय करते, कुठे जाते, येते, त्याची तो खूप काळजी घ्यायचा, पण म्हणून त्याने सोनलला भित्री भागुबाई बनवून ठेवलं नव्हतं, कुठली गोष्ट सोनल तू कर मी आहे तुझ्या मागे असंच सुरु असायचं त्याचं, एक भक्कम आधार होता तो सोनल साठी

सोनल च्या मैत्रिणी प्रिया, रीना, मीनल तिची वाट बघत होत्या रोज प्रमाणे

"काय उशीर होतो ग तुला रोज सोनल, पाच मिनिटात बस येईलच, आजही तुझी बस गेले असती",....... प्रिया

बस आली तेवढ्यात, तिघी बसमध्ये चढल्या, नेहमीच्या ठरलेल्या जागेवर येऊन बसल्या, त्या स्टॉपवर बस मध्ये चढायला विशेष गर्दी नसायची, सगळे कॉलेजचे मुलं असायचे, त्यात राहुल ही होता, राहुल सोनल पेक्षा दोन वर्षांनी मोठा होता तो, तो ग्रॅज्युएट होता, पुढचं शिक्षण घेण्यासाठी कॉलेजला येत होता, आता हल्ली नेहमी कॉलेजला जाण्यासाठी राहुल एक फार मोठं कारण होतं सोनल साठी..

सहा महिन्यापासून राहुल सोनल कडे बघत बसायचा, पूर्वी ही गोष्ट तिच्या लक्षात आली नव्हती,

नंतर मैत्रिणींनी सांगितलं,..... "राहुल सारखं तुझ्या कडे बघतो, याच बस मध्ये असतो तो नेहमी",...

तसा सोनल ला खूप राग आला एक दिवस तिने राहुल ला खूप खसकवल

"काय चाललंय हे राहुल तुझं? तुला काय वाटलं मला माहिती नाही का? का बघतोस माझ्या कडे सारखं",..... सोनल प्रचंड चिडली होती

"माहिती आहे ना तुला मी बघतो तुझ्या कडे, मग मला का विचारते तू ",...... राहुल हसत बोलला

"पण कशाला बघतोस माझ्याकडे रोज तू",....... सोनल

"आपण फ्रेंडशिप करू या का? तु मला खूप आवडते",..... राहुल

Shut up....

दोघांचं खूप भांडण झालं, म्हणजे सोनलच खुप बोलली राहुल ला, पण तरी राहुलने ऐकलं नाही, तो सोनल च्या मागे येतच राहिला, आता हेच सोनल ला आवडत होत

बस सुरू झाली, राहुल अजूनही दिसला नव्हता तिला,......

"प्रिया, रिना, आज राहुल नाही आला का ग",... सोनल

"हो ग दिसत नाही तो" ,....... प्रिया

तेवढ्यात पळत राहुल बस मध्ये चढला आणि सोनल च्या जिवात जीव आला, तो सोनल कडे बघुन छान हसला, सोनल लाजत होती

"आता बर वाटतय का सोनल", ?....... प्रिया चिडवत होती

गप ग..... सोनल छान हसत होती

" जर्नल लिहून झाल का",..... रिना

" हो झाल आहे",..... सोनल

"तू आहेच तशी हुशार अभ्यासात, वर्गात पहिला नंबर, दिसायला छान, तुझ काय बाबा मस्त सुरु आहे",...... रिना

"चूप ग रिना",...... सोनल ला छान वाटत होत तारीफ ऐकुन

कॉलेज आल, बस मधून सगळे उतरले, राहुल मागे येत होता

सोनल सोनल एक मिनिट थांब

सोनल ला हे अपेक्षित होत

सोनल च्या मैत्रिणी तिच्या कडे बघत होत्या......

"रिना, प्रिया तुम्ही व्हा पुढे मी आलेच",..... सोनल

"दहा मिनिट आहेत ह फर्स्ट लेक्चर ला, लवकर ये",.... प्रिया

हो आलीच......

प्रिया, रिना, मीनल पुढे गेल्या

"सोनल तू काय विचार केला माझा, प्लीज काही तरी बोल ना मी कधीच विचारतो आहे तुला, आज बोलू आपण आपल्या बद्दल, मला कॉलेज झाल की वेळ दे थोडा ",..... राहुल

सोनल फक्त हसली

" सोनल आता परीक्षा जवळ आली त्या नंतर कॉलेज संपेल, मग कधी भेटू आपण, प्लीज बोल काही तरी",..... राहुल

" आपण बोलू कॉलेज संपल्यावर , मला उशीर होतो वर्गात जायला",...... सोनल

" प्लीज हे विसरू नको ह, आज काहीही झाल तरी भेटू आपण ",....... राहुल

सोनल ने फक्त मान हलवली, राहुल तिच्या कडे बघत राहिला,

सोनल वर्गात यायला निघाली, राहुल शी बोलून ती खूप खुश होती, आपल्या नात्या साठी माझ हो आहे राहुल, पण हे तुझ्या शी बोलायची माझी हिम्मत होत नाहीये, आता हे कॉलेज च शेवटच वर्षे , या वर्षी राहुल ही पोस्ट ग्रॅज्युएट होईल, तो ही खूप सिन्सिअर आहे, नौकरी लगेच मिळेल त्याला, त्यात ते श्रीमंत आहेत, शेती वगैरे भरपूर आहे त्यांची, मग घरी लग्नाच्या विषय काढता येईल, घरी सगळ सांगायच आहे मला, त्या आधी राहुल ला हो बोलायच आहे, कस जमणार आहे मला, आधी दादा शी बोलते...... सोनल विचार करत होती

प्रिया, रीना, मीनल वर्गात येऊन बसल्या, त्यांच्यामागे सोनल ही स्वतःच्या विचारात वर्गात येत होती

"सोनल ए सोनल",...... तिने मागे वळून बघितलं, संतोष त्याच्या टग्या मित्रांसोबत मागून येत होता,

संतोष तिच्या दूरच्या नात्यातला आत्याचा मुलगा, त्याला सोनल आवडायची आधी पासून , पण सोनल काही त्याला भाव द्यायची नाही , तो नेहमी सोनल वर आपला हक्क दाखवण्याचा प्रयत्न करायचा, कोणीही सोनल शी बोललेल त्याला आवडायच नाही , श्रीमंत घरचा वाया गेलेला मुलगा, बरेच वर्ष एका वर्गात होता तो, अजिबात अभ्यासात लक्ष नव्हत त्याच, मित्र असेच होते त्याचे, एकदम खराब, वाया गेलेले, तो कॅन्टीन मध्ये खाऊ-पिऊ घालतो म्हणून उगीच ते त्याच्या आसपास असायचे, हा संतोष चा ग्रुप कॉलेज साठी ही डोकेदुखी होता , संतोष जे बोलेल त्यात हो मिळवणे, आणी चुकीच्या गोष्टीना पाठींबा देण एवढ येत होत त्यांना ....

सोनल ला संतोष अजिबात आवडत नव्हता, एक तर त्याला अजिबात वागण्या बोलण्याची पद्धत नव्हती आणि तिच्यावर हक्क दाखवायचा काही प्रश्नच येत नव्हता

सोनलने चालण्याचा स्पीड वाढवला तसा संतोष अजूनच फास्ट तिच्यापुढे गेला आणि क्‍लासच्या दारात जाऊन उभा राहिला

"संतोष येथे तमाशा नको आहे, सर येतील, मला जाऊ दे वर्गात ",..... सोनल

"ठीक आहे मग तु मला क्लास झाल्यावर भेटशील का",..... संतोष

"नाही, मी तुला कितीवेळा सांगितलं आहे, माझ्याशी बोलत जाऊ नकोस, माझी वाट अडवू नको, मला जाऊ दे ",...... सोनल

" काय ग सोनल? कुठे होती तू इतक्या वेळ? किती वेळा सांगितलं मी तुला त्या राहुल शी बोलत जाऊ नको, समजत नाही का तुला? ",...... संतोष खूप चिडला होता

" हे बघ संतोष तुझा आणि माझा काहीही संबंध नाही, मी कोणाशी ही बोलेल आणि कोणा बरोबर ही फिरेल तुझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, उगीच मला मला इकडे जा, तिकडे जाऊ नको, असं करू नकोस ",...... सोनल

" संबंध नाही आपला, म्हणजे काय? मी कोण आहे हे माहिती आहे ना तुला, माझ्याशी नीट बोलायच सोनल आधीच सांगतो ",...... संतोष

" हे अस आहे तुझ संतोष आपला काहीही संबंध नाही, तू माझ्या मागे येण बंद कर प्लीज",....... सोनल

सर समोरून येताना दिसले, तसा संतोष बाजूला झाला, सोनल आत जाऊन बसली

संतोष वरच्या वर्गात होता तो त्याच्या वर्गात निघून गेला, आतून मैत्रिणी सगळ बघत होत्या,

" काय म्हणत होता संतोष ",..... प्रिया

" नेहमीप्रमाणे म्हणत होता की राहुल शी बोलू नको, मला भेट, मी कोण आहे हे माहिती आहे ना तुला, वगैरे वगैरे, उगीच बडबड करत होता, उगीच त्रास देतो ग तो ",..... सोनल

"तू का ऐकुन घेतल इतक, एकदा त्याची कंप्लेंट कर जरा",..... प्रिया

" हो ते करणारच आहे मी",..... सोनल

सर वर्गात आले सगळे उठून उभे राहिले, पहिल्या लेक्चरला सुरुवात झाली, नंतर सबमिशन होत, सगळ्यांनी
जर्नल सबमिट केल, जेवणाची सुट्टी झाली, सोनल प्रिया रिना यांनी डब्बा खाल्ला, लगेच पुढचा लेक्चर होत

कॉलेज झाल.....

राहुल सोनल ची वाट बघत होता...... आज राहुल ला काही करून सोनल शी बोलायचं होत, त्याला माहिती होत की नक्की होकार असेल सोनल चा पण तरी तिच्या कडून हे ऐकायच होत त्याला, नेहमी दोघ सोबत एका बस ने घरी जात होते......
 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now