कधीही न तुटणारे.....
©️®️शिल्पा सुतार
..............
..............
सोनल ला सकाळी जाग आली तरी राहुल अभ्यास करत होता ,..... "तू झोपला नाहीस का राहुल? किती अभ्यास करणार?",...
"झोपलो होतो जरा वेळ, आता लवकर उठलो, तुझ्या कडे बघत बसलो मग आठवल अभ्यास आहे",... राहुल
"चल राहुल तू म्हणजे अति करतो",... सोनल लाजली
"अग खर, तू सकाळी एकदम निरागस बाहुली सारखी दिसत होती",.. राहुल ने सोनल ला जवळ ओढल
" राहुल सोड मला, आता नाही का अभ्यास, अरे मला खूप काम आहे, तुला ऑफिस नाही का, सोड ना",.. राहुल ऐकणार नव्हता आता...
सुरेख सहजीवन सुरू झाल होत, राहुल सोनल अतिशय प्रेमळ जोडी, एकमेकांना अनुरूप असे, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले, राहुल अतिशय हुशार, सोनल ने पहिला नंबर कधी सोडला नाही, तरी समाजाने त्यांना आणि संतोष ला एका तराजूत तोलल, उलट संतोष ला झुकत माप दिल, गुन्हा करून संतोष आरामात आई बाबांसोबत आहे, काहीही दोष नसतांना राहुल सोनल एकटे राहता आहेत, वरून जरी सुखी दिसले तरी दोघांच्या मनात ती एक सल आहे, आपल्या अजून स्विकारल नाही घरच्यांनी,
राहुल ची आज परीक्षा होती सकाळी त्यांने सोनल च्या आई बाबांचे आशीर्वाद घेतले, वैभव दादा येवून भेटून गेला, जरा वेळाने रमेश दादा वहिनी आले, रमेश दादा सोबत राहुल परीक्षेला गेला, वहिनी सोनल सोबत घरी होती
पेपर खूप चांगला गेला राहुल ला यश हमखास मिळणार खात्री होती,
सोनल बाहेर बाबांशी बोलत बसली होती, प्रिया आली, "उद्या अॅडमिशन घ्यायच आहे कॉलेज ला, सकाळी जाऊ आपण",..
"हो चालेल",... सोनल
लगेच कॉलेज सुरू होणार आहे,... प्रिया गेली
"सोनल आत ये",... बाबांनी सोनल ला फी साठी पैसे दिले
"बाबा आहेत आमच्या कडे पैसे, राहू द्या हे",.... सोनल
"अजिबात नाही, मी बोलतो आहे ना, घे हे पैसे मी अजिबात ऐकणार नाही",.... बाबा
"केवढी मदत करतात तुम्ही, खूप सपोर्ट आहे तुमचा",... सोनल
"तु आणि वैभव सारखे आहेत मला, दोघांच सारख करणार मी, अजिबात मनात काही आणू नको, छान शिकून मोठी हो ",.... बाबा
दुसऱ्या दिवशी प्रिया मीनल सोनल तिघींनी कॉलेजला ऍडमिशन घेतली, लगेच दोन-तीन दिवसांनी कॉलेज सुरू होणार होत, राहुल च ऑफिस व्यवस्थित सुरू होतं, अजून रिझल्ट आलेला नव्हता.
वैभव दादा निशा वहिनी च ही ऑफिस व्यवस्थित सुरू होत
आता सोनल कॉलेज व्यवस्थित सुरू झालं होतं, ती पण सकाळी नऊला कॉलेजला जात होती पाच वाजताच वापस येत होती, घरी आल्यावर अभ्यास वगैरे भरपूर असायचा, दोघेजण आता बिझी झाले होते
रात्री रमेश दादा चा फोन आला,... "उद्या राहुल तुझा रिझल्ट आहे",
राहुल आणि सोनल आनंदात होते, अपेक्षेप्रमाणे खूप चांगलं यश मिळालं होतं राहुल ला ऑफिसर पोस्ट मिळणार होती, सगळीकडे आनंदी आनंद झाला, भरपूर पेढे घेऊन रमेश दादा घरी आला सोनल च्या घरी सगळ्यांना पेढे वाटले, सगळे खूपच आनंदात होते
" तुम्ही तुमच्या घरी जाऊन पेढे देऊन या",.. बाबांनी सुचवलं
राहुल सोनल कडे बघत होता
"हो बरोबर बोलत आहे बाबा, राहुल तू घरी जाऊन आई बाबांना पेढे देऊन ये",.. सोनल
"आता माझं लग्न झालं आहे, तु जर सोबत आली तरच मी आता त्या घरी जाईल, तुझ्याशिवाय मी तिकडे जाणार नाही, त्यांना जर तू नको असेल तर मी पण नाही ऐकणार",... राहुल
"असं करू नको राहुल आज खूप आनंदाचा दिवस आहे, जा घरी जाऊन आईबाबांना भेटून ये",.. सोनल
राहुल रमेश दादा बरोबर घरी गेला, वहिनीने राहूल च ओवाळून स्वागत केल, राहुल ने वहिनींना पेढे दिले, पाया पडल्या, राहुलबाबांच्या खोलीला आला राहुल ला बघून आई रडत होती, त्याने दोघांना पेढे दिले त्यांच्या पाया पडल्या, काही न बोलता राहुल बराच वेळ आई जवळ बसला होता , आई बाबा दोघ बघत होते सोनल आली आहे का सोबत? पण ते काही बोलले नाही,
राहुल बाहेर आला रमेश दादा आणि वहिनी शी बोलत बसले होते,.... "काय म्हटले आई बाबा",..
"काही नाही मीही काही विषय काढला नाही, जाऊदे सारखं सारखं तेच तेच बोलण्यात काही अर्थ नाही",... राहुल
"बरोबर आहे जाऊ दे त्यांना कधी काही वाटल तर सांगतील ते ",... रमेश दादा
राहुल घरी वापस आला
त्याच्या मागे रमेश दादा वहिनी घरी आले
सोनल कडे राहुल पास झाला म्हणून मोठी पार्टी ठेवली होती, बरेच मित्र मंडळी आली होती घरचे, रमेश दादा वहिनी, निशा च्या घरचे बरेच लोक होते,
आधी सोनल ने राहुल ला ओवाळल, नंतर राहुल ने केक कापला, जेवण छान होत सगळ सोनल वैभव दादा निशा वहिनी ने अरेंज केल होत
दोन वर्षांनी....
राहुल एका मोठ्या पोस्ट वर अधिकारी म्हणून काम करत होता, सोनल प्रिया मीनल पोस्ट ग्रॅज्युएट झाल्या होत्या, सोनल ही राहुल सारखी पुढच्या परीक्षेची तयारी करत होती, वैभव दादा चा पूर्ण सपोर्ट होता तिला, दिवसातून 6 तास ती अभ्यास करत होती, सोनल ची परीक्षा झाली, ती चांगल्या मार्क ने पास झाली, तिचा जॉब फिक्स होता, पती पत्नी दोघ ऑफिसर, ठीक ठिकाणी त्यांचे सत्कार होत होते,
तरी घरच्यांना अजून त्यांची हुशारी दिसली नव्हती, राहुल चे आई बाबा नाराज होते, त्यांच्या कडे आता कोणी लक्ष देत नव्हत, रमेश दादा वहिनीचा पूर्ण सपोर्ट पूर्वी पासून होता, तोच पुरेसा होता
संतोष प्रशांत ने बिझनेस सुरू केला होता, चांगला चालत होता त्यांचा बिझनेस, संतोषच लग्न अजून झाल नव्हत, आक्का त्याच्या साठी स्थळ बघत होत्या, संतोष चे बाबा संतोष ची प्रगती बघून खुश होते,
संतोष च्या एका चुकी मुळे राहुल सोनल किती चांगले हुशार असले तरी आई बाबांनी त्यांना स्विकारल नाही, माहिती नाही कधी स्विकारतील,
समाजात मुल मुली भेद खूप मोठा आहे अजून त्यात समानता आलेली नाही, मुलानी काहीही केल तरी चालत, मुलींना अजिबात चालत नाही, त्यांची चुकी असो की नसो कायम त्यांना त्रास दिला जातो, प्रगती व्हावी पण शेजारी अस आहे आपल स्वतःवर वेळ येते तेव्हा अजिबात मोठ मन चांगले विचार आठवत नाही, राहुल च्या आई बाबानी सोनल ला स्विकारल नाही, त्या साठी त्यांनी मुलगा गमवला,
सोनल राहुल वर वर खुश सुखी सक्सेस फुल दिसत असले तरी पण मनातून आपण अजून माहेरी आहोत हे दुःख कमी होत नाही, अजुन ही मुलीना किती अग्नी परीक्षा द्यावी लागणार आहे काय माहिती ,
म्हणून गम्मत म्हणून ही कोणाच नाव घेवू नका, वागतांना विचार करा, तुमच्या एका मूव्ह मुळे कदाचित समोरच्याला कायमचे घरचे, त्यांचे नातलग स्विकारणार नाही, त्यांच दुःख किती मोठ आहे, विचार करा....
समाप्त...
सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार, खूप प्रेम दिल तुम्ही या कथे दरम्यान... तुमच्या comments आणि likes नेहमी प्रोत्साहित करतात , असच प्रेम कायम असू द्या.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा