बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 44

राहुल आणि सोनल दोघांच्या डोळ्यात पाणी होतं, रमेश दादा येऊन कॉट वर बसला,.... "आम्हालाही तुम्हाला दोघांना सोडून जाताना खूप वाईट वाटत आहे, पण सोनल चे आई-बाबा आहेत त्यामुळे काही चिंता नाही


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 44

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

संध्याकाळी राहुल वहिनींना न्यायला आला,

"चला जेवून घे आता राहुल",.. आई

"मी घरी जावून जेवेन, रमेश दादा आला असेल घरी",... राहुल

आई ने डब्बा दिला त्या सगळ्यांचा..

सोनल बाहेर बसली होती तिच्या हातावरची अतिशय सुंदर मेहंदी तो बघतच बसला, बाजूची रूम बघायला वहिनी राहुल सोनल गेले, खूपच आवडली त्यांना रूम, खूप खर्च होतो बाबांचा,

"हो मी तेच बोलली होती, बाबा रागवले मला",.. सोनल

"पण प्रसन्न वाटत आहे घरात",.. राहुल

हो,..

"चला आम्ही निघतो उशीर झाला आहे खूप",.. राहुल

"उद्या या लवकर, इकडे हळद आहे",... आई

ते घरी गेले..

राहुल, रमेश दादा आणि वहिनी हळदी पासुन सोनल कडे रहायला जाणार होते, तिकडे सगळे कार्यक्रम होते उगीच ये जा नको, बाजूची रूम होती , उद्या लग्न होत ,राहुलच मन लागत नव्हत, सगळ ठीक होत पण आई बाबांशिवाय मजाच नाही...

राहुल आई-बाबांच्या रूम मध्ये गेला

"आई बाबा उद्या माझं लग्न आहे, मी परत एकदा विचारतो आहे तुम्हाला राग सोडा, चला तुम्ही पण लग्नाला, तुमच्या आशीर्वादाशिवाय मला अजिबात बर वाटत नाही",... राहुल

" आम्ही मागे पण सांगितलं होतं आमचं जमणार नाही, आम्हाला सोनल सून म्हणून मान्य नाही, तुम्हाला आमचं नाही ऐकायच, वाटेल ते करा, आम्हाला तुमच्यात घेवू नका ",... बाबा

" काय झालं आहे नक्की? आता मला सांगा बरं नीट, कोणी तुमचे कान भरवले आहे एवढे, तुम्हाला चांगल वाईट समजत नाही, आज स्पष्ट सांगा तुम्ही",.. राहुल

" कोणी काहीही सांगितलं नाही आम्हाला, घराण्याच नाव खराब करत आहात तुम्ही ",... बाबा

" तुम्ही सोनलचा एवढा राग का करता आहात? , संतोष ला बोलवून आणू का मी? ज्याच्या सोबत सोनल दोन दिवस होती, तुमचा तुमच्या मुलांवर विश्वास नाही, दुसरे जे सांगतील ते तर तुम्हाला पटेल ना ",... राहुल

" आम्हाला कोणाशी बोलायचं नाही, काही ऐकुन घ्यायच नाही, तू जा बर इथून ",.. बाबा

" आई तू तरी सांग बाबांना",.. राहुल

" मी यांच्या शब्दा बाहेर नाही ",... आई

राहुल आता एकदम रडायला लागला, तसा रमेश दादा आत आला

" अरे काय सुरु आहे तुमचं?, राहुल कश्याला रडतोस ",... रमेश दादा

" बघ ना दादा आई-बाबा कसे वागत आहेस, काय झालं काहीही मोकळा बोलत नाही, कोणी त्यांचे कान भरले आहेत काय माहिती? , मला अगदी कंटाळा आला आहे आई-बाबांच्या वागण्याचा",... राहुल

"बरोबर आहे आई बाबा, काय झाला आहे एवढं? उद्या लग्न आहे राहुलच, का असं करत आहात? तुम्ही राग सोडा, पोरं एकटे राहतील",.... रमेश दादा

आई-बाबा काहीही बोलले नाही...

" काय झालं आहे कोणी तुम्हाला काही बोललं का? ही केस मला सगळी माहिती आहे, असं काहीही झालेलं नाही, सोनल आणि तिच्या घरच्यांनी ती केसही मागे घेतली आहे, आता काही कोर्टात जायचा प्रश्न नाही, तुम्ही असं का करत आहात? ",... रमेश दादा

"आम्हाला या विषयावर काही बोलायचं नाही ",... बाबा

" जर आम्हाला बहीण असती आणि तिच्या बाबतीतही असच झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही? सांगा ना? जर तिच्या बाबतीत काहीही न होता, तिचा काहीही दोष नसतांना तिच्या सासरच्यांनी तिला नाकारलं असतं तर कसं वाटल असत, हे तुमचं वागणं बरोबर आहे का? दुसऱ्याची मुलगी आहे म्हणून आपण कसही वागायचं का? नाहीतर तुमच्याकडे जर काही पुरावा असेल तर तो सादर करा, आम्ही पण ऐकू मग तुमचं ",... रमेश दादा

तरी आई-बाबांनी हट्ट सोडला नाही, शेवटी राहुल, रमेश दादा आणि वहिनी एकटेच सोनल कडे यायला निघाले

आज हळद होती सकाळपासून धावपळ सुरू होती, मैत्रिणींनी छान फुलाचा साज सोनल साठी तयार करून आणला होता, फुलांचा साज पिवळी साडी, गजरे, अतिशय सुंदर दिसत होती सोनल, खूप छान फोटो काढले सोनल चे, मैत्रिणी पण सोबत होत्या फोटो काढतांना

राहुल आणि वहिनी आणि रमेश दादा आले, आज राहुल ला इकडे हळद लागणार होती, ते बाजूच्या रूममध्ये राहणार होते आता उद्या लग्न लागल्यावर रमेश दादा आणि वहिनी जाणार होते

"सोनल रमेश दादा वहिनी राहुल आले इकडे ये", ,.. बाबा

सोनल चहा घेवून आली..

" अरे व्वा सोनल तुला साडी किती छान दिसते, खूप छान झाली आहे तयारी ",... वहिनी

अतिशय सुंदर सोनलला राहुल बघतच राहिला,
सोनल ला ते समजलं ती लाजली होती, राहुल कपडे बदलून आला, सोनल आणि राहुल चे एकत्र फोटो सगळ्यांनी काढले, खूप आनंदी वातावरण झालं होतं, मैत्रिणी मस्त एंजॉय करत होत्या,

मांडवात हळदीची पूर्ण तयारी झाली होती, आधी राहुल ला हळद लागली, दादा वहिनींच्या हातून, मग राहुल ची उष्टी हळद सोनल ला लागली, सोनल ची हळद बाजूच्या काकूंच्या हातून होती, त्यानंतर आई-बाबा आले हळद लावायला, सोनल ची त्यांच्याकडे बघायला हिम्मतच झाली नाही, वैभव दादा आला हळद लावायला त्याच्याबरोबर निशा वहिनी होती

सरप्राईज... निशा येवून सोनल ला भेटली

" अगं वहिनी तुझी मेंहंदी होती ना आज",... सोनल

"हो आता जाते आहे मी जरा वेळाने, मला राहावलच नाही तुला भेटल्याशिवाय, तुला हळद लावते मग जाते",.... निशा

" मला भेटायला आली की वैभव दादा ला",.. सोनल

निशा छान हसत होती..

सोनल ला खूप आनंद झाला होता वैभव दादा निशा वहिनींने सोनल ला हळद लावली, सोनल त्या दोघांना भेटली

सोनलच्या मैत्रिणी खूप हळद खेळत होत्या, खूप मजा आली राहुल ची वहिनी, निशा वहिनी त्यांच्यात एक होऊन गेली होती

बँड वाले आलेले होते, बँडच्या तालावर सगळे मनसोक्त नाचत होते, आई-बाबा रमेश दादा वहिनी, वैभव दादा निशा वहिनी सोनल च्या मैत्रिणी सगळ्याच खूप मजा करत होते, राहुल सोनल कडे बघूनच नाचत होता, आई बाबा सोनल सगळ्यांना आता आत ओढल होत नाचायला ,

जरा वेळाने निशा वहिनी घरी गेली तिच्या घरी पण कार्यक्रम सुरू होते, राहुल आणि रमेश दादा आवरायला घरात गेले

"घर छान आहे राहुल",.. रमेश दादा

"हो सोनल ने आवरल सगळ, साफसफाई केली, सामान आणल, तिच्या आई बाबां सोबत गेली होती ती",... राहुल

"तू ठीक आहेस ना राहुल, एकदम गप्प गप्प वाटतो आहेस",.. रमेश दादा

"ठीक आहे मी दादा, आई बाबा नाहीत तेच आहे माझ्या मनात",... राहुल

" ते नाही ऐकत जाऊ दे, काय करणार आपण, सोनल चा अपमान झाला किती, काहीही दोष नसतांना तिच्याशी कसे वागता आहेत ते ",.. रमेश दादा

"हो ना.. कोण समजवणार त्यांना",.. राहुल

दुसर्‍या दिवशी लग्न होत

सोनल बॅग भरत होती, लग्नासाठी बाजूचा छोटा हॉल घेतलेला होता, आई बाजुला बसुन सूचना देत होती, बाबा वैभव दादा यांची धावपळ होत होती,

सकाळी चहा नाश्ता करून सगळे तिकडे हॉल वर गेले, निशाच्या घरचे सगळे आलेले होते,

सकाळीच पार्लर वाली आली, सोनल तयार होत होती, सुंदर अशा लाल शालू ती खूपच छान दिसत होती, प्रिया मीनल तिच्या मैत्रिणी सोबत होत्या, काही लागलं तर त्या होत्या मदतीला,

राहुल ही तयार होत होता, वहिनी राहुल कडे लक्ष देत होती, राहुल वहिनी रमेश दादा देवळात गेले, तिथून ते वाजत गाजत येणार होते,

आई आत मध्ये आली तिच्याकडे दागिने होते, निशा आणि आईने मिळून सोनलला दागिने घातले, आईने सोनल ची नजर काढली,

खाली वरात आली तोपर्यंत, प्रिया मिनल सगळ्या मैत्रिणी नाचायला पळाल्या, वैभव दादा पण नाचत होता, त्याने निशा वहिनीला नाचायला ओढलं, सोनल सगळी गंमत बघत होती, तिचं लक्ष राहुल कडे गेलं, घोड्यावर बसलेला राहुल खूप हँडसम दिसत होता, मेन म्हणजे तो सोनल कडे बघत होता, सोनल लाजली, औक्षण करून राहुल आत आला, स्टेज वर बरीच गर्दी झाली होती

मंगलाष्टक झाले, वधू वरांनी एकमेकांना हार घातले, आई बाबांच्या डोळ्यात पाणी होत, रमेश दादा वहिनी भारावून गेले होते, वैभव निशा सोनल च्या आसपास होते, सात फेरे झाले पूजा झाली, जेवणाचा बेत फार छान होता, घरचे सगळे खूप थकले होते पाठवणी चा कार्यक्रम नव्हता, सगळे हॉल वरून घरी आले, वहिनी ने सोनल च स्वागत केल नवीन घरात, सगळे खूप खुश होते,

सोनल आणि राहुल ची हळद उतरवण्याचा कार्यक्रम झाला मुलींनी खूप मज्जा केली त्या कार्यक्रमाला, निशा हॉल वरून वापस घरी गेली, दुसऱ्या दिवशी लग्न होतं, तिला तिच्या घरच्यांना भरपूर काम होतं,

आज आराम करा उद्या वैभवच लग्न आहे, सगळे दमले होते खूप

सकाळी सगळे लवकर हॉलवर गेले, लगेच हळद होती, वैभव दादा ची हळद नवीन जोडप सोनल आणि राहुलच्या हातून होती, सोनल खूप सुंदर दिसत होती मंगळसूत्र तिला छान शोभत होत

"मला अस वाटतय सोनल आपण माझ्या परीक्षे नंतर लग्न करायला हव होत",... राहुल

"पण नंतर मुहूर्त नव्हते, का काय झाल?",.. सोनल

"म्हणजे लगेच हनिमून ला गेलो असतो" ,.... राहुल

"काहीही काय राहुल जरा गप्प बस कोणी ऐकेल",... सोनल

"ऐकु दे, मी माझ्या बायको शी बोलतो आहे, आता तू एवढी सुंदर त्यात माझी परिक्षा आली जवळ, काय करू मी, कसा अभ्यास करू, माझा काही विचार करशील की नाही ",... राहुल

" उद्या पासून तुझी परीक्षा होई पर्यंत मी मास्क लावून फिरू का घरात",.. सोनल

" उद्या पासून डबल अभ्यास चालेल का ",.. राहुल

सोनल मुद्दाम त्याला मारत होती, पूर्ण कार्यक्रमात राहुल सोनल च्या मागे मागे होता, सोनल ला खूप गम्मत वाटत होती

" राहुल माझ्या मागे का येतो आहेस तू सारखा, मला काही काम सुचू दे",... सोनल

" मग कोणा मागे फिरू ",.. राहुल

" सगळे बघता आहेत आपल्या कडे",.. सोनल

" बघु दे मला नाही फरक पडत",.. राहुल ने सोनल चा पिच्छा सोडला नाही

वैभव दादा ला हळद लागली, लगेच निशा वहिनीची हळद झाली जरा वेळाने लगेच लग्नाची तयारी झाली मरून रंगाचा शालूत निशा खूप सुंदर दिसत होते, नवी नवरी असलेली सोनल ही आज खूप छान दिसत होती, वैभव निशा च लग्न लागल, सगळ्या पूजा झाल्या, नवरीची पाठवणीची वेळ झाली

निशा खूप शांत झाली होती, सोनल तिच्या सोबत होती, आई बाबांना बघून निशा रडायला लागली, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होत,

"तुम्ही निशा ची अजिबात काळजी करू नका आमच्या घरी ती सुखात राहील",... आई

" त्याबद्दल आमच्या मनात जरासुद्धा शंका नाही कितीही केलं तरी मुलगी सासरी जाताना वाईट वाटत",... निशा ची आई

"हो ना तुम्हाला जेव्हा वाटल तेव्हा या तुम्ही घरी निशा ला भेटायला",... आई

सोनल च्या डोळ्यात पाणी होत, आज राहुल च्या घरच्यांचा होकार असता तर मी पण सासरी गेले असते, अस किती दिवस मी राहुल एकटे राहणार माहेरी, जरी बाजूची रूम असली तरी लोक नाव ठेवतील, माझा काय दोष, जाऊ दे आता विचार नको करायला

सगळे घरी आले सोनल निशा वहिनी च्या आसपास होती, तीच आवरून दिल, निशा कम्फर्टेबल झाली बघून ती तिच्या घरात गेली

दुसर्‍या दिवशी दोन्ही जोड्यांची सत्यनारायणाची पूजा होती, त्यानंतर रमेश दादा आणि वहिनी घरी जाणार होते,

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर भटजी पूजेला आले, राहुल सोनल.. वैभव दादा निशा सगळे पूजेला बसले, दोघी खूप सुंदर दिसत होत्या,

पूजा झाली, दुपारी जेवण झाल्यानंतर दोघे जोड्या देवाला गेल्या, त्यांच्याबरोबर रमेश दादा वहिनी होते, संध्याकाळी वापस आल्यानंतर निशा वहिनी माहेरी गेली

" आता आम्हालाही निघावं लागेल राहुल सोनल, दोन-तीन दिवस झाले आम्ही ईकडेच आहोत, आई बाबा एकटे आहेत" ,... रमेश दादा

राहुल आणि सोनल दोघांच्या डोळ्यात पाणी होतं, रमेश दादा येऊन कॉट वर बसला,.... "आम्हालाही तुम्हाला दोघांना सोडून जाताना खूप वाईट वाटत आहे, पण सोनल चे आई-बाबा आहेत त्यामुळे काही चिंता नाही, आणि आम्ही येत राहू नेहमी, मी आई बाबांच मन वळवण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही दोघ काळजी करू नका",...

" नाही तर चला घरी राहुल सोनल जे होईल ते होईल",... वहिनी

" नको वहिनी आम्ही इकडे ठीक आहोत माझी परिक्षा जवळ आली आहे, आणि तिकडे आलो की भांडण होतील, नको सहजीवनाची सुरुवात भांडणाने नको, तुम्ही जा ",... राहुल

रमेश दादा वहिनी घरी निघून गेले, घरात राहुल आणि सोनल राहिले, कधी एकटे राहिले नसल्याने खूप वेगळ वाटत होत घरात, राहुल आवरून अभ्यासाला बसला, त्याचा आधी एक दोन दिवस अभ्यास झाला नव्हता, परीक्षा अगदी एक आठवड्यावर आली होती, सोनलने आवरून घेतल सगळं, खूप थकले होती ती पूर्ण दिवसभराच्या धावपळीत, सोनल येवून राहुल जवळ बसली, राहुल ने तिला जवळ घेतल, ती तिथे आरामात झोपली,.......




🎭 Series Post

View all