Login

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 43

पण किती सत्यता होती त्यांच्या या वाक्यात एकदा लग्न झालं की साध जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही त्या मुलीला, एक मुलगी पत्नी होते कोणाची तरी सून होते, मग ती कुठे स्वतःचा विचार करते, नेहमी सगळ्यांना जे आवडतं ते करण्यात स्वतःला काय आवडत आहे ते ती विसरून जाते,
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 43

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

राहुलचा फोन आला,... "झाली का खरेदी? वहिनी केव्हा येणार आहे घरी?",

"वैभव दादा आला की येतो सोडायला आम्ही वाहिनीला",... सोनल

"छान झाली आज खरेदी, तू ही थोडा वेळ आला ते बर झाल, अभ्यास कुठपर्यंत आला आहे तुझा",... सोनल

" झालाच आहे जवळजवळ अभ्यास, आता जरी परीक्षा असली तरी लिहू शकतो",... राहुल

" हुशार आहेस तू राहुल ",... सोनल

" हो मग नंतर अभ्यास होणार नाही ना दोन चार दिवस, तुझं कधी आहे ऍडमिशन ",... राहुल

" पुढच्या आठवड्यात आहे माझा ऍडमिशन ",.. सोनल ल ने फोन ठेवला

वहिनी आई ला दागिने दाखवत होती...

"डबल डबल कशाला घेत बसले दागिने तुम्ही ",.. आई

" मी तेच सांगत होती आई वहिनींना त्यांनी ऐकलं नाही",... सोनल

"घेतले होते ना आपण इकडे दागिने, एवढे दागिने काय करणार आहे, नंतर कपाटात पडून राहतात",... आई

"मी पण तेच म्हणत होती वहिनींना",... सोनल

"असू द्या हो काकू आत्ताच लग्नात नवीन दागिन्यांची मजा असते, घेतले आहे छान राहुल कडून, तरी सोनलने छोट्या आणि नाजूक डिझाईन निवडल्या ",... वहिनी

" सोनल वहिनी ला आपली खरेदी दाखव आणि एक साडी पसंत करायला सांग ",.. आई

सोनल ने देण्यासाठी आणलेल्या साड्या वहिनींना दाखवल्या त्यांनी निळी हिरवी साडी पसंत केली

" खूप सुंदर साड्या मिळाल्या तुम्हाला, महाग आहेत सगळ्या साड्या ",.. वहिनी

" घरातल्या सगळ्यांसाठी आहेत, म्हणून चांगल्या घेतल्या ",... आई

" ब्लाऊज द्यावे लागतील शिवायला",.. वहिनी

" हो देवू उद्या ",... आई

वैभव दादा आला, आपण वाहिनीला सोडून येवू घरी

सोनल वहिनी वैभव निघाले... घर आल..

" चला आत ",.. वहिनी

" नको आई बाबांना नाही आवडणार मी आलेल",.. सोनल

राहुल बाहेर आला, थोड्या वेळ बोलले ते, वैभव सोनल घरी यायला निघाले,

"राहुलचे आई बाबा खरच येणार नाही वाटत लग्नाला ",.. वैभव

"हो ते अजून रागावलेले आहेत, जाऊ दे ",.. सोनल

वैभव सोनल घरी आले, जेवण झाल, सोनल ने बाकी खरेदी नीट ठेवून दिली

सोनल च्या आई बाबानी प्रिया मीनल बाकी मैत्रिणींना ही खूप छान ड्रेस आणले होते

आता बऱ्यापैकी लग्नाची तयारी झाली होती, मोजकेच लोक येणार होते कपडे खरेदी दागिने खरेदी झाली होती, स्वयंपाकाच कॉन्ट्रॅक्ट दिलेले होतं, राहुल सोनल च लग्न झालं की दुसर्‍या दिवशी वैभव आणि निशा च लग्न होतं, ते निशाच्या घरी होतो, तिकडे त्यांनी मोठा हॉल घेतला होता, दोन दिवसासाठी दोन वेगवेगळ्या साड्या लागणार होत्या, परत घरी येऊन सत्यनारायणाची पूजा सगळेच कार्यक्रम होते,

"लगेच ब्लाउज वगैरे सगळे शिवायला टाकून दे दोन-तीन दिवसात मिळायला पाहिजे",.. आई

"हो आई उद्या जाते मी तिकडे ",.. सोनल

शिवणाऱ्या मावशी ओळखीच्या होत्या, त्यामुळे काही प्रश्न नव्हता तरी त्यांनी तीन-चार दिवस लागतील असं त्यांनी सांगितलं, अर्जंट आहे लवकर करा, पार्लर वाली बुक केली होती, मेहंदी वाली त्यांच्याकडची येणार होती

लग्नाच्या तयारीत सगळे बिझी होते, सोनल आवरत होती.....

बाहेर गाडी थांबली आक्का आत्या आल्या होत्या, त्या घरात आल्या, सगळे आश्चर्यचकित झाले, एवढं कारस्थान करून सुद्धा या अश्या कशा भेटायला येतात? बाबा बाहेर उभे होते ते घरात आले

"आज कसं काय इकडे येण केलं आक्का? सगळ झालं ना तुझ्या मनासारखं? आता काय काम काढल इकडे? ",... बाबा

"किती बोलणार आहे भाऊ तू मला, मी सहज आली आहे तुझ्याकडे, सोनल च लग्न आहे ते समजलं, तुम्ही लोक आम्हाला बोलवणार नाही, म्हणून मीच आले आहे आहेर द्यायला",... आक्का

"हे बघ आक्का आता आम्हाला तुमच्याशी काहीही संबंध ठेवायचे नाही, तुमच्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला आता आम्ही ते सगळं विसरलो होतो आणि लग्नाच्या तयारीला लागलो होतो आता कशाला आली आहेस",... बाबा

" वहिनी ताट दे ",... आक्कांनी सगळ्यांसाठी कपडे सोनल साठी साडी नेकलेस असे आणले होते

" हे बघा आक्का आम्ही काहीही घेऊ शकत नाही, तू आत्ताच्या आत्ता हे सगळं सामान घेऊन वापस जा",.. बाबा

" भाऊ तू किती जरी मला बोलला तरी सुद्धा मी जाणार नाही, हा आहेर स्वीकार करा",... आक्का

" आम्हाला हे कपडे घेता येणार नाही",... बाबा

"सोनल इकडे के",... आक्का

" मला तुमच्याकडून कुठलीही वस्तू नको आहे आत्या, खरंच मला तुमच्या कोणाशी बोलायचं नाहीये, तुम्ही कोणी नातेवाईक माझ्या आयुष्यात नाही आहात असे मी धरून जाणार आहे, तुम्ही जा बर इथून ",... सोनल

" का ग एवढी चिडली आहेस",... आक्का

" तुम्हाला माहितीच नाही का जसं? मी का चिडली ते, उगीच येतात इथे, कटकट नुसती, तुमच्यामुळे माझं किती नुकसान झालं , आज लग्न होऊन सुद्धा मी सासरी जाणार नाही, माझ्या सासरचे अजूनही माझ्यावर शंका घेत आहेत, घर चालवण्यासाठी परीक्षा जवळ असून माझ्या नवऱ्याला नोकरी करावी लागत आहे, वैभव दादाचे लग्न मोडता मोडता राहिल, मला तर इतका त्रास झाला आहे या गोष्टीचा, वेडी व्हायची बाकी होती मी, तुम्ही वरिष्ठ लोकांशी ओळख वाढवून आमची केस दाबली, स्वतःच्या मुलाला निर्दोष शोधू सोडवून घेतलं, आम्हाला त्रास झाला असून आम्ही केस हरलो, अजून काय आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या कडून आनंदाने घ्यायच्या का? तुम्ही प्लीज जा बरं इथून आणि तुम्ही आणलेल्या वस्तू ताबडतोब घेऊन जा आम्हाला काहीही गरज नाही आहे तुमच्या साड्यांचे आणि दागिन्यांची ",... सोनल

" सोनल झालेल्या प्रकाराबद्दल मी तुझी माफी मागते तुला माहिती नसेल पण मी सुद्धा संतोष च्या विरोधात होते",... आक्का

" हो का मग तुम्ही विरोधात होते तर कोर्ट केस बद्दल एवढं वजन कोणी लावलं? खोटं बोलू नका, का आम्हाला मजबूर केलं ही केस मागे घ्यायला, तुम्ही स्वतः एक स्त्री असून दुसर्‍या स्त्री वर घाणेरडे आरोप लावले, काय तर म्हणे मी स्वतः पळून गेले संतोष सोबत, काहीच कस वाटत नाही तुम्हाला? ",.... सोनल

" एवढा राग राग करू नये सोनल , खरं तर आज मी इथे तुझी माफी मागायला आली होती, तुम्हाला नीट बोलायच नाही आमच्या शी, आम्ही चांगले आहोत हे तुम्ही मान्य करत नाही, नेहमी आमचा राग राग करतात, आम्ही तुमच्या कडे संतोषच स्थळ घेवून आलो होतो, तुझ्या सासरचे एवढे खराब वागत असतिल तर आमच्या संतोष च स्थळ काय वाईट होत, तुम्हाला नाही ऐकायच पण आमच, ठीक आहे येते मी ",... आक्का सगळ तिथेच सामान सोडून निघून गेल्या

आईने ते सामान एका पिशवीत भरल, कपाटात ठेवून दिल, नंतर मी जावून वापस करून येईन,
........

दुपारनंतर प्रिया मीनल बाकीच्या मैत्रिणी आल्या, त्यांना सोनल ने सगळी खरेदी दाखवली, खुपच आवडली सगळ्यांना खरेदी, साड्या आणि दागिने, आईने पोहे करून आणले तोपर्यंत, मीनल ने पुढे जाऊन काकूंच्या हातून पोहे घेतले तिने सगळ्यांना पोहे दिले, खूपच गंमत सुरू होती, सोनल च्या आई ने सगळ्यां मुलींना ड्रेस दिले, खूप खुश होत्या सगळ्यां, आजूबाजूच्या सगळ्या बायकांना लगेच आहेर करून टाकले, नंतर लग्नाच्या धावपळीत लक्षात रहात नाही,

बाबा आले दुकानातून,... "बाजूच्या खोल्या खाली करून घेतलेल्या आहे सोनल ला रंगरंगोटी झाली आहे , आपण जाऊ दुकानात तुला काय काय सामान घ्यायचं ते सगळं घेऊन घे",..

" बाबा तुमचा खूपच खर्च होत आहे सगळ्या गोष्टी साठी",... सोनल

" असा विचार करायचा नाही बेटा तुझ्यासाठी सगळं आहे आणि या संसारोपयोगी वस्तू तर नेहमीच लागतात त्या काही वाया जात नाही जरी तू उद्या तुझ्या सासरी गेली तरी तु या सगळ्या वस्तू सोबत नेऊ शकतेस",... बाबा

" ते कधी होणार आहे का बाबा? माझे सासू-सासरे राग सोडतील का? ते कायम माझ्याकडे संशयित नजरेने बघणार आहे की काय? ",... सोनल

" हो बेटा होईल नीट सगळ काळजी करू नकोस, ते राग न सोडायला काय झालं? असा विचार करायचा नाही ",... बाबा

जरा वेळाने राहुलचा फोन आला

"काय सुरु आहे राहुल ",... सोनल

" ऑफिसमध्ये आहे, काम सुरू आहे",... राहुल

" झाला का तुझा अभ्यास? ",... सोनल

" हो सुरू आहे ",..

" आपली बाजू ची रूम रिकामी झाली आहे, रंगरंगोटी झाली आहे, मी आई बाबां बरोबर जाऊन सगळं सामान घेऊन येणार आहे, तू येशील का सोबत",.. सोनल

"नाही सोनल तू जाऊन ये आई-बाबांसोबत माझा तेवढाच अभ्यास होईल माझी परीक्षा जवळ आली आहे",.. राहुल

" हो बरोबर आहे",.. सोनल

" आणि जेवढ आवश्यक आहे तेवढच सामान घे, मी पैसे देतो",.. राहुल

" पैशाचं काही नाही, पैसे बाबा देतील, तू उगीच सगळ्या गोष्टीची काळजी करू नकोस राहुल, पुढे भविष्यात परतफेड करायचे भरपूर चान्स येतील, तेव्हा आपल्या दोघांना नोकरी असेल, तेव्हा करू काहीतरी आता बाबा ऐकत नाही आहेत, करू दे त्यांना खर्च",... सोनल

" तुझ्या अॅडमिशनचा खर्च असेल आता",... राहुल

" हो ना आपले लग्न झाल्यानंतर लगेच पुढच्या आठवड्यात घ्यायची आहे अ‍ॅडमिशन ",... सोनल

सोनल आई-बाबांबरोबर जाऊन घर संसार उपयोगी सगळ्या वस्तू घेऊन आली, संध्याकाळी ट्रक मधून सगळं सामान येणार होत, ते सामान ते डायरेक्ट त्यांच्या रूम मध्ये लावून घेणार होते, कपाट किचन मधल सामान टीव्ही फ्रिज असं बरंच सामान होतं, सोनल नाही म्हणत होती तरी आई-बाबांनी सगळ सामान घेतलं, खूपच आनंदी होते दोघ सामान घेतांना,

संध्याकाळी सामान आलं घरात ते सगळं सामान व्यवस्थित रचलं, अतिशय छान दिसत होती आता रूम, दोन खोल्या होत्या एक पुढची खोली आणि एक किचन, किचन मोठं होतं सोनल आता घराकडे बघून खूप खुश होती

आई-बाबा त्यांच्या घरी गेले

सोनलने राहुल ला फोन केला,.. "आपल्या घरचं सगळं सामान लागला आहे, खूप छान दिसत आहे रूम",..

"हो का मी हवा होतो आता तिथे, सगळं काम तुलाच करावं लागतं",... राहुल

"तू आपल्या घरासाठी परीक्षा जवळ असताना नोकरी करतो आहे, एवढं घराचं सामानाचं स्वच्छतेचे काम तर मी करायलाच पाहिजे",... सोनल

लग्न अगदी दोन तीन दिवसावर आल होत आज सोनल पार्लरला गेली तिच्या बरोबर प्रिया मिनल होत्या, अतिशय सुंदर दिसत होती सोनल, तिच्या चेहरा अजून उजळला होता

दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम होता स्वयंपाकाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं स्वयंपाका वाल्या मावशी घरी येऊनच सगळा स्वयंपाक करून जात होत्या, तसं आई बोलत होती एवढं काही विशेष नाही मी करते स्वयंपाक पण कोणीच तिच ऐकलं नाही,

"आरामात रहा ग आई, तू नेहमी कामात असते" ,.. सोनल वैभवने ऐकल नाही

सोनल च्या मैत्रिणी सोनल बरोबरच होत्या, रोज पंचवीस तीस माणसांचा स्वयंपाक होत होता, सत्यनारायण पूजा पर्यंत राहू द्या स्वयंपाक साठी

लग्नाला कोणी येणार नाही असं वाटलं होतं, पण खुपच गर्दी झाली होती, आता सगळे जण खूप आनंदात होते,

रमेश दादा आणि वहिनी, राहुल त्यांची पण लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, वहिनी मेहंदी पासून इकडे सोनल कडे होत्या कार्यक्रमासाठी, आज मेहंदी चा कार्यक्रम होता, रमेश दादा सकाळीच वहिनींना इकडे सोडून गेले होते

सकाळी निशा वहिनीचा ही फोन आला तिचे सगळे कार्यक्रम एक दिवस उशिराने होते, हळद लग्नाच्या दिवशी सकाळी होती, कारण आदल्या दिवशी सोनल आणि राहून च लग्न होतं

सगळे मेहंदी वाले ताईची वाट बघत होते मांडवात सगळ्यांना चहा नाष्टा वाटला, सगळ्यांचा चहा-नाश्ता आनंदात पार पडलं खाऊन घे सोनल, आता एकदा हाताला मेहंदी लागली तर जेवणार कशी? आजपासून तुझी धावपळ ग, आईकडचे आरामाचे दिवस संपले, बाजूच्या मावशी चिडवत होत्या,

पण किती सत्यता होती त्यांच्या या वाक्यात एकदा लग्न झालं की साध जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही त्या मुलीला, एक मुलगी पत्नी होते कोणाची तरी सून होते, मग ती कुठे स्वतःचा विचार करते, नेहमी सगळ्यांना जे आवडतं ते करण्यात स्वतःला काय आवडत आहे ते ती विसरून जाते, घरादाराला सगळ आपल आयुष्य अर्पण करते, त्यातल्या बऱ्याच बायका लकी असतात की ज्यांच्या घरच्यांना माहिती असतो त्यांना काय आवडतं, नाही तर बऱ्याच जणांचा असंच आयुष्य निघून जातं, घरच्यांना माहितीच नसतं हिला काय आवडतं आणि तीही स्वतःच्या आवडीनिवडी त्यांना कधीच महत्त्व देत नाही,

सोनल च्या डोळ्यात पाणी होतं माहिती आहे की ती काही सासरी जाणार नाही, शेजारीच घर आहे तरीसुद्धा एकदम तिचं मन भरून आलं होतं, आई जवळ येऊन बसली, वहिनी सोनल ला समजावत होती

कोणीही रडू नका बरं आता, जो रडेल त्याला मांडवा बाहेर काढायच, सगळे हसत होते, प्रियाने लाऊड स्पीकर वाल्या ला इशारा केला, गाणं सुरू झाल, त्या मैत्रिणींनी छान डान्स सूरू केला, सगळेजण परत नॉर्मल झाले, आनंदाने सगळे डान्स बघत होते, आईने सगळ मैत्रिणींवरून पैसे ओवाळून टाकले, मुलींनी आईलाही ओढलं नाचायला, आई आता प्रिया आणि मीनल सोबत छान डान्स करत होती, सगळे खुप हसत होते

मेहंदी काढायला सुरुवात झाली, वहिनींनी सोनल चे फोटो काढून राहुल ला पाठवले,

लगेच राहुलचा फोन आला वहिनींच्या फोनवर, सगळ्या मैत्रिणींनी तो फोन वहिनीं कडून काढून घेतला, कोणीही फोन सोनल कडे देत नव्हतं, सगळ्या राहुल शी बोलत होत्या मुद्दामून सांगत होत्या की मी सोनल आहे, राहुल थकला त्याने फोन ठेवून दिला, अतिशय गम्मत सुरू होती त्यांची, अतिशय सुंदर मेहंदी काढली सोनल च्या हातावर

जेवण करून सगळ्या मैत्रीण घरी गेल्या,......

सोनल बाहेर बसली होती, मेहंदी चे हात बघत होती, बाबा आले बाजूला बसले,

" जेवली का तू बेटा" ,.. बाबा

"नाही आता आई खाऊ घालेल मला" ,.. सोनल

"खूप छान आहे तुझी मेहंदी, असे छान रंग तुझ्या आणि राहुल च्या आयुष्यात येतील, काही काळजी करू नकोस",... बाबा

"बाबा होईल ना अस",.. सोनल

"हो बेटा तुम्ही दोघ समजूतदार आहात, हुशार आहात, सगळ होईल नीट",.. बाबा

आई ताट घेवून आली, सोनल छान जेवत होती आई च्या हातून गप्पा मारत......