Login

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 42

सोनल ला माहिती होतं की राहुलच्या आईबाबांचा होकार नाही म्हणजे सगळा खर्च रमेश दादा वहिनी करत असतील, त्यामुळे तिचा नकार होता इतर खरेदी करायला, उगीच कशाला त्यांच्यावर एवढा भार आणि एवढे दागिने थोडी एकावेळी घालून फिरणार आहे


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 42

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............


सोनलच्या वकिलांनी तिकडच्या वकिलांना कॉन्टॅक्ट केला,... "आपल काम झाल, केस मागे घेतली आहे, आत्ताच इथे सोनल आणि वैभव येऊन सह्या करून गेले",

"चला छान झाल एक केस मार्गी लागली, तुम्हीच द्या मग ही आनंदाची बातमी आक्कांना" ,... वकील

"हो करतो त्यांना मी फोन, आता पण तुम्हाला लक्षात आहे ना माझ्या जास्तीच्या पेमेंटच",... वकील

"हो मला लक्षात आहे सांगितल्याप्रमाणे होईल सगळं, तुम्ही काळजी करू नका",...

सोनलच्या वकिलांनी आक्का आत्यांना फोन केला,.. "एक आनंदाची बातमी आहे जर मी तुम्हाला बातमी सांगितली तर काय द्याल?",..

"तुम्ही बोला काय झाला आहे पटकन, तुम्ही जे बोलाल ते घेऊन जा घरून",... आक्का आत्या

" आता इथे सोनल वैभव आले होते, त्यांनी संतोष वरची केस मागे घेतली आहे, सही करून गेले कागद पत्रावर",... वकील

"काय बोलत आहात तुम्ही",.. आक्का आत्या खुश होत्या

" बरोबर ऐकल तुम्ही ",.. वकील

" कस काय झाल हे सगळ? तुम्ही एकदम सरप्राईज दिलं ",.. आक्का आत्या

" काम तस केल मी, ते घाबरले असतिल बदनामी ला, त्यांना वाटलं असेल की आता ही केस लढून काही उपयोग नाही, सांगितल अस होत मी त्यांना, तुमच्या बाजूच्या वकीलांचे नाव ऐकून ते घाबरले",... वकील

"चला चांगल झाल, आमच्या कडून वकील साहेब तुम्हाला बोनस, पण कन्फर्म आहे ना ही न्यूज",... आक्का आत्या

" मी आत्ता पोलीस स्टेशन आणि कोर्टात जाऊन पेपर सबमिट केले, केस मागे घ्यायची प्रोसेस सुरू झाली असेल",... वकील

वकील खुश होते..

"माई आज गोड धोड करा, संतोष ऐ संतोष अरे सोनल ने केस मागे घेतली, आता फोन आला होता वकील साहेबांचा, तुझ्या मित्रांना फोन करून सांग",.. आक्का आत्या

संतोष आनंदात होता,.." काय बोलतेस खरं की काय? ",

"हो एकदम खरं आहे",.. आक्का

"आई आपल्याला सोनल ची माफी माग मागून आभार व्यक्त करायला पाहिजे",....संतोष

" हो मी पण तोच विचार करत होती, मी जाईन तिला भेटायला ",... आक्का

संतोषने प्रशांत ला फोन लावला,.." आनंदाची बातमी आहे प्रशांत, सोनलने आपल्यावरच्या सगळ्या केसेस मागे घेतल्या आहेत, नुसता माझ्यावरच्या नाहीतर तुमच्या सगळ्या मुलांवरची ही केस मागे घेतली आहे, आपण निर्दोष सुटलेले आहोत",..

" काय बोलतो आहेस तू संतोष? खरं का?",... प्रशांत

" हो एकदम खरं बोलतो आहे मी, आत्ताच त्यांच्या वकिलांचा फोन आला होता",.. संतोष

" कसं काय झालं पण हे आश्चर्य? ",... प्रशांत

" आईने काहीतरी केलं, वरून प्रेशर आलं, सांगत नाही आहे ती, पण बहुतेक बदनामीला घाबरुन सोनल मे केस मागे घेतली",.. संतोष

" चला चांगलं झालं" ,.... प्रशांत

" तुला लक्षात आहे ना प्रशांत आपल्याला दुकान टाकायचा आहे दोघांना मिळून",... संतोष

" हो माझ्या लक्षात आहे आणि मी चौकशी पण करून ठेवली आहे, पुढच्या आठवड्यापासून आपण कामाला लागू",... प्रशांत

" हो आता उशीर करायचं नाही आता एकदम व्यवस्थित वागुन दाखवायचं, स्वतःला बिझी करून घ्यायचं कामात",.... संतोष

"हो आता चांगलाच वागायचं आहे, एवढे दिवस कसे काढले आपण आपल्यालाच माहिती",.. प्रशांत

" खूप त्रास झाला आहे या केसचा, जरा वेळाने येतो भेटायला मग आपण ठरवू दुकानाच",.. संतोष

हो...

आक्कांनी संतोष च्या बाबांना फोन केला...

" केस मागे घेतली सोनल ने आत्ताच वकील साहेबांचा फोन आला होता",.. आक्का

"अरे वा, चांगलं झालं बरं झालं शिक्षा टळली, नाहीतर आयुष्यभर ते लेबल सोबत लागल असत",.. बाबा

"तुम्ही केव्हा येत आहात दुकानातून",.. आक्का

"रोजच्या वेळेवर येईल का काही काम होतं का? ",.. बाबा

"एवढी आनंदाची बातमी समजली आहे मला वाटलं लवकर याल",.. आक्का

"ही काही आनंदाची बातमी नाही आहे, आपल्या संतोष ची केस त्या लोकांनी मागे घेतली याचा अर्थ असा होत नाही की संतोष दोषी नाही, तू सांगितलं म्हणून मी त्याच्याशी नीट बोलतो आहे, त्याला म्हणावं आता जरा नीट वाग, चान्स मिळाला आहे त्याला अजून एक तो असा वाया घालवू नको, स्वतः व्यवस्थित वागून दाखव, दुसऱ्याला त्रास होणार नाही असं काहीतरी कर, आणि तु पण संतोष ची आई मुलाच्या बाबतीत आंधळे प्रेम ठेवू नको, आता किती मोठ्या संकटात सापडला होता तो, एवढी मोठी चुकी केली होती त्याने, तु लाड कर मुलांचे पण चांगल्या गोष्टीचे, फालतू गोष्टी बढावा देऊ नकोस, हीच वेळ आहे संतोषने चार चांगल्या गोष्टी शिकायची स्वतःच्या पायावर उभ रहायची",... बाबा

" हो मी सांगणार आहे संतोषला सगळ्या गोष्टी, समजवणार आहे त्याला, बदलला आहे हो तो, किती शांत झाला आहे ",.. आक्का

" आणि एकदा सोनाली कडे जाऊन माफी मागून या त्यांची किती त्रास झाला असेल त्या सोनल ला ही केस मागे घेताना, ते लोक साधे आहेत, चांगले आहेत नक्की तुम्ही लोकांनी त्यांना घाबरवलं असेल",.. बाबा

आक्का काही बोलल्या नाहीत पण बाबांना माहिती होता की नक्की आक्कांनी प्रयत्न केल्यामुळे संतोष ची सुटका झाली, आता संतोष नीट वागला तर बरं आहे

" ठीक आहे मी सांगते संतोषला समजावून ",.. संतोष च्या बाबांनी फोन ठेवला
.......

वैभव दादाने निशा वहिनीला फोन केला... " आज सोनलने केस मागे घेतली",

"का काय झालं असं अचानक? केस का मागे घेतली? ",.. वैभव दादाने निशा वहिनीला सगळं सांगितलं, की हे आक्कांच कारस्थान आहे, त्यांनी आपला वकील फोडला

"बापरे डेंजर दिसत आहे ते लोक, बरोबर आहे उगीच वेळ वाया गेला असता, बर झाल केस मागे घेतली, सोनल कशी आहे?",.. निशा

"हो ठीक आहे ती जरा नाराज आहे",.. वैभव

"नाराज तर होणारच जेव्हा स्वतःला त्रास होतो ना तेव्हा समजतं",.. निशा

" हो बरोबर आहे",.. वैभव

" काळजी नको करू होईल ठीक ",.. निशा

"तुमचं काय चाललं आहे तिकडे घरी आई-बाबा ठीक आहेत ना",... वैभव

" हो सगळे ठीक आहेत मजेत आहेत, लग्नाची तयारी सुरू आहे, तुमची सुरू आहे का तिकडे तयारी ",.. निशा

" काहीच नाही अजून बहुतेक उद्या आई आणि सोनल जातील खरेदीला",.. वैभव

" हे बघ त्यांना जर जमत नसेल खरेदीच तर मी करू का त्यांची खरेदी, मी येवु का तिकडे, दोघींचाही मूड नसेल",.. निशा

हो ना..

" माहिती नाही मला आता काय परिस्थिती आहे घरी, मी घरी जाऊन सोनल ला सांगतो तुला फोन करायला तू बोलून बघ तिच्याशी, ती तयार असेल तर तू जाशील का तिच्या बरोबर खरेदीला",.. वैभव

"हो चालेल माझी काही हरकत नाही",... निशा

सोनल सही करून घरी आली, एकदम शांत बसली होती ती,

" काय झालं आहे ग? ",... सोनल आई विचारत होती,..... "आता एकदाची झाली ना सही, आता त्या गोष्टीवर विचार करू नकोस, आता पुढे ज्या गोष्टी होणार आहेत त्याच्यावर विचार कर",

"हो आई तु बरोबर बोलते आहे, होऊन गेला तो भूतकाळ होता",.. सोनल

थोड्यावेळाने निशा वहिनीचा फोन आला,..." कशी आहेस तू वहिनी",..

"मी ठीक आहे" ,.. सोनल

"सुरू झाली का लग्नाची तयारी, खरेदी वगैरे बाकी आहे ना आपली",.. सोनल

" हो त्यासाठीच मी फोन केला होता, मला वैभवने सांगितलं तुम्ही लोकांनी केस मागे घेतली आहे",.. निशा

हो

"बरं झालं आता जाऊदे त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही तुझी खरेदी झाली का सोनल? मी येऊ का तिकडे आपण दोघींनी जायचं का खरेदीला",... निशा

"बरं झालं आठवण झाली आईला बोलायचं आहे तुझ्याशी, दागिने खरेदी करायची आहे ना, आई विचारत होती की तू तुझ्या पसंतीचे दागिने घेणार का ",.. सोनल

" चालेल ना, कधी जायचं मग खरेदीला",.. निशा

" आज येशील का तू खरेदी करून घेऊ उशीर जरी झाला तरी वैभव दादा तुला सोडून देईल",.. सोनल

" चालेल हरकत नाही मी आणि आई आम्ही दोघी येतो",.. निशा

" आधी घरी या तुम्ही दोघी मग आपण सगळे जाऊ दुकानात ",.. सोनल

" चालेल",.. निशा वहिनीने फोन ठेवला

" आई निशा वहिनी आणि तिची आई येते आहे दुपारून आज होईल तेवढी खरेदी करून टाकू ",.. सोनल

चालेल...

निशा तिची आई दोघी आल्या, चहा पाणी झाल, सगळे खरेदीला बाहेर पडले, आई बाबा सोनल वैभव दादा सगळे होते सोबत , राहुल बिझी होता अभ्यासात,

सोनल ने राहुल ला फोन लावला,..." राहुल अर्धा तास येशील का? म्हणजे तुझी खरेदी होईल ",

" हो मी वहिनी येतो",... राहुल

"कोणाचा फोन होता भाऊजी",... वहिनी

"सोनलचा फोन होता का वहिनी, आज जाता आहेत ते खरेदीला, आपल्याला बोलवलं आहे तिकडे, चला",.... राहुल

" हो आपली पण खरेदी बाकी आहे भाऊजी, तुम्हाला कपडे घ्यावे लागतील सोनल साठी दागिने साड्या सगळ घ्याव लागेल ",... वहिनी

" हो आपण जायचे का आता ",.. राहुल

" चालेल मी यांना सांगते ",... वहिनी

वहिनीने रमेश दादा ला फोन लावला,..." मी आणि राहुल खरेदीला जातो आहोत सोनल च्या आई-वडिलांसोबत, तुम्ही येत आहात का तिकडे",

" नाही मी बिझी आहे तुम्ही करून घ्या शॉपिंग, कपाटात पैसे आहे ते घेऊन जा, अजून आपलं कार्ड आहे तिथे, जे लागत ते घे, तुझ्यासाठी पण बघ एखादा दागिना, साडी घे",.... रमेश दादा

"तुम्ही काय घालणार आहात लग्नात, ती पण खरेदी करून घेते",... वहिनी

तू ठरव...

" ठीक आहे तुमच्या साठी कुर्ता-पायजमा घेते ",... वहिनी

" चालेल",.. रमेश दादा

वहिनीने कपाटात पैसे काढून घेतले, वहिनी तयार झाली

" रमेश दादा येणार आहे का? ",.. राहुल

"नाही ते बिझी आहेत ",... वहिनी

" मी पण अगदी अर्धा तास येईल त्या नंतर तुम्ही घ्या जे घ्यायच ते ",... राहुल

हो...


राहुल वहिनी खरेदीला बाहेर पडले,

सगळे दुकानात आले

निशाच्या पसंतीने मंगळसूत्र, बांगड्या, नेकलेस सेट अंगठी घेतलं, निशा दागिने घेतांना सारखी वैभव कडे बघत होती

"वैभव अरे निशा ला मदत कर खरेदी साठी ये बर इकडे",.. आई

सोनल साठी असेच दागिने घेतले, दागिने घेतांना राहुल सोबत होता, सोनल दागिने ट्राय करत होती, अतिशय सुंदर दिसत होती, राहुल तिच्या कडे बघत राहीला,

"सोनल तू अगदी एखाद्या हेरॉईन सारखी दिसते आहेस",.. राहुल

काहीही राहुल...

वैभव साठी आणि राहुलसाठी चैन अंगठी घेतल्या

वहिनीने सोनल ला विचारल,.. "दागिन्यांमध्ये काय हव आहे तुला सोनल ला?",

"काही नको तिकडे आईने मंगळसूत्र नेकलेस सेट बांगड्या अंगठी घेतल आहे ",.. सोनल

" मंगळसूत्र घे एक वापरायला, छोट मंगळसूत्र नाजूक कानातले घे म्हणजे नंतर कॉलेजला जायला ते सगळ वापरता येतील, असू दे आमच्या कडून थोड तरी ",... वहिनी

" चालेल वहिनी, खरं तर आईने खूप दागिने केलेले आहेत इतके कुठे घालणार आहे मी ",.. सोनल

" असू दे घे, काही हरकत नाही आमच्याकडं पण हवेत थोडे दागिने",.. वहिनी

सोनल ला माहिती होतं की राहुलच्या आईबाबांचा होकार नाही म्हणजे सगळा खर्च रमेश दादा वहिनी करत असतील, त्यामुळे तिचा नकार होता इतर खरेदी करायला, उगीच कशाला त्यांच्यावर एवढा भार आणि एवढे दागिने थोडी एकावेळी घालून फिरणार आहे, खूपच समजूतदारपणा होता सोनल जवळ

राहुल ने सोनल बोलवून घेतलं,... "आपण माझा ड्रेस घेवून टाकू म्हणजे मला घरी जाता येईल" ,

ठीक आहे...

वहिनी राहुल सोनल तिघांच्या पसंतीने राहुल चे कपडे घेतले सोनल साठी एक दोन ड्रेस आणि साड्या घेतल्या

"मला कशाला साड्या घेत आहेत आता वहिनी",... सोनल

"छान दिसत आहेत घ्यायला हरकत नाही घे ग" ,.. वहिनी

राहुल साठी सोन्याची चैन घेतली, सोनल चे दागिने घेतले, वाहिनीने छोटा नेकलेस घेतला,

बाबा वैभव दादा याना राहुल येवून भेटला,... "मी निघतो आता तुम्ही घ्या कपडे",

" ठीक आहे बर वाटल तुम्ही आलात खरेदी साठी",.. बाबा

" मी घरी सोडून देवू का तुला राहुल घरी",.. वैभव

"नाही मी जाईन नंतर वाहिनीला द्या सोडून",... राहुल

हो नक्की...

सगळे कपड्याच्या दुकानात आले, लग्नासाठी साड्या पसंत केल्या साड्यांची खरेदी झाली,घागरा घ्या मुलींनो

" मला नको घागरा मी शालू घेणार आहे",.. सोनल

"हो साडी नेस सोनल ",... वहिनी

"हो मला पण नको घागरा उगीच पडून राहतो साडी नेसता येते नंतर",.. निशा

सुरेख शालू दाखवले सोनल ने लाल रंगाचा शालू पसंत केला, निशा ने मरून कलर घेतला

"सोनल दुसर्‍या दिवशी वैभव च्या लग्नात काय घालशील घे अजून एक साडी घे",.. आई

" किती साड्या घेतेस आई तू मला, मी नेसणार नाही नंतर कॉलेज ला जायच आहे एवढा खर्च नको ",... सोनल

"अग प्रत्येक प्रोग्रामची एक नको का",... आई

"तुझ्या साठी काढ चांगली साडी",.. सोनल

बाबा ऐकत होते सगळ,..." सोनल इकडे ये, खरेदी करून घे व्यवस्थित खर्चाचा विचार करू नको ",..

" बाबा पण मी ड्रेस घालते ",... सोनल

" मग ड्रेस घे दोन तीन ",.. बाबा

"बाबा तुम्हीही ऐकत नाही, तुमचा ड्रेस झाला का घेवून?",.. सोनल

" आता घेवू माझा, वैभव चा, रमेश दादा, राहुल साठी घेवू ",.. बाबा

सोनल ला अजून एक डिझायनर साडी घेतली, बरीच खरेदी झाली सगळे खूप थकले, खूप खुश होते सगळे

सगळे घरी आले

" मी आता पटकन स्वयंपाक करते जेवून घ्या आणि मग जा तुम्ही घरी निशा ",... आई

" नको आई आम्ही निघतो आता, बाबा एकटे आहे घरी",... वैभवने कारने निशा निशाच्या आईला घरी सोडून दिल,

आई बाबा आत आवरत होते

"आवडली का खरेदी, झाल का मना प्रमाणे ",.. बाबा

"हो पण सोनल सगळ्यातून सावरली ते बघून अजून बर वाटल ",... आई

" हो ना काल खुप नाराज होती ती",... बाबा

सोनल आणि वहिनी आत बसल्या होत्या..

"मी निघते आता ",... वहिनी

हो वैभव दादा आला की आम्ही येतो घरी सोडायला.....

🎭 Series Post

View all