बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 41

त्यांना त्यांच्या मुलाची सुटका करून घ्यायची असेल लवकरात लवकर, मग त्यासाठी दुसऱ्याच्या मुलांची बदनामी झाली तरी चालणार आहे, चुकी त्यांच्या मुलाची आहे तरी सुद्धा त्यांचा मुलगा जिंकतो आहे आणि आपल्याला त्रास झाला तरीसुद्धा आपण हरलो



बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 41

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

रमेश दादा ऑफिसहून आला , सगळे जेवायला बसले, राहुल च जेवणात लक्ष नव्हत, आई बाबांच जेवण झाल, ते खोलीत गेले

"दादा वहिनी मला थोड बोलायच होत तुमच्याशी ",.. राहुल

" कसा होता तुझा आजचा दिवस राहूल?",... रमेश दादा

"चांगला गेला दादा, खूप अभ्यास झाला माझा तिकडे, चांगले आहेत लोक, ऐक ना थोड्या वेळापूर्वी सोनलचा फोन आला होता, संतोष च्या वकिलांनी वरपर्यंत ओळख लावली आहे, ते लोक म्हणतात की केस मागे घ्या नाहीतर खूप बदनामी होईल, त्यांचे म्हणणे आहे की ही केस काही विशेष नाही, सोनल तिच्या मनाने संतोष सोबत निघून गेली होती, असं का करतात लोक दादा? ",... राहुल

" या पेक्षा भयानक लोक आहेत या जगात, त्यांना दुसऱ्याचं काहीही वाटत नाही, त्यांची बदनामी झाली तरी काय हरकत नसते त्यांना, त्यांची स्वतःची सुटका महत्त्वाची असते ",.. रमेश दादा

"हे म्हणजे असं झालं आहे की चुकी करून सुद्धा तेच हुशार",... राहुल

" हो हे असच असतं श्रीमंत लोकांच, त्यांच्या मुलांचं कधीच काही चुकत नाही, आपल्या सारख्या साध्या मुलांना सुद्धा खूप त्रास होतो अशा गोष्टीचा, तसं खरं बघितलं तर ही केस विक आहे, काय होईल ते सांगता येत नाही, काही वेळेस आपण हरु शकतो, कारण त्यांच्या जवळ साक्षीदार असतील, तेच ते संतोष चे मित्र दुसर कोण? आपल्या कडून तू आणि सचिन असतील फक्त, तेही तुम्ही पहिला रिसॉर्टला नव्हते, दुसरे रिसॉर्टला तुम्ही सोनलची सुटका करायला गेले होते",.. रमेश दादा

" आपण कोणीच मोक्याचे ठिकाणी उपलब्ध नव्हतो, मग आता काय कराव दादा? तुझं काय म्हणणं आहे? ",... राहुल

" जर शक्य असेल तर ही केस मागे घेऊन घ्या, कारण यातून काही साध्य होणार नाही, उगाच तुमच्या सगळ्यांचा वेळ जाईल, कारण आता तुझी परीक्षा जवळ आलेली आहे, सोनलला पोस्ट ग्रॅज्युएशन ला अ‍ॅडमिशन घ्यायची आहे,लग्न आल आहे जवळ, अभ्यासाकडे प्रगतीकडे लक्ष द्या, या फालतू लोकांच्या नादी लागून काही उपयोग नाही",... रमेश दादा

"हो मी बघतो सोनल शी बोलून, काय म्हणते आहे ती, पण तिला खूप वाईट वाटेल या गोष्टीचं, खूप त्रास झाला आहे तिला या गोष्टीचा, जर काही करता काही झालं असतं तर आमचं आयुष्य बदलून गेलं असतं आणि अशा मुलाला निर्दोष मुक्तता द्यायची, सोनल ऐकेल की नाही माहिती नाही, मलाही ते पटत नाही, पण तू ही बरोबर बोलतो आहेस दादा",... राहुल

" पण आता याशिवाय काही इलाज नाही आपल्याकडे, आपलं नशीबच चांगल होत की आपण त्यातून सहीसलामत सुटलो, पुढे जायला पाहिजे आता, संतोष आणि त्यांच्या सोबत वेळ घालवण्यात अर्थ नाही ",.. रमेश दादा

" अजून सुद्धा सोनलला त्रास होत आहे या गोष्टीचा, अजूनही आपल्या आई-बाबांनी तिला स्वीकारला नाही, पुढे अजून भविष्यात काय होणार आहे काय माहिती? , संतोष ला काही फरक पडणार नाही, घरचे सगळे त्याच्या सोबत आहे, हाच फरक आहे चुकी करून संतोष मस्त जगतो फिरतो, त्याचे आई वडील पैसे खर्च करायला तयार आहेत त्याच्या सुटकेसाठी, चुकी नसतांना सोनल किती सहन करते, नातेवाईक ही तिला अजून स्विकारत नाहीत ",.. राहुल

" हो ना बरोबर आहे किती गोष्टींचा खूप त्रास होतो, असं कसं सोडून देणार त्या संतोषला, मला खूप राग येतो आहे ",.. वहिनी

" पण जरी तुम्ही लोकांनी केस लढली तरी आपण जिंकू याचे चान्सेस कमी आहे, जिंकलो तरी जास्तीत जास्त एखाद्या महिन्यांची शिक्षा होईल संतोष ला किंवा शिक्षा होणारही नाही फक्त तंबी देऊन सोडून देतील, यापुढे वागणूक नीट ठेव अस सांगतील आणि त्याचे ते मित्रांना तर काही शिक्षा होणार नाही जे सूत्रधार होते ",.. रमेश दादा

" चांगल्या लोकांच काही खरं नाही आहे या जगात, असच गुंड प्रवृत्तीच्या लोकांच चांगलं आहे ",.. वहिनी

" हो ना, दादा तू बोलून बघशील का सोनल शी? ",.. राहुल

"हो बोलेन मी ",.. रमेश दादा

" आपण उद्या सकाळी जाऊन येवू का त्यांच्या घरी",.. राहुल

हो जावू या..

" मी सांगतो तस सोनल ला",.. राहुल

" लवकर जाऊ म्हणजे तु तिकडून ऑफिसला जा, मी पोलिस स्टेशनला जाईल",.. रमेश दादा

" ठीक आहे ",.. राहुल

राहुल ला मेसेज केला,.." मी आणि रमेश दादा उद्या सकाळी लवकरच तुमच्याकडे येत आहे, मग बसून बोलू काय करायचं आहे ते",..

" हो चालेल",.. सोनलने रिप्लाय दिला

" आई-बाबा, वैभव दादा.. राहुल रमेश दादा उद्या सकाळी आपल्याकडे येणार आहेत लवकरच, केस संदर्भात बोलायला, बघु ते काय म्हणताय ते",... सोनल

" हो चालेल काय ठरवायचं ते व्यवस्थित ठरवून घ्या",.. बाबा

" तुम्हाला काय वाटत आहे बाबा? ",.. सोनल

" मला असं वाटत आहे की तू आता तुझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे, तुझं कॉलेज आता सुरू होईल, लगेच लग्न आहे, राहुलची ही खूप महत्त्वाची परीक्षा आहे पुढे, तुमच्या दोघांच चांगल व्हाव या पेक्षा कुठलीही गोष्ट महत्त्वाची नाही, त्रास झाला आहे आपल्याला संतोष मुळे, पण देवाच्या कृपेने आपण सहीसलामत सुटलो, तरी केस च काय करायच हा तुमच्या दोघांचा निर्णय असेल, राहुल आणि तुम्ही ठरवा तुम्हाला केस पुढे लढायची आहे की नाही, पण तुमचा नक्कीच वेळ वाया जाणार आहे यातून",... बाबा

" ठीक आहे बाबा मी विचार करते यावर ",... सोनल

सकाळी लवकरच राहुल आणि रमेश दादा घरी आले, आई-बाबा वैभव दादा त्यांची वाट बघत होते, सोनलने चहा केला, पोहे तयार होते, सगळ्यांना पोहे दिले, नाश्ता झाला

" तुझं काय म्हणणं आहे सोनल? ",... रमेश दादा

" रमेश दादा मला काही सुचत नाही आहे काय करावे? तुम्हाला काय वाटतं आहे आपण केस जिंकू शकतो का?",.. सोनल

"मला असं वाटत आहे की संतोषला आणि त्याच्या मित्रांना शिक्षा व्हायला पाहिजे, तुझ्याबरोबर खूप चुकीच वागला आहे तो संतोष, पण आता झाल काय ते लोक तुझ्यावर वेगळीच केस करत आहेत की तू स्वतःच्या मनाने संतोष सोबत पळून गेली होती, याने बदनामी होईल, तू विचार कर सोनल तुला वेळ आहे का आता या केस साठी, तुमच लग्न शिक्षण परीक्षा जवळ आली आहे, एक अतिशय चांगला भविष्यकाळ पुढे आहे तुमच्या तिकडे लक्ष द्यायला हव ",.. रमेश दादा

" हो ना दादा तुम्ही बरोबर बोलता आहात, पण असं काही झालंच नव्हतं तिकडे रमेश दादा, ते असं खोटं का सांगत आहेत, मला त्यामुळे खूप राग येतो आहे त्या लोकांचा ",... सोनल

" यापेक्षा भयानक केसेस मी बघितल्या आहेत, त्यात सुद्धा आरोपी सही सलामत सुटले आहेत आणि संतोष च्या घरच्यांची वरपर्यंत ओळख दिसते आहे, त्यांनी ज्या वकिलाचे नाव सांगितले आहे तो खूप मोठा वकील आहे, त्याच्यासाठी ही केस म्हणजे केस नाही आहे मुळात, ठरवा आता काय करायचा आहे ते , तो वकील संतोष ची केस जिंकण्यासाठी काहीही करेल कोर्टात अजून, तो सोनल तुझ्यावर खूप विचित्र आरोप लावेल, घाण घाण प्रश्न विचारेल, जे झालंच नव्हतं ते झालं आहे असं सिद्ध करेल आणि मेन म्हणजे आपला वकील सुद्धा त्या लोकांना सामील आहे असा मला संशय आहे, कारण आपल्या वकीलच आपल्याला समजावतो आहे की केस मागे घ्या, बहुतेक त्याने भरपूर पैसे घेतलेले दिसत आहेत संतोष कडून",... रमेश दादा

"मग आपण वकील बदलून बघितला तर ",.. सोनल

"त्याने काही फरक पडणार नाही एका वकीलाला ते पैसे देऊ शकतात तर बाकीच्यांना ही देऊ शकतात ",.. रमेश दादा

"म्हणजे ही केस आपल्या हातची गेली आहे तर",.. सोनल

" हो मला तेच वाटत आहे वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही",... रमेश दादा

" वैभव दादा तुला काय वाटत आहे",.. सोनल

" हे बघ सोनल राग मानू नको पण मला असं वाटत आहे की आपणही केस मागे घ्यावी, या अश्या फालतू लोकांच्या नादी लागून आपल्या वेळ घालवण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा आपण आपल्या प्रगतीचा विचार केला पाहिजे, कारण राहुल ची हे आता महत्त्वाची परीक्षा आहे तुझाही कॉलेज सुरू होईल आणि हट्टाने केस सुरू ठेवण्यात काही अर्थ नाही, विशेष शिक्षा ही होणार नाही संतोष ला",.. वैभव

राहुल तुला काय वाटत आहे

" मला ही दादा च म्हणण पटत आहे, मला काय वाटत आहे त्यापेक्षा तुला काय वाटत आहे हे महत्त्वाचं आहे सोनल, मला तर या गोष्टीचे खूप वाईट वाटत आहे की संतोषला काहीही शिक्षा होणार नाही आणि माझ्या जीवाशी किती मोठा खेळ केला होता त्याने, अजून डोक दुखत माझ, जास्त लागल असत डोक्याला तर मी काय केल असत, मेमोरि गेली असती माझी, या गोष्टीचे दुष्परिणाम बरेच दिवस चालतील, सगळ्यांना त्रास होणार आहे या गोष्टीचा",...

" ठीक आहे मलाही असं वाटत की ही केस मागे घ्यायला पाहिजे, कारण काहीच झालं नव्हतं तरीसुद्धा बऱ्याच लोकांनी माझ्याशी बोलण टाळलं, एवढ की माझं लग्न सुद्धा मोडायवर आल होत मला आता अजून रिस्क नको आहे, अजून बदनामी झाली तर काही सध्या होणार नाही, आता मला फक्त मी आणि राहुल कडे लक्ष द्यायचे आहे भरपूर शिकायचा आहे आणि आनंदात राहायचं आहे आई-बाबा तुम्हाला योग्य वाटतो आहे का माझा निर्णय ",... सोनल

" हो बरोबर आहे तुझं सोनल ",.. बाबा

चहा नाश्ता करून रमेश दादा आणि राहुल निघून गेले वैभव दादा निघत होता ऑफिसला गेला

" मी दुपारी फोन करतो तुला सोनल तू तुझा विचार करून ठेव जर तुला वाटत असेल केस मागे घ्यायची तर आपण जाऊन येवु वकिलांकडे, जर तुला केस लढवायची असेल तर मी आहे तुझ्यासोबत, असा अजिबात विचार करू नको की सगळे तुला सांगत आहे की केस मागे घे, तू तुझा निर्णय घेवू शकते",... वैभव

" नाही दादा मला कोणीही असं सांगितलं नाही, सगळे मला सपोर्ट करत आहेत मी विचार करेन यावर, माझ्या एकटीच अस नाही तर तुमच्या सगळ्यांचा विचार करायचं आहे मला, या गोष्टीला एक झालेला ॲक्सिडेंट असं समजून विसरण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, बघते मी ",.. सोनल

"मी निघतो मग ऑफिसला",.. वैभव

" ठीक आहे दादा",.. सोनल

वैभव ऑफिसला गेला

सोनल खूपच नाराज होती, किती खराब लोक आहेत या जगात, मला त्रास दिला आणि वर मला खोटं पाडत आहेत, मी केस लढावी की नाही लढावी? लढून ही काय साध्य होणार आहे, ते लोक आनंदात आहेत, मला हवी तशी शिक्षा संतोष ला मिळणार नाही, त्यांच्या वर असा प्रसंग आला असता तर त्यांनी काय केलं असतं, मी संतोष ला कधीच माफ करणार नाही आणि त्या आक्का स्वतः एक स्त्री असून माझ्यावर असे आरोप करत आहेत, जर माझं संतोष वर प्रेम असतं मला पळून जायची काय गरज होती? ते तर लोक तयार होते लग्नासाठी, असंच लग्न झालं असतं, काहीही आरोप लावतात, या गोष्टीला काही अर्थ नाही

आई आली तेवढ्यात,... "काय विचार चालला आहे सोनल?",

" आई मला खूप वाईट वाटत आहे या गोष्टीच, मी काय करू? कशी शिक्षा देवू संतोष ला? तुला काय वाटतं मी केस मागे घ्यायला पाहिजे का? आक्का आत्या का असं करता आहेत",.. सोनल

" त्यांना त्यांच्या मुलाची सुटका करून घ्यायची असेल लवकरात लवकर, मग त्यासाठी दुसऱ्याच्या मुलांची बदनामी झाली तरी चालणार आहे, चुकी त्यांच्या मुलाची आहे तरी सुद्धा त्यांचा मुलगा जिंकतो आहे आणि आपल्याला त्रास झाला तरीसुद्धा आपण हरलो, आपल्या हातात आता काही नाही, तू खुश रहा कोणाचा विचार करू नकोस ",... आई

" हो ना, माझं लग्न आहे सात-आठ दिवसांनी उगीच मी आता संतोषी भांडत बसू का? की माझा अभ्यास आमचं लग्न आमचं नातं याच्याकडे लक्ष देवु, राहुल ची परीक्षा खूप महत्वाची आहे, एकदमच जवळ आली आहे परीक्षा, कोर्ट केस आता सुरू झाली तर तो विचलित होईल",... सोनल

" मी एक सांगू का तुला सोनल, तू हि केस मागे घेऊन टाका काही उपयोग नाही आहे या गोष्टीचा यापुढे विचारही करू नको की अशी काही घटना तुझ्या आयुष्यात झाली होती, मस्तपैकी आता कॉलेजचा विचार कर, लग्न जवळ येत आहे त्याची तयारी कर, कारण संतोषला शिक्षा होण्यापेक्षा तर राहुल चांगल्या मार्कांनी पास होणं हे महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, संतोष ला जी शिक्षा द्यायचे ते त्याचे कर्म देणारच आहे ",.. आई

हो आई... दुपारी सोनल वैभव दादा सोबत वकीलांच्या ऑफिस मध्ये गेली आणि तिने संतोष केस मागे घेतली पेपर वर सह्या केल्या आणि ती घरी आली

ते सगळे पेपर वकीलांनी कोर्टात आणि पोलीस स्टेशनला सबमिट केले

माझ्या आयुष्यातुन संतोष प्रकरण संपल, आता मी त्याचा अजिबात विचार करणार नाही, आता फक्त मी आणि राहुल, खूप अभ्यास करायचा आहे मला, वैभव दादा सारख ऑफिसर बनायच आहे, मी प्रयत्न करणार आहे यातून बाहेर पडायच आहे मला,

....

🎭 Series Post

View all