बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 40

आत्ताच वैभव दादाला वकिलांचा फोन आला होता, त्यांचं म्हणणं आहे की ही केस मागे नाही घेतली तर माझी बदनामी होईल",.. सोनलले राहुल ला सगळं सांगितलं की आक्कांनी वरपर्यंत ओळख लावली आहे,



बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 40

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

सोनलचे आई बाबा घरी आले, त्यांनी वैभव ला फोन केला, तिकडे काय झालं ते सगळं सांगितलं, वैभवला ही आश्चर्यच वाटलं,...." काही प्रॉब्लेम तर नाही ना येणार आई बाबा? नाहीतर निशाला ते तिकडे बोलून घेतील आणि गायब करतील, कसे वागले ते, चिडलेले होते का? ",..

" नीट वागले, शांत होते, आम्हाला तरी वाटलं नाही असं काही होईल , पण तरी तू आणि निशा तुम्ही दोघांनी विचार करा आणि मग ठरवा, आम्हाला तर ते लोक नॉर्मल वाटत होते, काही त्रास होईल असं वाटत नाही, उलट ते निशा पासून दूर होते याचा त्यांना त्रास झालेला आहे ",... बाबा

" ठीक आहे मी बघतो निशा ला फोन करून, तिची इच्छा असेल तर जाईल ती तिकडे ",.. वैभव

वैभव ने निशा ला फोन लावला आणि काय काय झालं ते सगळं सांगितलं, निशा ला खूप आनंद झाला होता,... " तुला काय वाटत आहे वैभव? आई बाबा खरंच नीट झाले असतील का? जाऊ का मी घरी? ",..

" मला असं वाटतं तू जायला पाहिजे घरी, त्यांनी एवढ्या प्रेमाने बोलवलं आहे, एक हात त्यांनी पुढे गेला आहे आपण त्यांना साथ द्यायला पाहिजे आणि समजा काही प्रॉब्लेम झाला तर तू तिथे खोटं खोटं सांगायचं माझं आणि वैभवच लग्न झालेल आहे, आम्ही इथून घर सोडल तेव्हाच लगेच लग्न करून घेतल आणि आमच्याकडे साक्षीदारही आहेत ",.. वैभव

" ठीक आहे",.. निशा

" पण मला नाही वाटत मी आई-बाबा असं काही करतील",.. वैभव

निशा आता खूप खुश होती, एवढ्या लवकर आई-बाबा राग सोडतील असं वाटलं नव्हतं, कधी आई बाबांना भेटू अस झाल होत तिला

" मी आज जाते मग घरी, आपली भेट लग्नात होईल मग वैभव ",.. निशा

" हो मी येतो तुला सोडायला, आज खूप खुश आहेस तू ",..वैभव

"हो आई बाबानी राग सोडला, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ",.. निशा

"मला ही खूप आनंद झाला आहे, त्यांचा आशिर्वाद महत्वाचा आहे आपल्यासाठी ",.. वैभव

वैभव आणि निशा संध्याकाळी निशाच्या घरी गेले, निशा चे आई बाबा खूप खुश होते, शेवटी एकुलती एक मुलगी जिच्यावर ते रुसले होते, त्यांना ते सहन होत नव्हत, आता सगळे आनंदात होते

निशा आई बाबांना भेटली, त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होत, वैभव आत आला बसला, बाबा वैभव जवळ येवून बसले

" आम्ही तुमची माफी मागतो वैभव, आम्ही उगीच राग धरला होता, चूक झाली, सोनलची ही आम्ही माफी मागणार आहोत",.. बाबा

"बाबा अस बोलू नका",.. वैभव पुढे जावून निशाच्या वडलांना भेटला, त्यांच्या पाया पडल्या,... "तुमचा होकार आहे आमच्या लग्नाला खूप छान वाटत आहे आज, झाल्या गेल्या गोष्टी विसरून जाऊ आपण ",

चहा नाश्ता झाला, वैभव निघाला,..." निशा काही वाटल तर कर फोन ",

हो.....

आक्कांना वकिलांचा फोन आला,.. "आपलं काम झाल्यात जमा आहे",

"काय झालं? तुम्ही बोलले का त्या वकिलांशी",.. आक्का

" हो तिकडच्या वकिलांना फोन केला होता, त्यांना सांगितलं केस मागे घ्या, नाहीतर यात सोनल ची बदनामी होईल, बराच बोललो मी त्यांच्याशी, त्यांना सांगितल आमची केस वरिष्ठ वकिलांकडे आहे, ते बोलले ते करणार आहेत सोनल ला फोन, समजावतील ते बहुतेक त्यांना",... वकील

"अस झाल तर खूपच बरं होईल",... आक्का

" पण सोनल आणि त्यांनी केस मागे घेतली तर आपल्याला त्यांच्या वकीलाला थोडेफार पैसे द्यावे लागतील",.. वकील

" हो चालेल काही हरकत नाही, आपलं काम चोख व्हायला पाहिजे ",.. आक्का खुशीत होत्या

" मी देतो मग त्यांना ऑफर",.. वकील

" हो त्या पार्टी कडून जेवढे पैसे मिळत असतिल ना फी चे, त्याच्या दुप्पट पैसे द्या त्या वकिलांना , आणि सांगा त्या पार्टीला घाबरवुन सोडा, माझ्या मुलाला काही होता कामा नये, नाहीतर गाठ माझ्याशी आहे ",.. आक्का

वैभव घरी आला घरी, तो गेट जवळ होता, त्याच्या फोन वर वकीलांचा फोन आला

"आता संतोष च्या वकिलांचा फोन आला होता, ते बोलता आहेत केस मागे घ्या नाही तर सोनल ची बदनामी करू",..

"म्हणजे काय बदनामी करणार ते" ,... वैभव

"ते बोलता आहेत की सोनल तिच्या मनाने संतोष सोबत पळून गेली होती आणि घरच्यांच्या दबाव मूळे तिने संतोष वर अपहरणाची केस लावली त्यांच्या कडे साक्षीदार ही आहेत, संतोष चे मित्र बोलत होते सोनल तिकडे संतोष शी चांगली वागली, ते दोघ तिकडे लग्न करणार होते, आता घरचे बळजबरीने दुसरी कडे लग्न करता आहेत सोनल च",... वकील

" काहीही काय? अस काही नाही, चुकीच आहे हे, ते कसे प्रुव्ह करणार आहेत कोर्टात ",.. वैभव

" मला माहिती आहे ते चुकीच बोलता आहेत, खोट आहे हे सगळ, कोर्टात अस असत, कोणी काहीही वळणं देत केस ला, त्यांच्या वर पर्यंत ओळखी आहेत, करू शकतात ते काहीही, आणतील एक दोन साक्षीदार ",.. वकील

" मग आता तुमचा काय सल्ला आहे? आता काय करू या, कितपत आपण केस जिंकू शकतो ",.. वैभव

"तुम्ही घरी सगळ्यांशी बोलून ठरवा, केस चालू ठेवायची असेल तर माझी हरकत नाही, बदनाम होईल, वेळ वाया जाईल आणि संतोषला विशेष शिक्षा ही होणार नाही, त्याचे मित्र ही असेच सुटतील ",.. वकील

" ठीक आहे मी घरी बोलून सांगतो तुम्हाला सगळं",..वैभव

वैभव दादा आत घरात आला, सोनल जेवणाची तयारी करत होती, आई-बाबा बसलेले होते,

" काय म्हटले रे निशाच्या घरचे? काही प्रॉब्लेम?, चांगले वागले ना ते ",.. आई

" काही प्रॉब्लेम नाही, आनंदात आहेत सगळे, मस्त ठरवत होते काय काय करू या लग्नात ",.. वैभव

" तुझा चेहरा का कसा झाला मग? ",.. आई

"आता वकिलांचा फोन आला होता सोनल च्या केस साठी",.. वैभव

"काय म्हटले ते, कोर्टात केस कधी उभी राहणार ",.. बाबा

"प्रॉब्लेम झाला आहे, आक्का आत्याने वरपर्यंत ओळख लावली आहे आणि पैसा वापरला आहे, ते आता म्हणत आहे की केस मागे घ्या नाहीतर सोनल ची बदनामी होईल खूप, ते कोर्टात असे दाखवतील की ही केस काही विशेष नाही , सोनल स्वतःच्या मनाने संतोष सोबत पळून गेली होती, तिथे ती संतोष सोबत लग्न करणार होती आणि आता घरच्यांच्या दबावामुळे ती अशी सांगते आहे की संतोषने तिला किडनॅप केलं होतं, जंगलातल्या रिसॉर्टमध्ये सोनल संतोष व छान व्यवस्थित प्रेमाने वागत होते, याचे साक्षीदार आहेत म्हणे त्यांच्याकडे, व्हिडिओ रेकॉर्डिंग ही आहे, त्यांचा वकील खूप श्रीमंत आणि मोठा आहे, त्याला खूप सवय आहे, तो असे खोटे साक्षीदार आणतो , बरेच लोक पैशासाठी त्याचं काम करतात, ते बोलता आहेत संतोष ला विशेष शिक्षा होणार नाही, त्याचे मित्र असेच सुटतील, तुम्ही तुमच बघा ",.. वैभव

आई बाबा सोनल ला धक्काच बसला..

"आता काय करायचं आहे मग आपण? ",.. बाबा

"त्यांचं म्हणणं आहे संतोषने सोनल ला काही केलं नाही, संतोष सोनल च प्रेम होतं एकमेकांवर, त्यामुळे ही केस चुकीची आहे",.. वैभव

"काय करायच आहे या केसच? वैताग आहे, किती खोट बोलता आहेत ते, सोनल काय करू या?" ,.... बाबा

" बाबा मला काही सुचत नाही का अस खोट बोलता आहेत ते ",... सोनल

" त्यांनी वरून प्रेशर आणलेल दिसतय ",.. बाबा

" बाबा मला हे जे चालले आहे ते अजिबात पटत नाही, अस कस सोडून देणार त्या संतोष ला, बाकीचे मुल काय धडा घेतील या पासून की काही होत नाही मुलींच नाव घेतल की निर्दोष मुक्तता होते",.. सोनल

" पटत तर मलाही नाही पण या केस पुढे काय करायच आहे हे सर्वस्वी आम्ही तुझ्यावर सोडतो आहे तू ठरव काय करायचं आहे ते, केस लढाईची की केस मागे घ्यायची",.. दादा

"पण असं का असतं दादा? खरं तर सगळ्यांना माहिती आहे ना? ते लोक चुकीचा आरोप कसा करू शकतात माझ्यावर? संतोष ची चुकी होती या प्रकरणात, मी तिथून सटकण्यासाठी त्या संतोष शी व्यवस्थित वागत होती, त्यात माझं त्याच्यावर प्रेम आहे असं कस काय ते लोक बोलू शकतात, माझं लग्न ठरलं आहे राहुल शी हे त्यांना कळल असेल ना मग",.. सोनल

" या कोर्ट केस अशाच असतात, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तर होतच राहतात, आपणही कधी ऐकले नाहीत असे आपले गुण आपल्याला कळतात, आपण त्यांच्यावर आरोप केला आहे तर ते बचाव करतील ",.. बाबा

" मला वेळ पाहिजे आहे विचार करायला",.. सोनल

" उद्या पर्यंत आपल्याला सांगायचं आहे त्या वकीलाला कारण दोन-तीन दिवसात केस सुरू होईल कोर्टात",.. दादा

सोनल प्रचंड नाराज होती, काय हे असं? मला किती त्रास झाला हे माझं मलाच माहिती आणि वरून किती बदनामी करत आहे ते माझी, आक्का आत्या काही साधी बाई नाही, पोलिस नेतेमंडळी सगळे ओळखीचे आहेत तिच्या, त्यामुळे आता या केसच काहीही होऊ शकत, म्हणजे त्यांच्या मुलांनी आपलं नाव घ्यायचे आणि परत तेच केस जिंकणार, आपल्याला त्रास होऊन सुद्धा आपण हरणार, त्या रात्री माझ्यावर काय बितली होती हे कोणालाच माहिती नाही, एक क्षण असा होता की माहिती नव्हतं संतोष आता काय करेल, माझे हात बांधलेले होते, खोलीत माझ्या संतोष शिवाय कोणी नव्हत, काय झाल असत माझ, कसे लोक आहेत हे, एवढा त्रास देवून ही अजून मलाच बदनाम करता आहेत, विचार करतांना ही सोनल च्या डोळ्यात पाणी होत, राहुलशी बोलून बघते वैताग आहे,

सोनल ने राहुल ला फोन लावला,.." कसा होता तुझा आजचा दिवस ऑफिसचा",

" चांगला गेला काही विशेष काम नव्हतं बऱ्याच वेळा तर मी अभ्यास करत होतो, आज खूपच अभ्यास झाला माझा , तिकडे एकदम शांतता होती, सोनल आता परीक्षेला खूप कमी दिवस राहिले आहेत, मी छान अभ्यास करणार आहे ",.. राहुल भरभरुन बोलत होता, काय करू याला सांगू की नको? तो त्याच्या अभ्यासाच्या मूड मध्ये आहे

"काय झालं सोनल तुझा आवाज एवढा शांत का? काही झालं आहे का तिकडे? ",.. राहुल

" काही नाही राहुल तू कर अभ्यास आपण नंतर बोलू",.. सोनल

" सांग काय झाल ते नाही तर आता मी तिकडे येईन ह ",.. राहुल

" आत्ताच वैभव दादाला वकिलांचा फोन आला होता, त्यांचं म्हणणं आहे की ही केस मागे नाही घेतली तर माझी बदनामी होईल",.. सोनलले राहुल ला सगळं सांगितलं की आक्कांनी वरपर्यंत ओळख लावली आहे, त्यात त्यांनी असं दाखवलं आहे की माझे आणि संतोष च पूर्वीपासून प्रेमसंबंध होते, आम्ही दोघं स्वतःच्या मनाने पळून गेलो होतो, घरच्यांच्या दबावामुळे मी संतोष वर किडनॅप ची केस लावली आहे आणि आता आपल लग्न बळजबरीने माझ्या घरचे लावत आहेत

"बापरे काय भयानक प्रकार आहे हा",.. राहुल

"आता घरचे सगळे मला म्हणत आहेत तूच ठरव काय करायचं या केसच, लढवायची असेल तर आपण लढू मग हरलो व जिंको, तुला काय वाटत आहे यात",.. सोनल

"रमेश दादा शी बोलायला पाहिजे या विषयावर",.. राहुल

"उद्या पर्यंत निर्णय द्यायचा आहे, केस कमजोर आहे म्हणे संतोष ला विशेष शिक्षा होणार नाही, त्याचे मित्र असेच सुटतील",.. सोनल

" खर तर त्याचे मित्र जास्त दोषी होते, त्यांनी संतोष ला भडकवल",.. राहुल

"हो ना काय करू या आता? ",.. सोनल

" गोंधळ झाला आहे सगळा, डेंजर लोक आहेत हे ",.. राहुल

" तू रमेश दादा शी बोलून घे, रात्री कर मला फोन
मी पण घरी बोलते ",.. सोनल
..............

बघु पुढे काय होतय ते.....
तुम्हाला काय वाटतंय? सोनल ने केस मागे घ्यायला पाहिजे का? उगीच त्रास होईल यातून, त्या पेक्षा अभ्यासाकडे प्रगतीकडे लक्ष् दिल पाहिजे का?, की संतोष ची केस कोर्टात न्यायची?

काय घेईल सोनल निर्णय....?

🎭 Series Post

View all