बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 38

कॉलेजला बस आली, नेहमीप्रमाणे कोपऱ्यातली जागा त्यांनी पकडली, खूप गप्पा मारल्या, त्या कॉलेजला आल्या, अर्ध्या तासाने रिपोर्ट कार्ड मिळणार होते, जरा वेळ त्या सगळ्या मैत्रिणी वर्गात जाऊन बसल्या,


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 38

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

सोनल निशा आत आवरत होते,

"सोनल ऐक ना, आई बोलल्या की त्या माझ्या आईकडे जाणार आहेत आमंत्रण द्यायला, उगाच त्यांचा तिकडे अपमान झाला तर काय करणार ग, मला भिती वाटते, एक तर माझ्या घरचे चिडलेले आहेत ",.. निशा

"तू अजिबात जास्त विचार करू नकोस वहिनी, बोलू दे आई बाबांना तुझ्या आई बाबा बाबांशी, एकदा बोलायला पाहिजे त्यांनी एकमेकांशी, त्यांच्या मुलीच लग्न आहे त्यांना बोलवायला पाहिजे, बघु तरी काय म्हणतात ते ",.. सोनल

" उगीच काही झालं भांडण वगैरे झाल तर? त्यांना राग नाही येणार ना ",.. निशा

"नाही वहिनी आई-बाबांना नाही राग येणार आणि मी आहे ना काही झाला तर, मी तर जाणार नाही सासरी, इथे तर बाजूला घर आहे माझं ",.. सोनल

" हो ना राहुलचे आई-बाबा असे काय करतात काय माहिती ? अजिबात विश्वास नाही त्यांना कोणावर, तिकडे काय झालं होतं सोनल त्या दिवशी? , म्हणजे तुला त्रास नाही होणार ना , नाही तर जावु दे, नको बोलू या, मी ही ना उगाच विषय काढला ",.. निशा

" आपल बोलण झाल नाही ना या विषयावर वहिनी , नाही ग त्यात काय त्रास",.. सोनल

"संतोष कधी पासून मागे येत होता तुझ्या?",.. निशा

" बरेच वर्ष झाले ग, कॉलेज ला गेलो तेव्हा पासून बहुतेक, पण वाटल नव्हत तो अस करेन", .. सोनल

" मग पुढे काय झालं ",.. निशा

"मी आणि राहुल इथे बोलतो उभ होतो त्या दिवशी , संतोष आणि त्याचे मित्र आले गाडीतून, माझा राहुलचा साखरपुडा होणार होता म्हणून संतोष चिडलेला होता, त्यांनी राहुलला डोक्यात मारलं आणि मला गाडीत बसून घेऊन गेले, बराच लांब होत ते घर, रस्त्यात अंधार, अगदी जंगला जवळ",.. सोनल

" भीती नाही का वाटली ",.. निशा

" हो मग काय, किती विचार केला मी माहिती आहे का?, तेव्हा वाटल आई बाबा वैभव दादा राहुल परत कधीच भेटणार नाहीत मला, माझ काय होईल इथे आता काय माहिती? , मी सुरुवातीला त्या मुलांचा विरोध केला, त्यांनी मला एका खोलीत कोंडलं, मग मी विचार केला की शक्तीने नाही युक्तीने या लोकांशी वागायला पाहिजे, मग मी संतोषशी गोड बोलले, त्यामुळे संतोष माझ्या बाजूने होता, प्रशांतने आमच लग्न तिथे व्हाव यासाठी खूप प्रयत्न केले, पण मी ते होवु दिल नाही, नंतर तिथून ते घर सोडून आम्ही दुसर्‍या घरी गेलो, तिथे मला राहुल घ्यायला आला, आम्ही पळालो तिथून, मग आम्ही त्या आजी आजोबा सोबत होतो ",.. सोनल

" बापरे डेंजर आहे हे सगळ, पण राहुलच्या आई-बाबांना कसला राग आला आहे ",.. निशा

" ते समजत नाही, त्यांना वाटत मी संतोष सोबत दोन दिवस होते, माझ्याशी लग्न त्यांना मान्य नाही, काय झाल आहे काय माहिती? एखादी मुलगी कशाला खोटे बोलेल? जेव्हा काही होत एखाद्या मुलीसोबत तीला किती त्रास होतो त्या गोष्टीचा , ती अशी गप्प राहू शकणार नाही, तिने कितीही ठरवलं कि ही गोष्ट लपवून ठेवु तरी लपवली जाते का? काही असत तर संतोषच्या मित्रांनी सगळ्यांना सांगितल असत ना ",.. सोनल

" बरोबर बोलते आहेस तू सोनल जर काही प्रॉब्लेम असता तर तू आधी सांगितलं तर सगळ्यांना, आईंना",.. निशा

" हो आणि एखाद्या सोबत जर अशी दुर्दैवी घटना घडत असेल तर तो फक्त एक ॲक्सिडेंट आहे, त्याचा एवढा बाऊ करायची गरज नाही, ती मुलगी तीच आयुष्य परत सुरू करू शकते, पण आजूबाजूचे लोकं तिला इतके त्रास देतात, कि ती मुलगी ती झालेली घटना कधी विसरू शकत नाही",.. सोनल

"हो बरोबर बोलते आहेस तू सोनल तुलाही असंच केलं आहे की सगळ्यांनी",.. निशा

" आणि संतोष जरी तेव्हा वाईट वागला असला तरी तो काही मुळात गुंड नाही, त्याचा उद्देश हाच होता की त्याला फक्त माझ्या बरोबर लग्न करायचं होतं, पण त्या प्रशांत आणि त्या मुलांच्या नादी लागून त्याने हे चुकीचं पाऊल उचललं, तो तिकडे माझी फार काळजी घेत होता ",... सोनल

" जाऊदे आता झालं ते झालं आता तू राहुलच्या आई बाबांचा अजिबात विचार करू नकोस, आले तर ठीक आहे नाहीतर तू आणि राहुल मजेत राहा ",.. निशा

" हो मी त्यांचा विचार अजिबात करणार नाही, मला राग आला आहे त्यांच्या, किती घाण विचार आहेत त्यांचे, काही झाल असो किंवा नसो, एखाद्याला किती कमी पणाची वागणूक देतात ते, उलट अश्या परिस्थितीत एखाद्या मुलीला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतात बाकीचे, इथे हे अजून त्रास वाढवता आहेत माझा ",.. सोनल

" हो ना कठीण आहे सगळ, आमच्या घरचे तसेच आहेत की तुझा त्रास वाढवला, सॉरी सोनल ",.. निशा

" ठीक आहे वहिनी, तुझ्या घरच्यांशी माझा काही संबध नाही, पण राहुलच्या आई बाबांन मुळे आम्हाला अस वेगळ रहाव लागत आहे ",.. सोनल

दोघींच आवरुन झाल....

वैभव दादा आत आला,.. "निशा मला तुझ्याशी बोलायचं आहे दोन मिनिटं, बाहेर ये",.

निशा वहिनी बाहेर गेली

"तू नाराज आहेस का? ",.. वैभव

" ठीक आहे मी आता, तेव्हा आठवण येत होती आई बाबांची",.. निशा

"आई-बाबा जाणार आहेत उद्या तुझ्या घरी ते बोलतील तुझ्या आई-बाबांशी, उगाच तू कसल्या गोष्टीची चिंता करू नको",.. वैभव

" नाही मी काही चिंता करत नाही",.. निशा

"तुला पसंत आहे ना सगळ ठरल ते, सॉरी तेव्हा सगळ्यांसमोर विचारता आल नाही ",.. वैभव

" हो ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही ",.. निशा
..............

संतोष चे बाबा घरी आले, ते रूम मध्ये निघून गेले, आक्का गेल्या मागे जेवणाच ताट घेवून, त्यांच आवरल, जेवून घेतल त्यांनी,

" अहो मी काय म्हणते, तुम्ही संतोषला माफ करा ना? का एवढा राग राग करता त्याचा? ",.. आक्का

" काय बोलतेस तू? अग त्याने चोरी केली, गल्ल्यातून किती पैसे घेतले काय माहिती? दहा हजाराचा हिशोब लागत नाही, ही अशी सवय बरी आहे का? तूच सांग ",.. बाबा चिडले होते

"अहो कशावरून संतोष ने घेतले ते पैसे ",.. आक्का

" त्याने कबूल केल आहे की, घेतले आहेत त्याने पैसे, तरी तू किती त्याची बाजू घेणार आहेस? , हे अस अति लाड, नेहमी पाठीशी घालण काय कामाचा? पोरगा नुसता बिघडला आहे, आता तरी त्याची बाजू घेण कमी कर, नाही तर उद्या पासून मी घरी येणार नाही, दुकानात झोपत जाईल ",.. बाबा

" अहो असं करू नका, राग सोडा, मी या पुढे काही बोलणार नाही",.. आक्का बाहेर निघून गेले
.............

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच सोनलच्या मैत्रिणी मीनल प्रिया आल्या, आज रिझल्ट होता तर सगळ्या कॉलेजला जाणार होत्या, सोनल ही तयारच होती, ती नाश्ता करत होती,

" चल मीनल प्रिया खावून घ्या थोड ",.. आई

" आमचा नाश्ता झाला काकू, आम्ही थांबतो",.. प्रिया

सोनल तयार झाली, बर्‍याच दिवसांनी कॉलेजला जायला मिळणार म्हणून सगळ्या मैत्रिणी खूप उत्साही होत्या

"येतो ग आई आम्ही, एक दोन तास लागतील",.. सोनल

सोनल मैत्रीणींबरोबर कॉलेजला गेली

आई काळजी करत होती,.." अहो तिकडे संतोष ही येईल ना रिझल्ट घ्यायला ",..

" हो येईल, तो ही आहे त्या कॉलेज मध्ये म्हणजे येईल तो",.. बाबा

" काही बोलला तर तो सोनलला? काही करणार तर नाही ना?",.. आई

"काही होणार नाही, आता बरीच परिस्थिती बदललेली आहे, कोणी नाही आता संतोष सोबत, त्याचे सगळे मित्र आता शिक्षा होईल ह्याच विचारात आहेत, घाबरलेले आहेत ते मूल आता , तू अजिबात काळजी करू नको, मलाही आला होता हा विचार मनात, पण आपण असं सारखं सोनलला घाबरवत ठेवू शकत नाही, तिने सगळीकडे जायला पाहिजे, जे होईल ते होईल, प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यायला पाहिजे, काही होणार नाही, काळजी करू नको",.. बाबा

सोनल प्रिया मीनल बस स्टॉप वर आल्या,

" आज बर्‍याच दिवसांनी आपण बसने जातो आहोत ना",..प्रिया

" हो आज आपण खूप एन्जॉय करायच मस्त ",.. सोनल

" दुपारी कॅन्टीन मध्ये जाऊ ",.. मीनल

सगळ्या मैत्रिणी उत्साहात होत्या

कॉलेजला बस आली, नेहमीप्रमाणे कोपऱ्यातली जागा त्यांनी पकडली, खूप गप्पा मारल्या, त्या कॉलेजला आल्या, अर्ध्या तासाने रिपोर्ट कार्ड मिळणार होते, जरा वेळ त्या सगळ्या मैत्रिणी वर्गात जाऊन बसल्या, खूप छान वाटत होतं सगळ्यांना भेटून, काही मैत्रिणींना धडधड होत होती,

"जे व्हायचं ते होईल ग नका घाबरू" ,... सोनल

"आज आपण इतके दिवसांनी भेटलो आहोत, नंतर आपण कॅन्टीनमध्ये जाऊ",.. प्रिया

सगळ्या हो बोलल्या....

जरा वेळाने रिझल्ट लागला, सोनल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पहिली आली होती, टीचर ने सोनल शाबासकी दिली,.. "अशी छान अभ्यासात प्रगती कर, उच्च शिक्षित हो",

थँक्यू मॅम .... सोनल खूप खुश होती

" तुला प्रिन्सिपल सरांनी भेटायला बोलवल आहे, घरी जाण्याच्या आधी एकदा त्यांना भेटून घे ",... टीचर

" हो मॅम ",.. सोनल

बाकीच्यांच रिजल्ट द्यायच काम सुरू होत

सोनलने पटपट वैभव दादा ला मेसेज पाठवून दिला,..." मला चांगले मार्क मिळाले आहेत, वैभव दादा तू आई बाबांना सांगून दे वहिनीला ही सांग",

राहुल ला मेसेज केला,.." मला चांगले मार्क मिळाले आहेत, रमेश दादा आणि वहिनीला सांगून दे, मी घरी आली की करते फोन ",..

" कॅन्टीनमध्ये गेल्यावर पार्टी दे सोनल आता, दरवर्षी पहिला नंबर सोडत नाहीस तू",.. सगळ्या मैत्रिणी

"आता पुढे काय करायचं ठरलं आहे",..

"सोनलच लग्न आहे आता आठ दिवसांनी",. मीनल

"आम्हाला बोलावलं लग्नाला",.

" हो माझं लग्न जरी असला तरी मी पुढे शिकणार आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेणार आहे लगेच",.. सोनल

प्रिया आणि मीनल खूप खुश होत्या त्या दोघींनाही खूप छान मार्क मिळाले होते, पुढची ऍडमिशन त्यांची फिक्स झाली होती, मीनललाही प्रिन्सिपल सरांना भेटायचं होतं, तिचं लग्न होतं दोन महिन्यांनी होत, तिला तेच विचारायचं होतं की इथे ऍडमिशन घेतली आणि परीक्षेला आलं तर चालेल का? किती परसेंटेज अटेंडन्स पाहिजे? सगळी चौकशी करायची होती, त्या मैत्रिणी प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये गेल्या

" तुमच्या सगळ्यां ग्रुप च खूप अभिनंदन, सोनल मग पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेणार ना इकडे?",.. सर

"हो सर मी शिकणार आहे पुढे इथेच ऍडमिशन घेते आहे, माझा सीट फिक्स समजा",.. सोनल

"तुम्ही प्रिया मीनल?",.. सर

" हो सर आम्ही पण घेतो आहोत ऍडमिशन, तेच विचारायचं होतं", ..मीनलने तिची अडचण सांगितली

"काही हरकत नाही मीनल, ऍडमिशन घे, पुढचं पुढे बघू",.. सर

प्रिसींपल सरांनी सोनल चा छोटासा सत्कार केला, सगळ्या मुलींना चॉकलेट दिले, खूप आनंदी वातावरण झाल होत, प्रियाने फोटो काढले, ग्रुप वर पाठवून दिले

त्या आनंदाने बाहेर निघाल्या, बिल्डिंगच्या बाहेर आल्या असतील तेवढ्यात समोर संतोष प्रशांत त्याचे मित्र दिसले

" सोनल समोर बघ संतोष येतो आहे",.. प्रिया

सोनल ला जरा धड-धड झाल, काय माहिती काय म्हणतो? विचारेल मला कि मी जेल मध्ये मी त्याच्याशी बोलली का नाही, केस मागे घे वगैरे, कटकटच आहे ही, का दिसला हा संतोष आज?

सोनल आणि तिच्या मैत्रिणी जातच होत्या,

संतोषने सोनलला हाक मारली,.. "सोनल.. सोनल",

सोनल थांबली तिच्या मैत्रिणी तिच्यासोबतच थांबल्या , संतोष जवळ आला,... "तुझं खूप अभिनंदन सोनल, आता समजलं मला की तू पहिली आली आहेस, खूप आनंद झाला मला, मी पण पास झालो आहे",.

"तुझं खूप अभिनंदन संतोष",.. सोनल

सोनल तिथुन निघून गेली

कॅन्टीन मध्ये खूप मजा आली, छान छोटीशी पार्टी केली त्यांनी, जगात कुठे गेल तरी आपल्या कॅन्टीन सारखे पदार्थ कुठेच मिळत नाही यावर सगळ्यांच एकमत झाल

"आता घरी यायच सगळ्यांनी",.. सोनल

"हो तुझ्या लग्नाला ना",.. मैत्रिणी

सोनल छान लाजली होती, मैत्रिणी चिडवत होत्या,

सोनल आणि तिच्या मैत्रिणी निघाल्या, बस स्टॉप वर आल्या

"आज अतिशय आश्चर्य झालं ना, संतोषने काही त्रास दिला नाही",.. मीनल

" हो ना मला पण तेच आश्चर्यच वाटलं एकदम, चला बर आहे थोडा फरक पडला संतोष मध्ये",.. सोनल

बस आली, मुली घरी निघाल्या..
......

संतोष घरी आला आक्का कुठेतरी बाहेर जायची तयारी करत होत्या

" कुठे जाते आहेस आई?",.. संतोष

"आज कोर्टाची नोटीस आली आहे घरी, वकिलांना भेटायला जाते आहे मी, आज तुझा रिझल्ट होता ना? काय झालं? ",.. आक्का

"मी पास झालो आहे आई, मला खूप आनंद झाला आहे",..संतोष

"संतोष असंच छान अभ्यासावर लक्ष ठेव, ऍडमिशन घ्यायचे आहे का तुला पुढे",.. आक्का

"बघतो ना आई आता कोर्टाची केस सुरू आहे, रिजल्ट काय लागतो ते, नाहीतर मग मी आणि प्रशांत मिळून आम्ही एक व्यवसाय सुरू करणार होतो ",.. संतोष

" अरे वा कसला व्यवसाय? ",.. आक्का

" आम्ही दोघं मिळून बाजारात दुकान टाकणार होतो आई प्रशांत ही पास झाला आणि माझी बाकी सगळे मित्रही पास झाले आणि सोनल पहिली आली आहे कॉलेजमध्ये",.. संतोष

" अरे वा छान झालं, सोनल हुशारच आहे खूप",.. आक्का

" आई बाबांना सांगू का माझा रिजल्ट ",.. संतोष

सांग ना..

" जाऊ दे त्यांना मी आवडत नाही, त्यांना काय फरक पडणार आहे मी पास आहे की फेल, मला फार वाईट वाटतय आई ",...संतोष

"असा नको विचार करू संतोष होईल नीट सगळ, बाबा बोलतील तुझ्याशी तू काळजी करू नकोस, मी जरा जाऊन येते ",... आक्का घरात निघाल्या

...............

🎭 Series Post

View all