बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 37
कधीही न तुटणारे.....
©️®️शिल्पा सुतार
..............
..............
संतोष सकाळच्या वेळी दुकानात गेला, बाबा गल्ल्यावर बसलेले होते, दुकानातले सगळे संतोष कडे बघायला लागले, बाबांना राग आला संतोष ला बघून, बाबा तुला घेवून बाजूला गेले,.." आता कशाला आला आहेस तू इथे संतोष? घरी जा",.
"बाबा मला तुम्हाला मदत करायची आहे दुकानात",.. संतोष
" मला तुझ्या मदतीची काही गरज नाही संतोष, यापुढे तू इथे नाही आला तरी चालेल",.. बाबा
"बाबा अस नका करू, खरच मी रोज येईन दुकानात ",.. संतोष
"मागच्या वेळी तू गल्यातुन पैसे घेतले होते ना? ",.. बाबा
संतोष गप्प होता..
" बोल संतोष, मी तुझ्यावर विश्वास ठेवून त्या दिवशी बाहेर गेलो होतो, तू अस केलस? ", .. बाबा खूप चिडले होते
" हो बाबा माझी चुकी झाली ",.. संतोष
" किती घेतले होते ",.. बाबा
"दहा हजार ",.. संतोष
" ते मला वापस दे लवकरात लवकर, आणि या पुढे इथे नको येवूस, मी अजून समर्थ आहे दुकान सांभाळायला ",.. बाबा
बाबांनी आक्कांना फोन लावला,.. "हा संतोष काय करतो आहे दुकानात? आधीच गिऱ्हाईक कमी झाले आहेत, त्याला ताबडतोब घरी बोलवुन घे" ,.. बाबांनी संतोषच्या हातात फोन दिला
" संतोष काय झालं तिकडे? तू घरी ये आधी ",.. आक्का
" ठीक आहे आई येतो मी ",.. संतोष
संतोष घरी यायला निघाला रस्त्यात त्याला प्रशांत दिसला
" कुठून येतो आहेस संतोष? ",.. प्रशांत
"काही विचारू नको प्रशांत, दुकानात गेलो होतो बाबांच्या मदतीसाठी, ना घर का ना घाट का, असं माझ झाला आहे, मी त्या वेळी तिजोरीतुन पैसे घेतले होते गुपचूप ते बाबांना समजलं, त्यांनी मला त्यांचे घेतलेले पैसे वापस करायला सांगितले आहेत, सोनलसाठी सगळं हे केलं, सोनल हि गेली, आई-बाबाही चिडले काय करू मी, बाबांनी बसू दिलं नाही दुकानात, हाकलून दिलं ",.. संतोष
" एकदा या केसचा निकाल लागू दे, बघू आपल्याला शिक्षा होते की नाही, आपण दोघं मिळून काहीतरी व्यवसाय करू",.. प्रशांत
" तुझ्या डोक्यात आहे का काही विचार ",.. संतोष
" हो धान्याचा व्यवसाय करायचा विचार आहे, होलसेल धान्य घ्यायच स्वस्त आणि ते बाजारात विकायचं, कष्ट आहे, रोज बसावं लागेल दुकानात, अस एक एक गोष्ट वाढवायची दुकानात ",.. प्रशांत
" बसू मग दुकानात करू मेहनत, आता बाबांचा राग जाण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे",.. संतोष
" उद्या रिझल्ट आहे आपला तु येणार आहे का कॉलेज ला? बहुतेक सोनलही येईल उद्या तिकडे, आपल्याला तिला रिक्वेस्ट करायची असेल तर बोलता येईल तिच्याशी ",.. प्रशांत
" जाऊदे आता मला तिच्याशी काहीही बोलायचं नाही, जी व्हायची ती शिक्षा होऊ दे, जेल पेक्षा घरीच किती मोठी शिक्षा होते आहे मला, मी बरा होतो जेल मध्ये ",.. संतोष
" असा काय विचार करतो आहे संतोष तू?, का एवढी काळजी करतोस होईल नीट",.. प्रशांत
"मला सगळ्या गोष्टींचा आता कंटाळा आला आहे, अरे बाबा कसे वागता आहेत बाबा माझ्याशी?, अगदी चोर ठरवुन टाकल मला ",.. संतोष
" तू धीर सोडू नको होईल काहीतरी",.. प्रशांत
संतोष घरी आला, आक्का समोर बसून त्याची वाट बघत होत्या,.." काय झालं संतोष तिकडे? बाबा का एवढे चिडले होते? ",..
संतोष काही बोलला नाही बोलला..
"संतोष काय झालं आहे",.. आक्का
" आई माझी चुकी झाली मागच्यावेळी मी दुकानात गेलो होतो ना तेव्हा मी गल्ल्यातून दहा हजार रुपये घेतले होते, ते आता बाबांना समजलं बहुतेक हिशोबात आलं असेल ते, बाबांनी मला ते पैसे लवकरात लवकर वापस करायला सांगितले",.. संतोष
" का असं करतोस तू संतोष? अजून काय काय चुका करून ठेवल्या आहेस तू?",.. आक्का
संतोष काही बोलला नाही..
आक्कांना यावेळी खूप राग आला होता.. संतोष चुकला तू, त्या रागाने आत चालल्या गेल्या
" काहीही करून लवकरात लवकर काम शोधावं लागेल हे असं जगण्यापेक्षा तर जेलमध्ये बरा होतो",.. संतोष
.............
.............
संध्याकाळ झाली आज रमेश दादा लवकर आला पोलीस स्टेशन हून घरी, राहुल आणि वहिनी तयार होते,
"मी एकदा आई बाबांना विचारून बघू का?",.. राहुल
" हो जा बोलून बघ, मी तो पर्यंत तयार होतो, मी काल बोललो त्यांच्याशी, पण काही उपयोग नाही",.. रमेश दादा
राहुल आई बाबांच्या रूम मध्ये गेला,.. " आई बाबा मी आता सोनल कडे जातो आहे, तुम्ही येत आहात का? लग्न ठरवायची बैठक आहे" ,... राहुल
" अरे वाह मस्त सुरु आहेत प्रोग्राम, आमच्या संमतीची गरज नाही ना, तू सगळ ठरवुन आला आहेस तर आता मग आम्हाला विचारायच नाटक कशाला करतोस? मी आधी सांगितलं होतं, कालही सांगितलं रमेशला आम्हाला या लग्नात काडीचाही इंटरेस्ट नाही, आम्ही येणार नाही, सून म्हणून आम्हाला सोनल मान्य नाही",.. बाबा
"असं करू नका आई बाबा, तुमच्या आशीर्वादाशिवाय मला बरं नाही वाटणार" ,.... राहुल
" आमचा नाईलाज आहे",.. बाबा
" एवढं काय झाल आहे? कोण काय बोलल तुम्हाला? का अस मनात भरून घेतल तुम्ही सगळ? मोकळ बोला बर आज, किती चांगली आहे सोनल, तुम्ही उगाच तिच्यावर संशय घेत आहात",.. राहुल
" कोणी काही बोललं नाही, आम्हाला समजत थोड, आपण या विषयावर न बोललेलं बरं ",.. बाबा
"ठीक आहे मग तुम्ही तुमचा हट्ट सोडणार नाही, तर मी रमेश दादा आणि वहिनीला घेऊन जातो आहे सोनल कडे",.. राहुल
राहुल रूम च्या बाहेर आला...
" काय झाल?",.. दादा
" त्यांच्या नकार आहे",.. राहुल
"मी आधी बोललो होतो नको बोलू त्यांच्याशी जाऊ दे उगीच मूड जातो, आई बाबा ऐकत नाहीत",... रमेश दादा
"मी त्यांच्याशी बोलून घेतलं हे बरं झालं नाही तर उद्या म्हणतील की एवढं लग्न ठरवायला गेला आणि आम्हाला बोलला सुध्दा नाही जातांना",.. राहुल
"हो बरोबर आहे ",.. दादा
तिघे सोनल कडे यायला निघाले, सोनल कडे सगळी तयारी झाली होती, सगळे वाट बघत होते, आई बाबा भारावून गेले होते, सोनल तयार होती, वैभव दादा वहिनी आवरात होते,
" काय झाल हो? चेहेरा का असा झाला तुमचा? काय विचार चालला आहे? ",.. आई
"काही नाही आज एकदम मन भरून आलं, दोघ मुलांच लग्न जमत आहे",.. बाबा
"हो ना मुल किती लवकर मोठी होतात",.. आई
"राहुलच्या घरचे नाराज आहेत, निशाच्या घरचे नाराज आहेत, मला नाही आवडत आहे हे अस, आपल्या मुलांवर त्यांचा काही दोष नसतांना सगळे नाराज आहेत ",.. बाबा
"जाऊ द्या हो आपण आहोत आपल्या मुलांसाठी, त्यांचा काहीही दोष नसताना जर लोक उगाचच त्यांच्यावर नाराज होत असतील तर आपण काही करू शकत नाही आणि तुम्ही आता हळवे होऊ नका, मुलं घाबरून जातात सोनल आताच सगळ्यातुन बाहेर पडली आहे, निशा अजूनही तिच्या आई बाबांची आठवण काढते आहे, ती परत रडायला लागेल",.. आई
" हो बरोबर बोलते आहेस तू ",.. बाबा
राहुल रमेश दादा वहिनी आले, बाबांनी पुढे होवुन त्यांच स्वागत केल,
कार्यक्रम आहे तर सगळे जेवूनच जातील, आई, सोनल, निशा ने लवकर स्वयंपाक करून घेतला होता, चहापाणी झालं, सगळे छान बोलत बसले होते
" राहुल आणि सोनल तुमचं काय विचार आहे, ते बोला, तसं आपलं काल बोलणं झालंच आहे तरी एकदा सगळ्यांसमोर सांगा, राहुल तुझं खूप अभिनंदन नवीन नोकरीचे पेढे आणले का?",.. बाबा
"हो आणले आहेत ",.. राहुल ने आई बाबांना पेढे दिले नमस्कार केला, राहुल ने सगळ्यांना पेढे वाटले,
सोनल खूपच खुश होती, वैभव दादा आई बाबांचा तर सपोर्ट होतात, रमेश दादा वहिनी किती छान आहेत, त्यात राहुलला नोकरी लागल्यामुळे थोडं बरं वाटत होतं , निदान राहुल ला तरी समाधान वाटेल तो काहीतरी करतो आहे याचं, त्याच मन जपण महत्त्वाचं आहे
" रमेश दादा तू बोल" ,.. राहुल
"नाही राहुल तू बोल",.. रमेश दादा
"आई बाबा आम्हाला लग्न करायचं आहे, तुम्हाला माहिती आहे आमच्या घरून विरोध आहे त्यामुळे आम्हाला सध्या तरी वेगळे राहाव लागेल",.. राहुल
"हो काल मी बोललो त्या विषयावर सोनल शी, तुम्ही आमच्या सोबत रहायला आमची हरकत नाही ",.. बाबा
राहुल सोनल कडे बघत होता..
" बाबा मला माहिती आहे तुम्ही आमचा विचार करून हे बोलता आहात पण राहुल कंफर्टेबल असेल तिथे आम्ही राहू ",.. सोनल
" ठीक आहे तुम्ही दोघ बघा तुमचा काय विचार आहे तो, पण सोनल वैभव दोघे आम्हाला सारखे, एकत्र राहिले तरी हरकत नाही, बाजूला दोन खोल्या भाड्याने दिलेल्या आहेत त्याखाली करता येतील, तिथे राहता येईल तुम्हाला",.. बाबा
" राहुल तुला जे काही सामान लागत ते सगळं घेऊन घे",.. रमेश दादा
हो...
" मी आणि तुमचे दादा आम्ही येत राहू नेहमी",.. वहिनी
" मलाही आमच्या आई-वडिलांचे मत पटलेलं नाही, आम्ही पण घर सोडलं असत दोघांनी आणि राहुल सोनल सोबत राहिलो असतो पण ते दोघं एकटे राहतील म्हणून आम्ही तिथे रहायचा निर्णय घेतला आहे",... रमेश दादा
"बरोबर आहे तुमचा निर्णय, कुणीतरी एकाने आई-बाबांचं जवळ रहायला पाहिजे",... बाबा
" हो आणि आम्ही आई-बाबांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो आहोतच ",.. रमेश दादा
सोनल सगळं ऐकत होती तिच्या चेहऱ्यावर चिंता होती राहुल चे आई बाबा मला स्विकारतील का कधी?
"तर मग आता लग्नाची तारीख ठरवून घेऊ आपण चालेल ना वैभव निशा, राहुल सोनल ",.. बाबा
गुरुजी आले तेवढ्यात
वैभव दादा निशा वहिनी राहुल सोनल खूप आनंदात होते, आधी बहिणीच लग्न मग भावाच त्या प्रमाणे आदल्या दिवशी राहुल आणि सोनलच लग्न करायचं ठरलं, दुसऱ्या दिवशी वैभव दादा आणि निशा वहिनीच लग्न ठरलं, दोघं लग्न एकावेळी करू नये म्हणून दोन दिवसाचा मुहूर्त धरला, आज पासून एक आठवड्याने हे दोघं लग्न होते
सगळे खूप आनंदात होते, काय काय खरेदी करावी लागेल सगळे मस्त बोलत बसले होते,
निशा गप्प होती ते सोनलच्या लक्ष्यात आल
" वहिनी काय झाल घरच्यांनी आठवण येते का? ",.. सोनल
"हो, आई बाबा का अस करतात काय माहिती ",..निशा
"अग निशा आम्ही दोघे जाणार आहोत तुझ्या घरी आमंत्रण द्यायला, त्यांच मन वळवण्याचा प्रयत्न करू आम्ही, तू काळजी करू नकोस, सहाजिकच आहे तुला येणार त्या लोकांची आठवण, तू ही येशील का आमच्या सोबत ",.. आई
" नाही आई तुम्ही जावून या तिकडे, मी आता लग्न झाल्या शिवाय जाणार नाही आई कडे ",.. निशा
जेवणाची तयारी झाली, सगळे जण आनंदाने जेवायला बसले, खूप छान झाला होता स्वयंपाक
राहुल ने विचारलं,.." आजचा स्वयंपाक कोणी केला किती छान झाला आहे ",
" आईने, मी आणि वहिनी ने मदत केली ",.. सोनल
" सोनल तुला स्वयंपाक येतो का? ",. राहुल
सगळे हसायला लागले..
" राहुल अरे हा प्रश्न विचारायला खूप उशीर झाला आहे असं नाही वाटत का तुला? , पुढच्या आठवड्यात लग्न आहे आपल ",.. सोनल
" अगं सांग ना सोनल तुला स्वयंपाक येतो का?",.. राहुल
" नाही येत मला स्वयंपाक ",.. सोनल ही मजेच्या मूडमध्ये होती
" बापरे वहिनी माझी उद्या सकाळपासूनच स्वयंपाकाची ट्रेनिंग सुरू करा, तुम्हाला एवढ्या घाईने आता मला स्वयंपाक शिकवावा लागेल",.. राहुल
परत सगळे खूप हसत होते, मस्त आनंदी वातावरण झाल होतं
.............
सगळे घरी जायला निघाले
"मी करते तुम्हाला फोन काकू, खरेदीचे काय आहे ते आपण दोन-तीन दिवसात ठरवू ",.. वहिनी
" हो चालेल, लिस्ट करा तो पर्यंत सोनल निशा, काय काय लागेल ते एकदाचा जावून घेवून येवु ",.. आई
"सोनल उद्या काय रिझल्ट लागतो ते सांग",.. वहिनी
"हो वहिनी",.. सोनल
सगळे आत आले, वैभव दादा बाबा बाहेर काहीतरी ठरवत होते,
" पैशाची व्यवस्था करावी लागेल" ,.. बाबा
" मी देतो बाबा पैसे ",.. वैभव दादा
" आहेत पैसे वैभव, लग्नासाठी मी मुद्दाम बाजूला फिक्स मध्ये टाकले होते पैसे, उद्या आपण बॅंकेत जाऊ पैसे घेवुन येवू",.. बाबा
"बाबा मलाही घेवू द्या थोडी जबाबदारी",... वैभव दादा
" ठीक आहे वैभव काही प्रोब्लेम नाही, सगळा खर्च मी करणार आहे , आता अजुन चर्चा नको ",.. बाबा
बाबा आत आले आई आवरत होती,.." उद्या वैभव सोबत बँकेत जातो मी आणि लग्नासाठी ठेवलेले पैसे काढून आणतो, चालेल ना",
"हो, दागिने, कपडे, दोन तीन दिवसाचा खर्च, नंतर पूजा बरेच प्रोग्राम आहेत",.. आई
" तू उद्या सकाळी मला किती पैसे लागतात ते व्यवस्थित सांगून दे",... बाबा
"ठीक आहे मी हिशोब करते थोडे पाच पन्नास हजार इकडेतिकडे",... आई
चालेल..... आई बाबा दोघ खूप खुश होते
......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा