बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 36

राहुल ने घरी जाता जाता मिठाई घेतली, वहिनी वाट बघत होती, राहुलला आनंदात येतांना बघून वहिनीला आधी समजलं होतं की नक्कीच नोकरी मिळाली आहे



बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 36

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

आई बाबा टीव्ही बघत होते, रमेश दादा वहिनी आत आले,... "आम्ही उद्या सोनलच्या घरी जातो आहोत लग्न ठरवायला, तुम्ही येत आहात का सोबत?",..

"नाही आमचं ठरलं आहे, आम्हाला हे लग्न मान्य नाही",.. बाबा

"का असं करत आहात आई बाबा? , सगळं सांगितलं आहे ना आम्ही तुम्हाला, आता प्लीज हट्ट सोडा, परके लोकसुद्धा मदत करत आहेत आणि तुम्ही असं करतात ",.. रमेश दादा

"आम्ही आडकाठी घेतलेली नाही, फक्त आमचा विरोध आहे, तुम्हाला जे करायचे ते करा",.. बाबा

" असं करू नका आई बाबा, कोण आहे राहुल ला आपल्याशिवाय? त्याला लग्नानंतर राहायला जागा नाही, एवढी महत्त्वाची परीक्षा जवळ आली आहे तरी तो नोकरी शोधत आहे, त्याला गरज आहे आपल्या पाठिंब्याची",.. रमेश दादा

" अरे मग काय गरज आहे इतक्यात लग्न करायची",.. बाबा

" तुम्हाला माहिती आहे ना सोनल आता कुठल्या परिस्थितीतला सामोरी गेली आहे, त्या दोघांसाठी आता लग्न करण चांगलं राहील, उगीच लोक मोडता घालतात, त्यांच्या घरचे शिकले-सवरलेले लोक आहे, सोनल स्वतः पोस्ट ग्रॅज्युएशन ला ऍडमिशन घेते आहे, तिचा दादा मोठा ऑफिसर आहे गव्हर्मेंट मध्ये, अजून काय हव आहे तुम्हाला?, यापेक्षा चांगलं स्थळ कोणत आहे आणि पूर्वी तर तुमचा होकार होता ना? मग का असं करत आहात तुम्ही, मुलं उगाच एकटे राहतील ",.. रमेश दादा

" तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकतात तुम्ही त्यांच्या सोबत, आणि आम्हाला या विषयावर काहीही बोलायचं नाही, तुम्हाला जे करायचं ते करा, तुम्हाला आई-वडिलांची गोष्ट ऐकता येत नाही, फक्त आम्हीच तुमच ऐकायच का? , नेहमी तुम्ही आम्हाला अस करतात, असं कसं वागतात तुम्ही?",.. बाबा

"आई-बाबा तुमचं म्हणणं एकदम चुकीच आहे, इतर गोष्टी ऐकत नाही का आम्ही तुमच्या? , उगीच कोणाच तरी ऐकुन तुम्ही घरच्यांना विरोध करता आहात, राहुल सोनल च लग्न होईलच, मी आहे, जाऊ द्या तुमच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही",.. रमेश दादा वहिनी रूम मध्ये वापस आले, रमेश दादा रागात होता,.." काय अस करतात आई बाबा, किती चांगली मुलगी आहे सोनल",

" हो ना त्या दोघांच एकमेकांनवर प्रेम आहे, आपण आहोत राहुल भाऊजी सोनल साठी, मी करेन बरोबर, आपण जेवढ बोलु आई बाबांना तेवढे ते नाही बोलतात ",.. वहिनी

" हो तस करता आहेत ते, कोणाच ऐकुन अस करतात ते काय माहिती ",.. रमेश दादा

वहिनी काहीतरी लिस्ट करत होती

"काय लिहिते आहेस ग",.. दादा

" सोनल साठी थोडं सामान घ्यावे लागेल, त्याची लिस्ट करते आहे, त्यांच्या घरासाठी सामान घेवू या ",.. वहिनी

"बरोबर करते आहेस तू, आपण दोघं जाऊ, शॉपिंग करून येऊ, राहुल साठी पण कपडे वगैरे घ्यावे लागतील, घरातल्या वस्तू घेवुया" ,.. दादा

" दर महिन्याला त्यांना सपोर्ट करावा लागेल,.. वहिनी

" हो बरोबर बोलते आहेस तु आपण करू सगळं, तुझी काही आडकाठी नाही ना",.. दादा

" माझी कशाला असेल काही आडकाठी? मीच तयार करते आहे ना सगळी लिस्ट, राहुल भाऊजी मला लहान भावासारखे आहेत, किती व्यवस्थित वागतात ते, एवढे शिकलेले आहेत, पुढे जावून वरच्या पोस्ट वर काम करतील तेव्हा त्यांच्या कडून वसूल करेन मी",.. वहिनी छान हसत होती

"बरोबर बोलते आहेस तू, छान प्लॅन आहे तुझा ",.. रमेश दादा ही हसत होता

"काय प्लॅन ठरतोय ",.. राहुल आत आला

" तुझ्या कडून भविष्यात काय काय घ्यायचं ते तुझी वहिनी ठरवते आहे",.. दादा

" आता तुम्ही किती करताय माझ्यासाठी तुमचा हक्क आहे, काय म्हटले आई बाबा? तयार आहेत का ते ?",.. राहुल

" नाही त्यांचा नकार आहे अजून, जाऊ दे तू विचार करू नकोस ",.. दादा

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळे येणार होते लग्न जमवायला, सोनलला अजिबातच काही सुचत नव्हतं, माझं आणि राहुलच लग्न किती जवळ आल आहे, विचार करूनच तिला खूप लाजायला झालं होतं, एक स्वप्न पूर्ण होत आहे आमच्या दोघांच, पण राहुलच्या घरच्यांनी अजूनही मला स्वीकारल नाही, त्यांना अजूनही असं वाटतं आहे की नक्कीच माझ्यासोबत संतोषने काहीतरी केलं आहे आणि मी ही बातमी सगळ्यांपासून लपवून ठेवते आहे, जाऊदे आता कोणी काही जरी बोलल तरी यापुढे मला त्याचा विचार करायचा नाही, कोणाला काहीही वाटल तरी मी राहुल सोबत आनंदी राहणार नाही, मी राहुलला खूप सुखी ठेवीन, राहुलला आवडतं तसंच वागणार आहे मी या पुढे, तसच पुढचं शिक्षण घेउ, तोपर्यंत बघू घरच्यांचा राग कमी झाला तर ठीक आहे नाहीतर बघू पुढे काय होतं ते, देव ना करो पण माझ्या सोबत झाल होते जर त्यांच्यासोबत झाल असत तर, त्यांना मुलगी असती तिला कोणी पळवल असत तर असे वागले असते का ते तिच्याशी? , घराबाहेर निघाले नसते का ते? जाऊदे त्यांचा विचार न केलेलाच बरा, राहुलच माझ्यावर खूप प्रेम आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, राहुल साठी मी वाटेल ते करायला तयार आहे, आई-बाबा किती सपोर्ट करता आहेत, पैसे घर सगळ्या गोष्टी तयार आहेत, आई बाबा मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही, विचार करता करता सोनलला झोप लागली

सकाळपासूनच सोनल ला सुचत नव्हतं, तिने आईने घर आवरायला घेतल, वैभव दादा निशा वहिनी ऑफिसला गेले होते, दोघ लवकर येणार होते,

प्रिया घरी आली,.. "कसली तयारी सुरू आहे सोनल" ,

"अग आज संध्याकाळी राहुल रमेश दादा वहिनी येणार आहेत, लग्नाची तारीख ठरवून टाकू",.. सोनल

"अरे वाह ही आनंदाची बातमी आहे, आधी का नाही सांगितल मला ",.. प्रिया

"अग मला ही माहिती नव्हत काल पर्यंत, पण राहुलच्या घरच्यांचा विरोध आहे मी सासरी जाणार नाही इथे राहणार आहे",.. सोनल

"असू दे सध्या तुम्ही दोघ एकत्र येण महत्वाच आहे",.. आई आवरायला आत गेली.

" हो बरोबर काकू, तुम्ही लग्न करून घ्या दोघ, होतील राहुल च्या घरचे नीट नीट ",.. प्रिया

प्रिया हसून सोनल कडे बघत होती

" राहुल खूप खुश असेल ना आता ",.. प्रिया

" प्रिया काय ग गप्प आई ऐकेल ना",.. सोनल

" सांग ग",.. प्रिया

" तू माझ्या मागे मागे करू नकोस ग प्रिया, मला आवरु दे ",.. सोनल

" काय बोलण झाल सांग ना ",.. प्रिया

"आपल्या रिजल्ट कधी आहे प्रिया ",.. सोनल ने मुद्दाम विषय बदलला

" ते सांगायला आली आहे मी, उद्या आहे आपला रिजल्ट, उद्या जाऊ आपण कॉलेज ला",.. प्रिया

सोनलला धडधड होत होती

" घाबरते कश्याला तू नापास होणार आहेस का?",.. प्रिया

" दर वेळी वाटते भीती रिजल्टची",.. सोनल

" हो ते आहेच",.. प्रिया

" लगेच पुढच अ‍ॅडमिशन घ्याव लागेल ",.. सोनल

" हो ते मार्कांवर अवलंबून आहे, तू हुशार आहेस सोनल मला मिळायला हवे मार्क",.. प्रिया

"तू ही भरपूर हुशार आहेस मिळेल आपल्याला अ‍ॅडमिशन",.. सोनल

.......

राहुल रमेश दादा बरोबर इंटरव्यूच्या ठिकाणी गेला गेला, ही नोकरी मला पाहिजे आहे काहीही झालं तरी, स्वतः थोडं तरी कमवायला पाहिजे, ऑफिस साध होत, पण लोक चांगले होते, ज्यांची फॅक्टरी होती ते काका आणि त्यांचा मुलगा आले होते, रमेश दादाला ते आधीपासूनच ओळखत होते, राहुल बद्दल त्यांना माहिती होता की हुशार आणि समजूतदार मुलगा आहे, काम तर जवळजवळ झाल्यासारखाच होतं, सरांनी मॅनेजरला बोलवुन घेतलं.. "हे राहुल आहेत, उद्या पासून हे इथे काम करतील, त्यांना काम समजून द्या, त्या साईडचे ते बाजूच्या टेबल त्यांना द्या",

येस सर..

" सर मला बोलायचं होतं थोडं, कामाव्यतिरिक्त जेव्हा वेळ असेल तेव्हा मी इथे अभ्यास करू शकतो का, माझी महत्वाची परीक्षा येते आहे जवळ ",.. राहुल

" हो करू शकता तुम्ही का नाही, तुम्ही तुमचा वेळ सत्कारणी लावत असाल तर चांगलंच आहे, कोणती परीक्षा देता आहात तुम्ही?",.. सर

राहुल ने सगळी माहिती दिली, सर खूप खुश होते भविष्यात आपल्याला एक खूप छान ऑफिसर मिळणार आहे, राहुल लाजला होता, रमेश दादा अभिमानाने राहुल कडे बघत होता,

मॅनेजर सोबत राहुल आत मध्ये गेला, बाहेर रमेश दादा ते सर बोलत बसले, कुठलं काम आहे, नक्की काय करायच ते सगळ मॅनेजर नीट समजून सांगत होते, दोघजण वापस आले,

" उद्या जॉईन व्हा तुम्ही, येतांना तुमचे सर्टिफिकीटची झेरॉक्स कॉपी येथे सबमिट करा" ,... मॅनेजर

एक-दोन फॉर्म भरायला सांगितले, राहुल ने ते भरले, पगार फार विशेष नव्हता, पण त्यात त्या दोघांचा आरामशीर चालणार होतं,

"येत्या आठवडय़ात लग्न आहे राहुलच तेव्हा सुट्टी लागेल त्याला ",.. रमेश दादा

" काही हरकत नाही तस आधी सांगून द्या, आम्हाला ही बोलवा लग्नाला",.. सर

राहुल खूप खुश होता, तिथल्या फॉर्मॅलिटी झाल्या, त्याने फोन काढून सोनलला मेसेज केला, मला नोकरी मिळाली आहे, आता अजून इथेच आहे फॅक्टरीत, मी नंतर तुला फोन करतो, पहिला मेसेज तुलाच करायचा होता म्हणून एवढ्या घाईने मेसेज करत आहे,

रमेश दादा खूप खुश होता दोघ बाहेर आले,... "चांगला डिसिजन घेतला तू राहुल, चांगली आहे फॅक्टरी, काम आहे काही विशेष नाही, वेळ सत्कारणी लागेल, पण मात्र अभ्यासात हयगय करू नको" ,.

" नाही दादा मी व्यवस्थित मन लावून काम करेल आणि उरलेल्या वेळात अभ्यास ही करेल, त्या व्यतिरिक्त सुद्धा मी घरी जाऊन अभ्यास करेन",.. राहुल

" परीक्षा जवळ आली आहे हे लक्षात ठेव, तुमच्या लोकांच्या कॉलेजचा रिझल्ट लागला नाही का अजून? " ,.. रमेश दादा

" नाही लागला अजून, सोनल चा आहे बहुतेक उद्या रिजल्ट, आमचा रिजल्ट येईल पंधरा दिवसात",.. राहुल

मी निघतो, रमेश दादा पोलीस स्टेशनला गेला, राहुलने सोनल ला फोन लावला, सोनल राहुल ने पाठवलेला मेसेज वाचत होती, तेवढ्यात राहुलचा फोन आला

" कुठे जॉब मिळाला राहुल अरे वा आत्ताच बघितला मी हा मेसेज",.. सोनल

" रमेश दादाच्या ओळखीने फॅक्टरीत ऑफिस मध्ये काम आहे",.. राहुल

"अरे पण तुझी परीक्षा किती जवळ आली आहे, तू आपल्या लग्नामुळे हे सगळं करतो आहे का? दोघांपैकी एकाने जॉब करायचा असेल तर मी करते जॉब, घरखर्चाला पैसे हवे आहेत ना आपल्याला? तू तुझ्या परीक्षेकडे लक्ष ठेव, तू खूप हुशार आहेस राहुल, तुझी हुशारी वाया नको जायला, माझ्यामुळे तुझ नुकसान नको व्हायला",.. सोनल

"नाही सोनल असं कसं तुझ्यामुळे माझं नुकसान होईल, उगीच काहीही विचार करू नकोस लग्नामुळे किंवा जबाबदारीमुळे नाही मला सुद्धा हवा होता जॉब, घरात करमत नाही आणि तिकडे ऑफिस मध्ये विशेष काम नाही, पैसेसुद्धा मिळतील आणि अभ्यास सुद्धा होईल, तिकडे बसायला चांगली जागा आहे मला, जास्त लोकं नाही, डिस्टर्ब होणार नाही, उलट तिथे एका जागी शांत बसून दोन-तीन तास अभ्यास होऊ शकतो माझा ",.. राहुल

" नक्की ना राहुल तू हे खूप प्रेशर घेऊन नाही करत आहेस ना, तुला जॉब मिळाला तर मला खूपच आनंद झाला आहे, पण असं वाटतं आहे की तुला खूपच काम पडत आहे" ,.. सोनल

" नाही नाही मी व्यवस्थित करीन सगळ, उलट मला आता खूप आनंद झाला आहे " ,.. राहुल

"आज संध्याकाळी येत आहात ना तुम्ही लोक घरी ",.. सोनल

" हो मी आता घरी जातो, मला थोडा अभ्यास आहे मग येतो संध्याकाळी",.. राहुल

" ठीक आहे ",.. सोनल

सोनलने घरच्यांना राहुल ला जॉब मिळाल्याची बातमी सांगितली सगळ्यांना खूप आनंद झाला

राहुल ने घरी जाता जाता मिठाई घेतली, वहिनी वाट बघत होती, राहुलला आनंदात येतांना बघून वहिनीला आधी समजलं होतं की नक्कीच नोकरी मिळाली आहे

राहुलने वहिनीला इंटरव्यू च्या ठिकाणी काय झालं हे सगळं व्यवस्थित सांगितलं

"खूप छान वाटत असेल ना आता भाऊजी",.. वहिनी

" हो वहिनी, मला काम हवं होतं, करेन मी बरोबर अभ्यास",.. राहुल

" आई बाबांना सांगितलं का? ",..वहिनी

"सांगतो आता",.. राहुल आई-बाबांच्या रूम मध्ये गेला,.. "आई-बाबा हे घ्या पेढे, मला आज नोकरी लागली आहे",.

आई बाबांना खूप आनंद झाला.. "अशीच तुझी प्रगती होवु दे तुझी, तू खूप हुशार आहेस राहुल",..

बाबा चौकशी करत होते,.. "कुठली कंपनी? ऑफिसचं काम आहे का? तुझ्या शिक्षणापेक्षा काम फारच कमी आहे हे काम",..

"बाबा मी नोकरी मी तात्पुरती करतो आहे, या बरोबर अभ्यास सुरू ठेवेन ",.. राहुल

"हो तुझं लक्ष काय आहे, तुला भविष्यात काय करायचं त्याकडे लक्ष ठेव, तू खूप हुशार आहेस राहुल, हुशारी वाया घालवू नकोस",.. बाबा

"हो बाबा मी खूप अभ्यास करणार आहे, परीक्षेत यश मला नक्कीच मिळेल",.. राहुल

आज बर्‍याच दिवसांनी आई-बाबा खूश होते आणि ते राहुलशी नीट बोलले होते म्हणून राहुलही खुश होता
..............

🎭 Series Post

View all