बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 35

हे सगळं सहन होत नाही आता, मला खूप वाईट वाटत आहे राहुल, आपल्या घरच सगळे व्यवस्थित असताना तुम्हाला दोघांना असं कुठे कुठे राहावे लागत आहे, एवढं महत्त्वाचं वर्ष असून तुला अभ्यास सोडून नोकरी करावी लागत आहे


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 35

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............


आक्का, संतोष, प्रशांत आणि त्यांचे मित्र निघाले घरी यायला

बाबा दुकानात होते, आक्कांनी फोन करून बाबांना सांगितल,... "मी आज भाऊ कडे गेली होती त्यांनी केस मागे घ्यायला नकार दिला",...

" कशाला ऐकतील ते आपलं, त्यांना संतोष ने किती त्रास दिला आहे, आपल्यावर असा प्रसंग आला असता तर आपण तरी ऐकल असत का कोणाच?",.. बाबा

" मी तिथून जेल मध्ये गेली होती",.. आक्का

" तू कश्याला गेली तिकडे मी नको बोललो होतो ना ",.. बाबा

" अहो ऐका तरी, संतोष आणि त्याच्या मित्रांना तात्पुरती बेल मिळाली आहे , आपले वकील आहेत ना, त्यांनी बोलवून घेतल होत मला तिकडे, आम्ही आता घरी येतो आहोत, संतोष माझ्या सोबत आहे ",.. आक्का

बाबा काही बोलले नाहीत त्यांनी फोन ठेवून दिला...

गावात गाडी आली संतोष चे मित्र एकेक करून खाली उतरले,

"मुलांनो एवढे लक्षात ठेवा काहीही झालं तरी आमचं घर आहे, जर काही लागलं तर हय गय करू नका, फोन करा ",.. आक्का

हो...

संतोष घरी आला, माईंनी संतोषची नजर काढली

" आता चांगला छान जेवणाचा बेत करा, आधी पाणी गरम करत ठेवा, संतोष जा छान अंघोळ करून घे" ,.. आक्का खूप खुश होत्या, त्यांनी माईंना काय काय स्वयंपाक करायचा याची सूचना दिली,

जरा वेळाने बाबा घरी आले, संतोष समोर बसलेला होता बाबा त्याच्याकडे न बघताच आत निघुन गेले, त्यांनी हात पाय धुतले, ते आतच बसले, संतोष आईकडे बघत होता

" जा जाऊन बोल त्यांच्याशी",.. आक्का

संतोष आत गेला, बाबा पेपर वाचत बसले होते,.. "बाबा येऊ का मी आत",.. संतोष

"जस काही तू सगळं मलाच विचारून करतो आहे संतोष, तुला आत यायचं असेल तर ये",.. बाबा

"बाबा प्लीज असं नका बोलू तुम्ही माझ्याशी, मला माहिती आहे माझी चुकी झाली आहे, या बदल्यात मला शिक्षाही मिळणार आहे, पण तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात ही फार मोठी शिक्षा आहे मला, तुम्ही मला माफ नाही करू शकत का? ",.. संतोष

" आता काय उपयोग आहे या गोष्टीचा संतोष, जेव्हा सगळे सांगत होते तेव्हा तू ऐकलं नाहीस, तुला माहिती आहे का तू किती मोठी चूक केली आहेस ",.. बाबा

" बाबा पण आता यापुढे मी तुमचं सगळं ऐकणार आहे, स्वतःला सिद्ध करून दाखवेन, चुकीचा वागणार नाही",.. संतोष

" बघू पुढच्या पुढे, तू तसं नेहमीच म्हणतोस पण काही वागत नाही तसं, मागे पण मी तुला बोललो होतो की हे सगळं सोड दुकानात लक्ष दे, तरी तू माझा ऐकलं नाही, मागे पण झाल होत आपल बोलण यावर, सारख नको आता मी काहीच बोलणार नाही, तू आहे तुझी आई आहे, काहीही गोंधळ घाला फक्तं यापुढे मला यात घेवू नका ",.. बाबा

"तेव्हा मला अजिबात कल्पना नव्हती बाबा तुम्ही काय सांगत आहात ते, पण आता नाही आता मला बराच अनुभव येवुन गेला आहे, मी तुमचं यापुढे ऐकेन",.. संतोष

"बघू किती दिवस टिकतो आहे तुझा उत्साह, बाहेर कुठे तोंड दाखवायला जागा सोडली नाहीस तू, सगळे जण येऊन माझ्याकडे विचित्र नजरेने बघतात, या वयात मुलाच्या कर्तुत्वाने बापाचा चेहरा उजळतो, इथे तर तुझ्या मुळे संतोष मला चेहरा झाकून फिराव लागत आहे, तुझ्यामुळे दुकानातले गिराईक ही थोडे कमी झाले आहेत, मला अजिबात बोलायचं नाही, तु माझं डोकं नको खाऊ",.. बाबा खूप चिडले होते

संतोष बाहेर येऊन बसला, तो अतिशय नाराज होता डोळ्यात पाणी होतो त्याच्या,

" काय झालं संतोष? बाबा बोलले का तुझ्याशी? ",.. आक्का

" नाही आई ते खूपच नाराज आहेत, एवढं की त्यांना माझ तोंडही बघायचं नाही, आई मी वागलोच आहे तेवढ वाईट, कधी नीट होणार आहे हे सगळं काय माहिती ",.. संतोष

"थोडे दिवस लागणारच, तुला सिद्ध करावे लागेल की तू बदलला आहेस, काळजी करू नकोस ",.. आक्का

स्वयंपाक झाला, बाबांनी जेवण आत मध्ये मागवलं, ते बाहेर संतोष सोबत जेवायला बसले नाही

संतोष आईकडे बघत होता

"तुला सहन करावाच लागेल थोड, धीर धर होईल नीट",.. आक्का

"असं का पण? मी एवढा वाईट आहे का?",.. संतोष

"तू वाईट नाही आहे संतोष, पण तुझ्यावर आता विश्वास नाही राहिला त्यांचा, तू त्यांना विश्वास बसेल असं वागून दाखव",.. आक्का

संतोष विचार करत होता की आता काय करता येईल?

जरा वेळाने प्रशांतचा फोन आला,

" कस आहे तिकडे सगळ प्रशांत? ",.. संतोष

" ठीक आहे, बाबा बोलत नाही माझ्याशी, आई ठीक आहे, संतोष मला माफ कर मी आईशी खोटं बोललो की मला माहिती नव्हतं संतोष काय करणार आहे, उगीच मी त्याच्यासोबत गेलो असो सांगितलं मी आईला, तेव्हा तिने मला घरात घेतलं, बाबाही ऐकत होते, बोलतील बहुतेक दोन चार दिवसात माझ्याशी",.. प्रशांत

" काही हरकत नाही प्रशांत, तुझे आई बाबा होतील लवकर नीट, माझ्याकडे तोच प्रॉब्लेम झाला आहे, आईची ठीक आहे बाबा चिडलेले आहेत",.. संतोष

" होईल ठीक ",.. प्रशांत

" हो आता तीच आशा आहे ",.. संतोष

............

सोनल च्या घरी सगळ्यांच जेवण झाल, वैभव दादा खूपच खुशीत होता, निशा वहिनीला सुचतच नव्हतं घरात तरी ती आई आणि सोनल ला मदत करू लागत होती, सोनलचा फोन वाजला, ती फोन घेऊन बाहेर गेली, राहुल चा फोन होता

"कसा झाला मीनल चा साखरपुडा? ",.. राहुल

"चांगला झाला, छान आहे स्थळ आणि सगळे माझ्याशी व्यवस्थित वागले तिकडे ",..सोनल

"व्यवस्थित ना वागायला झालंय काय सोनल? आता तू सगळ डोक्यात काढून टाक बरं, किती चांगली आहेस तू " ,.. राहुल

" तुला माहिती आहे का आज घरी निशा वहिनी आलेली आहे, वैभव दादा जाऊन वहिनी ला घेऊन आला, आता दोन चार दिवसांनी त्या दोघांचं लग्न आहे, तर माझी आई विचारत होती आपल्या दोघांच्या काय विचार आहे? ",.. सोनल

" मी पण त्यासाठीच फोन केला आहे तुला, सोनल ईकडे वैभव दादाचा फोन आला होता, मी रमेश दादा, वहिनी उद्या आम्हाला तिकडे येणार आहे तुमच्याकडे लग्नाच ठरवायला, त्या आधी मला वाटलं मी तुझ्याशी बोलायला पाहिजे म्हणून आता फोन केला, काय करूया आपणही लग्न करायचं का वैभव दादा निशा वहिनी सोबत",.. राहुल

" मीही तोच विचार करते आहे काय करावे? जर लग्न झालं तर आपण राहणार कुठे? तुमच्या घरून नकार आहे, आमच्या घरी राहता येणार नाही",.. सोनल

" हो मला ही नाही राहायचं आहे तसं",.. राहुल

"आपल्याला राहायला जागा नाही राहुल, आमच्या काही रूम भाड्याने दिले आहेत बाजूला त्यातल्या दोन रूम खाली आहेत बघू मी बोलून बघते आज आई-बाबांशी, तुला चालेल ना आमच्या घराच्या अगदी शेजारी घर की दुसरीकडे बघायचा आपण घर",.. सोनल

" म्हणजे सोनल तुझा आपल्या लग्नासाठी होकार आहे तर ",.. राहुल

सोनल एकदम लाजली,..."काय रे राहुल ",

"बोल ना सोनल ",..राहुल

" मला असं वाटत आहे राहुल आपण लग्न करून घ्यायला काही हरकत नाही",.. सोनल

" अगं सोनल पण घर कसं चालेल मला ही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे त्या शिवाय मला चांगली नोकरी मिळणार नाही",.. राहुल

" मला पण पोस्ट ग्रॅज्युएशन ला ऍडमिशन घ्यायचे आहे थोडे दिवस आपल्याला घरच्यांची मदत घ्यावी लागेल की थांबायचं आपण थोडे दिवस राहुल",.. सोनल

"थोडे दिवस थांबून काय होणार आहे सोनल नाहीतरी ज्यांचा विरोध आहे ते विरोधच करणार त्यापेक्षा करून घेऊ लग्न जे व्हायचं ते होईल ",.. राहुल

"मी बोलते माझ्या बाबांशी तू पण बोलून घे रमेशदादाशी मग उद्या आपण ठरवून टाकू ",.. सोनल

" नक्की ना सोनल",.. राहुल

" हो नक्की राहुल ",.. सोनल

राहुल खूप खुश होता आता पुढच्या जॉब साठी ही परीक्षा आहे त्याची मी खूप छान तयारी करेल अजिबात कशात कमी पडायचं नाही, चांगले मार्क मिळवेन मी , मग हा गव्हर्मेंट जॉब माझाच, राहुल ला काय करू नि काय नको असं झालं होतं, सोनल खूप खुश होती,

"बरोबर करतो आहे का आम्ही?, पण आम्हाला दोघांनाही नोकरी नाही, माझं तर शिक्षण बाकी आहे, तसं आई बाबा मला काही कमी पडू देणार नाही, थोडे दिवस त्यांची मदत घ्यायला काही हरकत नाही, पण या इतर लोकांना तोंड देण्यापेक्षा राहुल बरोबर राहिलेले बरं, राहुलही घरी खूप एकटा पडलेला आहे, कोणीच बोलत नाही त्याच्याशी, ईकडे माझ्यासोबत राहिला तर त्याचं मन लागेल, अभ्यास करावासा वाटेल, बरोबरच घेतला आहे डिसिजन ",.. विचार करता करता सोनल आत आली

वैभव दादा निशा वहिनी बाहेर चक्कर मारत होते, आई-बाबा पुढच्या खोलीत बसले होते,

" राहुल चा फोन होता का ग सोनल",.. बाबा

" हो बाबा",.. सोनल

" काय म्हटला राहुल",.. बाबा

" वैभव दादा ने रमेश दादा ला फोन केला होता ते उद्या आपल्याकडे येणार आहेत लग्नाचं ठरवायला, तुमच्या दोघांचं काय मत आहे आई बाबा? आम्ही अजून कमावते नाही, त्यामुळे समजत नाही आहे काय करावं? लग्न केलं तर आम्ही एकमेकांसोबत राहू मानसिक समाधान मिळेल, पण आम्हाला तुमच्यावर अवलंबून रहावे लागेल, अजून राहुलची परीक्षा बाकी आहे, मला पण पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे",.. सोनल

"त्यात काय एवढं काळजी सारख, तुम्ही इथे रहा आपल्याला कडे" ,.. बाबा

" नाही बाबा इथेच, राहुल ला नाही आवडणार ",.. सोनल

" मग काय हरकत आहे, वैभव निशा राहणार ना इकडे, मग तुम्ही का नको? ",.. बाबा

" तरी बाबा राहुलला बहुतेक नाही आवडणार",.. सोनल

" अस काही नसतं बेटा, कुठेही राहील तर काय फरक पडतो ",.. बाबा

" ते नाही बाबा आधीच त्याच्या घरचे नाराज आहेत, त्यात राहुल डायरेक्ट आपल्या घरी राहतो अस समजल तर ते लोक जास्त चिडतील ",.. सोनल

" एक तर ते लोकं सपोर्ट करत नाहीत आणि दुसरीकडे हि नीट राहू देत नाहीत, नक्की हवय काय त्यांना? ",.. बाबा

" काय माहिती बाबा अजूनही नकारच आहे त्यांचा",.. सोनल

" अग पण मग काय ठरवल आहे तुम्ही? , सध्या तरी मी तुला माझ्या डोळ्याआड होवू देणार नाही सोनल, सासरी गेली असती तर ठीक होत सगळे होते तिथे, अस एकट नाही रहायचं ",.. आई

" काय करू मग आम्ही",.. सोनल

"बाजूच्या दोन खोल्या खाली आहेत, तिथे राहा तुम्ही, सामान घरून घेऊन जाऊ शकतात, किवा जेवायला इकडे येत जा, आपल्याला काही कुठल्या गोष्टीची कमी आहे का? जे आहे ते तुझं आणि वैभव दादा आहे, तुम्हाला आत्ता सपोर्ट नाही करायचं तर मग कधी करणार, तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर करून घ्या, आता पैशाची काळजी करू नका, तुम्ही ऐकत नाही म्हणून नाहीतर आमच्या एकत्र राहिलाय काही हरकत नाही",.. आई

" चालेल ते घर, नाहीतरी प्रश्न एक दोन वर्षाचा तर आहे त्यानंतर तुझे शिक्षण होईल राहुलची परीक्षा होईल ",.. बाबा

"हो बाबा तोच विचार आम्ही करतो आहोत, काय करायचं ते",.. सोनल

" एवढा काही विचार करू नका डिसिजन घेऊन टाका",.. बाबा

" आई तुला काय वाटतं आहे",.. सोनल

" मला असं वाटत आहे तुम्ही दोघांनी लग्न करून टाकावं, आता एकमेकांनसोबत राहणं खूप गरजेचा आहे तुम्हाला, घर तर काय कसंही चालू शकत, स्वयंपाक करण्याची काही गरज नाही, इकडे येत चला जेवायला",.. आई

" तसं काही नाही आई मी पण करू शकते तिकडे स्वयंपाक",.. सोनल

"दर महिन्याला एक ठराविक रक्कम घेऊन जात घरून म्हणजे मग तुम्हाला पण कसंतरी वाटणार नाही आमच्या कडून पैसे घ्यायला, होईल बरोबर आणि तुझा शिक्षणाचा खर्च आम्ही करू त्याची अजिबात काळजी करू नको",.. आई
....

रमेश दादा ऑफिसहून आला, वहिनीने त्याला सांगितलं सगळं, आपल्याला उद्या सोनल कडे जायचं आहे

राहुल आलाच बोलायला,.. "दादा तुझ्या ओळखीचे एक होते ना ते साहेब, त्यांच्या ऑफिस मध्ये काम होतं, ते मागे विचारात होते बघ, ते काम मला हव आहे ",.

" अरे पण तू पोस्ट ग्रॅज्युएट आहेस, ते ऑफिसमधलं काम करत बसला तर तुझा अभ्यास होणार नाही, तुझा अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे आणि त्या ऑफिसमधल्या पोस्ट पेक्षा तुझा शिक्षण खूप जास्त आहे",.. रमेश दादा

" ते काही का असेना दादा, मी त्या लोकांशी बोलतो, व्यवस्थित आठ तासाचं काम आहे आणि पूर्णवेळ काम नसेल तेव्हा मी तीथे आरामात अभ्यास करू शकेल, काही का असेना पण लग्न करण्याच्या आधी छोटी-मोठी नोकरी मला हवी आहे",.. राहुल

" ठीक आहे काही हरकत नाही उद्या आपण दोघे तिकडे जाऊ तू त्या लोकांशी बोलून घे मग दुपारून आपण सोनल कडे जाऊ",.. रमेश दादा

राहुल आता खुश होता,.. "साधारण काय विचारतील दादा तिकडे"?,...

"मला काहीही कल्पना नाही इंटरव्यू बाबत, मी कधीच दिला नाही इंटरव्यू, डायरेक्ट पोलीसात जॉईन झालो, आणि तू का इतकी घर खर्चाची काळजी का करतो आहेस? , मी आहे ना आपल्या घरच एवढं चांगला आहे, ते कधी कामी येणार?, तुझी परीक्षा आता खूप महत्त्वाची आहे त्यावर तूझ भविष्य अवलंबून आहे ",.. दादा

" उलट दादा माझा घरी अभ्यास होत नाही, तिकडे ऑफिस मध्ये तरी माझा अभ्यास होईल आणि मला एक प्रकारचं समाधान ही लाभेल",.. राहुल

" रहाणार कुठे आहात तुम्ही दोघं? काय ठरलं आहे? ",.. दादा

" माहिती नाही दादा सोनल राहते तिथे त्यांच्या खूप रूम भाड्याने दिलेल्या आहेत बहुतेक तिकडे कुठेतरी राहु",..राहुल

" हे सगळं सहन होत नाही आता, मला खूप वाईट वाटत आहे राहुल, आपल्या घरच सगळे व्यवस्थित असताना तुम्हाला दोघांना असं कुठे कुठे राहावे लागत आहे, एवढं महत्त्वाचं वर्ष असून तुला अभ्यास सोडून नोकरी करावी लागत आहे, मी एकदा बोलून बघू का परत आई-बाबांशी? ",.. रमेश दादा

"तुला बोलायचं असेल तर बोल दादा, पण मला अस वाटत या गोष्टीचा काही फायदा होणार नाही, तुला अस तर नाही ना वाटत मी आणि सोनल खूप घाई करतो आहोत लग्नाची ",.. राहुल

" नाही बरोबर आहे तुमच, सध्या सोनल सोबत जे झाल आहे, अजून कोणी आडकाठी आणण्यापेक्षा तुमच लग्न झालेल बर, लोकांचा भरोसा नाही, आपले आई बाबा कसे करता आहेत, उद्या स्थळ घेवून येतील तुझ्या साठी, त्या पेक्षा लग्न करून घ्या तुम्ही ",.. रमेश दादा

ठीक आहे दादा आपण जाऊ मग उद्या....

रमेश दादा आणि वहिनी आई-बाबांचे रूम मध्ये आले

...............

बघु पुढे काय होत ते....🎭 Series Post

View all