Jan 29, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 34

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 34


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 34

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............


सोनल कार्यक्रमा हुन घरी आली, वैभव दादा बाहेर उभा राहून कोणाशी तरी बोलत होता,

"दादा तू जाणार होता ना आज निशा वहिनी कडे?, गेला होतास का? ",.. सोनल

"हो जावून आलो मी तिकडे",.. वैभव दादा

"काय झालं तिकडे?, तू एकटा कसा? वहिनी कुठे आहे?",.. सोनल

"निशा आली आहे सोबत घरात असेल बघ",.. वैभव

"काय झाल तिकडे? बर सोडल त्यांनी वहिनीला, भांडण झाल का ",.. सोनल

"हो, पण मला बोलायचं होत निशा च्या घरच्यांशी, आम्ही त्यांना सांगितल आम्हाला सोबत राहायच आहे, आणि मी रमेश दादाची मदत घेतली ",..वैभव दादा

"खूप छान झाल दादा, मी खूप खुश आहे",..सोनल

"सोनल जरा बघ निशाकडे, ती थोडी अपडेट होती रडत होती ती निघतांना ",..वैभव

"साहजिक आहे दादा, स्वतः च घर सोडतांना येतच मन भरून, शेवटी आई वडील आहेत ते वाहिनीचे, तू काळजी करू नको दादा, मी लक्ष देते वहिनी कडे",..सोनल

सोनल पळत आत गेली..

निशा वहिनी सोनलच्या रूम मध्ये बसलेली होती, सोनल तिला जावून भेटली, दोघींच्या डोळ्यात पाणी होत

"वहिनी तुला भेटून खूप आनंद झाला, कशी आहेस तु? ",.. सोनल

"मी ठीक आहे, सोनल मला माफ कर मी तुला भेटायला आले नाही, तुला माहिती आहे माझे घरचे कसे वागता आहेत, मी इथे कशी आली माझ मला माहिती",.. निशा

"निशा वहिनी अग माफी का मागतेस?, मला माहिती आहे सगळ आणि आता कसली काळजी करायची नाही",.. सोनल

"तू कशी आहेस सोनल खूप मोठ संकट आल होत आपल्यावर, बर झाल सुखरूप आहेस तू ",.. निशा

" हो ना ग वहिनी, मी ठीक आहे दोन दिवसा पुर्वी माझा मूड गेला होता, कोणी काहीही बोलत ग विचार न करता, त्यांना माहिती नाही काय झाल होत तिकडे, ते उगीच बोलतात, मला त्रास होतो ग असा, आता ठीक आहे मी ",.. सोनल

" आपण हे बोलतो त्याने त्रास नाही ना होत आहे तुला, नाहीतर आपण नको बोलायला या विषयावर",.. निशा

" नाही वहिनी काही प्रॉब्लेम नाही, आता मी एकदम ओके आहे, या सगळीकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं आहे मी, उगाच काही वाईट लोकांकरता आपण चांगल्या लोकांना का दुखवा, आणि मी आता माझा स्वतःचा विचार करणार आहे, मला जे लोक आवडतात त्यांच्या सोबत राहणार आहे मी ",.. सोनल

"एकदम करेक्ट बोलते आहेस तू सोनल, सगळे आपल्या मनाच करतात आणि आपण तसं केलं की आपण दोषी, हा जगाचा नियम आहे",.. निशा

" हो ना वहिनी",.. सोनल

त्या दोघी बोलत असताना आई हि येऊन बसली

" तुझं काही झालं का ग बोलण राहुलशी? ",.. आई

" नाही आई आज सकाळीच मी राहुल ला भेटली होती तेवढच",.. सोनल

" मग करून बघ ना फोन त्याला, तुमच्या दोघांचं काही ठरत आहे ते सांगा आम्हाला ",.. आई

"म्हणजे आई? कसल ग? ",.. सोनल

" अगं वैभव आणि निशा सोबत तुझ आणि राहुल च लग्न करायचा आहे की नाही ते ठरवून घ्या, तुझे बाबा विचारात होते की झाला का सोनलचा काही बोलण",.. आई

सोनल एकदम लाजली, आई आणि निशा हसत होते,

" आज तर बिझी होती मी मीनल च्या घरी, नंतर बोलते मी राहुल शी ",... सोनल

"चालेल जे काही ठरवायचं आहे ते पटापट ठरवा",.. आई

" चला बोला आता पटापट मुलींनो तुम्ही काय खाणार आहात?, स्वयंपाक बाकी आहे आपला",.. आई

" आई तुम्ही बसा मी करते",.. निशा

" हो आई तू बस आम्ही दोघी करतो",.. सोनल

" हो नाही काही नाही, मी करते आहे स्वयंपाक, स्वयंपाक झाल्यावर निशा तू वाढून दे , आणि बरं वाटत असेल तर कर काम नाही तर आराम कर, सोनल तू मला मदतीला ये, पोळ्या करून घे",.. आई

" हो आई आलीच ",.. तिघीजणी किचनमध्ये गेल्या

.........

सोनलच्या घरून आक्का आत्या निघाल्या, त्या एकदमच गळून गेल्या होत्या, तेवढ्यात त्यांना आठवलं की संतोष साठी नेमलेले त्यांच्या बाजूचे वकील म्हणत होते की कोर्टात त्यांची ओळख आहे, थोडेफार पैसे देऊन संतोष आणि त्याच्या मित्रांना तात्पुरती बेल मिळू शकते, हीच एक आशा होती, आता मी कितीही पैसे मोजायला तयार आहे, संतोष ची सुटका व्हायला पाहिजे, एकदा तो घरी आलात मग पुढचं पुढे बघता येईल, ही ओळख कामा येईल पुढे जेव्हा केस सुरू होईल,

त्यांनी वकीलाला फोन केला, तो कोर्टात होता....

"तुम्ही केलं आहे का संतोष आणि त्याच्या मित्रांच्या बेल च काम?" ,.. आक्का

"हो झालं आहे, मी आता पोलीस स्टेशन जवळच आहे, मी आता तुम्हाला फोन करणार होतो, तुम्हाला येता येईल का लगेच इकडे",.. वकील

" हो मी या गावत आहे, आता जमेल का आपल्याला संतोषला भेटायला, घरी घेवून जायला",.. आक्का

" आता ते कोर्टाचे पेपर पोलीस स्टेशनला जमा केले तर होईल पटकन काम, पोलीस इन्स्पेक्टर ऐकतील, जास्त संध्याकाळ झाली तर उद्या वर गोष्ट जाईल, मी जातो पटकन पुढे ",.. वकील

"हो जा पटकन",.. आक्का

"तुम्हाला यायला जमेल का आत्ता लगेच इकडे यायला तुम्ही ही या पटकन ",.. वकील

" हो जमेल येते आहे मी रस्तात आहे ",.. आक्का

" तुम्ही या पोलीस स्टेशनला मी तिथे पुढे जाऊन पेपर सब्मिट करतो आणि परवानगी काढतो जर जमलं तर आजच आपण संतोष आणि त्याच्या मित्रांना सोबत घेऊन जाऊ, पण जेव्हा केस असेल कोर्टात तेव्हा कोर्टात हजर व्हावे लागेल",.. वकील

" हो चालेल ",.. आक्का आत्या खूप खुश होत्या, अगदी काय करून काय नको असं झालं होतं त्यांना, आज सोडायला पाहिजे संतोषला, त्या पोलीस स्टेशनला पोहोचल्या , त्यांच्या बाजूचे वकील तिथे आलेलेच होते

रमेश दादा आज पहिल्यांदा आक्का आत्यांना बघत होते, त्यांनी सगळे कोर्टाने दिलेले पेपर तपासले संतोष आणि त्याच्या मित्रांची बेल मंजूर झालेली होती, त्यांनी परवानगी दिली,..

"तुम्ही संतोषला आणि त्याच्या मित्रांना घरी घेऊन जाऊ शकता, पण तुम्हाला तुमच गाव सोडून जाता येणार नाही, केस चालू असेपर्यंत नेहमी पोलीस स्टेशनला येऊन हजेरी द्यावी लागेल",.. रमेश दादा

"हो चालेल आम्ही सगळे नियम पाळू",.. आक्का

हवालदार काकांसोबत वकिल आत गेले, आक्का आत्या बाहेर बसल्या होत्या, संतोष आणि त्याचे मित्र आता बरेच दिवस झाले आत मध्ये होते, अगदीच कंटाळून गेल्यासारखे झाले होते ते, कुठून सुचल आणि त्या सोनल च नाव घेतलं असं झालं होतं त्यांना..

हवालदार काका आले,.. "संतोष तुला भेटायला तुझी आई आली आहे, चला तुमच्या मुलांची बेल झाली आहे",

संतोष आणि त्याच्या मित्रांना कानावर विश्वासच बसत नव्हता, आई आली आहे बाहेर? तिने सोडवलं मला?,

" हो कोर्टाने तुमचा बेल मंजूर केला आहे, झालं आहे ते काम",.. हवालदार काका

" आम्ही आता घरी जाऊ शकतो का?",.. संतोष

"हो कोर्टाच्या तारखेला कोर्टात हजर राहावे लागेल आणि बाहेर इन्स्पेक्टर साहेब सांगतील अजून काही नियम आहेत उठा",.. हवालदार काका

सगळे मुलं पटापट उठले बाहेर आले, बाहेर आक्का आत्या बसलेल्या होत्या, संतोषला बघून त्या उठून उभ्या राहिल्या, पुढे होऊन त्यांनी संतोषला मिठी मारली, दोघं काही बोलत नव्हते

इंस्पेक्टर रमेश दादाने सगळ्या मुलांना एका रांगेत उभ केलं,.." तुम्हाला केस सुरू असेपर्यंत नेहमीच हजेरी द्यावी लागेल, आणि आता वागणूक चांगली ठेवा अजिबात नवीन उपद्व्याप नको आहेत, स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या, आई-वडिलांच ऐका, नीट वागा",.. त्याने सगळ्या मुलांच्या सह्या पेपर वर घेतल्या

सगळे मुल गाडीत जाऊन बसले, त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की त्यांची सुटका झाली आहे, अगदी भारावून गेले होते ते

" माहिती नाही माझ्या घरचे कसे वागतील, मला घरात घेतील की नाही ",.. प्रशांत

" हो ना माहिती नाही, काय होईल",.. बाकीचे मुलं

" तुम्ही कोणी काहीच काळजी करू नका माझ्यामुळे झाला आहे ना हे सगळं, मी तुम्हाला मुलांना कधीच अंतर देणार नाही, कोणाला जर घरात घेतलं नाही तर सरळ माझ्याकडे या ",.. संतोष

प्रशांत आश्चर्याने संतोष कडे बघत होता

" मी खरं बोलतो आहे प्रशांत, मी तुम्हा मुलांबरोबर नेहमी राहील",.. संतोष

मुलांच्या चेहऱ्यावर आता आनंद होता

आक्का आत्या वकील साहेबांशी बाहेर बोलत होत्या, त्यांनी मोठं नोटांचं पुडकं वकील साहेबांच्या हातात कोंबलं

"आहो आक्का आता हे कशासाठी?, फी भरली आहे तुम्ही सगळी ",.. वकील

" आज तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे ते तुम्हाला माहिती नाही, केसचा निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे, मुलांना पस्तावा होतो आहे, काहीही करा त्या बाजूच्या वकिलांना भेटा, वशिला लावा, केस आपण जिंकलो पाहिजे, मी तुम्हाला कसलीही कमी पडू देणार नाही, माझा एकुलता एक मुलगा आहे, त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि तो यापुढे असा कुठल्याही प्रकारचा गुन्हा करणार नाही याकडे मी स्वतः जातीने लक्ष देणार आहे, एवढी फक्त वेळ सांभाळून घ्या ",.. आक्का

" तुम्ही भेटल्या का त्या पार्टीला, सोनल ला? जर त्या बाजूने केस मागे घेतली तर लवकरच काम होऊन जाईल आपल",.. वकील

" माझ्या भाऊच्या घरचे आजिबात ऐकत नाही आहेत माझ, आत्ताच मी जाऊन आली तिकडे, काहीही बोललं तरी ते ऐकत नाहीत, त्यांच फक्त हेच म्हणणं आहे की काहीही करून संतोष आणि त्याच्या मित्रांना शिक्षा झाली पाहिजे, आणि हे इन्स्पेक्टर साहेब पण त्यांच्या ओळखीचेच आहेत ,बरं झालं त्यांनी संतोषला अजून त्रास दिला नाही लाॅक अप मध्ये",.. आक्का

कठीण आहे.....

" माझ्या मुलाला काहीही त्रास होता कामा नये, वर पर्यंत मॅनेज करायचं असलं तर करा, आपल्याकडे पैशाची कमी नाही, मी त्याला परत आता जेलमध्ये नाही बघू शकत",.. आक्का

" ठीक आहे आक्का तुम्ही म्हणाल तसंच करू आपण, मी उद्याच अजून एक वरिष्ठ वकीलाला भेटतो आहे, त्यांना पूर्ण केस सांगतो, मी करतो उद्या तुम्हाला फोन काहीच काळजी करू नका, करू आपण मॅनेज माझ्याकडे आहेत बऱ्याच आईडिया बऱ्याच केसेस मी जिंकलो आहे अशा मी बरोबर करेल",.. वकील

गाडीत आक्का आत्या संतोष जवळ बसलेल्या होत्या, त्यांच्या बाजूला प्रशांत होता, बाकीचे तीन चार मुलं मागे बसलेले होते, सगळे मुलं गप्प होते, गाडी गावाबाहेर निघाली, एका हॉटेलवर गाडी थांबली

" आता का गाडी थांबली आहे आई, घरी जाऊ ",.. संतोष

" चहापाणी करून घ्या मला बोलायच आहे तुमच्याशी",.. आक्का

आक्कांनी सगळ्यांसाठी चहा आणि फराळाचे पदार्थ सांगितले, सगळे मुल वेगळेच गप्प झालेले होते

" प्रशांत संतोष कसली काळजी करत आहात आता मी आहे ना तुमच्या बाजूने लवकरात लवकर यातून बाहेर पडु, आता हे सगळ विसरायचं नवीन सुरुवात करायची ",.. आक्का

" काकू मला आता टेन्शन आहे घरचे कसे वागतील माहिती नाही, मला समजलंच नाही की आम्ही एवढी मोठी चूक करतो आहे, आम्ही विचार करून वागायला पाहिजे होत ",.. प्रशांत

" हे बघ प्रशांत झालं ते झालं, आता या पुढे कोणतीही चूक नको आहे मला, मी आहे, बाकीचे तुम्ही सुद्धा सगळे लक्षात ठेवा जर घरी कोणी घरात घेतलं नाही तर सरळ आमच्याकडे निघून या, मी दुसऱ्या दिवशी स्वतः जाऊन बोलेल त्या सगळ्यांशी आणि सगळ्यांनी मिळून एक व्यवसाय सुरू करा आता, ज्यांचे शिक्षण बाकी आहे त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्या, मला माहिती आहे तुम्हाला आता घरचे चांगलं वागवणार नाहीत, पण आता हीच तुमची परीक्षा आहे, चांगलं वागून दाखवा सगळ्यांना, घरात दुकानात अभ्यासात लक्ष द्या, सुरूवातीला बोलतील सगळे, संतोष तुलाही बाबा बोलू शकतात, किवा तुझ्याशी अबोला ठेवू शकतात, सहन करावे लागेल तुम्हाला थोडे दिवस, यापुढे स्वतः कमवायचं स्वतः खायचं आणि कुठलाही डिसीजन घेताना किंवा कुठलीही गोष्ट करताना दोन वेळा विचार करा मुलांनो",.. आक्का

"हो काकू आम्ही नीट वागू",..

" मला अजिबात आवडल नाही आहे तुम्ही मुल जे वागले ते, मला थोडी जरी कल्पना वस्ती की तुम्ही मुलं असे करणार आहात तर मी तुम्हाला अडवलं असतं, झालं ते झालं आता यातून काहीतरी शिका, चांगलं वागा, संतोष माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, पण तू काय केलं खोटं बोललास ना तू माझ्याशी, माझ्याकडून क्लास साठी म्हणून पैसे घेतले आहे वेगळ्या ठिकाणी वापरले असं करतात का?, आणि तुम्ही मुलांनी पण त्याला समजवायचं तर तुम्ही अजून त्याला मदत करत होते हे असं वागतात का? ",.. आक्का

"आई मला माफ कर माझी खूपच चुकी झाली आहे, मला ते लक्षात आला आहे या दिवसात, यापुढे मी तू जे म्हणशील तेच करणार आहे, हे मी उगीच म्हणत नाहीये आहे मी सिद्ध करून दाखवले",.. संतोष

"ठीक आहे बघु तुझ्या साठी मी तुझ्या बाबांशी भांडले, नेहमी तुझी बाजू घेतली तू मला तोंडावर पाडल, आता तुझ्यावर सहज विश्वास ठेवणार नाही मी आणि खबरदार जर या पुढे कुठल्याही मुलीच नाव घेतल तर बाकीच्यांच्या आधी मी तुम्हाला शिक्षा करेन ",.. आक्का

सगळे मुल शांत बसले होते,.....
.....

काय होईल पुढे?, संतोष प्रशांत आणि त्यांचे मित्र सुधारतील का?, की झालेल्या प्रकरणातुन काही धडा घेतील ते?, का परत थोड्या दिवसांनी तसेच वागतील......
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now