Login

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 32

भाऊ ऐ भाऊ मला तुझ्याशी बोलायचं आहे, काय आहे तुझ्या मनात सांग मला, मला माहितीये की तुला माझा राग आला आहे, बोल जे असेल ते मनात, मी काहीही उलट बोलणार नाही, वहिनी अगं माफ कर आता मला,


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 32

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............


आई आणि सोनल बोलत बसल्या होत्या तेव्हा मीनलची आई आली घरात..

"ताई आज साखरपुड्याला यायचं बर का संध्याकाळी आणि सोनल तू पटकन आवरून घे, चल आता माझ्या सोबत घरी, खूप काम पडलं आहे, जरा मदत कर",.. काकू

आई आणि सोनल ला दोघांना आनंद झाला मीनलच्या आईला भेटून..

" हो काकू मी लगेच येते",.. सोनल ची आई खुश होती की चला सोनल या सगळ्यातून बाहेर पडते आहे, ती आनंदाने मीनलच्या आईकडे बघत होती,

सोनल आवरायला आत गेली

" बर झाल ताई तुम्ही आल्या, खूप छान वाटल आम्हाला, सगळ्यांनी जस वाळीत टाकल होत , आज बर वाटल पण",.. आई

" कोणी काहीही बोलू द्या ताई, आम्ही आहोत तुमच्या सोबत, सोनल सोबत, आपण मदत केली तरच सोनल जरा बाहेर पडेन यातून",.. काकू

हो ना...

प्रिया आली तेवढ्यातच,.." आटोप सोनल आपण लगेच जाऊ मीनल कडे, मुलाकडचे येतील जरा वेळात ",.

" हो झाल आहे पाच मिनिट, संध्याकाळचा ड्रेस सोबत घेते आहे का ग प्रिया? ",.. सोनल

" नाही आपण घरी येऊन करू तयारी, आता तिकडे मदत करु, जरा वेळ थांबू आणि येऊ मग संध्याकाळी परत तयार होऊन जाऊ",.. प्रिया

मीनल ची आई पुढे गेल्या, सोनल तयार होत होती,

" काकू ठीक आहे ना सोनल आता, आज बरी दिसते आहे सोनल ",.. प्रिया

" हो आज झाल तीच राहुलशी बोलण, तेव्हा पासून ठीक आहे ती ",.. आई

"बर झालं", ... प्रिया

"हो ना एक मोठा प्रॉब्लेम झाला होता तो, नशीब सोनल डिप्रेशन मध्ये नाही गेली, लवकर आटोपला हा त्रास ",.. आई

" हो ना काकू ",.. प्रिया

सोनल आली तयार होवुन, त्या मिनल कडे गेल्या

"झालं का ग काही बोलणं राहुल शी",.. प्रिया

" हो आज सकाळीच भेटला होता राहुल मला, व्यवस्थित बोलण झाल आमच, प्रिया तू बरोबर बोलत होतीस, संतोष आणि त्याच्या मित्रांनी माझ्या सोबत असा डाव खेळला होता की माझ जगण मुश्किल होईल आणि मी संतोष ला बोलेल की माझ्याशी लग्न कर, बाकी सगळे नकार देतील मला, पण राहुल ने मला फार चांगली साथ दिली, मी आता राहुलची साथ कधी सोडणार नाही आणि मी दुःखी हि राहणार नाही, बोलू दे ज्याला जे बोलायचं ते, मला माहिती आहे तिकडे नक्की काय झालं ते, त्यामुळे मी कोणाला उत्तर द्यायला बांधील नाही, थोडसं बिंदास राहिला पाहिजे, त्रास करून घेतला तर जगणं मुश्किल होऊन जाईल आणि मी नाराज होती तर राहुल, आई बाबा, वैभव दादा नाराज होते, शेवटी आज वैभव दादा चिडला माझ्यावर, त्यानेच मला समजून सांगितलं सगळं आणि मला ते पटलं की मी माझा स्वतःचाच विचार करत होते, त्या पेक्षा मी माझा आणि राहुल चा विचार करायला पाहिजे ",.. सोनल

" एकदम बरोबर आहे तुझ सोनल, असंच करायचं, सगळे स्वतःचा विचार करतात, आपणच का त्रास करून घ्यायचा",.. प्रिया

मीनल च घर आलं, मीनल खूप खुश होती, तिची तयारी होत आली होती, सोनल ला बघून मीनल पळत आली, तिने सोनल ला मिठी मारली, दोघी बर्‍याच वेळ तश्या होत्या, मीनल ची आई आली आतून, त्यांनी सोनल ची नजर काढली, सोनल च्या डोळ्यात पाणी होत

" काकू मी ठीक आहे आता ",.. सोनल

"असू दे माझ्या डोळ्यासमोर लहानाची मोठी झाली तू माझी मुलगी आहेस, तुला कोणाची नजर नको लागायला",.. काकू

"काकू आई सांगत होती तुम्ही खूप आधार दिला आई बाबांना खूप थँक्स",.. सोनल

"काहीही काय चल आटोप मदत कर आता ",.. काकू

"आमची कोण नजर काढणार?",... प्रिया बोलली, सगळे हसायला लागले

" तुमच्यावर नजर लागण्यासारखी वेळ नको यायला ",.. सोनल

" काकू सांगा काय करायचं आहे",.. सोनल प्रिया आत गेल्या

घरात बरेच पाहुणे होते, गेल्या गेल्या सोनल व प्रियाने कामाला सुरुवात केली, तसं काही विशेष काम नव्हतं पण काकूंना मदत करणे, मीनलला तयार व्हायला मदत करणे, चहा-नाश्ता पुढे देणे, असे बरेच काम होते, छान आनंदी वातावरण तयार झाला होत सगळीकडे, सोनल आता रीलॅक्स झाली होती

राहुल घरी आला खूप आनंदात होता तो, त्याने लगेचच दादाला फोन लावला,... "दादा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे वैभव दादा आणि मी मिळून सोनल शी बोललो, ती बऱ्यापैकी नीट झाली आहे, आता काळजीसारखं काही नाही, मलाही बरं वाटत आहे आता",.

"चला चांगलं झालं, मी तुला तेच बोलत होतो तू तुझा विचार कर, सोनल ला समजाव, आता थोडे दिवस तुला जे योग्य वाटतं ते कर, आई बाबांचा विचार करू नको, बाकी मी आणि तुझी वहिनी आहोत तुझ्या पाठीशी",... रमेश दादा

वहिनी किचन मध्ये काम करत होती,

" वहिनी झालं बोलणं सोनल बरोबर",.. राहुल

" झाला का प्रॉब्लेम सॉल?",.. वहिनी

हो...

" कसं काय झाला आहे हे, चला छान झाल ",.. वहिनी

" वैभव दादाने समजावलं सोनलला, नाही तरी तिच प्रेम आहे माझ्यावर, ती बोलली की ती आता आमच्या दोघांचा विचार करणार आहे, बाकी इतर गोष्टी सोडून देणार आहे आणि आनंदी राहणार आहे",.. राहुल

" चला बरं झालं, ही एक खूप छान आनंदाची बातमी दिली आहे तुम्ही भाऊजी, पण आता आई-बाबांचं काय? ",.. वहिनी

" वहिनी त्यांचं सोडून द्या, मी बोलणार आहे एकदा त्यांच्या शी",... राहुल

" तुम्ही काळजी करू नका, मी आणि तुमचे भाऊ आहेत त्यांच्यासोबत, तुम्ही जमलं तर सोनल शी लग्न करून घ्या लवकर, तोपर्यंत आपण आई बाबांना मनवण्याचा प्रयत्न करू ",.. वहिनी

" हो बरोबर आहे वहिनी, असच करू आपण, वहिनी आज मला फार बर वाटत आहे, मला माहिती होतं की हे सगळ लवकरच नीट होणार आहे",... राहुल

" सोनल खूप समजूतदार मुलगी आहे ",.. वहिनी

" हो वहिनी खरंच सोनल खूप समजूतदार आणि चांगली आहे, तिला कोणी काही सांगितलं की लगेच समजतं, प्रत्येकाचा विचार करते ती, पण शेवटी ती हि माणूसच आहे, कधी कधी तिला येतो राग ",.. राहुल

" हो ना काय करेल ती सगळे तिला बोलत होते तेव्हा, आणि अजूनही बोलतील, दुर्लक्ष करायला हव, आता तुम्ही भाऊजी सोनल सोबत संतोष चा विषय सारखा सारखा काढू नका",.. वहिनी

" हो बरोबर बोलत आहात तुम्ही वहिनी, जेवढ्या वेगवेगळ्या विषयावर बोलता येईल ते बोलायचं, जे होऊन गेलं तेच तेच बोलण्यात काही अर्थ नाही, उगीच सगळ्यांना त्रास होतो ",.. राहुल
.....

सोनल चे बाबा घरी आले, आई आनंदात होती

" सोनल कुठे गेली ग ",.. बाबा ही काळजीत होते, सोनल अशी नाराज होती तेव्हा पासून त्यांच मन लागत नव्हत कशात

" ती मीनल कडे गेली साखरपुड्याला ",.. आई

" बरं झालं चला सोनल आता थोडी तरी बाहेर पडली, सोनल गेली होती का वकिलांना भेटायला? काय म्हटले ते?",.. बाबा

आईने बाबांना सगळं सांगितलं,.. "बर्‍यापैकी नीट झाली आहे आता सोनल",

"चला बर झालं, झाल ना तीच राहुल शी बोलण, आपला वैभव हुशार आहे, खूप छान सांभाळतो सगळ ",.. बाबा आनंदात होते

"हो ना, नेहमी सपोर्ट करतो तो सोनलला, जिवापाड जपतो, समजून घेतो, चांगली आहेत आपली मुले ",.. आई

आई-बाबा दोघे बोलत होते तेवढ्यात बाहेर गाडी थांबली

" कोण आलं आहे हो आत्ता ",.. आई

बाबानी वाकून बघितल,.." आक्का आली आहे ",

" कशाला आल्या त्या इकडे आता?, त्यांना जायला सांगा , एक तर आता थोडी सोनल ठीक होते आहे, काहीही करून त्यांची सोनलची भेट नको व्हायला",.. आई

" हो बरोबर बोलते आहेस, तू बर झाल सोनल बाहेर गेली, जर ती आलीच तर मी तिला बाहेर थांबवेन",.. बाबा

"हो चालेल पण आता या का आल्या इकडे ",.. आई

" माहिती नाही पण मी बोलणार नाही आहे तिच्याशी, तू पण अघळ पघळ बोलू नको, चहा करून काढून दे तिला ",.. बाबा

हो..

आक्का आत्या आत आल्या, येऊ का घरात?

कोणी काही बोलाल नाही..

" वहिनी काय ग तू ही नाराज आहेस का माझ्या वर ",.. आक्का

" हो आक्का, नाराज आहोत आम्ही, का आल्या तुम्ही इकडे? खरच काम आहे का तुमच आमच्या कडे?,आपण नको ना बोलायला, प्लीज तुम्ही जा बर",.. आई

"अग वहिनी काय अस करते? अजून रागावली आहेस का तू? ऐक तरी माझ",.. आक्का

" रागावणार नाही तर मग काय करणार खुश राहणार का आम्ही? तुमच्या मुळे एवढ्या मोठ्या संकट आल होत आमच्यावर त्याची काही कल्पना आहे का तुम्हाला? ",.. आई

आई आत निघून आली रागाने

" हो माहिती आहे मला ते, म्हणूनच तर मी माफी मागायला आली आहे, अग बोल तरी नीट ",.. आक्का

" भाऊ.... भाऊ.. तू तर मला परकच करून टाकला आहे",.. आक्का

बाबा उठून आत चालले गेले

" दोन मिनीट येवू का मी वहिनी, अग काय अस करताय तुम्ही, मी काय म्हणते ऐका तरी, बोलून प्रश्न सुटतील ",.. आक्का

" या आत ताई, जे काही बोलायचं आहे ते पटकन बोला बोला, फक्त इतर विषय काढू नका ",.. आई

" भाऊ तू का मला बघून आत चालला गेला?",.. अक्का पलंगावर बसल्या

" भाऊ ऐ भाऊ मला तुझ्याशी बोलायचं आहे, काय आहे तुझ्या मनात सांग मला, मला माहितीये की तुला माझा राग आला आहे, बोल जे असेल ते मनात, मी काहीही उलट बोलणार नाही, वहिनी अगं माफ कर आता मला, बोला ग माझ्याशी, मला तरी कोण आहे तुमच्या शिवाय, भाऊ तू बाहेर येतो आहे का? की मी आत येऊ? , मी आज तुझ्याशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही",... आक्का

सोनलचे बाबा बाहेर येऊन बसले,.." हे बघा अक्का तुला जे बोलायचं असेल ते बोल संतोष चा विषय सोडून",

" असा कसा संतोष चा विषय सोडून द्यायचा भाऊ, तू मामा आहे त्याचा, तुला काळजी नाही का संतोषची",.. आक्का

" नाही आहे मला त्याची काळजी, उलट राग येतो आहे त्याचा खूप, हे बघ असं बोलते तू आक्का मला नाही बोलायचं तुझ्याशी ",.. बाबा

" बरं राहिलं सोनल कुठे आहे",.. आक्का

" ती बाहेर गेली आहे",.. बाबा

" मला सोनलची माफी मागायची आहे",.. आक्का

" हो येईल ती थोड्या वेळात, पण मला काय वाटत आहे ना आक्का, तू सोनल शी न बोललेलं बरं, ती आता थोडीशी त्या धक्क्यातून बाहेर येते आहे, तू लांब थांब तिच्या पासून, तुझं बोलून झालं असेल तर तु जा आणि यापुढे आमच्याकडे नाही आलं तरी चालेल, ज्यांच्यामुळे आमच्या मुलांना त्रास होतो त्यांच्याशी आम्हाला संबंध ठेवायचा नाही",.. बाबा

" मी काही तिला त्रास होईल असं वागणार नाही, मला फक्त माफी मागायची आहे सोनल ची, माझ्या मनावर एक ओझं आहे ते कमी होईल",.. आक्का

" नाही म्हटलं ना का आक्का, सोनल किंवा वैभव शी कुणाशी बोलू नको तू आणि तुला असं वाटत असेल तर तू सोनल शी बोलल्यावर आम्ही संतोष वरचे केस मागे घेऊ तर तुझा गैरसमज होतो आहे, आम्ही कुठल्याही परिस्थितीत संतोष वरची केस मागे घेणार नाही आणि संतोषला जास्तीत जास्त शिक्षा होईल याकडे लक्ष देणार आहोत",.. बाबा

" नादान आहे संतोष, चूक झाली त्याच्याकडून, माफ कर त्याला, असा काय करतोस भाऊ तुला माहिती आहे का संतोष जेल मध्ये असल्यापासून मी आणि तुझे दाजी आणि जेवलेलो सुद्धा नाही व्यवस्थित, तुझे दाजी जेलमध्ये होते, रोज ते काळजी करत बसतात, तू जर माझी मदत केली तर बरं होईल, संतोषला पश्चाताप होतो आहे झालेल्या गोष्टीबद्दल, मी लगेच संतोष च लग्न दुसरीकडे करून टाकेल, यापुढे कधीच संतोष तुमच्या मुलांच्या वाट्याला येणार नाही, जर तुला वाटत असेल तर मी आम्ही पेपर वर लिहून देऊ, पण एवढी केस मागे घे, खूप उपकार होतील तुझे भाऊ, वहिनी तू तरी सांग, माझा एकुलता एक मुलगा आहे, कसं जगणार मी त्याच्याशिवाय आणि त्यांने हे काय उपद्व्याप केले आहेत ते काय आम्हाला विचारून गेली आहेत का",.. आक्का

" मग कशाला तू त्याची बाजू घेऊन आमच्याशी बोलते, तुलाही ते आवडलं नाही आहे जे संतोष वागला ते तर नको ना त्याला पाठीशी घालु, जे होते ते होऊन जाऊ देत, एकदा शिक्षा झाली की होईल नीट ",.. बाबा

" माझ आईच काळीज आहे, संतोष आमचा एक आधार आहे, तो बोलला यांना माझी चूक झाली आहे बाबा, एकदा मदत करा, यापुढे मी असं काही करणार नाही, तुला जर वाटलं तर भाऊ आपण जाऊन भेटायचं का त्याला पोलीस स्टेशनमध्ये ",.. आक्का

" नाही काही गरज नाही आहे त्याची, मी कुठेही येणार नाही आणि तुम्हाला मदत ही करणार नाही, जर आमच्या मुलीचं काही बर वाईट झालं असतं तर काय करणार होतो आम्ही? ",.. बाबा

" काय झालं असतं? माझ्या घरी आली असती ना तुझी पोरगी, मी काय वाईट आहे का? तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळल असत तिला, पण तुम्हाला ते नको आहे, तुम्हाला दुसरे लोक आवडतात",.. आक्का

" हे बघ आक्का मला वाद नको आहे",.. बाबा

" ठीक आहे मी निघते मग ",.. आक्का

हो चालेल..

" तुमचा नाही मग काही विचार आम्हाला मदत करायचा",.. आक्का

" नाही... मी अश्या कोणत्याही मुलाला मदत करणार नाही जो त्रासदायक आहे, दुसर्‍याच जिवन मुश्किल करतो, दुसर्‍याच्या मुली त्यांना हक्काच्या वाटतात का? काही लाज वाटली पाहिजे, अश्यांना शिक्षा ही व्हायला पाहिजे",... बाबा

आक्का जड पावलांनी निघून गेल्या, हा ही रस्ता बंद झाला, काय करता येईल मला संतोष साठी? , संतोष... संतोष आक्का गाडीत रडायला लागल्या....