बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 31

राहुल ने सोनल चा हात हातात घेतला,.." हो सोनल मी कायम तुझ्या सोबत असेल, आपण दोघ मिळून लढु, सगळ्या संकटांचा सामना करू, तू अजिबात काळजी करू नकोस,


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 31

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

रमेश दादाच्या ओळखीचे एक चांगले वकील केस साठी नेमले होते, त्यांचा फोन आला,.." तुम्हाला आता येता येईल का ऑफिसमध्ये, केस संदर्भात डिटेल्स हव्या होत्या ",

"हो मी पाठवतो सोनल राहुलला ",.. रमेश दादा

सकाळी राहुलचा फोन आला, सोनलने फोन उचलला

"आपल्या केस साठी वकील मिळाला आहे, त्यांना काही डिटेल्स हवी आहेत केस बद्दल, आपल्याला जाव लागेल त्यांना भेटायला",.. राहुल

"ठीक आहे मी येते वैभव दादा सोबत तिकडे",.. सोनल

"सोनल मी येतो तुला घ्यायला",... राहुल

"राहुल प्लीज मला परत परत सांगायला नको लावूस, मी येईन बोलली ना दादा सोबत ",.. सोनल

" ठीक आहे सोनल, आता तू मला भेटणार ही नाहीस का? , बोलणार ही नाही माझ्याशी, माझ काही चुकलं का? ",... राहुल

" मी फोन ठेवते राहुल",.. सोनल

वहिनी आली चहा घेवून,.. "कशी आहे सोनल भाऊजी?, बोलली का काही? ",.

" नाही वहिनी नीट नाही बोलत ती अजून माझ्याशी",.. राहुल

रमेश दादा आत आला,.." काय झाल राहुल? , सोनल कशी आहे आता ",.

" काही ठीक नाही सुरू आहे दादा, सगळा गोंधळ झाला आहे , सोनल ने नकार दिला लग्नाला, ती माझ्याशी मोकळ बोलत नाही, आता वकीलांच्या ऑफिस मध्ये जायच तर सोनल बोलली मी येईन माझी ",.. राहुल

" थोडा वेळ दे तिला होईल नीट, कोणीतरी बोलायला पाहिजे सोनल शी, नाराज आहे ती, मी काल बोलणार होतो तुमच्या दोघांशी पण मला घरी यायला उशीर झाला नेमका ",.. रमेश दादा

" दादा काही करता येणार नाही का? , सोनल चिडली आहे, आई बाबा ऐकत नाहीत, काय करू मी?",.. राहुल

" हे बघ राहुल येवढ हार मानून चालणार नाही, होईल नीट, आपण यातून सुवर्णमध्य साधू, तू तुझा निर्णय घे आता, आई बाबांकडे लक्ष नको देवू, तुला घर सोडव लागेल, सोनल ला घेवून वेगळा रहा, केसच्या संदर्भात आपण भेटूच सोनलला तेव्हा बघू तिचा काय मूड आहे, तिची समजूत काढता येईल, एवढच आहे की जरा उशीर होईल, तुला समजून घ्यावे लागेल ",.. रमेश दादा

" सोनल जेवढी एकटी राहिली ना दादा, तेवढी ती स्वतःला त्रास करून घेईल, जर आम्ही सोबत असलो तर तेच तेच विचार मनात येत नाहीत, आणि त्रास मला ही होतो सगळ्यांच्या वागण्याचा, काय करणार लोक बोलतातच, पुढे जायला पाहिजे ",.. राहुल

"लोक नाही इथे घरचे विरोध करता आहेत",.. रमेश दादा

"हो ना ती एक मोठी शोकांतिका आहे, आपण सपोर्ट करायला पाहिजे सोनलला, तिला हे सगळ विसरायला मदत करायला पाहिजे, तर आपल्या घरातून तिला सगळ्यात जास्त त्रास होतो आहे ",.. राहुल

"हो बरोबर आहे, होईल नीट सगळ, तू हार मानू नकोस",.. रमेश दादा

" नाही दादा, मी आज बोलणार आहे सोनल शी, वैभव दादा ही येतो आहे तिकडे, बघू काय होत ते ",.. राहुल
......

सोनल वैभव दादा सोबत वकिलांच्या ऑफिस मध्ये गेली तिथे राहुल आलेला होता राहुल आणि सोनल कडून केस संदर्भात सगळे डिटेल्स त्यांनी घेतले,.. "प्रकरण बरच जून आहे म्हणजे बर्‍याच दिवसापासून त्रास होता तुम्हाला, तुम्ही आधी पोलिस केस का नाही केली संतोष ची?, त्याला तेव्हा अद्दल घडली असती, पुढच्या गोष्टी टळल्या असत्या ",

"घरचे लोक होते वाटल संतोष अल्लड आहे, होईल नीट म्हणून दुर्लक्ष झाल, केवढ नुकसान झाल आमच, आणि वाटल नव्हतं संतोष अस करेन ",.. वैभव दादा

"करू आपण काहीतरी, संतोषला आणि त्याच्या मित्रांना जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहीजे अस बघु, परत त्याची कोणा मुलीकडे बघायची हिम्मत नाही व्हायला पाहिजे ",.. वकील

राहुल सोनल वैभव दादा बाहेर आले, चला आपण चहा घेऊ

तिघे चहा घ्यायला आले, राहुल वैभव दादा कडे बघत होता,

"सोनल राहुल काय म्हणणं आहे तुमचं, काय चाललय तुमच हे, मोकळ बोलणार का तुम्ही माझ्याशी ",.. वैभव दादा

" दादा आपलं कालच बोलणं झालं आहे ना या विषयावर, मग आता परत तेच तेच का बोलतो आहे आपण, मला घरी जायच आहे",.. सोनल

" हे बघ सोनल अस वागून कस चालेल? , हे नातं तुझं आणि राहुलच मिळून आहे, फक्त तुझ्या बाजूची मत मी ऐकलं आहे, राहुलच्या ही मताला तेवढीच किंमत आहे, तो काय म्हणतो आहे ते मला जाणून घ्यायचं आहे, चालेल ना ",.. वैभव दादा

" बरोबर आहे तुझं दादा, माझं चुकलं ",.. सोनल

"बोल राहुल तुझं काय म्हणणं आहे ",.. वैभव दादा

" सोनल मला समजत आहे की आमच्या घरचे चुकले आहेत, पण त्यांचं काय मत आहे हे मी तुला कालच स्पष्ट सांगितलं, मला वाटलं असतं तर मी खोटं बोललो असतो, तुझ्या पासून त्यांचे विचार लपवले असते आणि लग्ना नंतर तुला समजलं असतं तर तुला किती वाईट वाटलं असतं, माझ्यावरचा विश्वास उडाला असता, त्यापेक्षा आता माझ्या घरच्यांचं काय म्हणणं आहे हे आपल्याला स्पष्ट झाल आहे",.. राहुल

" बरोबर बोलतो आहे राहुल, सोनल तू विचार कर एकदा यावर आम्ही कोणीही तुला कसलीही जबरदस्ती करत नाही पण जे आहे ते स्पष्ट राहुल ने सांगितलं त्याने कुठलीही लपवाछपवी केलेली नाही आणि राहुल कायम तुझ्या सोबत आहे त्यामुळे तुला त्याच्या बाजूने सुद्धा विचार करणे गरजेचे आहे, आणि तुला होतोय तेवढाच त्रास त्याला ही होतोय",.. वैभव दादा

सोनल राहुल नीट ऐकत होते

" सोनल राहुल खूप एकटा पडला आहे, तू पण असं करशील तर तर तो काय करेल आणि तो केवळ तुझ्यासाठी त्याच्या घरच्यांशी भांडतो आहे, तू त्याला समजून घे थोडं, आम्हाला माहिती आहे हा तुझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे, तसाच त्रास राहुललाही धक्का बसला आहे, त्यात तुझा काय डिसिजन आहे हे त्याला समजत नाही, असं करू नका दोघांनीही एकमेकांना समजून घ्या ",.. वैभव दादा

" हो दादा तू बरोबर बोलतो आहेस, मी स्वार्थी झाली होती, मला फक्त माझा त्रास दिसत होता, मलाच लोक बोलतात असा मी विचार करत होते, पण मी अस वागल्याने राहुलला त्रास होत होता, राहुल मला माफ कर, मी तुझा विचार करेन, आपल्याला नात्या त्याबद्दल विचार करेन, फक्त थोडा वेळ दे मला, मला आता सगळ नीट लक्ष्यात आल माझ्याकडून आता कोणाला त्रास होणार नाही ",.. सोनल

" सोनल तुला हवा तो वेळ घे, फक्त गैरसमज करून घेऊ नको, माझ्याशी बोलण बंद करू नकोस, मी सदोदित तुझ्यासोबत आहे",.. राहुल

वैभव दादाला आता बरं वाटत होतं, चला बरं झालं निदान राहुल आणि सोनल मध्ये थोडं बोलणं तरी झालं,

" मी आता ऑफिसला जातो आहे, राहुल तू सोनल ला घरी सोडून ये ",.. वैभव दादा

" ठीक आहे दादा ",.. राहुल

वैभव दादा ऑफिसला निघून गेला

राहुल सोनल निघाले,.. "सोनल तू अजून रागावली आहेस का माझ्यावर, तुला बोलायचा ते बोल मन मोकळ कर काहीही मनात ठेवू नकोस",.

"नाही राहुल मी ठीक आहे आता, मी फक्त माझा विचार करत होते, आता मी माझा नाही आपल्या दोघांचा विचार मी नेहमी विचार करेन",.. सोनल

"आपण का फरक पडून घ्यायचा आपल्या आयुष्यात, आपण चांगल असो की वाईट असो लोक बोलतातच, कोणी काही बोलू दे सोनल आपण आपल्या निर्णयावर ठाम रहायला पाहिजे, एकमेकांची साथ नको सोडायला, तू काल पासुन माझ्याशी बोलत नाहीस, मी कोलमडून गेलो होतो, प्लीज अस करु नकोस, तू माझी स्ट्रेंथ आहेस आपण एकमेकांना आधार व्हायला पाहिजे, आणि आपला नात तुटल तेच संतोष ला हव आहे, आपण सोबत राहून त्याच्या डाव पूर्ण होवू द्यायचा नाही ",.. राहुल

सोनल ऐकत होती सगळ, तिच्या डोळ्यात आसू होते, राहुल मी खूप वाईट वागली तुझ्याशी, मलाच समजत नाही काय झाल ते सगळ, नको नको झाल आहे मला आता हे संतोष प्रकरण , हो मला काल प्रिया तेच बोलत होती, की तू अस वागायला पाहिजे हेच संतोष ला हव होत, मी का एवढा त्रास करून घेते मला समजत नाही? , कुठे यावस वाटत नाही मला, अस वाटत की सगळे माझ्याकडे बघता आहेत, माझ्या विषयी बोलता आहेत, घाबरते मी आता सगळ्यांमध्ये जायला, काहीही नको अस वाटत, मला यातून बाहेर पडायचं आहे, मला मदत करशील का राहुल ",.. सोनल

राहुल ने सोनल चा हात हातात घेतला,.." हो सोनल मी कायम तुझ्या सोबत असेल, आपण दोघ मिळून लढु, सगळ्या संकटांचा सामना करू, तू अजिबात काळजी करू नकोस, तुझ काही चुकलं आहे का यात, नाही ना, मग तू का तुझा कॉन्फिडन्स कमी करते आहेस, तू अशी कमजोर झाली तर लोकांना वाटेल हिच्यात दोष आहे म्हणून ती अशी वागते, आणि तुझ्या आई बाबांना मला वैभव दादा ला त्रास होईल तू अशी शांत राहिली तर ",.. राहुल

" हो बरोबर आहे, आपण स्ट्रॉंग रहायला पाहिजे, आपण का फरक करून घ्यायचं आपल्या आयुष्यात दुसऱ्या मुळे, जे लोक आपल्यासाठी काहीही महत्वाचे नाही, त्यांचा विचार करायची काहीही गरज नाही आहे आपल्याला, उगीच मी त्या लोकांचा विचार करत होते आणि त्रास करून घेत होते",.. सोनल

" हो बरोबर, प्रॉमीस कर अस परत नाही त्रास करून घेणार",.. राहुल

" प्रॉमीस या पुढे मी आनंदी राहीन नीट राहीन कुठल्याही गोष्टीची त्रास करून घेणार नाही",.. सोनल

राहुल खुश होता आता, दोघ सोनलच्या घराजवळ आले,

" मी निघते आता राहुल",.. सोनल

" ओके ना आता",.. राहुल

" हो एकदम ",.. सोनल छान हसली राहुल शी, राहुल ने खिश्यातून चॉकलेट काढल ते सोनलला दिल, सोनल राहुल कडे बघत होती तिने आजुबाजुला बघितल पटकन राहुलला मिठी मारली, राहुल गडबडून गेला, सोनल गालातल्या गालात हसत आत निघून गेली

राहुल खूप खुश होता, मनोमन त्याने देवाचे आभार मानले, बर झाल सोनल शी बोलण झाल

आई वाट बघत होती, सोनल आत आली,

"भेटले का ग वकील? काय बोलणं झालं?",.. आई

"हो आई, झाल बोलण, सगळी माहिती विचारात होते ते, काय काय झालं ते",.. सोनल

"केस कधी सुरू होणार आता",.. आई

"माहिती नाही काही",.. सोनल

"झाल का बोलण राहुल शी?",.. आई

"हो आई आणि सगळे गैरसमज ही दूर झाले, मी फक्त माझ्या बाजूने विचार करत होते, मी राहुल चा ही विचार करायला पाहिजे होता, राहुल ने मला खूप साथ दिली, आई माझ चुकलं, या पुढे मी विचार करून वागेन ",.. सोनल

" बरोबर बोलतो आहे सोनल तू दोघे बाजूने विचार केला, छान, नात दोघ बाजूने असत, दोघांनी तितकाच महत्त्वाचे असतात, राहुल चांगला आहे ग खूप ",.. आई

" हो आई मी आता राहुलची साथ कधी सोडणार नाही ",.. सोनल खुश होती
............

संतोष कडचे वकील संतोषच्या घरी गेले, बाबा आणि आक्का पुढेच बसलेले होते

मला थोडी माहिती हवी होती, संतोष कसा आहे? संतोषच्या घरच वातावरण कस आहे? , त्याच वागण बाकीच्यांशी कस होत? सगळ्या नोट्स त्यांनी घेतल्या, संतोष खूप साध्या घरचा मुलगा आहे, तो काही गुन्हेगार नाही, मग त्याने अस का केल? , बर्‍याच नोट्स त्यांनी घेतल्या..

आक्कांनी त्यांना चहा करून दिला

"आमचा संतोष सुटेल ना निर्दोष?" ,.. आक्का

"सांगता येत नाही अजून, काकू तुम्ही काळजी करू नका, लवकर केस सुरू होईल, तो पर्यंत तुम्ही सोनलला एकदा भेटा, तिची माफी मागा, जर केस आधीच कॅन्सल झाली तर बर आहे, मी पण भेटणार आहे त्यांच्या वकिलांना",.. वकील

"आक्कांना थोड बर वाटत होत, थोडी आशा आहे चला, हो मी जावून भेटते सोनलला, भाऊला ",.. आक्का

" लवकरात लवकर करा हे काम पुढे काय झाल ते लोक काय बोलले ते सांगा मला",.. वकील

" हो, मला भेटता येईल का संतोषला? ",.. आक्का

" हो भेटू शकता तुम्ही ",.. वकील

"काय गरज आहे तिकडे पोलिस स्टेशन ला जायची पण ",.. बाबा चिडले होते

" मला भेटायच आहे संतोषला काहीही झाल तरी, बरेच दिवस झाले बघितल नाही त्याला, तुम्ही आले नाही तर मी एकटी जाईन ",.. आक्का

" मी घेवून जाईन तुला तू एकटी नको जावू",.. बाबा

" मला बघाव लागेल आता काय करता येईल ते पुढे, भाऊ कडे जावून येईन मी, तुम्ही मला तुमचा फोन नंबर द्या वकील साहेब ",.. आक्का
........

बघु पुढे काय होतय ते, सोनल माफ करेल का संतोषला,...
आक्का काढतील का काही मार्ग संतोष साठी...

.......

🎭 Series Post

View all