कधीही न तुटणारे.....
©️®️शिल्पा सुतार
..............
..............
राहुल घरी आला, आई बाबा पुढे बसलेले होते, त्यांच्याशी न बोलता राहुल सरळ रूम मध्ये निघून गेला, वहिनी बघत होती, ती मागे गेली
"काय झालं भाऊजी?, तुम्ही चिडलेले आहेत का?, झाल का बोलण सोनल शी? ",.. वहिनी
"हो मग काय करु वहिनी, सोनल खूप नाराज आहे माझ्यावर , ती बोलते मला वेळ हवा आहे आता, लग्नाची घाई नको करायला",.. राहुल
" भाऊजी सोनल दुखावली गेली आहे, कोणी किती काहीही बोलल तरी चालत पण जवळच्या माणसांकडून वेगळी अपेक्षा असते, तिला धक्काच बसला असेल हे सगळ ऐकुन , आई बाबा अस का करता आहेत",.. वहिनी
" हो वहिनी अस झाल आहे, आता काय करू या वहिनी? मी सोनल शिवाय नाही राहू शकत, अगदी सगळ संपल्या सारख वाटत आहे ",.. राहुल
" सगळ्यांनी सोनल वर संशय घेतला की ती संतोष सोबत होती, पण ती काही तिच्या मनाने गेली होती का तिकडे? , तिच्यावर विचित्र प्रसंग ओढवला होता, किती वेळा सोनल सांगेन की काही केल नाही संतोष ने मला, अविश्वास दाखवताय सगळे, म्हणून ती चिडली आहे, तिचा काही दोष नसतांना तिला त्रास होतो आहे, समाज असा असतो भाऊजी, तो दुसर्याला दोष देवून मोकळा होता, थोड जरी काही झाल की सगळे बोलायला मोकळे होतात, साहजिक आहे हे भाऊजी सोनल कस सहन करेल? , तिला वेळ द्या थोडा, होईल नीट",.. वहिनी
" माझ चुकलं वहिनी, मी आज लगेच नव्हत बोलायला पाहिजे होत सोनलशी, आई बाबा काय म्हणताय ते नव्हत सांगायला पाहिजे होत, आई बाबांना अजून समजवले असत ",... राहुल
" त्याने काही फरक पडला असता भाऊजी? , एक न एक दिवस तिला समजल असत ते नाराज आहेत ते, आई बाबा दुसर्याच जास्त ऐकतात, समाजाला घाबरून रहातात, आपल्या मुलांची बाजू घ्यायची तर ते अजून आपल्याला त्रासात टाकतात, लोक काय बोलतील ते आपण नाही कंट्रोल करू शकत, स्वतः वर अशी वेळ आली तर कस वाटेल हे समजल पाहिजे लोकांना",... वहिनी
" बरोबर आहे वहिनी, तुम्ही मदत करा ना प्लीज ",... राहुल
"हो मी आणि तुमचे दादा आहोत तुमच्या सोबत, राहुल भाऊजी अजिबात काळजी करू नका, काढू आपण काही तरी मार्ग, सोनल ने तुम्हाला नकार दिला नाही ना, वेळ मागितली ना फक्त, नंतर करू लग्न अस ",.. वहिनी
" हो वहिनी पण ही वेळ किती दिवसाची असेल? ",.. राहुल
" करु आपण काहीतरी, तिच्या मागे लागता येणार नाही, समजुतीने घ्याव लागेल ",.. वहिनी
राहुल विचार करत होता काय करता येईल...
......
......
वहिनी त्यांच्या रूम मध्ये गेली तिने रमेश दादा ला फोन करून सांगितले काय झालं ते, दोघ बराच वेळ बोलत होते,...." मी घरी आलो की बोलतो राहुलशी, हे जे झाल ते काही बर नाही झाल, आई बाबांनी अस नव्हत करायला पाहिजे, तू काळजी करू नकोस, करू आपण ठीक ",..
"हो मी पण तेच सांगितल राहुल भाऊजींना... त्यांना आपल्या सपोर्ट ची गरज आहे",.. वहिनी
......
......
आई बाबानी वैभव दादा ला फोन केला
"वैभव अरे सोनल भेटून आली राहुलला, तिने सध्या लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे ",.. बाबा
" राहुल भेटला का तुम्हाला? , तो आला असेल ना सोनलला सोडायला ",.. वैभव
" नाही तो सोनल ला बाहेर सोडून गेला ",.. बाबा
"तुम्ही काळजी करू नका, मी आल्यावर बोलतो सोनल शी, ती ठीक आहे ना, तुम्ही ही काळजी करू नका ",... वैभव
" हो ठीक आहे, राहुलशी पण बोलून बघ",.. बाबा
हो...
वैभव दादा विचार करत होता काय झालं असेल नेमकं? , वैभव ने राहुल ला फोन केला
" वैभव दादा तुला समजल का?, सोनल रागावली माझ्या वर ",.. राहुल
"हो, काय झालं नेमक?, तू ठीक आहेस ना राहुल",..वैभव
"हो दादा काय कराव समजत नाही मला, चुकी आमची आहे, सोनलला खूप त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा",.. राहुल
"काय झालं नक्की",.. वैभव
"मी सोनल ला सांगितल की आई बाबांचा नकार आहे आपल्या लग्नाला, आपण लग्न नंतर वेगळ राहू, सोनल बोलली तू तुझ्या आई बाबांना सोडू नको माझ्यासाठी, ती काही बोलली नाही, पण तिला आता वेळ हवा आहे, वैभव दादा प्लीज मदत करा मला, काही सुचत नाही मला सोनल शी लग्न करायचा आहे ",...राहुल
" हे बघ राहुल तू काळजी करू नकोस मी घरी गेलो की बोलतो सोनल शी मग सांगतो तुला ",.. वैभव
" माझे आई बाबा सोनलला मेडिकल टेस्ट करायला सांगता आहेत, मला ही मान्य नाही ते ",... राहुल
" हे अति होतय राहुल, माझ्या बहिणीवर असा संशय नाही घेवू शकत ते, मला अजिबात आवडल नाही हे ",... वैभव
" हो ना दादा माफ कर आम्हाला, काय करणार कोणाच ऐकुन आई बाबा असे वागतात काय माहिती ",... राहुल
" तुझा काही दोष नाही राहुल, तू का माफी मागतोस, उलट तू मदत केली आहे आम्हाला वेळोवेळी, होईल ठीक मी बघतो काय करता येईल ते ",... वैभव
....
....
आई बाबा काळजीत होते, सोनल आत रूम मध्ये होती, ती खूपच शांत झाली होती, बाबांनी चहा केला, दोघींना दिला, हसत खेळत घर एकदम शांत झालं होतं
बाजूच्या मावशी आल्या बसायला, आईने डोळ्याने खुणावल सोनल शी बोला..
" सोनल कशी आहेस ग? , तुला समजल का मीनलच लग्न जमल ते, तुला मीनलच्या आईने बोलवलं आहे मदतीला, जरा वेळ जावून ये तिच्याकडे",... काकू
"हो का, अरे वा काकू, जावुन येईल मी नंतर " ,.. सोनल
"उद्या साखरपुडा आहे, खूप धावपळ सुरु आहे त्यांची",... काकू
सोनल बोलायच्या मनस्थितीत नव्हती... ती आत चालली गेली
जरा वेळाने प्रिया आली भेटायला, प्रिया ला बघून आई ला बर वाटल ,.." प्रिया येत जा ग रोज",..
" हो काकू, सोनल कुठे आहे? ",.. प्रिया
"ती काय आत आहे, जरा बोलत कर बाई तिला",.. आई
" हो बघते मी, तुम्ही काळजी करू नका काकू",.. प्रिया
" सोनल आनंदाची बातमी आहे, मीनलच लग्न जमल आहे, उद्या साखरपुडा आहे, आपल्याला जायच आहे तिकडे , काकूंनी बोलवलं आहे सकाळ पासून, सकाळी लवकर तयार रहा, कोणता ड्रेस घालशील, मी तो हिरवा घालणार आहे ",.. प्रिया
"नाही प्रिया मला नाही जमणार यायला " ,.. सोनल
"का अशी करतेस, काय झालं आहे",.. प्रिया
" तुला माहिती नाही का काय झालं ते? , नको उगीच मी तिथे यायची, लोक काही बोलायचे, परत मीनलच्या लग्नामध्ये माझ्यामुळे काही विघ्न नको मला ",.. सोनल
" अरे काहीही काय सोनल, काय यार का कोणी अस का बोलेल तुला? , आम्हाला माहिती आहे संतोष तुला किती त्रास द्यायचा आधीपासून , त्यात तुझा काय दोष, सोड ग आता, आणि तूला असा त्रास व्हायला पाहिजे हाच प्लॅन असेल संतोष चा, सगळे तुला त्रास देतील, मग तू कंटाळून त्याला हो बोलशील, तू नीट रहा, त्याचा प्लॅन सक्सेसफुल होवू देवू नकोस ",.. प्रिया
सोनल विचार करत होती,.. " मी सोडायला तयार आहे पण लोक मला विसरू देत नाही काही, मला थोडा वेळ हवा आहे प्रिया, मी येणार नाही, माझी हिम्मत होत नाही आता घराबाहेर निघायची" ,.. सोनल
"परत तेच, अशी हिम्मत हारून कस होईल सोनल, मला सांग सगळ कोण काय बोलल का तुला?, राहुल भेटला का? ",... प्रिया
" जाऊ दे, नको तो राहुलचा विषय, काय होणार त्याने, झाल ते बदलता येणार नाही , मी घरीच बरी, तुम्ही मैत्रिणी लांब थांबा माझ्या पासून, अजून मला कोणाला त्रास द्यायचा नाही ",... सोनल आत निघून गेली
प्रिया येवून सोनलच्या आई जवळ बसली, आई रडत होती,.. "कशी झाली बघ सोनल, काय करू ग मी आता",..
"काकू तुम्ही काळजी करू नका, मी आहे सोनल सोबत, करू आपण सगळ नीट, मीनल आहे बाकीच्या मैत्रिणी आहेत, मी येत जाईन रोज, होईल नीट सगळ, सोनल लग्नाला ही तयार होईल, तुम्ही रडू नका काकू ",... प्रिया
आता आई ला बर वाटत होत,..
सोनल आत आली, ती राहुलचा विचार करत होती, तीच्या चेहर्यावर दुःखाचे भाव आले, माझा प्रिय राहुल काय करत असेल, किती तोडून बोलली आज मी त्याला, मी पण तुझ्या शिवाय नाही राहू शकत राहुल, पण थोडा वेळ जाऊ द्यायला हवा, कर थोड सहन माझ्या साठी, मी पण इकडे कशी राहते माझ मला माहिती, जातील हे ही दिवस निघून
........
........
संध्याकाळी वैभव दादा लवकर घरी आला
आई स्वयंपाक करत होती, बाबा कामानिमित्त बाहेर गेले होते,
" आई कशी आहे सोनल? काही बोलली का ",.. वैभव
" नाही काही बोलली नाही, आत आहे बसलेली, एकदम गप्प झाली आहे रे ती, काय कराव ",.. आई
मी बघतो..
वैभव दादा आत आला,.. "सोनल पाणी दे" , मुद्दाम तो काम सांगता होता तिला
सोनल जावून पाणी घेवून आली
"भेटला का राहुल झाल का बोलण तुमच ",... वैभव
" हो दादा तुला माहिती आहे ना त्याच्या आई बाबांना हे लग्न मान्य नाही ",.. सोनल
" मग पुढे काय?, चला तुझ राहुलच माझ निशाच सोबत लग्न होईल आपल्याकडे, काही इलाज नाही त्या गोष्टीला, नसतील ते लोक आपल्या लग्नात एवढाच काय तो फरक पडेल ",.. वैभव दादा
"नाही दादा, आता मला थोडा वेळ हवा आहे,
आधी तुझ निशा वहिनीच लग्न करून घेवू आपण ",.. सोनल
आधी तुझ निशा वहिनीच लग्न करून घेवू आपण ",.. सोनल
"याला काय अर्थ आहे, काय झालं, काही बोलाल का राहुल ",.. वैभव
" नाही दादा राहुल खूप समजूतदार आणि चांगला आहे, तो काही बोलला नाही, मलाच वेळ हवा आहे, आता पोस्ट ग्रॅज्युएशनला अॅडमिशन घ्यायची आहे, अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहे मी ",.. सोनल
" लग्नानंतर ही शिकता येईल की तुला, नाही तरी राहुल देणार आहे पुढच्या जॉब साठी परीक्षा ",.. वैभव
" मला नाही वाटत एवढी घाई करायला पाहिजे",.. सोनल
" का पण"? .. वैभव
" त्याच्या आई बाबांची इच्छा नाही दादा, नुसत्या इच्छेचा प्रश्न नाही तर त्यांना माझावर संशय आहे, त्यांनी मला मेडिकल टेस्ट करायला सांगितली आहे, मी तयार नाही त्या साठी, माझी काही चूक नाही, आणि माझ्यासोबत काहीही अस झाल नाही, मी का मला पावित्र्य सिद्ध करायला टेस्ट करायची, माझ्या मनाविरुद्ध मला आता लगेच हे लग्न नाही करायच, तुम्ही लोक सारख तेच तेच बोलू नका, माझ डोक दुखतय आता ",..
आई ऐकत होती दारातून तिला ऐकुन धक्का बसला
" एवढ झाल तिकडे, माझी मुलगी किती सहन करते आहे",.. आई काळजीत होती
वैभव दादा आई पुढे येवून बसले
" हे सगळ भयानक आहे वैभव, ते लोक संशय का घेता आहेत सोनल वर",... आई ,
वैभव दादा विचार करत होता,.." झाल एकदम विचित्र, कोण सहन करेल असे आरोप, सोनलच बरोबर आहे, माझ्या बहिणीला किती हा त्रास",
वैभव दादाच्या फोनवर निशा वहिनीचा फोन आला होता, तो फोन घेवून बाहेर गेला
"कशी आहेस निशा",.. वैभव
"मी ठीक आहे तुझा आवाज का असा येतो आहे",.. निशा
"इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला, सोनलने लग्नाला नकार दिला आहे",.. वैभव
"का काय झाल",.. निशा
वैभव ने तिला सगळ सांगितल ,.. "सगळ्यात वाईट म्हणजे ते लोक सोनलवर संशय घेत आहेत, त्यांनी तिला मेडिकल टेस्ट करायला सांगितल",
"बापरे काय डेंजर सुरू आहे तिकडे ",.. निशा
" हो ना सोनल खूप नाराज आहे, एकदम गप्प झाली आहे ती ",.. वैभव
" आमच्या घरच्यांनी वेगळ काय केल? अस केल ना, तुझ माझ लग्न मोडायचा प्रयत्न केला, आपण दोघ ठाम आहोत म्हणून बर, नाहीतर होताच त्रास आणि सोनलच म्हणशील तर कंटाळली असेल ती त्याच त्याच गोष्टींना, नको नको झाल असेल तिला आता ",.. निशा
" हो ना आता काय करू या? कस काढायची तिची समजूत समजत नाहिये? ",.. वैभव
" तिला थोडा वेळ द्यावा लागेल , मेन म्हणजे तिला बळजबरी नको करायला, शांततेत तिच्या मनाप्रमाणे होवू देवू ",.. निशा
" हो बरोबर बोलते आहेस तू, आपल काय ठरतय? , मी उद्या येवू का तुमच्या कडे",.. वैभव
" हो, माझ ऑफिस सुटल की सोबत जाऊ घरी",.. निशा
" चालेल, तुला काय वाटतं घरचे कसे वागतील ",.. वैभव
" मला वाटतय ते नाही ऐकणार ",.. निशा
" तुझी तयारी आहे ना माझ्या सोबत यायची",.. वैभव
" हो माझी आहे तयारी ",.. निशा
" अजून विचार कर नंतर तुला कोणी नसेल माझ्या शिवाय",.. वैभव
" हो झाला आहे माझा निर्णय फिक्स",.. निशा
" आपण बरोबर करतो आहे ना निशा?",.. वैभव
" आपल प्रेम आहे एकमेकांवर, एकदम बरोबर आहोत आपण, काळजी करू नकोस तू वैभव",.. निशा
वैभव आत आला, बाबा आलेले होते घरी,.." आई बाबा मी उद्या निशा कडे जाणार आहे, काही वेळेस निशाला सोबत घेवून येईल ",.
" हो चालेल, आम्ही येवू का सोबत ",.. बाबा
" नको बाबा माहिती नाही त्या लोकांचा काय मूड आहे",.. वैभव
" सोनल शी बोलला का तू? ",.. बाबा
"हो खूप नाराज आहे ती, वेळ लागेल तिला, मला काय वाटतं बाबा की सोनलशी सदोदित त्याच विषयावर आपण नको बोलायला, ती त्रासली आहे सगळ्या गोष्टींना ",.. वैभव
" हो बरोबर बोलतो आहेस तू ",.. बाबा
" तिला या सगळ्यातून आपण बाहेर काढल पाहिजे ",.. वैभव
" घरातील छान मोकळा वातावरण ठेवू ",.. बाबा
हो..
वैभव दादा आवरायला निघून गेला
.......
.......
काय होईल उद्या वैभव दादाच? , निशा वहिनीच्या घरचे ऐकतील का?, सोनल जाईल का मीनल च्या साखरपुड्याला? ..... बघू या पुढच्या भागात
वाचकांचे खूप आभार....
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा