Jan 26, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 29

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 29बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 29

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

सोनल आई बाबांच दुपारच जेवण झाल, आवरुन झाल सगळ काम, वैभव दादा ऑफिसला गेला होता

" आई बाबा आवरल नाही का? तुम्ही तयारी करा ना , आज तुम्ही जाता आहात ना राहुलकडे? ",... सोनल आनंदात होती

आई बाबा काही बोलले नाहीत..

सोनलने राहुलला फोन लावला, राहुलने फोन उचलला

"कुठे होता राहुल तू काल? मी तुला रात्री फोन केला होता, काही प्रॉब्लेम आहे का? तू फोन का उचलत नव्हता?, मला काळजी वाटत होती ",... सोनल

"अग लवकर झोपलो होतो मी काल, सकाळी बघितला मी मिस कॉल, करणार होतो तुला फोन, सोनल मला तुला भेटायच आहे आत्ता, मी येतो तुला घ्यायला" ,... राहुल

"अरे आता कस जमेल?, आई बाबा येतं आहेत ना तिकडे, मी पण येवू का त्यांच्यासोबत ",.... सोनल

" मी सांगतो ना सोनल तू तयार हो, मला बोलायचं आहे तुझ्याशी, आपण बाहेर भेटणार आहोत ",... राहुल

" काय झालं राहुल काही प्रॉब्लेम आहे का? ",.. सोनल

" नाही काही प्रॉब्लेम नाही, भेटून बोलू या आपण ",... राहुल

" ठीक आहे कुठे जायच?, पिकनिक आहे का? ",... सोनल लाइट मूड मध्ये होती

" मी येतो घ्यायला तुला",.... राहुल

" आई बाबा आता राहुलचा फोन आला होता, आम्ही बाहेर जातोय, काही तरी बोलायचं आहे त्याला माझ्याशी " ,..सोनल

"हो जावून ये",... आई

" तुम्हाला नाही जायचं का राहुलकडे? ",.. सोनल

"आम्ही जाऊ नंतर ",.. आई

"ठीक आहे" ,.. सोनल तयारी करायला आत गेली, काय बोलायचं असेल राहुलला माझ्याशी, बहुतेक लग्नाच प्लॅनिंग करायच असेल, विचार करून सोनल लाजली, बापरे माझ लग्न, माझ राहुलवर खूप प्रेम आहे, तो ही माझ्यासाठी काहीही करायला तयार असतो, आम्ही एकत्र येवू आता, खूप दिवसांपासून बघितलेले स्वप्नं पूर्ण होईल आमच, किती मजा येईल लग्नात , कस असेल राहुलच घर, आमच पुढच जिवन कस असेल , मला घर सांभाळून कॉलेजला जायला जमायला पाहिजे, राहुलच्या वहिनी आहेत मदतीला, त्या खूप छान आहेत, मी खूप एक्साईटेड आहे, सोनल खूप खुश होती, छान गुलाबी ड्रेस तिने घातला, हा कलर मला छान दिसतो अस नेहमी राहुल म्हणतो, ती तयार झाली, राहुलने दिलेल्या बांगड्या हातात होत्या तिच्या, स्वतः च्या लग्नाच्या गोड विचारात ती हरवून गेली होती, फोन वाजला राहुल बाहेर येऊन थांबला होता

"आई बाबा मी जावून येते" ,... सोनल घरातुन निघाली, बाहेर जाऊन ती राहुलकडे बघत होती, तो एकदम शांत वाटत होता, सोनल आश्‍चर्यच वाटलं मी अगदी थोडी जरी तयारी केली तरी भरभरून बोलणारा तारीफ करणारा राहुल आज किती शांत आहे, मी एवढा छान त्याचा आवडीचा ड्रेस घातला आहे तरी काहीच बोलला नाही, जाऊदे नसेल मूड, बोलेलं नंतर, नक्की काहीतरी झाल आहे, ती गाडीवर मागे जाऊन बसली, राहुल ने गाडी सुरु केली

"कुठे जातो आहोत आपण राहुल? काय सरप्राईज आहे? काही बोलणार कि नाही तू राहुल?",.. सोनल

सोनलने मुद्दाम राहुल पुढे हात धरले, बांगड्यांचा छान आवाज झाला, सोनल एकदम छान मूड मध्ये होती, तरी राहुल गप्प होता

"काय झालं आहे राहुल काही बोलणार का? ",.. सोनल

राहुल ने गाडी देवळासमोर थांबवली, दोघांनी आत जाऊन देवाचं दर्शन घेतलं, दोघ मागच्या बाजूला येऊन बसले, दोन मिनिटं शांततेत गेले, सोनल राहुल कडे बघत होती

" राहुल तुला काही सांगायच आहे का मला? काही सिरीयस मॅटर दिसतो आहे, काय झालं आहे? पटपट बोल मला आता धक्के पचवायची सवय झाली आहे",... सोनल

राहुल ने सोनल हातात घेतला,.. "सोनल माझ्या आई बाबांनी आपल्या लग्नाला नकार दिला, पण मी आहे तुझ्यासोबत, आपण दोघांना लग्नानंतर सेपरेट राहावे लागेल ",..

" काय झालं नक्की नीट सांगणार का? ",... सोनल

" दोन-तीन दिवसापासून आई बाबा माझ्याशी मोकळं बोलत नव्हते",.. राहुल

"म्हणजे तू माझ्या सोबत होता तेव्हा पासून का? ",.. सोनल

" हो, काल मी रमेश दादाला याबद्दल सांगितलं, आम्ही आई बाबांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की त्यांना लग्न मान्य नाही, आमचं खूप भांडण झालं, त्यांनी मला सांगितलं की आणि लग्नानंतर आपल्याला घरात रहाता येणार नाही, नाहीतर ते कुठे तरी निघून जातील ",.. राहुल

सोनल शांत बसून सगळं ऐकत होती,.." मला असं वाटत आहे राहुल हे सगळं माझ्यामुळे झाल आहे, सगळ्यांना माझा आणि संतोषचा संशय आहे, मी संतोष बरोबर दोन दिवस होती, पण मी खरंच सांगते संतोषचा आणि माझा काहीही संबंध नाही, त्याने मला हातही लावला नाही",.

" सोनल प्लीज सारख सांगू नको, मला माहिती आहे सगळ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मला माफ कर, आमच्या घरचे असे वागतात ",.. राहुल

" अपेक्षित होत ते, काही प्रॉब्लेम नाही राहुल, मला तुझा राग आला नाही, होती मी संतोष सोबत दोन दिवस , वाटल असेल त्यांना काही, त्यांच मत असेल की अश्या मुलीशी त्यांच्या मुलाने लग्न करू नये, मी ठीक आहे, तू तुझा डिसिजन घेवू शकतो राहुल, तू तुझ्या आई बाबांच ऐक",... सोनल

" नाही सोनल प्लीज असा विचार करू नकोस, मी कायम तुझ्या सोबत आहे, मला ही आई बाबांचे विचार पटले नाहीत , इतके विचित्र बोलले ते मला",.. राहुल

" काय बोलले आई बाबा ",.. सोनल

" जाऊ दे सोनल, तू नको विचार करूस ",.. राहुल

" नाही मला जाणून घ्यायच आहे राहुल, प्लीज मला सगळ सांग ",... सोनल

" त्यांनी मला सांगितल की सोनलला मेडिकल टेस्ट करावी लागेल, त्या नंतर ते विचार करतील आपल्या लग्नाबद्दल",.. राहुल

सोनल शॉक मध्ये होती,.. बापरे माझ्या बद्दल किती वेगळाच विचार करता आहेत हे लोक , आताच्या जगात ही एका स्त्रीला सदोदित ती पावित्र्य आहे हे सिद्ध कराव लागतंय, पुढारलेले समजतो आपण स्वतःला , आणि काय हे विचार, चांगले विचार नाही मुळी, सुधारणा व्हावी पण दुसर्‍यांच्या घरात, स्वतःवर वेळ आली की सगळे नियम पाळणार, मी पावित्र आहे की नाही हे जास्त महत्वाचे आहे त्यांना, माझी सुखरूप सुटका झाली याच्याशी काही देण घेण नाही,..

"मी तुझ्याशी आत्ता लग्न नाही करु शकत राहुल, प्लीज मला समजून घे, आता तरी शक्य नाही, थोडे दिवस दे मला, किती वेळा मी अग्निपरीक्षा द्यायची आहे आता, स्वतःला पवित्र सिद्ध करायच, माझ्या कडून नाही होणार, सगळे संशय घेतात माझ्या वर, संतोषचा उद्देश साध्य झाला बरोबर, माझ लग्न कुठे होणार नाही याची व्यवस्था केली आहे त्याने, माझ जीवन नकोस करून सोडले आहे ",... सोनल नाराज होती

" सोनल का बोलतेस अस?, मी आहे ना सोबत, करू आपण काहीतरी धीर धर जरा, लग्न न करण्याचा विचार सोडून दे ",.. राहुल

" मला कंटाळा आला आहे आता या संतोष प्रकरणाचा, मी एकटी बरी, प्रत्येक जण माझ्यावर संशय घेतो आहे, आता मला या सगळ्या गोष्टीचा नकोश्या झाल्या आहेत" ,.. सोनल

"का अस बोलतेस सोनल ?, निदान माझा तरी विचार कर, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय",.. राहुल

"मला बरोबर वाटत आहे राहुल, आपण लग्न नको करायला, तू माझ्यासाठी तुझ्या आई वडिलांना दुखवू नको, त्यांच बरोबर आहे, नको असेल त्यांना अशी सून जी दुसर्या सोबत होती दोन दिवस , त्यांच्या मनात संशय आहे माझ्या बद्दल , ठीक आहे, आयुष्यभर त्यांच्या मनात माझ्याविषय संशय असलेल्या मला चालणार नाही, मला वेळ हवा आहे ",.. सोनल

" होतील ते नीट थोडा वेळ लागेल त्यांना, मी समजावेन त्यांना, तू असा धीर सोडू नकोस, होईल नीट ",.. राहुल

" नाही राहुल आज तुझ्या आई बाबांच्या मनात ही गोष्ट आली, उद्या बाकी कोणी बोलतील, तुझ्या मनात येईल संशय, मला नाही चालणार हे, मी सारख सारख हेच सांगत राहू का की माझा आणि संतोष चा काही संबंध नाही, माझ्या कडून नाही होणार हे, मला ही आता थोडा वेळ हवा आहे, तू ही विचार कर परत एकदा ",.. सोनल

"सोनल एकदम असा टोकाचा निर्णय घेवू नकोस, मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय",.. राहुल

"माझ ठरलय आता, मला पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला अ‍ॅडमिशन घ्यायची आहे, खूप शिकायच आहे, आता लग्न वगैरे काही नको, हे सगळ माहिती आहे वाटत माझ्या घरी, काल सांगितलं का तु आई-बाबांना आणि वैभव दादाला, तरी ते आज तुमच्या घरी जायची घाई करत नव्हते",.. सोनल

" सोनल मी काय म्हणतोय तू थंड डोक्याने विचार कर ",.. राहुल

" मला तुझ्याशी काही प्रॉब्लेम नाही राहुल, हा माझा निर्णय आहे, करू आपण लग्न पण आता नको जाऊ दे थोडे दिवस, मी घरी जाते आहे, तू ही तुझ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कर, ऑल द बेस्ट ",.. राहुल

सोनल...... सोनल......

सोनल चालत निघाली

" एक मिनिट सोनल, थांब तुला राग आला आहे का ",.. राहुल

" नाही.... तुझा राग करून कस होईल माझ, मला समजत नाही मी काय आणि कशी रिएक्ट होवु, काय नशीब आहे माझ सगळ होत्या च नव्हत झाल ",.. सोनल

" काहीही एवढ झाल नाही सोनल तू ऐकुन घे ",.. राहुल

"एखाद्याच्या चरित्रात वर जेव्हा संशय येतो ती गोष्ट सोपी नसते राहुल, तू खूप चांगल आहे पण जग तस नाही, मी रीक्वेस्ट करते, मला वेळ दे थोडा",.. सोनल

"ठीक आहे मी आदर करतो तुझ्या भावनांचा, मी सोडतो तुला घरी, आपण बोलू नंतर शांततेत ",... राहुल

ठीक आहे..

राहुलने सोनलला घरी सोडल, ती न बोलता आत निघून गेली, राहुल तिच्याकडे बघत राहिला

मला माफ कर सोनल, सगळे तुला त्रास देतात, तुझ्यावर संशय घेतात, त्यात आज माझी भर पडली, शेवटी मी पण तेच केल, तुझ मन दुखवल, तुला त्रास दिला, पण मी तुझी समजूत काढेन नक्की, लवकरच हो बोलशील तू लग्नाला, राहुल रडत होता

सोनल आत आली, आई बाबा समोर बसले होते, सोनल सरळ आत निघून गेली, आई बाबा एकमेकांनाकडे बघत होते

सोनल... आई ने आवाज दिला

सोनल ने उत्तर दिल नाही, प्रचंड नाराज होती ती, सगळ संपल, काय होवुन बसल हे, कोणा कोणाला उत्तर देवु मी, कोणीच नको मला, मी एकटी बरी, निदान टेंशन तरी नाही काही, पण मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत राहुल, होईल त्रास, सहन करावा लागेल, सध्या तरी मी लग्नाला होकार देवू शकत नाही, राहुल मला माफ कर

"अहो बघा ना काय झालाय ते? सोनल शी बोला, अशी काय आत निघून गेली सोनल",.. आई काळजीत होती

आई बाबा आत आले रूम मध्ये,.. "सोनल एक मिनिट येऊ का आम्ही? थोडं बोलायचं आहे",..

"हो या ना बाबा",.. सोनल

"काय झालं? राहुल भेटला का?",.. बाबा

" हो बाबा झाली आमची भेट",.. सोनल

" काय म्हटला राहुल? ",.. बाबा

"तुम्हाला तर माहितीच आहे आई-बाबा, राहुलच्या आई-बाबांना आमचं लग्न मान्य नाही, नकार दिला त्यांनी ",.. सोनल

"पुढे काय ठरवलं आहे मग तुम्ही दोघांनी",.. बाबा

"दोघांनी नाही, आता मी ठरवल आहे आई बाबा, मला थोडा वेळ हवा आहे, आता माझा रिझल्ट लागेल शेवटच्या वर्षाचा, मला पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घ्यायच आहे, शिकायच आहे आता, या सगळ्यातुन बाहेर पडायचं आहे, तुम्ही आहात ना माझ्या सोबत आई बाबा, तुमचा आधार आहे आता फक्त मला, बाकी काही नाही आता माझ्या आयुष्यात ",... सोनल

" हो मग आम्ही कायम सोबत आहोत तुझ्या बेटा, अजिबात काळजी करायची नाही कसलीच",.. बाबा

" राहुल काही बोलला का तुला",.. बाबा

" नाही बाबा राहुल काहीच बोलला नाही, पण मलाच अस वाटत आहे की आता थोडा वेळ लागेल मला , या सगळ्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही, मला पुढे ॲडमिशन घ्यायची आहे आणि कॉलेज सुरू होईल आता , तेच तेच बोलून उपयोग नाही आणि आई-बाबा मी एकदम ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, होईल जसं व्हायच तसं, आता यापुढे मी कसलाच विचार करायचं नाही असं ठरवलं आहे, कोणाला नसेल मी पसंत तर नाही बोलणार ते माझ्याशी, मी माझी नीट राहणार आहे ",... सोनल

आई रडत होती..

" आई तू कशाला रडते आहेस, मी ठीक आहे, बघ जरा माझ्याकडे, थोडा वेळ जावा लागेल, मग ठरवू आपण काय करायचं ते, राहुलचा काहीच दोष नाही यात, मला त्याचा राग आलेला नाही, तुम्ही दोघ आत्ता शक्यतो तोवर यातून बाहेर पडा, जास्त टेन्शन घेण्यात काही अर्थ नाही",... सोनल

" अगं पण सोनल असं कसं बोलतेस तू? सगळ तोडून आली आहेस का ",.. बाबा

" नाही बाबा मला फक्त वेळ हवा आहे एवढच, तुम्ही अजिबात काळजी करू नका",.. सोनल

सोनल आवरायला आत गेली

आई बाबा एकमेकांना कडे बघत होते

" अहो काय होईल हो पुढे",.. आई

बाबा उठून आई जवळ येवून बसले,.." तू काळजी करू नकोस, होईल नीट, सोनल करेल बरोबर, थोडा वेळ द्यायला पाहिजे तिला, धक्का बसला आहे तिला, राहुल शी बोलतो मी एकदा ",..

" आता करताय का फोन राहुल ला, बघा तरी काय म्हणतोय तो ",.. आई

"नको आता, वैभव ला येवू दे घरी मग बघू",. बाबा

......

सोनल कंटाळली आता लोकांच्या बोलण्याला, ती तिच्या निर्णयावर ठाम राहील का?, राहुलचा विचार करेल का, की दादा वहिनी तिची समजूत काढतील, काय होईल पुढे?.....

...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now