Jan 29, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 28

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 28


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 28

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

आई बाबांनी नकार दिल्यानंतर राहुल रमेश दादा वहिनी हताश झाले,.. " आता काय करायचं दादा? आपल्याला सोनल च्या आई बाबांशी बोलाव लागेल आज, नाही तर ते उद्या येतील इथे खूप गोंधळ होईल, भांडण होईल, अजून परिस्थिती हाता बाहेर जाईल, मला नाही वाटत त्यांना अजून त्रास व्हावा, काय कराव ",.... राहुल

"काय होवुन बसल हे , आई बाबा का असे वागतात? , केवढे दुष्परिणाम आहेत हे संतोषच्या वागण्याचे, काय कराव डायरेक्ट जाव त्यांच्याकडे की वैभव दादाला करायचा फोन ",... रमेश दादा

" हो ना दादा मला आता खूप टेंशन आल आहे, सोनलला समजल तर किती वाईट वाटेल तिला ",.. राहुल

" हो ना, किती मोठ्या आवाजात सांगितल होत मी वैभव ला की आमच्या कडे मोठय़ा मनाची माणस आहेत, इकडे काही त्रास होणार नाही सोनल ला, आता काय करू या, त्या लोकांना समजल आपल्या घरच्यांचे विचार तर काय वाटेल त्यांना",.... रमेश दादा

" आता काय करू या रमेश दादा , वैभव दादा ला करतोस का फोन तू?, त्यांना सांग की आई बाबांना सांगा उद्या इकडे येवू नका आपण जावून भेटू त्यांना नंतर, सांगू समजवून, पण हे आई बाबांच वागण मला अजिबात आवडल नाही ",... राहुल

" हो करतो मी फोन लगेच ",... रमेश दादा

रमेश दादा ने वैभव ला फोन लावला

" बोला रमेश दादा ",... वैभव

" थोड बोलायच होत ",.. रमेश दादा

" बोला ना ",.. वैभव

" जरा प्रॉब्लेम झाला आहे, तुमच्या जवळ सोनल नाही ना ",.. रमेश दादा

" काय झालं? काही प्रॉब्लेम का? ",.. वैभव

हो..

" एक मिनिट मी बाहेर येतो, काय झालं "?,.. वैभव

" प्लीज मला माफ करा, इकडे आता खूप भांडण झाल, आमचे आई बाबा लग्नाला तयार नाहीत, मी आणि राहुल तुमच्या बाजूने आहोत पण, तुम्ही टेंशन घेऊ नका, आम्ही समजावतो आहोत त्यांना, फक्त उद्या काका काकू आमच्या कडे येणार होते ना त्यांच बघा ",.. रमेश दादा

" हो मी बघतो त्यांना नाही पाठवणार, पण नक्की झाल काय तिकडे"?,.. वैभव

" आई बाबा दोन दिवसापासून राहुलशी बोलत नव्हते, आज मग आम्ही विचारलं की काय झालं आहे? , काय प्रॉब्लेम आहे का?, तर ते बोलले की त्यांना हे लग्न मान्य नाही, लोक सोनल संतोष बद्दल खूप काही काही बोलत आहेत, वैभव आम्हाला माफ कर, आमच्या आई-वडिलांचे विचार बरोबर नाहीत",.. रमेश दादा

" नाही हो तुम्ही कशाला माफी मागत आहात, आम्हाला आता हाच अनुभव येत आहे सगळीकडे, एवढच टेंशन आहे की सोनल ला त्रास नको व्हायला, तिला समजवाव लागेल ",... वैभव

" हे लग्न तर होणारच आहे तुम्ही काळजी करू नका एवढाच आहे की आमच्या आई-वडिलांचा राग सहन करूनही लग्न करावे लागेल आणि राहुल सोनल ला आमच्या घरात राहता येणार नाही, बघू काहीतरी करू, होतील आई बाबा ठीक थोड्या दिवसात, आसपास रूम घेऊ, पण राहुल सोनल ची साथ सोडणार नाही एवढा नक्की आहे ",... रमेश दादा

वैभव दादाला आता खूप टेन्शन आलो होतं, ज्याची भीती होती तेच होऊन बसलं, सोनल ला आता कुठल्या शब्दांत सांगणार आहे मी सगळं,

" तुम्ही एक काम करा सध्या सोनल ला काही सांगू नका, राहुल भेटणार आहे तिला, तो समजून सांगेल तिला",.. रमेश दादा

" हो चालेल",.. वैभव

" आणि तुम्ही प्लीज काही काळजी करू नका होईल सगळं नीट थोडा वेळ लागेल ",.. रमेश दादा

" हो हो तुम्ही असतांना मला काळजी नाही, मी सांगतो आई-बाबांना पण तुम्हाला काही शंका नाही ना सोनल बद्दल, खूप साधी आहे हो माझी बहिण, तिला आता अजून त्रास नको व्हायला हीच माझी इच्छा आहे, संतोष प्रकरण कुठल्या कुठे गेल ",... वैभव

" नाही असा विचारही मनात आणू नका, सोनल मला माझ्या लहान बहिणी प्रमाणे आहे, मी तिची कायम साथ देईन, मी तुमची माफी मागतो ",.. रमेश दादा

" नाही रमेश दादा तुम्ही प्लीज माफी मागू नका, झाली ही घटना खूप दुर्दैवी आहे यात आपण सगळं पोळलं गेलो आहोत, मी समजावतो घरच्यांना",... वैभव दादाने फोन ठेवला

तो घरात गेला, बघितलं तर सोनल तिच्या रूम मध्ये होती, आई-बाबा बाहेरच्या रूम मध्ये बसून बोलत होते, वैभव दादा ने इशारा करून बाबांना बोलवून घेतलं, आई बाबा दोघ बाहेर आले, दोघांन समजल काही तरी झाल आहे, त्यांना सगळं सांगितलं काय काय झालं आहे, सोनलला कळता कामा नये, आई बाबांच्या डोळ्यात पाणी होतं

"जे झालं ते खूप वाईट झाले आहे, सोनल कसं सहन करणार सगळं",... बाबा

"बाबा काहीही झालेलं नाहीये, राहुल आणि रमेश दादा आपल्या बाजूने आहे",.. वैभव

"किती दिवस राहतील ते आपल्या बाजूने, सगळं जगच फिरत आहे आपल्या पासून आता यांचा नंबर",.. रमेश दादा

"नाही बाबा मला विश्वास आहे राहुल आणि रमेशदादा वर, होईल सगळं नीट, आणि त्या दोघांचे खूप उपकार आहेत आपल्यावर नाहीतर सोनल आपल्याला सापडली नसती एवढ्या लवकर",... वैभव

" हो हे अगदी खरं आहे",.... बाबा

" जसं माझं मी निशा च लग्न तुम्हाला लावावे लागेल, तसंच राहुल आणि सोनल च लग्न ही तुम्हाला लावावा लागेल, एवढ समजायचा की आपल्याला कोणीही नातेवाईक नाहीत",.. वैभव

आईच्या डोळ्यात पाणी होत

" आई चल आत सोनल समोर काही बोलू नकोस, राहुल सांगेल तिला बरोबर उद्या",.. वैभव

हो..

तिघे आत गेले..

" काय करत होते तुम्ही बाहेर काय झालं आई? ",.. सोनल

" काही नाही",.. आई

" तू रडल्यासारखी वाटते आहे ",.. सोनल

" नाही ग मी कशाला रडेल, तेच मला वैभव निशा च टेंशन आहे एवढच",.. आई

" चला जेवण करून घेवू, आई बाबा टेंशन घेऊ नका, चांगल होणार आहे त्यांच ",.. सोनल

सोनल ने ताट केले तिघे येत नव्हते, त्यांचा मूड नव्हता

"चला ना काय चाललय, तिकडे आणू का ताट ",.. सोनल

सगळे जेवायला बसले, पण कोणाच जेवणात लक्ष् नव्हत, सोनल एकटी बोलत होती,

माझी एवढी छान निरागस बहीण काय आहे हिच्या नशिबात काय माहिती, तिला काहीही कल्पना नाही काय झालं तिच्या सोबत, आई बाबा म्हणतात तसं राहुल तर तिची साथ सोडणार नाही ना, वैभव दादा काळजीत होता आपण काढली खरी आई बाबांची समजूत पण अजून काही सांगता येत नाही काय होईल

"दादा ऐ दादा काय विचार करतोस, जेव ना",.. सोनल

झोपण्या आधी सोनल ने दोन तीनदा राहुलला फोन लावून बघितला, त्याने फोन उचलला नाही, कुठे आहेस राहुल तू, काय झालं असेल नेमक, फोन का उचलत नाही, आज मला कसतरी होत आहे, अशी एक वेगळीच भीती वाटते आहे, बर्‍याच लोकानी नाकारले आहे मला, तू तर अस करणार नाही ना, अजून काय पुढे वाढून ठेवले आहे काय माहिती
.........

संतोष चे बाबा पुढे येवून बसले आक्कांनी येवून चहा दिला

"संतोषला भेटायला जातो आहे मी वकील बघितला आहे",... बाबा

"होईल का सुटका संतोषची",.. आक्का

"लगेच कशी होईल सुटका, अजून केस सुरू झाली नाही, आता बघू वकील काय म्हणतात ते",.. बाबा

"मी येवू का सोबत",.. आक्का

"नाही कोणा तरी एकाला भेटू देतात, मला बोलायचा आहे वकीलांशी थोड ",.. बाबा

" ठीक आहे काही देवू का संतोषसाठी ",.. आक्का

नाही तिथे देवू देत नाही काही, तु काळजी करु नकोस, संतोष ला भेटू दिल तरी खूप आहे आता",.. बाबा

हो...

संतोष चे बाबा पोलीस स्टेशनला आले ते इन्स्पेक्टर रमेश यांना जाऊन भेटले,.. "मला संतोषला भेटता येईल का? ",..

"हो, काका, भेटता येईल दहा मिनिटं वेळ आहे",.. रमेश दादा

" माझ्या सोबत हे वकील आहेत या मुलांसाठी",.. बाबा

" ठीक आहे तुम्ही इकडे थांबा, नंतर जा आत नाव सांगा तुमच",.. रमेश दादा

हवालदार काका माहिती लिहून घेत होते..

बाबा आत मध्ये आले, बाबांना बघून संतोष उठून उभा राहिला, त्यांना बघून त्याला भरून आलं होतं, बाबा सुरुवातीला काहीच बोलले नाहीत, संतोष रडत होता, त्याचे मित्र खाली मान घालून बसलेले होते

"का केलं तुम्ही सगळ्यांनी असं? तुम्हाला माहिती आहे का या गोष्टीचा परिणाम काय होऊ शकतो? , आयुष्य म्हणजे काय खेळ आहे का?, कस ही वागून चालत का?, याचे परिणाम काय होतील याचा विचार केला का कधी तुम्ही?", काय रे संतोष, प्रशांत, काय रे मुलांनो, तुला माहिती आहे का संतोष तुझ्यामुळे मी लॉक अप मध्ये होतो दोन दिवस, पाहिल्यांदा आयुष्यात जेल मध्ये गेलो मुला मुळे, मला वाटलेलं तुला समजेल तेव्हा माझ्यासाठी तू येशील, पण माझ चुकलं तू आला नाहीस, आता माझ्या कडून मदतीची अपेक्षा ठेवतो तू, दोन दिवसापासून तुम्ही मित्र जेल मध्ये आहात कोणी भेटायला आलं का? आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टीचा परिणाम स्वतःलाच भोगायचा असतो, कोणीही येत नाही मदतीला, भोगा आता तुमच्या कर्माचे फळ ",.. संतोष चे बाबा खूप चिडले होते

" आमची चुकी झाली बाबा, तुम्ही बऱ्याच वेळा मला सांगत होते की घराकडे दुकानाकडे लक्ष दे, माझी चुकी झाली, आता काय करायचं बाबा? आम्हाला यातून बाहेर काढा, मी वचन देतो की यापुढे तुम्ही जे सांगाल ते मी करेन ",... संतोष

" हे आज पहिल्यांदा नाही होत आहे संतोष, तुझ्यापुढे किती जरी डोकं फोडल तरी तू ऐकत नाहीस, त्यामुळे यापुढे मी तुला सपोर्ट करणार नाही, मुळातच मला हे जे तू वागला आहे सोनल शी ते पटलं नाही, मी मागे पण तुला बोलत होतो तिचं नसेल तुझ्यावर प्रेम तर राहू दे, पण तू ऐकलं नाहीस तू स्वतः बरोबर इतरांच्या पण आयुष्याशी खेळला आहेस, आज काही करता काही होऊन बसल असत म्हणजे, फक्त तूच नाही मला कुठलाच मुलगा असं दुसर्या मुलीशी वागलेला आवडणार नाही, तुम्ही मुलं काय स्वतःला खूप शहाणे समजतात का? कसही वागायचं काहीही माहिती नाही, त्या सोनलचा दोन दिवसाने साखरपुडा होता, खूपच चुकीची गोष्ट केली आहेस तू संतोष, आयुष्य उध्वस्त केल त्या पोरीच, आणि माझा विरोध आहे या गोष्टीला, आज केवळ तुझ्या आईने पाठवलं म्हणून मी इथे आलो आहे, केवळ तुझ्या आईची इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला वकील नेमून देत आहे, याच्यात न तुझी सुटका होवो किंवा शिक्षा होवो मी यापुढे तुझ्या कुठल्याच गोष्टीत लक्ष घालणार नाही आणि तुझ्याशी बोलणार नाही",... बाबा

" नाही बाबा प्लीज तुम्ही असं बोलू नका माझ्याशी, माझी चुकी झाली, तुम्ही मला मारा बोला हवं तर, पण असं माझ्याशी संबंध तोडण्याच्या गोष्टी करू नका, मला तुम्ही हवे आहात बाबा, माझं तुमच्यावर, आई वर खूप प्रेम आहे, यापुढे तुम्ही म्हणाल तेच करेल मी ",... संतोष रडत होता, प्रशांत बाकीचे मुल ही रडत होते

" नको संतोष नको आम्हाला खोटी आशा दाखवु, एकदा मागे मी तुला जेल बाहेर काढलं होत प्रेमा पोटी ते चुकलं माझं, तेव्हाच जर तुला चांगली शिक्षा झाली असती तर पुढची ही चूक करायची तुझ्यावर वेळ आली नसती, आता ही तुझी चूक काही छोटी नाही, तुला माफी नाही आणि तुझ्या मित्रांनाही तुला सपोर्ट केल्याबद्दल चांगले शिक्षा व्हायला पाहिजे, आम्ही समजून घेवु आम्हाला मूलबाळ नाही झाल, यापुढे मी इथे जेल मध्ये येणार नाही, हे वकील येतील त्यांना काय सांगायचं ते सांगा, त्यांची फी मी देऊन दिल, पुढे शिक्षा झाली तरी ठीक, निर्दोष मुक्तता झाली तरी ठीक, तुला जर घरी यायचं असेल तर ये, नाही घरी आलास तरी चालेल संतोष",.... बाबा

" आई कशी आहे बाबा मला तिला भेटायच आहे, आईची खूप आठवण येते ",... संतोष

" ती आधीच तुझ्यामुळे त्रासात आहे कश्याला भेटायचं आहे तिला? काही गरज नाही, ती काय इथे जेल मध्ये येईल का तुझ्यासाठी, चांगले दिवे लावले तू, आमच नाव छान पुढे नेल ",.. बाबा

बाबा रागारागाने निघून गेले

बाबा.... बाबा..... थांबा बाबा मला माफ करा बाबा, मला हवे आहात तुम्ही, आई...... आई.... संतोष एकदम खाली बसून रडायला लागला, प्रशांत उठून संतोष जवळ आला

" प्रशांत बघितलं का आज बाबा कसे बोलले माझ्याशी, सगळे संबंध तोडून टाकले त्यांनी, मी आहे काय नाही काय त्यांना काहीच वाटत नाही, मला हे सहन होत नाही आता , लहानपणापासून किती लाडात वाढवलं आहे मला माझ्या आई-बाबांनी, असे ते माझ्याशी पाठ फिरवून गेलेले मला चालणार नाही, मला काहीही करून इथून बाहेर पडायचा आहे, यापुढे मी आई बाबा म्हणतील तसच वागेन खूपच चूक झालेली दिसते आहे आपली, पण प्रेम करण ही काही चूक आहे का? काय माहिती काय म्हणण आहे सगळ्यांच? ",... संतोष

प्रशांत नुसताच संतोष जवळ बसून होता, पुढे काय होणार आहे? शिक्षा होईल की नाही? घरचे काय म्हणतील? भविष्य काय आहे आपलं? याची त्याला काहीही कल्पना नव्हती त्याला, फक्त एकच गोष्ट मनात होती संतोष ला मदत करून फार मोठी चूक केली आहे आपण...
.............

सोनल पचवू शकेल का हे सत्य की राहुल चे आई बाबा लग्नाला तयार नाहीत, तिचा काय दोष, आता तरी संतोष आणि त्याचे मित्र मान्य करतील का की मोठी चूक झाली आहे, एका घटनेचे किती वाईट परीणाम होतात, विचार करून वागायला पाहिजे....
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now