Jan 29, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 27

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 27बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 27

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

संतोष चे बाबा दुकानातून घरी आले चार पाच दिवसापासून दुकानापुढे जरा दुर्लक्ष झाल होत संतोष मुळे, आक्का शांत बसलेल्या होत्या, बाबा आत आले तसे त्या रडायला लागल्या,..

" काय झालं आहे आता, हे असं किती दिवस तू स्वतःला त्रास करून घेणार आहेस संतोष ची आई",.. बाबा

" मी आता भाऊ ला फोन केला होता, तो माझ्याशी बोलला नाही, मग मी वैभव ला फोन केला त्याने माझं काहीही ऐकून घेतले नाही, मी त्याला समजावलं की केस मागे घे, हे ही बोलली की संतोष तुझा भाऊ आहे, झाली आहे त्याची चुकी आम्ही माफी मागायला तयार आहोत, यापुढे संतोष तुम्हाला कोणाला त्रास देणार नाही, आम्ही संतोषच लग्न दुसरीकडे लावून देऊ, तरीही वैभवने काहीही ऐकलं नाही तो खूप बोलला मला, मी त्याला बोलली की संतोष आमचा आधार आहे, काहीतरी मदत कर तर त्याने फोन ठेवून दिला",..... आक्का

" बरोबरच केला आहे वैभवने, तुला काय गरज होती फोन करायची",... बाबा

" तुम्ही आमच्या बाजूने आहात का वैभव च्या बाजूने",.. आक्का

" यात कोणाची बाजू घ्यायचं काय संबंध आहे? तुला अजूनही असं वाटत आहे का संतोषच काही चुकलं नाही",.. बाबा

" आता पण त्याने सोनलला काहीही केलं नाही, व्यवस्थित वागला तो तिच्याशी ",.. आक्का

" अग दोन दिवसांनी साखरपुडा होता सोनल चा, आपल्या संतोष ने तिला ला पळवलं, अजून काय वाईट होवू शकत तिच्या सोबत , सगळा दोष आपल्या संतोष चा आहे, समजतय का,आणि आपण अजून संतोष काही त्रास देतो का सोनलला ह्याची वाट बघणार होतो का? काय बोलते आहेस तु हे संतोष ची आई, चुकीचे विचार आहेत तुझे",... बाबा

तशा अक्का रडायला लागल्या

" हे बघ सोडून दे बर आता हा विषय आता ",.. बाबा

" तुम्ही मला सांगा तुम्ही संतोष साठी वकील बघणार आहात की नाही? आणि तुम्ही का नाही जात आहात संतोष ला भेटायला? तुम्ही काही मदत करत नसणार नसाल तर मला घराबाहेर पडावे लागेल",... आक्का

"नाही तू राहू दे मी बघतो काही तरी, तू म्हणते म्हणून संतोषला वकील शोधून देईल मी, पण मी संतोष ला भेटायला जाणार नाही ",.. बाबा

" आहो का करता तुम्ही असं?, एकदा संतोषला भेटून घ्या, काय म्हणणं आहे त्याचं ते तरी बघा, नाहीतर मी पण येते सोबत ",.. आक्का

" नको तू येऊ नको, मी बघतो वकील नेमतो, पण मला संतोष वागला ते अजिबात आवडलेल नाही, मी संतोष शी बोलणार नाही ",.. संतोष चे बाबा रागाने आत निघून गेले, आक्का बाहेर बसून परत रडायला लागल्या, स्वयंपाका वाल्या माई येऊन त्यांच्या जवळ बसल्या, त्या बर्‍याच वेळ आक्कांच सांत्वन करत होत्या,
.........


रमेश दादा चा फोन आला घरी,..." सोनल तुला पोलिस स्टेशन ला याव लागेल, तुझा साक्ष नोंदवून घ्यायची आहे, राहुल ही येतो आहे इकडे",..

"ठीक आहे दादा मी येते",... सोनल, आई बाबा मला पोलिस स्टेशन ला बोलवलं आहे, मी जावून येते

"कशी जाणार ग",.. आई

"राहुल येतो आहे घ्यायला",.... सोनल

राहुल चा फोन आला,.. "मी येतो तुला घ्यायला, आवरुन ठेव " ,

सोनल तयार झाली, तिला धडधड होत होती, संतोष नको भेटायला तिकडे, मला अजिबात त्याच तोंड ही बघायच नाही, केवढ संकट आल होत, त्या दिवशी मी खरच घाबरले होते, किती भयानक होती ती रात्र, नशीब संतोष ने काही केल नाही मला, काहीही नव्हत माझ्या हातात, हुशारी करून नीट वागले मी त्याच्याशी तेव्हा, नाहीतर आज काय झालं असत, थोडक्यात वाचले मी त्या दिवशी..

राहुल आला, दोघ पोलिस स्टेशन ला गेले, हवालदार काकांनी सोनल ची साक्ष नोंदवून घेतली, केस चा तो एक भाग होता, नक्की काय काय झालं होत तिकडे हवालदार काका लिहून घेत होते, राहुल तो पर्यंत रमेश दादा शी बोलत बसला होता

सोनल बाहेर राहुल ची वाट बघत होती, राहुल बाहेर आला ,... "राहुल रमेश दादा बोलता आहेत मला संतोष त्यांची ओळख परेड करावी लागेल, तस असतो नियम, पण मला नाही भेटायच त्यांना" ,

"अस नाही चालणार सोनल, दोन तीन मिनिटाच काम आहे, फॉर्मॅलिटी पूर्ण कराव्या लागतील, केस चा तो एक भाग असेल, चल मी आहे ना सोबत",... राहुल

दोघ आत गेले लॉक अप मध्ये, संतोष त्याचे मित्र बसले होते, ओळख परेड होती त्यांची, हवालदार काका एक एक नाव घेत होते, सोनल ने ते सांगायचं होत की ते त्यादिवशी तिथे उपस्थित होते का, हा एक केस चा भाग होता, काकांनी नाव घ्यायला सुरुवात केली, सोनलने सांगितलं की हे सगळे उपस्थित होते, काम झाल

ते दोघ जायला निघाले..

संतोषने हाक मारली,.. "सोनल थांब एक मिनिट मला बोलायचं आहे तुझ्याशी",..

" मला तुझ्याशी बोलायचं नाही संतोष",.. सोनल

"काल मी बोललो ना तुला एवढ संतोष, तरी तुझी सोनल शी बोलायची हिम्मत कशी झाली",.. राहुल

राहुल प्लीज मला एकदा सोनल शी बोलू दे,.. "एवढंच सांग सोनल की तू का असं केलं",

"मी असं केलं म्हणजे काय संतोष? हा प्रश्न चुकीचा आहे, त्रास तर तू देतो आहेस आम्हाला संतोष, तू कशाला माझ्या आणि राहुल च्या आयुष्यात ढवळाढवळ करतो, एकदा नाही शंभर वेळा मी तुला सांगितलं होत की मला तुझ्याशी लग्न करायचं नाही",.. सोनल

" पण तिकडे रिसॉर्टला तर तू सांगत होती तुला मी आवडतो आणि तू लग्नाला तयार आहेस ",.. संतोष

" हो ते मी खोटं बोलत होते, मी माझा बचाव करत होते तुझ्यापासून, मला तिथून लवकरात लवकर निघायचं होतं म्हणून मी खोटं बोलले, अजून काही ऐकायचं आहे का तुला संतोष ",.. सोनल

" तू का असं केलं हे मी तुला विचारू शकतो का ",.. संतोष

" तू सांग तू का असं केलं? माझं आणि राहुल चा दोन दिवसांनी साखरपुडा होता, त्या आधी मी बर्‍याच वेळा तुला नकार दिला होता, तरीसुद्धा तू राहुल ला मारलं मला जबरदस्तीने तुझ्यासोबत घेऊन गेला, तेव्हा मी विचार केला, शक्ती ने नाहीतर युक्तीने तुला जिंकता येईल म्हणून मी हे नाटक केलं आणि मला असं वाटतं की मी काहीही चुकीचं केलं नाही, तू एवढं दुसऱ्याला त्रास देऊन सुद्धा तुला असं वाटतं की तुझं काही चुकलं नाही, तर एकदा तू स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे की तू जे वागतो ते योग्य आहे का?, मला भविष्यात तुझं तोंड बघायची पण इच्छा नाही, या केस संदर्भात जेवढी भेट होईल तेवढीच, तू जे केला आहे त्याचा तुला पश्चाताप होत नाही अजून ही, आणि तू मलाच विचारतो की तू का असं केलंस? याला काय अर्थ आहे संतोष? अजूनही वेळ गेलेली नाही, तुझ्या आई बाबांचा विचार कर, नीट वाग, त्यांना सुखी ठेवायचा प्रयत्न कर",...सोनल

ते दोघ बोलत असताना प्रशांत उठून आला,..." सोनल आम्ही मान्य करतो आमचं चुकलं आहे, आम्हाला प्लीज एक चान्स दे, यापुढे तुझ्याकडे आणि राहुल कडे आम्ही कोणीही बघणार नाही, संतोष तूम्हाला दोघांना त्रास देणार नाही याची मी हमी घेतो, एवढा एक उपकार कर , समजून घे सोनल",.. प्रशांत

"हो मी तुला काही त्रास दिला नाही सोनल, माझ्या हातात होत सगळ, मी वाटल असत तर काहीही करू शकत होतो, आणि तिथे कोणी अडवणार नव्हत मला, पण केवळ माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून तू माझ्या हातून सुटली, तुला समजतंय ना मी काय बोलतोय ते ",.... संतोष

"संतोष मूर्खासारखे बोलू नकोस, या मुलांशी बोलण्यात काही अर्थ नाही राहुल, चल इथून ",... सोनल

"एक मिनिट सोनल, संतोष तोंड सांभाळून बोल, कोणाशी बोलतो आहेस तू, सोनल माझी होणारी बायको आहे ",... राहुल

सोनल ही खूप चिडली होती, काय बोलतो हा संतोष ते ही राहुल समोर, माझ किती नुकसान होवू शकत अश्याने, काही कल्पना नाही त्याला, प्रशांत ही मध्ये मध्ये करतो आहे,

" प्रशांत हे तू बोलतो आहेस , जेव्हा माझ्याशी संतोष चांगला वागत होता तेव्हा तूच त्याला उकसवत होता आणि आता अचानक कस तुझं वागणं चांगलं झालं? आता ही केस आता माझ्या हातात राहिली नाही, याचा निर्णय रमेश दादा घेतील आणि यापुढे केस संदर्भात आपण भेटलो तरी माझ्याशी बोलायची काही गरज नाही",... सोनल

सोनल राहुल तिथून निघून गेले, संतोष डोकं धरून खाली बसला

" आता तरी समजलं का तुला संतोष, सोनल कशी वागते, हे मी तुला आधीच सांगत होतो, तू मिळालेल्या संधीचा फायदा करून घेतला नाही ",... प्रशांत

" हो मला माहिती आहे माझ चुकलं प्रशांत, किती वेळा बोलणार आहेस तू मला" ,.... संतोष चिडला होता

प्रशांत त्याच्या जवळ येवून बसला,..." मला माफ कर दोस्त पण आता इथून पुढे काय, कस सुटणार आपण इथून, वकील बघावा लागेल, कोणी आल नाही आपल्याला भेटायला, तुझ्या घरचे ही नाही आलेत ",..

" एखादा फोन मिळाला असता तर मी आई ला फोन केला असता , तिने नक्की काही तरी केल असत, तिला माहिती आहे की नाही आपल्याला अटक झाली ते, काहीही करून तिच्याशी संपर्क व्हायला पाहिजे ",.... संतोष

संतोष रडत होता, फार फासला आपला डाव, सोनल गेली, आई बाबा नाहीत सोबत, मित्र चिडलेले, कसा काय आई बाबांचा विश्वास संपादन करणार आहे मी परत, कधी सुटका होईल जेलमधून..
.......

सोनल घरी आली, आई बाबा विचारात होते काय झाल तिकडे, वैभव दादा घरी आला, तो आनंदात होता, निशा त्याच्या बाजूने आहे हा विचार खूप छान होता

"काय झालं वैभव झाल का बोलण निशा शी",.... आई

"हो आई, निशा माझ्या बाजूने आहे, तिला आवडल नाही तिच्या आई बाबांच वागण, आता मी त्यांच्या घरी जाणार आहे, ते लोक तयार असतिल तर ठीक, नाही तर निशा माझ्या सोबत घरी निघून येईन",... वैभव ने नक्की काय बोलण झाल ते सांगितल

" बापरे कसे वागतात ते, हे नक्की माझ्या मुळे झाल आहे ",... सोनल

" सोनल तू उगाच स्वतःला बोल लावू नकोस, आई बाबा ठीक आहे ना माझ निशा च डिसिजन ",... वैभव

" हो एकदम ठीक आहे, ते लोक ऐकत नाही तर काय करणार आहोत आपण, करू आपण तुमच लग्न इकडे",.... बाबा

आई बाबा सोनल ला बर वाटत होत, पण तरी काळजी होती की आता पुढे काय?, का वागतात लोक असे काय माहिती?, सोनल च काय होणार पुढे? , राहुल रमेश दादा तर चांगले आहेत, जावून बघु उद्या त्यांच्या कडे
.........

रमेश दादा घरी पोहोचले, राहुल त्याची वाट बघत होता, आत जावून रमेश दादा आवरुन आला, वहिनी होती सोबत,

"वहिनी तू बघितल ना, आई बाबा नाही बोलत आहे माझ्याशी" ,.. राहुल

हो...

"काय झाल आहे नक्की?, तुझ काही झाल का बोलण वहिनी?",... राहुल

"नाही ते मला काहीही बोलले नाही",... वहिनी

रमेश दादा वहिनी राहुल सगळे आई बाबांच्या रूम मध्ये गेले

आई बाबा टीव्ही बघत होते

" काय झालं आई बाबा सगळ ठीक आहे ना ",... रमेश दादा

"हो, का काय झालं आता परत",... बाबा

" मग तुम्ही राहुल शी का बोलत नाही कालपासून ",.... रमेश दादा

" नाही तस काही नाही, काही प्रॉब्लेम नाही",... बाबा

"आई तुझ काय म्हणणं आहे ",... रमेश दादा

"ठीक आहे मी ",... आई

" ठीक आहे राहुल काही प्रॉब्लेम नाही आई बाबांना ओके , आई बाबा उद्या सोनल चे आई वडील येतील लग्नाची बोलणी करायला ",... रमेश दादा

तसे दोघे आई बाबा एकमेकांनकडे बघायला लागले

" तुम्ही बोलताय का मी बोलू",... आई

" हे बघ दादा आम्हाला हे लग्न मान्य नाही",... बाबा

" का काय झाल आता ",... रमेश दादा, राहुल वहिनी यांना शॉक बसला होता

" सगळे लोक वाटेल ते बोलता आहेत, सगळ्या गावत झाल सोनल संतोष बद्दल ",.... बाबा

"मग त्याने काय फरक पडतो, आपल्याला माहिती होत आधी पासून संतोष त्रास देतो सोनल राहुल ला म्हणून आपण त्यांच लग्न लवकर करणार होतो, आधी सांगितल होत आम्ही तुम्हाला",... रमेश दादा

"आता हे लग्न होण शक्य नाही ",.. बाबा

" का पण? का अस करता आहात आई बाबा"?,... रमेश दादा

" एक तर या घरात सोनल येईल कींवा आम्ही राहू ",... बाबा

" हे अति होतय आई बाबा, स्वतःला पुढारलेल्या विचाराचे समजतो आपण आणि असा विचार करतो, काय वाटेल सोनल आणि तिच्या घरच्यांना

"आहोत आम्ही जुन्या विचाराचे",... बाबा

"हे योग्य नाही पण, तुम्ही विचार करा, अस कस बोलू शकता तुम्ही",.. रमेश दादा

"नाही आमचा विचार झाला आहे",... बाबा

"पण मी शब्द दिला आहे त्या लोकांना की आमच्या कडून तुम्हाला काही त्रास होणार नाही, अस काय आई बाबा ऐका ना ",.. रमेश दादा

"सोनल ने मेडिकल टेस्ट करावी आधी, मग आम्ही विचार करू ",.. आई

राहुल रमेश दादा वहिनी कडे बघत होता

"आई बाबा नका अस करु, टेस्ट म्हणजे काय"?,.. राहुल

"तू मध्ये बोलू नकोस राहुल, तुला काय गरज होती त्या पोरीच्या मागे मागे करायची",.... आई

"माझ प्रेम आहे तिच्यावर मी तिला अस एकट नाही सोडू शकत",... राहुल

" मग आम्हाला सोडू शकतो एकट",... आई

"हा विषय कुठे आला आता मध्ये आई बाबा, समजून घ्या मला, तिकडे वैभव दादाच लग्न याच कारणाने मोडत, किती त्रास आहे त्यांना आधी त्यात आपण ही अस वागवायच म्हणजे काय",.... राहुल

" तुम्ही असा करतात आमच्या शब्दाला काही किम्मत आहे की नाही ",... राहुल

" तुमच्या शब्दा मुळे त्या पोरीला गळ्यात बांधुन घ्यायची का, ती संतोष सोबत होती दोन दिवस",... आई

" संतोष बरोबर होती म्हणजे काय? मजेने गेली होती का ती? , तिला बळजबरी नेल होत संतोष ने"?,... राहुल

" हेच म्हणते आहे मी, ती त्याच्या बरोबर होती ",... आई

"बापरे किती जुनाट आणि घाण विचार आहेत आई बाबा तुमचे, माझा सोनल वर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही हो म्हणा की नाही मी सोनल शी लग्न करणार माझ ठरल आहे ",... राहुल

" मग तुला या घरात रहात येणार नाही किवा आम्ही तरी इथे राहणार नाही, आमचा विरोध आहे लग्नाला",... बाबा

" आई बाबा अस दुसर टोक नका गाठू, समजुतीने घ्या, राहुल तू ही शांत हो ",.. रमेश दादा

" दादा बघितल का तू आई बाबा सोनल वर संशय घेता आहेत ",... राहुल

"हो ना आई बाबा हे चुकीच आहे एकदम, काय असा विचार करता तुम्ही, दुसर्‍या वर असा प्रसंग आला तर तुम्ही त्यांचा साथ द्यायची सोडून त्यांचा संशय घेता की कितपत योग्य आहे ",... रमेश दादा

"आम्हाला काही बोलायच नाही या विषयावर ",.. बाबा

राहुल रागाने रूम मध्ये निघून गेला, रमेश दादा वहिनी ही गेले मागे
..........

राहुल सोनल च लग्न मोडल, हा धक्का सोनल पचवु शकेल का, काय होईल पुढे?, किती चुकीचे वागतात सगळे, यात राहुल सोनल भरडले जात आहेत,.....
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now