Jan 29, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 26

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 26


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 26

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

वैभव दादा घरात आला, त्याच्या चेहर्‍यावर टेंशन होत

सोनल त्याची वाट बघत होती,.. "तुला शप्पत आहे माझी काय झाल ते सांग, वाहिनीला फोन लाव आता दादा",..

"तू आराम कर सोनल, माझ आता बोलण झाल निशा शी ती ठीक आहे एकदम, येणार आहे तुला भेटायला",.. वैभव दादा

"हो ना मग मला बोलू दे तिच्याशी",.. सोनल

वैभव दादा आत निघून गेला, सोनल मागे गेली,

" दादा मला महिती आहे काही तरी झाल आहे, मला नाही सांगणार का? , आता खूप धक्के बसले मला, काही होत नाही सांगून टाक मी मदत करू शकते तुला, आपण काढू काही तरी सोल्यूशन, पण जर तू काहीच बोलला नाही तर मग मी मदत कशी करणार तुला, मला तुला आणि वाहिनीला आनंदात बघायच आहे",.. सोनल

वैभव दादा गप्प होता,.. "काय झालं आहे सोनल माहिती नाही पण निशा च्या घरचे आम्हाला दोघांना बोलू देत नाही",.

"भांडण झाल का काही",... सोनल

"नाही काहीच नाही, निशा माझा फोन उचलत नव्हती नंतर तिने गुपचूप फोन करून सांगितलं घरचे बोलू देत नाही अस",.. वैभव

"माझ्या मुळे झाल आहे हे दादा",.. सोनल

"नाही सोनल तुझ्या मुळे नाही",.. वैभव

"हो दादा मला माहिती आहे, तू काळजी करू नकोस, मला काही धक्का बसला नाही, ठीक आहे, करू आपण त्यांचा गैरसमज दूर ",.. सोनल

ते दोघ बोलत असतांना आई बाबा दारातून ऐकत होत सगळ

" काय झालं आहे वैभव? , आम्ही ऐकल आता ते खरं आहे का? , काय म्हणण आहे त्या लोकांच? ",.. बाबा

"बाबा काही तरी गैरसमज झाला आहे, होईल ठीक सगळ, माझ बोलण नाही झाल अजून निशा शी",.. वैभव

" तू म्हणशील तर मी बोलून बघू का त्या लोकांशी",.. बाबा

"नको बाबा, मला काय वाटतय आई बाबा सोनल मी आधी निशा ला जावून भेटतो आणि समजून घेतो नक्की काय झालय ते, नाही तर प्रॉब्लेम वेगळाच असायचा, आपण उगीच टेंशन घ्यायचो ",.. वैभव

" ठीक आहे पण आता या वेळी जे होईल ते तू आम्हाला सगळ सांगणार आहेस, एकटा का त्रास सहन करतोस तू? ",.. बाबा

" हो बाबा मी सांगेन सगळ, आई तू ठीक आहेस ना ",.. वैभव

" हो मी ठीक आहे, समजूत घालु त्या लोकांची आपण तू काळजी करू नकोस वैभव ",.. आई

" हो आई",.. वैभव

या सगळ्यात सोनल एकदम गप्प झाली होती, ती विचारात होती काय होवुन बसल हे, पुढे अजून काय काय होणार आहे, राहुल च्या घरचे माझा स्विकार करतील का?, संतोष तू खूप चुकी केलीस,

राहुल चा फोन आला, सोनल बाजूला गेली फोन घेवून, ती एकदम रडायला लागली

" काय झाल सोनल काही प्रॉब्लेम आहे का? ",.. राहुल

"वैभव दादा बद्दल समजल का तुला? , माझ्या मुळे त्याच लग्न नको मोडायला राहुल, मला खुप वाईट वाटत आहे ",.. सोनल

"हो मला सांगितल वैभव दादाने, तू काळजी करू नकोस, थोडे गैरसमज झाले आहेत, होतील दूर आणि आता हे अस सारख रडायचा नाही, अजून बाकीचे लोक कसे वागतील ते माहिती नाही आपल्याला, किती त्रास करून घेणार आहेस तू स्वतःला",.. राहुल

"अस का पण राहुल? यात आपला काय दोष? दादाचा काय दोष,? दादाला का अशी शिक्षा?, त्याच नीट व्हायला पाहिजे, मी स्वतः ला माफ करणार नाही ",.. सोनल

"लोकांच वागण का अस आपल्याला काय माहिती?, ते काय बोलतील हे आपण कंट्रोल नाही करू शकत, एवढंच वाटतय की तू त्रास नको करून घेऊस, तुझा ही काही दोष नाही यात, वैभव दादाचा ही नाही ",.. राहुल

" मला त्रास होतो पण या सगळ्याचा",.. सोनल

" जास्त विचार करू नकोस",.. राहुल

" राहुल उद्या माझे आई बाबा येणार आहेत तुमच्या घरी
बहुतेक आपला साखरपुडा लग्न बाबतीत ठरवायला",... सोनल

" हो चालेल, तू ही येणार आहेस का त्यांच्या सोबत ",.. राहुल

" नाही मी नाही येणार ",... सोनल

"ठीक आहे आणि जरा विचार करण कमी कर, जे जसं समोर येईल त्याला तोंड द्यायच आपण ",.. राहुल

राहुल ने बरच समजवल सोनल ला..

"तू सचिन ला भेटायला जाशील तेव्हा मला सांग मी येईन सोबत,मला भेटायच आहे त्याला ", .. सोनल

" हो निघतो आहे मी, येवू का तुला घ्यायला ", ..राहुल

"हो, मी पण येते सोबत ",... सोनल

राहुल सोनल जावून सचिन ला भेटले, थोडी तोंडावर सूज होती त्याच्या,

"सचिन केवळ तुझ्या मदतीमुळे आम्ही आज भेटू शकलो, नाही तर पुढे काय झालं असत काय माहिती",.. राहुल

"तू कसा आहेस राहुल",.... सचिन

" हो मी ठीक आहे",.. राहुल

" सोनल कसे आहेत घरी सगळे",...सचिन

"ठीक आहेत आई बाबा आता ",...सोनल

तिघे बराच वेळ बोलत होते

राहुल ने सोनल ला घरी सोडल,

"आत येतोस का राहुल ",.. सोनल

" नको आता मी निघतो",.. राहुल

" घरी कसे आहेत सगळे ठीक आहेत ना ",.. सोनल

" हो ठीक आहेत, मला थोड काम आहेत येतो मी, आणि तू खूप काळजी करत बसू नकोस ",.. राहुल

सोनल आत गेली, राहुल निघाला, काल पासुन घरात जरा शांत वातावरण होत , कोणी जास्त बोलत नाही, फक्त वहिनी बोलते आहे माझ्याशी, आई बाबा विशेष बोलत नाही, काय झालं आहे? , सांगाव का हे सगळ रमेश दादाला?, काय करू? नक्की काय आहे त्यांच्या मनात? , उद्या सोनल चे आई बाबा घरी यायच म्हणता आहेत, काय कराव? काय होणार पुढे? त्या वेळी मी घरी थांबेन, आई बाबांना राग आला आहे का? की मी जीव धोक्यात नव्हता टाकायला पाहिजे होता अस त्यांना वाटतय? , काय कराव समजत नाही?, उद्या येवू नका अस सांगता येणार नाही सोनल च्या घरच्यांना, जे होईल ते होईल आता, देवू तोंड आता सगळ्या प्रसंगांना",.. विचार करत राहुल पोलिस स्टेशन ला आला, जर चान्स मिळाला तर तो बोलणार होता रमेश दादा शी

"रमेश दादा मला संतोष ला भेटायच आहे ",.. राहुल

"का पण ",.. रमेश दादा

" मला बोलायचं आहे त्याच्याशी",... राहुल

"हवालदार काका राहुल ला घेऊन जा त्याला संतोषला भेटायच आहे, त्या मुलांना लॉक अप मध्ये टाकला आहे तिकडे न्या, तुम्ही तिथेच थांबा राहुल जवळ, एक मिनिटे इकडे तिकडे जाऊ नका",... रमेश दादा

"ठीक आहे साहेब",..

राहुल हवालदार काकांसोबत गेला, लॉक अप जवळ जातात संतोष उठून उभा राहिला, राहुल बाजूला उभा होता

" का केलस तू संतोष असं? काय मिळालं तुला? एखाद्याच्या मनात नसत आपल्याविषयी प्रेम, जाऊ द्यायचं असतं, तू माझं आणि सोनलच आयुष्य का बर खराब करायला टपला आहेस ",..... राहुल

"का आला आहेस राहुल तू इथे, जा मला नाही बोलायचं तुझ्याशी",... संतोष

"तू मलाच का विचारतो का आला आहे इथे?, मी इथे तुला जाब विचारायला आला आहे की तुला आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची काय गरज आहे? तुझ्या एका चुकी मुळे आम्हाला आता किती त्रास होतो माहिती आहे का तुला?, ".... राहुल

" काय त्रास झाला तुला राहुल?, उलट सोनल माझ्याशी तिकडे गोड बोलत होती ती लग्न करणार होती माझ्याशी, पण तू मध्ये आला ",.. संतोष

" मी मध्ये आलो?, काय बोलतोस तू संतोष?, मूर्ख आहेस का तू जरा? , मी तुला जास्तीत जास्त शिक्षा होईल या साठी प्रयत्न करणार आहे",... राहुल चिडला होता

" बघू ते पुढच्या पुढे, मी काहीही केलल नाही राहुल सोनल ला, वाटल तर सोनल ला विचार, तिला खूप जपत होतो मी, ती माझ्या मामाची मुलगी आहे, ती माझ्याशी लग्नाला तयार होती, तू आमच्या मध्ये आला आहेस, सोनल बोलली होती मला तिला माझा आधार वाटतो, ती घरी येवून बोलणार होती आई बाबांशी, मला एकदा सोनल शी बोलायचं आहे, तिच्या तोंडून ऐकायच आहे, तू त्या दिवशी तिला घेवून गेला नसता तर आमच लग्न झालं असत ",.... संतोष

" एवढ होवुन संतोष तुला अक्कल आली नाही वाटत, तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही, मी एवढ सांगतो माझ्या पासून सोनल पासून दूर रहा, समजल का या वेळी गाठ माझ्याशी आहे आणि मी पूर्ण सावध आहे, प्रशांत तू बरा वाटतो, समजवून सांग याला आता, एवढ झाल तरी सोनल सोनल करतो, सोनल च नाव जरी तोंडातून काढला तरी मुस्काट फोडेन मी तुझ ",... राहुल रागाने निघून गेला

संतोष खाली बसला

" प्रशांत तू बघितल ना सोनल माझ्याशी किती चांगल वागत होती ते ",... संतोष

" अरे ती नाटक करत होती, किती वेळा सांगितल मी तुला, पण तुला नाही समजल, जाऊ दे हो शांत",... प्रशांत

.............

राहुल बाहेर आला, रमेश दादा काहीतरी काम करत होता,... "दादा मला बोलायच आहे तुझ्याशी",

" ह बोल ना ",... रमेश दादा

" दादा.. आई बाबांना काहीतरी झाल आहे, ते नीट बोलत नाही माझ्याशी, घरात फक्त वहिनी बोलते माझ्याशी ",.. राहुल

रमेश दादा ने काम करण थांबवल,.. "काय झालं आहे नक्की",.

"माहिती नाही मला, तुला माहिती आहे का काही?, वाहिनीला विचार ना, मला भिती वाटते दादा.. आई बाबा नकार तर देणार नाही ना माझ्या लग्नाला ",... राहुल

रमेश दादाच्या चेहेऱ्यावर भीती होती

" मी आज येतो लवकर घरी मग बोलू, तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या सोबत, आज बहुतेक साक्ष घ्यावी लागेल सोनल ची, तुला परत याव लागेल इकडे संध्याकाळी ",... रमेश दादा

" ठीक आहे दादा मी येईन सोनल ला घेवून, तू सोनल ला आई बाबांच काही बोलू नकोस",.. राहुल

नाही....

राहुल घरी गेला
.........


वैभव दादा तयार झाला

"आई बाबा मी निशा च्या ऑफिस ला जातो आहे, निशा भेटणार आहे मला तिथे, बघतो बोलून, काय प्रॉब्लेम झालाय ते",.. वैभव

"जावून ये, समजुतीने घ्या, एकमेकांना समजून घ्या" ,.. आई

" हो आई",.. वैभव

सोनल झोपली होती जरावेळ..

आई काळजीत होती ,.. "काय होणार आहे नक्की मुलांच, काय होवुन बसल आहे हे",..

" तू काळजी करू नकोस, होईल जे व्हायचं ते आपल, जास्तीत जास्त काय होईल असा विचार करायचा, टेंशन घ्यायचा नाही, आपण आहोत ना मुलांसाठी, आपण साथ देवू त्यांची",.. बाबा
............

वैभव निशा च्या ऑफिस जवळ पोहोचला, त्याने निशा ला फोन केला, निशा पाच मिनिटात बाहेर आली, ती येवून वैभव ला भेटली,.." चल आपण कॅन्टीन ला जाऊ",

दोघ कॅन्टीन ला गेले

" काय घेणार वैभव ",... वैभव दादा निशा कडे बघत होता, नॉर्मल वाटते आहे ही वागायला

चहा सांग...

वैभव गप्प होता

निशा खाली बघत होती,.. "मला माहिती आहे वैभव तुला माझा राग आला आहे ते",.

"नाही निशा मला राग नाही आला, काय झालं आहे नक्की घरी, काही प्रॉब्लेम आहे का"?,..वैभव

" मला माफ कर वैभव माझ्या घरचे नीट वागत नाही, माहिती नाही काय झालय त्यांना, मी समजावेल त्यांना ",.. निशा

"तू का माफी मागते निशा, काय म्हणण आहे तुझ्या घरच्यांचा",... वैभव

" सोनल ला संतोष ने पळवून नेल ते मी घरी सांगितल, तेव्हा घरचे खूप घाबरले होते, आधी ते काळजीने सोनल बद्दल सगळ विचारात होते, अचानक काय झाल काय माहिती, ते मला तुझ्याशी बोलू देत नाही आणि सोनल बद्दल काहीही विचारात नाही आता ते ",... निशा

"काय विचार आहे त्यांच्या नक्की, तू विचारल का "?,.. वैभव

" त्यांना हे लग्न मान्य नाही, त्यांच म्हणण आहे की मला ही त्रास झाला तिकडे तर, संतोष त्याचे मित्र डेंजर आहेत, पण खरं सांगू का वैभव मला तुझ्याशी लग्न करायच आहे काहीही झाल तरी, कसा काय हा प्रॉब्लेम नीट होईल काही समजत नाही ",.. निशा

" संतोष आणि त्याच्या मित्रांना आता अटक झाली आहे, त्यांची चूक झाली पण ते काही अट्टल गुन्हेगार नाहीत ते तुला त्रास देणार नाहीत, संतोष ला फक्त सोनल हवी होती तिला पळवलं तरी त्याने सोनल ला त्रास दिला नाही, म्हणजे मी संतोष ची बाजू घेत नाही, तर तुला काहीही धोका नाही आमच्या कडे हे सांगतो आहे ",.. वैभव

" मला माहिती आहे हे वैभव, पण आई बाबांच काय करणार",.. निशा

" तू आहेस ना माझ्या सोबत निशा ",.. वैभव

" हो काहीही झाल तरी मला तुझ्या सोबत लग्न करायच आहे वैभव ",.. निशा

" ठीक आहे मग मी येतो नंतर तुझ्या घरी, बोलतो त्यांच्याशी, जर वेळ पडली तर तुला माझ्या सोबत लगेच घराबाहेर पडाव लागेल, आणि नंतर तुला तुझे आई बाबा कधी स्विकार करतील की नाही माहिती नाही, त्या मुळे वेळ घे एक दोन दिवसाचा मग मला सांग, नंतर तुझ्या जवळ माझ्या शिवाय कोणी नसेल, तू जो निर्णय घेशील ते मला मान्य आहे ",.. वैभव

" माझा निर्णय झाला आहे वैभव, मला तुझ्या सोबत राहायच आहे, मी माझ आयुष्य दुसर्‍या कोणा सोबत घालवायचा विचार ही करू शकत नाही, मला माझे आई बाबा हवे आहेत पण ते जास्त दिवस माझ्या पासून लांब नाही राहू शकत, आता मला तुझी साथ देण, तुझ्या सोबत रहाण महत्वाच वाटत, आणि झाल्या प्रकारात सोनल चा किवा आपला काय दोष? आई बाबा का अस करता आहेत काय माहिती? ",.. निशा

वैभव खूप आनंदात होता काल पासुन खुप टेंशन होत, त्याच निशा वर खूप प्रेम होत, आता बरच चित्र स्पष्ट झाल होत, दोघ बर्‍याच वेळ बोलत होते

वैभव ने निशा चा हात हातात घेतला,.." निशा मला आता जरा बर वाटत आहे",

जरा वेळाने वैभव घरी यायला निघाला
.....

काय होणार सोनल च्या लग्नाच, आई बाबा जाणार आहेत राहुल कडे, बघू पुढच्या भागात, संतोष ला वकील मिळेल का?
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now