बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 25

आता संतोष ला सोडून दिल तर तो आम्हाला अजुन त्रास देईल, दुसर्‍या मुलींना ही त्रास देईल, आक्का आत्या तुम्हाला काही लागल तर मी आहे, पण मी कधीच संतोष ला माफ करणार नाहीबंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 25

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

सोनल, राहुल, वैभव दादा आत येवून बसले,

"संतोष प्रशांत त्याचे मित्र लॉक अप मध्ये आहेत, तुम्हाला भेटायचं आहे का त्यांना",..रमेश दादा

"नाही आम्हाला नाही भेटायचं आता त्यांना, मी भेटेल त्यांना नंतर",.. राहुल

सोनल ला जरा बरं वाटलं की आत्ता संतोष आणि त्याच्या मित्रांना भेटायचं नाही

खरं तर राहुल ने सोनल साठी हा डिसीजन घेतला होता, त्याला संतोष आणि त्याच्या मित्रांशी जरा बोलायचं होतं, खूप राग होता त्याच्या मनात त्यांच्या विषयी, पण नंतर भेटेल मी त्या मुलांना, राहुल ला आता कुठलीही गोष्ट सोनलच्या मनाविरुद्ध व्हायला नको होती, सध्या सोनल च मन जपणं खूप महत्त्वाचा होत, ती घाबरून गेलेली होती, तिला थोडा वेळ लागेल यातून बाहेर यायला,

कंप्लेंट पेपर वर सोनल वैभव च्या सह्या घेतल्या, वैभव दादा ने ती कंप्लेंट केली होती

"तुम्हाला अजून काही सांगायचं आहे का राहुल, सोनल",.. रमेश दादा

"नाही, मला त्यांच तोंड ही बघायच नाही",.. सोनल

"मला सांगायच आहे, या मुलांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, परत असा गुन्हा करायची त्यांची हिम्मत नाही व्हायला पाहीजे, त्यांच्या अश्या वागण्याने दुसर्‍यांना किती त्रास होतो",... वैभव दादा

हवालदार काका सगळ लिहून घेत होते..

"जेव्हा केस पुढे जाईल तेव्हा तुम्हाला याव लागेल पोलिस स्टेशनमध्ये, आता तुम्ही येवू शकता",... हवालदार काका

" ठीक आहे, रमेश दादा सचिन कसा आहे, कुठे आहे तो ",... राहुल

" सचिन आमच्या सोबत घरी आला, त्याला ही संतोष ने मारल, डॉक्टर कडे नेल होत त्याला, आता ठीक आहे तो",.. रमेश दादा

"बापरे मी जातो त्याला भेटायला, इथल झाल ना काम, आता आम्ही जाऊ शकतो का घरी",.. राहुल

" हो",.. रमेश दादा

राहुल सोनल कडे बघत होता, तो सोनल जवळ आला,.. "सोनल आराम कर घरी जावून, कुठल्याही गोष्टीचा अजिबात विचार करू नको, काहीही झाल कोणी काहीही बोलल तरी मी कायम तुझ्या सोबत आहे हे लक्ष्यात ठेव, तुला आरामाची गरज आहे, आई-बाबांकडे लक्ष दे, वैभव दादा कडे लक्ष दे",.. राहुल

"हो राहुल, आधी आपण डॉक्टर कडे जाऊ, मग मी घरी जाते, तुझ्या डोक्याला अजूनही सूज आहे, जखम आहे, दुर्लक्ष करून चालणार नाही ",.. सोनल

" हो मी जाईन दादा सोबत डॉक्टर कडे, तू घरी जा सोनल, आई बाबा तुझी खूप वाट बघत असतिल, आणि मी एकदम ठीक आहे ",.. राहुल

"डॉक्टर काय म्हटले ते मला फोन करून सांग",.. सोनल

हो.. राहुल ने सोनल ला तिच्या बांगड्या दिल्या

" अरे या बांगड्या मी त्या आजोबांना दिल्या होत्या, रिसॉर्ट वर ",.. सोनल

" हो त्यांनी दिल्या त्या मला, त्यांची खूप मदत झाली आपल्याला ",.. राहुल

" हो ना" ,.. सोनल ने बांगड्या हातात घातल्या, ती प्रेमाने राहुल कडे बघत होती, येतो आम्ही राहुल, काळजी घे,..

सोनल निघाली वैभव दादा सोबत..

रमेश दादा ने वैभव दादा काय सांगत होता ते राहुल ला सांगितल,.." पुढे त्रास होवु शकतो राहुल, वैभव दादाच बघितल ना, कस झाल काय होणार काय माहिती , लग्न नको मोडायला त्याच , तू कोणाला बोलू नकोस हे, सोनल ला मुळीच सांगू नकोस",..

"हो दादा मला सांगितलं वैभव दादाने की तुम्हाला दोघांनाही त्रास होऊ शकतो, समाज सोनल बद्दल काहीही बोलेल, पण दादा मी सोनलची साथ कधी सोडणार नाही, पण अस कस वागू शकतात लोक",.. राहुल

" तेच ना खूप व्यवस्थित वागतो आहेस तू राहुल, मी तुझ्या बरोबर आहे, याप्रकरणात सोनलचा काही दोष नाही, आपल्या घरून सोनल ला काही त्रास होणार नाही ",.. रमेश दादा

रस्त्याने वैभव दादा गप्प होता, सोनल खूप बोलत होती,.. "कसे आहेत आई, बाबा, दादा? निशा वहिनी कशी आहे, घरी गेलो की आपण करू वाहिनीला फोन, तू काहीच का बोलत नाहीस दादा, मी ठीक आहे अरे, काय झाल ",..

निशा ची आठवण आल्याने वैभव दादा गप्प झाला होता

"काय झालं दादा तू बोल ना काही तू असा गप्प का, आई, बाबा ठीक आहेत ना ",.. सोनल

" डोक दुखतय माझं, एवढच, बाकी मी ठीक आहे, तू काय बोलते ते ऐकतो आहे मी ",.. वैभव दादा

घर आल, सोनल पळत आत गेली, आई झोपली होती काॅट वर, बाबा पेपर वाचत होते, सोनल येवुन भेटली दोघांना , आई बाबा दोघ रडत होते, बर्‍याच वेळ ते तसेच होते

" कशी आहेस सोनल",.. आई हळवी झाली होती

" कशी दिसते आहे मी आई?, नेहमी सारखी ना? ",.. सोनल ला आई ला बघून बर वाटल

हो..

"आता काळजी करू नकोस आई, आणि तू का अशी झोपून होती बर नाही का वाटत"?,.. सोनल

"नाही बेटा अस काही नाही",.. आई

"उठ बर आता, तुला अस झोपलेल बघायची सवय नाही",.. सोनल

आई ही लगबगीने उठली,.." राहुल नाही आला का घरी"?,

" तो नंतर येईल, आता डॉक्टर कडे जाणार होता तो ",.. सोनल

" बर वाटत का ग त्याला ",.. आई

" हो आई ठीक आहे जरा सूज होती अजून बघू आता डॉक्टर काय म्हणताय ते, चल मला जेवायला दे आधी आई ",.. सोनल

बाबा बाजूला बसून सोनल कडे बघत होते, सोनल बाबांजवळ गेली, त्यांच्या बाजूला बसली, तसे बाबा रडायला लागले, आज पहिल्यांदाच ती बघत होती बाबांना रडताना, आई ने आधी रडून आपल मन मोकळ केल होत, पण बाबांनी सगळ मनात साठवल होत, आज सोनल ला बघून त्यांना कंट्रोल झाल नाही, दोघे हातात हात घेऊन बसलेले होते

" बाबा शांत व्हा मी ठीक आहे बाबा, मला माहिती आहे तूम्हाला माझी खूप काळजी होती, पण मला काहीही झालं नाही, मी अगदी सुरक्षित आणि छान आहे, संतोष आणि त्याचे मित्र सगळे आजूबाजूला होते माझ्या, बरेच कटकारस्थान रचले त्यांनी, मी पुरून उरले, पण संतोष ने मला एकदाही हात लावला नाही, तुम्ही माझी काळजी करू नका",.. सोनल

" मला माफ कर सोनल मी तुझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, एक बाबा म्हणून मी फेल गेलो ",.. बाबा

" बाबा प्लीज अस म्हणु नका, तुम्ही माझ्या साठी वैभव दादा साठी जे केल आजपर्यंत ते कोणीच करू शकत नाही, तुम्ही शांत व्हा बर, आणि का त्रास करून घेता आहात तुम्ही, जगातील सगळ्यात चांगले बाबा आहात तुम्ही",.. सोनल

" अस माझ्या डोळ्यासमोर तो संतोष तुला घेऊन गेला, मी काहीही करू शकलो नाही, जर काही कमी जास्त झाल असत तर मी काय केलं असतं, पण यापुढे असं होणार नाही मी तुझी कायम काळजी घेईल, मी आहे तुझ्यासाठी, वैभव साठी कायम ",.. बाबा

" हो बाबा, तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका , काही गोष्टी दुर्दैवाने घडतातच आपण त्या रोखू शकत नाही आणि मी आता ठीक आहे ना, पुसा बरं डोळे आणि आता कोणीच त्रास करून घ्यायचा नाही, आधी सारखं नॉर्मल छान रहायचं आहे आपल्याला , आणि आता चला जेवायला मला खूप भूक लागली आहे ",.. सोनल

बाबा आणि सोनल बोलत होते तेव्हा आई आणि वैभव दादाच्या ही डोळ्यात पाणी होतं

वैभव दादा बाबांना जवळ येवून बसला,.." बाबा पुरे आता, आपण आहोत सगळे सोबत, सगळे मिळून पुरून उरु, संकटांचा सामना करू, तुम्ही आमचा आधार स्तंभ आहात, अस त्रास करून नाही घ्यायचा आता",..

तिघे जेवायला बसले वैभव दादा फोन घेवून बाहेर गेला त्याने तिथून निशाला फोन लावून बघितला, पण फोन स्विच ऑफ होता,

"चल कुठे आहेस तू? चल रे दादा लवकर जेवायला, काय करतो आहेस"?,.. सोनल

"तुम्ही बसा मी आलोच",.. वैभव च मन नव्हत कशात

सोनल बाहेर आली वैभव दादा गप्प बसला होता,.. "काय झालं दादा? काही प्रॉब्लेम आहे का? , चल ना जेवायला",..

"नाही काय असणार प्रॉब्लेम, तू सुखरूप घरी आली मला खूप आनंद झाला आहे, काही सुचत नाही मला ",.. वैभव दादा

"मग तू असा गप्प का, इकडे काय करतोय, नीट सांग काय झालं",.. सोनल

"काही झाल नाही, तुला बघून भरून आल एवढच",.. वैभव दादा

" चल मग जेवायला, खूप भूक लागली आहे",.. सोनल

हो आलोच..

" काय झाल ग आई दादा ला"?,.. सोनल

" काही माहिती नाही, काहीच नाही बोलला तो",.. आई

" अग बघ कसा गप्प गप्प झाला,.. निशा वाहिनीचा काही फोन? ",.. सोनल

"नाही आला ग निशा चा फोन इतक्या दिवसात ",.. आई

"मी गेल्यानंतर वहिनी आली होती का इकडे? ",.. सोनल

"नाही निशा नव्हती आली आणि तिचा एकदाही फोन आला नाही, मी ही काही विचारलं नाही तिच्या बद्दल ",.. आई

"नक्की काहीतरी झाल आहे? , मला वैभव दादा शी बोलायला पाहिजे, माझ्यामुळे तर नाही ना झाल काही, दादा वहिनी भांडले की काय? ",.. सोनल विचार करत होती

" तुझ्या मुळे कश्याला होईल काही , तू उगीच काहीही विचार करू नकोस सोनल, चल जेवून घे, आराम कर आता छान, यापुढे कुठल्याच गोष्टीचा टेन्शन घ्यायचं नाही",.. आई

वैभव दादा आला आत, सगळे जेवायला बसले, सोनल सांगत होती तिकडे काय काय झाल ते, कस त्या लोकांनी तीच आणि संतोष च लग्न जमवल होत, तिने कस गोड बोलून ते लग्न पुढे ढकलल, प्रशांत तिला धमकी देत होता, संतोष बरा वागत होता, आणि नंतर राहुल आणि सचिन आला ते निसटले तिकडून, ते जंगलात वाट चुकले होते तेव्हा ते आजी आजोबा भेटले आजी-आजोबा खूप चांगले होते, त्यांनी खूप छान प्रकारे सांभाळून घेतला आम्हाला , त्यांची खूप मदत झाली , राहुलने खूप आधार दिला मला , त्याला बर नसतांना खूप रिस्क घेतली त्याने, संतोष आणि त्याच्या मित्रांकडे काठ्या चाकू वगैरे होते, सचिन ला मारल म्हणे संतोष ने, वैभव दादा आज आपण जाऊ सचिन ला भेटून येवू ,.. सोनल सगळ सांगत होती, आई बाबांच्या अंगावर काटा होता,

"हो जाऊ या", ... वैभव दादा

"किती मोठ संकट आल होत हे, राहुल सचिन ने खूप रिस्क घेतली, खुपच मदत केली राहुल ने",.. बाबा

"हो ना बाबा राहुलला इतक लागल होत तरी तो माझ्यासाठी आला, बाबा मी राहुल ची साथ कधीच सोडणार नाही",.. सोनल

"हो बेटा आम्ही उद्या जाणार आहोत राहुलच्या घरी, तुमच्या दोघांची साखरपुड्याची तारीख फिक्स करू, आणि नंतर लगेच लग्न करून टाकू",.. बाबा

हो बाबा..

वैभव दादा तिथे असून नसल्यासारखा होता, सारखं फोन कडे बघत होता तो, अजून निशा चा फोन कसा आला नाही, तिला नसेल वेळ मिळाला बहुतेक फोन करायला, मी करून बघू का तिला परत फोन? का तिच्या घरचे असतील आजूबाजूला? काही सुचत नाही, जोपर्यंत निशाशी व्यवस्थित बोलण होत नाही तोपर्यंत समजणारच नाही तिकडे काय झाला आहे, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लवकरच लावायला पाहिजे

जेवण झालं, आई सोनल च्या आसपास होती, ती कुठे जायला नको अशी भीती वाटत होती आईला, दोघीजणी आराम करत होत्या, बाबांचा फोन वाजला तेवढ्यात,

"कोणाचा फोन आहे हो, तुम्ही उचलत का नाही आहात", ?.. आई

"आक्काचा फोन आहे, मला नाही बोलायचं तिच्याशी",.. बाबांनी फोन बाजूला ठेवून दिला

परत दोन मिनिटांनी फोन आला, परत बाबांनी फोन कट केला

सोनल आणि आई बाबांकडे बघत होत्या..

"मला आता त्या लोकांशी काहीही संबंध ठेवायचे नाही, चांगलं ही नाही आणि वाईट नाही बोलायचं मला आता आक्का शी, माझ्या दृष्टीने ते लोक या जगातच नाही",.. बाबा

" बरोबर बोलता आहात तुम्ही , नका त्रास करून घेऊ",.. आई

परत बाबांच्या फोनवर आक्का आत्यांचा फोन येत होता

" काय झालं आहे बाबा कोणाचा फोन येतो आहे ",.. वैभव दादा

" अरे आक्का आत्या चा फोन येतो आहे",.. बाबा

" काय म्हणणं आहे आत्याच ",.. वैभव

" माहिती नाही आणि मला जाणून ही घ्यायच नाही अजिबात बोलायचं तिच्याशी" ,.. बाबा

वैभव दादा च्या फोनवर आक्का आत्याचा फोन आला

वैभव दादा फोन घेवून बाहेर गेला, आता त्याला घरच्यांना अजून कोणताही त्रास झालेला नको होता, त्याने फोन उचलला

" आक्का आत्या का फोन करता आहात तुम्ही सारख इकडे? , आम्हाला नाही बोलायच तुमच्या शी समजून घ्या",... वैभव

"वैभव एक मिनिट थांब मी काय म्हणते ते तरी ऐक",.. आक्का आत्या

"आता काय राहील आहे बोलण्यासारखं आत्या, की आता तुमच हे म्हणण आहे की आम्ही ही केस मागे घ्यायची",.. वैभव

"नाही माझ अस अजिबात म्हणण नाही, मला माहीती आहे संतोष ची चुकी झाली, त्याला मी ओरडणार आहे",..आक्का आत्या

" ओरडणार आहे म्हणजे काय आत्या? इथे माझ्या बहिणीचा जिवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता, आई बाबा आजारी पडले होते आणि म्हणे तुम्ही ओरडणार आहे संतोष ला, तुम्ही प्लीज फोन ठेवा, मला तुमच्याशी काहीही बोलायच नाही, उगीच आपला भांडण होईल, या पुढे इकडे फोन करू नका आमच्या कडून तुम्हाला काहीही मदत होणार नाही ",.. वैभव

" वैभव एक मिनिट ऐक रे, आक्का रडत होत्या, संतोष तुझा भाऊ आहे, झाली चुकी त्याची, पण त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे, संतोष चा या पुढे तुम्हाला काही त्रास होणार नाही मी शब्द देते, मी संतोष च दुसरी कडे लग्न लावून देईन, एवढ काम कर वैभव.. संतोष वरची केस मागे घ्या, तो अल्लड आहे, नाही समजल त्याला त्याची चुकी झाली, मी पदर पसरते तुमच्या पुढे ",.. आक्का आत्या

" हेच आक्का आत्या तुम्हाला लक्ष्यात आल नाही अजून, किती पाठीशी घालणार संतोष ला, आधीच तुम्ही त्याला बढावा दिला नसता तर बर झाल असत, तुमच्या मुलामुळे आज आमच्या वर किती संकट येतं आहेत काही कल्पना आहे का तुम्हाला, आणि तुम्ही संतोष ला अल्लड समजू नका आत्या , सोनल शी बळजबरीने लग्न करायचा प्लॅन होता त्याचा, चाकू काठ्या घेवून फिरतो तो, धोकादायक आहे तो, तुम्ही फोन ठेवा आक्का आत्या ",.. वैभव चिडला होता

" मी माफी मागायला तयार आहे भाऊ ची, तुझी, सोनल ची, ऐक रे वैभव एक आई आज अगदी अगतिक झाली आहे, या दोन तीन दिवसात माझ काय झाल ते मी नाही सांगू शकत, अरे तुझ्या काकांना ही अटक झाली होती, आम्ही म्हातारे झालो रे, आता आमचा आधार आहे संतोष, समजून घे",.. आक्का आत्या

"आता संतोष ला सोडून दिल तर तो आम्हाला अजुन त्रास देईल, दुसर्‍या मुलींना ही त्रास देईल, आक्का आत्या तुम्हाला काही लागल तर मी आहे, पण मी कधीच संतोष ला माफ करणार नाही ",... वैभव

आक्का आत्या खूप रडत होत्या, वैभव दादाने फोन ठेवून दिला

.........

वैभव परत निशा च्या फोन ची वाट बघत बसला, येईल का त्याला निशा चा फोन, की लग्न मोडेल त्यांच, काय होईल पुढे, यात वैभव चा काय दोष, कसली मिळते त्याला शिक्षा, आक्का आत्यांना माहिती आहे का की संतोष च्या चुकीची शिक्षा वैभव दादा ला मिळते आहे, पुढे जावून अजून काय होईल ....

...........

🎭 Series Post

View all