Jan 29, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 24

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 24


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 24

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

संतोष चे बाबा तिकडे पोलिस स्टेशन ला बसले होते, इंस्पेक्टर साहेब आले तसे ते उठून उभे राहिले ,.. "संतोष प्रशांत आणि त्याच्या मित्रांना ला अटक झाली काल, आत्ताच निरोप आला इंस्पेक्टर रमेश साहेबांचा, त्याच्या मित्राच्या फार्म हाऊस वर होते ते, काका तुम्ही घरी जा आता",..

"कुठे आहेत संतोष आणि त्याचे मित्र? , सोनल कशी आहे? , ती त्यांच्या सोबत आहे का? ",..बाबा

"सोनल राहुल सोबत आहे अजून ती घरी आली नाही, संतोष आणि त्याच्या मित्रांना इंस्पेक्टर रमेश त्या गावात घेवून गेले , तिकडे पोलिस कंप्लेंट दिली आहे ना त्या लोकांनी",.. इंस्पेक्टर

"ठीक आहे, काही लागल तर सांगा" ,.. बाबा

संतोष चे बाबा जात नव्हते घरी..

"काय झालं काका? काही बोलायचा आहे का ",.. इंस्पेक्टर

" हो ते साधारण किती शिक्षा होईल संतोष ला, मला माहिती आहे त्याची चुकी झाली आहे, पण तरीही मला काही करता येईल का यात? वाटल तर मी माफी मागतो सोनल च्या घरच्यांची, घरी त्याची आई खूप त्रास करून घेते आहे, ती विचारेल हे सगळे प्रश्न ",.. बाबा

" मला माहिती नाही काका काही, किती शिक्षा होईल ते , कंप्लेंट कोणती आहे यावर अवलंबून आहे ते, अपहरणाची केस आहे, आणि तुम्ही आता संतोष ला पाठीशी घालू नका काका, नाही तर तो अट्टल गुन्हेगार होईल, आणि तुम्ही माफी मागायची काही गरजच नाही ",.. इंस्पेक्टर

" हो, बाबांच्या डोळ्यात पाणी होत, मी तिकडे जावून भेटू शकतो का संतोष ला",.. बाबा

" मी फोन करतो तिकडे आणि विचारतो, मी करतो तुम्हाला फोन काका, तस कळवतो ",.. इंस्पेक्टर

" ठीक आहे",.. बाबा घरी निघाले

तीन दिवसानी आज संतोष चे बाबा घरी आले होते ,ते येवून आक्कांन जवळ बसले, आक्का अगदी सुकून गेल्यासारख्या दिसत होत्या, बाबा घरी आले त्यांना बघून आक्का रडायला लागल्या,

" काय झालं, कश्याला त्रास करून घेतेस",.. बाबा

" काही समजल का संतोषच, कुठे आहे तो ",.. आक्का

" हो संतोष आणि त्याच्या मित्रांना इंस्पेक्टर रमेश यांनी अटक केली, तिकडे त्या गावाच्या पोलिस स्टेशन ला आहेत ते",.. बाबा

"कुठे होते ते इतके दिवस? , का केल त्यांनी अस?, तुम्ही भेटले का त्याला",.. आक्का

"नाही गेलो मी तिकडे, आता सोडल मला घरी",.. बाबा

" पुढे काय हो, संतोष ला जेल होईल का, मला खुप भिती वाटते आहे, मी बोलून बघु का भाऊ शी थोड",.. आक्का

"नको बोलू तू काही सोनल च्या घरच्यांशी, चूक संतोष ची आहे, हो होईल शिक्षा त्याला आणि आपण अजिबात त्याला आता मदत करणार नाही, त्याची चूक त्याला समजायला हवी",.. बाबा

आक्का रडायला लागल्या,

" रडून उपयोग नाही, आता त्याला आपण पाठीशी घातल तर तो अजुन मोठे मोठे गुन्हे करेल पुढे, थोडी शिक्षा झालीच पाहिजे संतोष ला त्याला समजल पाहिजे कसा ही वागून चालणार नाही ",.. बाबा

" सोनल भेटली का? कशी आहे ती? ",.. आक्का

" ती आली नाही घरी म्हणे अजून, तिने तिची सुटका करून घेतली तिकडे संतोष च्या तावडीतून, राहुल सोबत आहे ती ",.. बाबा

" काय होवुन बसल हो हे, संतोष काय असा विचार करतो काही समजत नाही, आपण जे करतो ते गुन्हा आहे हे तरी माहिती होत का हो त्याला, आपला मुलगा इतका वाईट नाही, संगत वाईट निवडली त्याने ",.. आक्का

" बरोबर बोलते आहेस तू, काय करतो पुढे जावून संतोष काय माहिती, पण निदान चांगल वाईट तरी समजत की नाही त्याला, थोडा विचार करायचा त्याने वागतांना",.. बाबा

संतोष चे आई बाबा काळजीत होते, ते आवरायला आत गेले, आक्का मागे गेल्या..
............

वैभव दादा पोलिस ठाण्यात वापस आला, तो चिंताग्रस्त दिसत होता, रमेश दादाच्या नजरेतून ती गोष्ट सुटली नाही,.. " काय झाल वैभव काही टेंशन आहे का"?,

" नाही दादा काही प्रॉब्लेम नाही" .. वैभव

" काय झाल , तुम्हाला मन मोकळ करायचा असेल तर तुम्ही सांगू शकता मला",.. रमेश दादा

"संतोष ने खूप मोठी चुकी केली, यात आपल्याला त्रास तर झालाच, पण याचे खूप तोटे आहेत, राहुल सोनलच काय होणार काय माहिती, त्यांच्या सोबत आपल्याला काय काय भोगाव लागणार आहे काय माहिती ",.. वैभव दादा

" का काय झाल",.. रमेश दादा

वैभव दादा ने निशाबद्दल सगळ सांगितल,.." तिच्या घरचे नाराज आहेत, ते बहुतेक हे ठरलेल लग्न कॅन्सल करतील",

" काय म्हणणं आहे त्यांच, तुमचा काय दोष त्यात, राहुल सोनल चा ही काही दोष नाही यात, हे अस नको वागायला",.. रमेश दादा

" समजल नाही अजून नक्की काय झालं तिकडे, ते लोक बोलू देत नाही निशाला माझ्याशी, मी जाणार आहे उद्या निशा ला भेटायला ",.. वैभव

"का करतात असे लोक काय माहिती"?,.. रमेश दादा

"हो ना, स्वतःला पुढारलेले समजतात आणि स्वतःवर वेळ आली की अस करतात, काय होणार सोनल च पुढे काय माहिती, अगदी साधी आहे माझी बहिण, कस सहन करेन हे सगळ काय माहिती, आई बाबांना अजून काहीही माहिती नाही यातल, काय वाटेल त्यांना, तुमच्या मनात काही शंका नाही ना सोनल बद्दल",.. वैभव

"काय बोलताय तुम्ही, आमच्या कडून काहीच काळजी करू नका तुम्ही, आमच्या कडचे सगळे लोक सुशिक्षित आणि नवीन विचारांचे आहेत ",.. रमेश दादा

रमेश दादा बोलला तर खरं काही प्रॉब्लेम नाही, पण काय होणार नक्की सोनल च याच विचारात होता वैभव दादा, आई बाबांना हा धक्का सहन होईल का? निशाशी एकदा बोलायला हव, निशा चांगली आहे पण तिचे विचार असे नाहीत
.............

राहुल सोनल हवालदार काकां सोबत निघाले, गाडीत खूप आनंदी होते दोघे , कधी घरी जाऊ अस झाल होत त्यांना, दोघ हातात हात घेवून बसले होते,

"आधी आपल्याला पोलिस स्टेशन ला जाव लागेल सोनल",.. राहुल

"का? मला घरी जायच आहे",.. सोनल

"एक तासाच काम आहे, पोलिस कंप्लेंट झाली आहे ना, त्या फॉर्मलीटी पूर्ण कराव्या लागतील",.. राहुल

"संतोष प्रशांत असतिल का तिथे, मला नाही यायच तिकडे, माझ्या मनात एक खूप भीती बसली आहे त्यांच्या विषयी, मला नाही करायची त्यांची कंप्लेट मला घरी जायच आहे",..सोनल

"सोनल झालेल्या प्रकाराला खूप घाबरली होती, साहजिक आहे, किती त्रास झाला तिला, संतोष ला अजिबात अक्कल नाही, सोनल ला यातून बाहेर काढाव लागेल, तिला कॉन्फिडन्स द्यावा लागेल ",.. राहुल विचार करत होता

" अस कस चालेल सोनल? कंप्लेट झाली आहे, काही फाॅरम्यालीटीज पूर्ण कराव्या लागतील आपल्याला, मी आहे ना सोबत काळजी करू नकोस, हे अस घाबरायचं नाही, छान समोर जा त्यांच्या, तू खूप धाडसी मुलगी आहेस, अस हार मानून कस चालेल ",.. राहुल

" ठीक आहे केवळ तू म्हणतो आहेस म्हणून मी येते तिकडे राहुल",.. सोनल

" रमेश दादा, वैभव दादा दोघ असतिल तिथे, काही वेळेस संतोष त्यांना भेटायची वेळ येणार नाही आपल्यावर ",.. राहुल

सोनल ला आता बर वाटत होत

दोघे पोलिस स्टेशन ला आले, वैभव दादा बाहेर उभा होता, सोनल पळत जावून वैभव दादाला भेटली, दोघ रडत होते, राहुल जावून रमेश दादाला भेटला,

रमेश दादा चौकशी करत होते,..... " कसे आहात तुम्ही दोघ, सोनल कुठे आहे",

" ती बाहेर वैभव दादा सोबत आहे",.. राहुल

दोघ बाहेर आले, सोनल येऊन रमेश दादा ला भेटली

"कशी आहेस सोनल",.. रमेश दादा

"मी ठीक आहे दादा, घरी कसे आहेत सगळे? वहिनी ठीक आहेत ना", ?.. सोनल

"हो घरी सगळे ठीक आहे, तुझ्या वाहिनीला तुझी खूप काळजी होती, सांगून देतो तिला तू भेटली ते ",.. रमेश दादा

रमेश दादाने वाहिनीला मेसेज केला..

सोनल रमेश दादा शी बोलत होती तेव्हा वैभव दादा राहुल जवळ आला,.." राहुल तुझे आभार मी कोणत्या शब्दात मानू हेच समजत नाही, तू आज जे सोनल साठी केल, आमच्या साठी केल ते खूप आहे ",

" दादा प्लीज अस बोलू नकोस ",.. राहुल

"तुला एवढ लागल असतांना केवळ सोनल साठी तू दोन दिवसापासून धावपळ करतो आहेस, तुझे खूप आभार, पण मला तुझ्याशी बोलायचा आहे ",.. वैभव दादा

" बोल दादा, काय झालं",.. राहुल

" हे सगळ जे झाल ते अगदी त्रासदायक होत, आपल्या सगळ्यांना खूप त्रास झाला संतोष मुळे, स्पेशली सोनल ला, पण या पुढे जे होणार आहे त्या साठी तुम्ही दोघांनी तयार रहा ",.. वैभव दादा

" म्हणजे काय दादा? काही झाल आहे का?",.. राहुल

"नाही काही झाल नाही, पण समाज तुम्हाला दोघांना सुखाने जगू देणार नाही, ते कायम सोनल वर शंका घेत राहतील, चालेल ना तुला ",.. वैभव दादा

" दादा मला बाकीच्या लोकांशी काही घेण नाही, कोणी काहीही म्हंटल तरी मी सोनल ची साथ कधीच सोडणार नाही ",.. राहुल

वैभव दादा इमोशनल झाला होता..

" दादा एक विचारू का? काही झालं आहे का इकडे? तू असं का बोलतो आहेस", ?.. राहुल

" सांगेन नंतर, काही विशेष झालेल नाही, थोडे गैरसमज आहेत, ते दूर करावे लागतील",.. वैभव दादा

राहुल विचारात होत नक्की काही तरी झालंय, वैभव दादा आपल्याला काहीही सांगत नाही,
...........

लॉक अप मध्ये संतोष प्रशांत सगळे बसले होते, काहीही करून इथून बाहेर पडायची संतोष ची धडपड सुरू होती, बाकीचे मुलांच्या हातात काही नव्हत म्हणून ते शांत बसले होते, त्यांचे सगळ्यांचे फोन आधीच जप्त केले होते,

"मला फक्त एक फोन करू द्या हवालदार साहेब, मला माझ्या बाबांशी बोलायचं आहे ",.. संतोष

"गप्प बस संतोष, अजिबात गोंधळ घालायचा नाही, आणि आता कोणीही तुझ्या मदतीला येणार नाही, आधी विचार न करता चुका करायच्या, नंतर मदतीला बोलवायचा घरच्यांना, पण या वेळी अस होणार नाही, समजल का, आणि आता मला मुळीच आवाज देवू नकोस ",.. हवालदार काका

संतोष कडे प्रशांत व इतर मित्र रागाने बघत होते,

" काही उपयोग नाही संतोष धडपड करून, आपण पूर्ण पणे अडकलो आहोत या प्रकारात, आता आपली सुटका नाही",.. प्रशांत

" काय झालं आहे प्रशांत? तू माझ्याकडे कधीपासून रागाने का बघतो आहेस? , आणि असा का बोलतोस? ",.. संतोष

" मग काय करणार आहे मी संतोष, उगाच फसलो ना आम्ही तुझ्या सोबत, आम्हाला वाटलं तुला मदत करून तुला सोनल मिळेल, जर मित्राला त्याचं प्रेम मिळत असेल तर काय हरकत आहे रिस्क घ्यायला, पण इथे वेगळेच होऊन बसलं, तू आमचं काही ऐकलं नाही तिकडे, तुला ती नाटक करणारी सोनल जवळची वाटली, सोनल गेली पळून राहुल सोबत आणि आम्हीच संकटात सापडलो, आता पुढे काय होणार आहे माहिती नाही, तुझं काय तू श्रीमंत आहेस, पण आमचं काय होणार आहे पुढे?",.. प्रशांत चांगलाच चिडला होता

" का बोलतोस अस प्रशांत? , मी तुम्हाला मित्रांना कधीच अंतर देणार नाही, मी मागे पण बोललो होतो, तुम्हाला माझी शंका येतेच कशी अशी? काही होऊ दे मी आहे, हा संतोष आहे तुमच्यासाठी, प्लीज या पुढे अस बोलू नकोस प्रशांत ",.. संतोष

प्रशांत आता शांत झाला होता,.. "अरे पण संतोष पुढे काय होणार याची त्यांना कल्पना नाही आम्हाला? , किती शिक्षा होईल? , घरचे कसे वागतील? पुढे जावून लग्न तरी होतील का आमचे? , नौकरी मिळेल का? , काय होईल? कस होईल? , आम्हाला वाटल तुझ सोनल च लग्न होईल मग काय ते लोक आपल्या विरुद्ध तक्रार करणार नाहीत, पण आता झाल उलट, आपण सगळे लॉक अप मध्ये आहोत",.. प्रशांत

संतोष ही काळजीत होता, आई बाबांची आठवण येत होती,.." काल पासुन आपण जेल मध्ये आहोत, अजून कोणीही भेटायला आल नाही, चुकी झाली वाटत आपली, सोनल तू का केल अस? गोड बोलून गळा कापला, आई बाबा खूप महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी, बाबा खूपच चिडलेले असतील, ते कधीच सांगत होते घराकडे दुकानाकडे लक्ष दे, तरी मी लक्ष दिल नाही, माझीच चुकी झाली, आता नीट वागव लागेल, काय कराव? सोनल मला तुझ्या शिवाय जगता येणार नाही, पण आता मी आई बाबा बोलतील तेच करणार आहे, सोनल चा विषय थोडे दिवस डोक्यातून काढावा लागेल",.. संतोष विचारात होता
..

बघु पुढे काय होतय ते

सोनल ला समजेल का निशा वहिनी वैभव दादाच लग्न तिच्या मुळे मोडल, काय करेल ती पुढे, सोनल चा आणि तिच्या घरच्यांचा काय दोष..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now