बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 23

नक्की काय झालं असेल? निशा चे आई वडील असे का करत आहेत? सोनल मुळे तर ते निशाला इकडे येऊ देत नसतील का?

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 23

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

राहुल घराजवळ गेला, आत स्वयंपाक होत असल्याचा वास येत होता, राहुलने बघितलं घरात एक आजी आजोबा होते, त्याने आवाज दिला तसे आजोबा बाहेर आले,..... "आजोबा आम्ही रस्ता चुकलो आहोत आम्हाला येथे आजची रात्र आसरा मिळेल का? ",...

" हो या ना चालेल, कोण आहे तुमच्या सोबत" ?,..... आजोबा

राहुल जाऊन सोनलला घेऊन आला, आजी पण बाहेर आल्या, आजी आजोबा दोघांकडे कौतुकाने बघत होत्या,

"कोण आहे ही गोड मुलगी? , तुम्ही दोघं घरातुन पळून आले आहात का? काय करताय इथे? , आई बाबांना माहिती आहे का हे सगळ? , काय रे पोरा हे, अस फिरत जाऊ नका, धोका असतो अश्या माळरानी, चल ग पोरी आत",...... आजीने तोंडाचा पट्टा सुरू केला

" अग थांब जरा, काय झालं आहे हे नक्की माहिती नाही आपल्याला, किती बोलतेस मुलांना, काय नाव तुमच पोरांनो? , कोणत गाव तुमच? ",...... आजोबा

राहुल ने माहिती दिली...

आजीने चहा केला, चहा पिऊन दोघांना हुशारी आली

राहुल ने आजी आजोबांना सगळी हकिगत सांगितली, संतोष कसा पूर्वी पासून सोनलला त्रास देत होता, दोघांच लग्न जमलं तर कस पळवल सोनलला, दोघ तिथून निसटले, अजून पुढे माहिती नाही काय संकट असेल

"काहीही होणार नाही आता पोरांनो, किती खराब वागतात ना काही काही मुलं, बापरे किती त्रास सहन केला तुम्ही, पण तुम्ही इथे सुरक्षित आहात राहुल आणि सोनल, हे दुसरं गाव आहे त्या रिसॉर्ट पासून तुम्ही बरेच आत चालत आले आहात, कसलीच काळजी करू नका, आजची रात्र इथेच थांबा, मी सकाळी तुम्हाला स्वतः बस मध्ये बसवेन",...... आजोबा

" इथून रस्ता किती लांब आहे आजोबा ",...... राहुल

" जवळच आहे अर्ध्या तासावर, मी सकाळी तुम्हा दोघांना सोडून येईन, आज रात्री तुम्ही इथेच राहा, आणि काळजी करू नका ".......आजोबा

" पण आजोबा तुम्ही या जंगलात काय करत आहात",...... राहुल

" जंगल संपलं मागे, इथे आमचं शेत आहे, तिथेच आम्ही घर बांधलं आहे, कधीकधी शेतावर उशीर झाल्यावर आम्ही इथे थांबतो, खाली गावात आमचं घर आहे",........ आजोबा

" तुम्ही दोघ राहता इथे? ",..... राहुल

"हो मुल नौकरी निमित्त शहरात राहतात, कधीतरी सुट्टी मिळाली की येतात इकडे, जमिनीचा छोटासा तुकडा तुकडा आहे, आम्ही दोघं मिळून करतो थोडी शेती ची कामे, तेवढ्याच आम्हालाही विरंगुळा, सवय आहे कामाची, नुसत बसवत नाही, नाहीतर आम्हाला म्हातारा म्हातारीला गावात करमत नाही",........आजोबा

" तसं इथे काही धोका नाही ना, चोर वगैरे येणार नाहीत ना",...... राहुल

" नाही काहीच धोका नाही",...... आजोबा

" इथे फोनला रेंज नाही का आजोबा",.... राहुल

" माळ रानात कसला आला फोन, इथे आम्ही नेहमी येत नाही , मध्ये कधीतरी काम असले की राहावं लागतं",....... आजोबा

" चल ग पोरी तु हात-पाय-तोंड धुवून घे, काय केस झाले तुझे, तेल लावून विंचरुन देते",....... आजी

सोनल आजीसोबत आत गेली, भरपूर पाणी पिली, बाहेर येऊन राहुल ला पाणी दिलं, दोघांनी हात पाय धुतले, आजीने मायेने सोनलच आवरून दिल,

आजी स्वयंपाक करत होती

" द्या आजी मी करते स्वयंपाक",.... सोनल

" नको बाई तू बस, तू जंगलात चालून चालून थकलेली दिसते आहे, दोन घास खाऊन घे आणि झोप, या चुलीवर काय जमणार आहे तुला स्वैपाक, हात भाजतात ",...... आजी

सोनल आजी जवळ बसली

"घरी कोण कोण आहे तुझ्या? ",...... आजी

सोनल ने सांगितल आई बाबा वैभव दादा विषयी, तुम्ही या आमच्या कडे आजी

" हो येवू आता तुझ्या लग्नाला ",.... आजी

सोनल छान लाजली

सोनल खरंच खूपच थकलेली होती, घरी तिकडे काय चालले असेल काही कल्पना नव्हती, आई बाबा कसे असतिल वैभव दादा ने खूप शोधल असेल आज आम्हाला,

सोनल बाहेर आली राहुल जवळ बसली,..... " सचिन चं काय झालं असेल राहुल, रमेश दादा वैभव दादा पोहचली असतील का तिथे फार्महाऊसवर",......

" हो ना मलाही सचिन ची चिंता आहे, बहुतेक दादाने आपल्या शोधायचा प्रयत्न केला असेल, आता सगळं उद्याच कळेल आपल्याला सोनल, तू काळजी करू नकोस",....... राहुल

"उद्या आपण घरी जाऊ, मला अस झाल कधी आई बाबांना भेटू ",...... सोनल

" हो आणि लगेच लग्न करणार आहोत आपण सोनल ",..... राहुल

" पण आपल्याला नौकरी नाही दोघांना ",...... सोनल

" जे होईल ते, पण आता मी तुला अजिबात एकट सोडणार नाही, आधी पोलिस संरक्षण घेऊ आपण",...... राहुल
.......

आजींचा स्वैपाक झाला, त्यांनी आवाज दिला, सोनल आत गेली, तिने ताटे घेतली, आजीने गरम गरम भाजी भाकरी ताटात वाढली, आमच्याकडे भात वगैरे काही नाही पोरांनो, जे केलंय ते खाऊन घ्या,

" आजी खूप धन्यवाद, हे खूपच छान जेवण आहे, तुम्हाला माहिती नाही तुम्ही किती आधार दिला आम्हाला",..... राहुल

"आटपा पोरांनो जेवून घ्या, गार होईल भाजी",.... आजी

सगळ्यांच छान जेवण झालं, आवरून झालं, खूप छान चव होती आजीच्या हाताला, आतल्या खोलीत झोपायची व्यवस्था केली होती, राहुल सोनल जवळ बसली होती, बाहेर आजी आजोबा बोलत बसले होते

"झोप ना सोनल, थकली ना तू",...... राहुल

"खूप पाय दुखता आहेत राहुल",.... सोनल स्वतःचे पाय दाबत होती

"आण मी दाबून देतो पाय",..... राहुल

"नको राहू दे" ,...... सोनल

"दे ग, आपल्यात आता तुझ माझ काही नाही, उद्या बर वाटायला पाहिजे ",...... राहुल

राहुल तिचे पाय दाबून देत होता, सोनल ला लगेच झोप लागली, दोन दिवसांनी ती अशी शांत निवांत झोपली होती , सोनल एकदम शांत झोपली होती, राहुल तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत बसला, "किती सुंदर आहे ही, निरागस एकदम, एवढी गोड मुलगी माझी बायको होणार आहे, विचार करून राहुलला खूप छान वाटल, खूप मोठं संकट आला होता आमच्या दोघांवर, बरं झालं ते लवकर मिटलं, सोनल जर मला सापडली नसती तर मी काय केलं असतं माहिती नाही, सोनल आता मी तुला अजिबात माझ्यापासून कधीच दूर करणार नाही, आपण लगेच लग्न करू, मी तुझी खूप काळजी घेईन, थोडे दिवस पोलिस सौरक्षण घेवू आपण, परीक्षा झाली की शहरात जाऊ रहायला, नको आता त्या गावत",... विचार करता करता राहुल ही सोनल च्या बाजूला झोपून गेला,

आजी आजोबा आत आले, मुलं झोपले आहेत, छान किती निरागस दिसता आहेत दोघं पण, त्यांच्या आई-वडिलांना काळजी लागून राहिली असेल

हो ना....
....

सकाळ झाली, सोनल ला जाग आली तिने बघितल राहुल तिच्या बाजूला झोपला होता, तिला एकदम लाजल्या सारख झाल, "पण खूप छान आहे राहुल, हा खरी साथ देतो माझी, मी अगदी निर्धास्त असते याचा सोबत, अशी साथ हवी," 

आजी आत आल्या,.... "झोप लागली का पोरी, चल आवर आता" ,

राहुल ही उठला, आजी आजोबा दोघ आवरत होते, आजीने दोघांना चहा दिला, आंघोळ करून घ्या पोरांनो

"नाही आम्ही निघतो आता",...... राहुल सोनल एकमेकांकडे बघत होते

"अजिबात चालणार नाही, आंघोळ करा आवरा पटापट",...... आजी रागावली

दोघे फ्रेश झाले.....

आजीने भाजी भाकरी दिली खायला,.... "इथे पोहे उपमा नाही पोरांनो, हेच आहे, खावून घ्या माझ्या डोळ्या समोर, मग जा",....

आजीच्या डोळ्यात पाणी होत, अगदी एका रात्रीतून त्यांना लळा लागला होता मुलांचा, राहुल सोनल उठून आजी जवळ गेले,आजीने दोघांना जवळ घेतल

चहा झाल्यानंतर आजोबा दोघांना स्टॅण्डवर सोडून येणार होते, दोघांची तयारी झाली

एवढ्या छान घरातुन पायच निघत नव्हता,

" आपल्या दोघांचा घरसंसार असा असायला हवा राहुल , एकदम शांत निवांत, कोणाची तक तक नाही, फोन नाही टीव्ही नाही फक्त दोघे एकमेका सोबत"..... सोनल

आजीने पोळीभाजी बांधून दिली..

"कशाला आजी आता पोळी भाजी",..... सोनल

गाडी सुरु झाली की खाऊन घ्या मुलांनो, आजीचा गळा भरून आला, तिने दोघा मुलांना कवटाळलं, आमच्या म्हातारा म्हातारी जवळ कोणी नाही राहिल, सगळे कामानिमित्त शहरात चालले गेले, त्यामुळे कोणी आल की छान वाटत, काल संध्याकाळपासून तुम्ही दोघ आले तुमचा लळा लागला असेच छान राहा सोबत, एकमेकांची काळजी घ्या आणि आम्हाला लग्नाला बोलवा,

राहुल आणि सोनलच्या डोळ्यातही पाणी होतं, राहुलने आजोबांना फोन नंबर दिला, त्यांचा घेतला

"काळजी घे रे राहुल सोनलची जर कुठे राहायला जागा नसेल तर इकडे निघून या सरळ, मी बघते त्या संतोष कडे",..... आजी

तसे सगळे हसायला लागले......

सगळे गावाकडे जायला निघाले,

"हे बघा मुलांनो ही गल्ली वळली की आमचं घर आहे, चला जरा वेळ घरी" ,...... आजोबा

"नाही आता उशीर होतोय, येवू आम्ही नंतर",..... दोघांनी आजीचा निरोप घेतला

" मी जाते आता इथून, तुम्ही दोघं नीट जा, घरी गेले की फोन करा",..... आजी

हो आजी.....

आजीचा निरोप घेऊन आजोबांसोबत राहुलने सोनल स्टॅन्ड कडे निघाले

स्टँड वर हवालदार काका उभे होते, राहुल सोनल त्यांना जावून भेटले, ओळख सांगितली

"कुठे होते तुम्ही दोघे रात्र भर, इंस्पेक्टर साहेब किती काळजी करत होते",...... हवालदार काका

हवालदार काकानी रमेश दादा ला फोन केला, राहुल सोनल भेटले

"पोलिसांच्या गाडीतून नीट घेवून या त्यांना, कुठे थांबू नका रस्त्यात" ,........ रमेश दादा

"हो साहेब तुम्ही काळजी करू नका, नीट येतो आम्ही",...... हवालदार काका

रमेश दादा फोन वर राहुल शी बोलला,..... " कसे आहात तुम्ही दोघ, सोनल कशी आहे, लगेच निघून या तुम्ही दोघ",...

" आम्ही दोघ ठीक आहोत, कधी घरी येऊ अस झाल आहे, दादा सोनल च्या घरी सांगून दे",....... राहुल

" हो लगेच करतो फोन",..... रमेश दादा

आजोबांचा निरोप घेवून हवालदार काकांन सोबत सोनल राहुल निघाले

रमेश दादाने वैभव दादाला फोन करून सांगितल,...."सोनल राहुल भेटले, ते येता आहेत इकडे, तुम्ही पोलिस स्टेशन ला या लगेच",

वैभव दादाने आई बाबांना आनंदाची बातमी दिली,

" मी पण येतो पोलिस स्टेशन ला",..... बाबा

"बाबा तुम्ही आई कडे लक्ष द्या, तिकडे वेळ लागेल बहुतेक पोलिस कंप्लेंट वगैरे करून येवू आम्ही, दोन तीन तास जातील",...... वैभव दादा

आई उठली तिने एका डब्यात थोडी भाजी पोळी भरून दिली,... "डब्बा ने सोबत वैभव, माहिती नाही सोनलने काही खाल्ल की नाही दोन दिवसा पासुन, आधी जेवून घे म्हणा तिला आणि राहुल ला",..

आई बाबांना आता सोनल ला कधी भेटू अस झाल होत

वैभव दादा पोलिस स्टेशन ला आला, रमेश दादा ही वाट बघत होता राहुल सोनल ची

"कुठे आहेत मुल",..... वैभव

" एक तास लागेल अजून, चला आपण चहा घेवू",...... रमेश दादा

वैभव दादा ने निशा वाहिनीला फोन केला, तिने फोन उचलला नाही, मेसेज पाठवला काय झालं निशा? आज सकाळ पासून तू माझा फोन घेत नाही...

थोड्या वेळाने निशा वहिनी चा मेसेज आला,... "करते जरा वेळाने फोन",..

वैभव दादा रमेश दादा बरोबर चहा घ्यायला गेला,

थोड्या वेळाने निशा वहिनीचा फोन आला,.... "आई बाबा मला आता बोलू देत नाही आहे तुझ्याशी वैभव",

" का काय झालं आहे"?,...... वैभव

"माहित नाही",..... निशा

" तू आज येणार होती नाही इकडे मला भेटायला ",..... वैभव

"नाही येता येणार फोन सुद्धा करू देत नाही आहे ते, सोनल आली का घरी"?,...... निशा

"नाही आता येईल ती एका तासात ",...... वैभव

" सोनल आली की मला मेसेज करून दे ",.... निशा

" ठीक आहे आणि तू काळजी करू नकोस निशा, होईल ठीक सगळ ",..... वैभव

"हो मी करते नंतर फोन",... निशा

" नक्की काय झालं असेल? निशा चे आई वडील असे का करत आहेत? सोनल मुळे तर ते निशाला इकडे येऊ देत नसतील का? , अस असेल तर किती बुरसटलेले विचार आहेत त्यांचे, काय झालं नक्की? , आज निशाला नीट विचारून घेऊ ",....... वैभव दादा काळजीत होता, त्याला निशा खूप आवडली होती, त्याचं निशा वर खूप प्रेम होतं, आता हे मध्येच लग्नात विघ्न नको यायला,

पण या सगळ्यात सोनलचा काय दोष, सोनलला संतोषने पळवून नेलं त्यामुळे त्या लोकांनी निशाला माझ्याशी बोलू द्यायचं नाही, लग्न मोडायच, याला काहीही अर्थ नाही, पुढारलेल्या विचारांची समजतो आपण स्वतःला आणि आपल्यावर अशी वेळ आली की जसं वागायचं तसंच वागतो, शी काय घाणेरडे लोक आहेत, घरी आई बाबांना किंवा सोनल ला हे कळता कामा नये नाही तर त्यांना अजून वाईट वाटेल, संतोष मुळे आधीच झाला तो मनस्ताप काही कमी नाही झाला, अजून त्यात निशाच्या घरच्यांची भर पडते आहे, वैभव दादा नाराज होता,

............

काय होणार पुढे.....

समाज स्विकार करेल का सोनलला? काय मनस्ताप होईल सोनलच्या कुटुंबीयांना?,... हे अस योग्य आहे का वागण.....

🎭 Series Post

View all