बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 22
कधीही न तुटणारे.....
©️®️शिल्पा सुतार
..............
..............
बराच वेळ पळाल्यानंतर सोनल एका झाडाजवळ थांबली, मागून राहुल येत होता, आपल्या मागे कोणी नाही आहे ना याची त्यांनी खात्री केली, सोनल ने जाऊन राहुलला एकदम मिठी मारली आणि जोरात रडायला लागली, राहुल ही रडत होता, बर्याच वेळ ते दोघ असे उभे होते
"कशी आहेस तू सोनल, तुला काही झालं तर नाही ना",..... राहुल सोनल कडे डोळे भरून बघत होता
"नाही मला काही झालं नाही, पण बरं झालं तू वेळेवर आला, नाहीतर पुढे काय झालं असत माहिती नाही, तू कसा आहेस राहुल , कुठे लागल त्या दिवशी, आई बाबा वैभव दादा कसे आहेत" ,....... सोनल
राहुल ने डोक्याला लागलेला मार दाखवला, सोनलच्या डोळ्यात पाणी होत,
"तुझे आई बाबा ठीक आहेत, काळजी करू नकोस ",....... राहुल
" आता काय करायचं पुढे, रमेश दादा वैभव दादा येतील का रिसॉर्टवर ",....... सोनल
" हो दादा येतो आहे पण आपल्याला तिकडे जाता येणार नाही, आता संतोष सोबत तिकडे किती मुलं आहेत हे आपल्याला माहिती नाही, रमेश दादा ते तिकडे यायला किती वेळ आहे हे माहिती नाही, संतोष आणि प्रशांत मागे येत असतिल तर अडकू आपण त्यांच्या जाळ्यात, पुढच्या बाजूने रस्ता आहे त्या रस्त्यावर आपण जाऊ, एखादी गाडी मिळाली तर त्यांने आपण गावी जाऊ, पण खूप सावध राहाव लागेल आपल्याला , चल लवकर आपल्याला सुरक्षित स्थळी जाव लागेल, तस काही झाल संतोष मागे आला तर तू पळून जा मी बघेन त्यांच्याकडे ",........ राहुल
" हो चालेल",....... सोनल ने राहुल ला परत मिठी मारली
किती चांगलं आहे हा, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मला म्हणतो की काही झालं तर तू पळून जा, राहुलला कालच किती लागल आहे, तरी माझ्यासाठी त्याने जिवाची पर्वा केली नाही, खरंच देवाचे खूपच आभार की मला इतका चांगला जोडीदार मिळाला आहे, मीही काहीही झालं तरी राहुल ची साथ कधी सोडणार नाही,
"काय झालं सोनल काय बघते आहेस माझ्याकडे",...... राहुल लाजला होता
"बघते आहे की माझा जोडीदार किती चांगला आहे, कुठलही संकट आलं तरी त्याने माझी साथ सोडली नाही, आज माझी इथून या संतोष पासून सुटका झाली, राहुल मी खूप खुश आहे ",...... सोनलच्या डोळ्यात राहुल विषयी खूप प्रेम भरल होत, पुढे होवुन तिने राहुल चा हात हातात घेतला त्यावर आपले ओठ टेकवले, राहुल ने ही तिला मिठी मारली
" ते कर्तव्यच आहे माझं, आणि माझ तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे ",...... राहुल ने सोनलचा हात अजून घट्ट धरला
दोघे हातात हात घेऊन चालत होते, सोनलला आता ही वाट आवडत होती, काल असं वाटत होतं की काय होईल माझं, घरचे कधी भेटतील आणि आज मी राहुल सोबत होती हे नक्कीच मोठ्यांचे आशीर्वाद आहेत आणि आम्ही दोघं सोबत राहू हे सगळ्यांनाच वाटत असेल म्हणून राहुल आणि मी भेटलो परत, दोघं चालत चालत मेन रोड कडे निघाले
"काय झाल तिकडे नंतर राहुल, ती संध्याकाळ भयानक होती",...... सोनल
"त्या लोकांना मला मारल, मी चक्कर येऊन पडलो मी जेव्हा उठलो तेव्हा वैभव दादा बाजूला होता, मी सांगितल त्याला की तुला संतोष ने पळवून नेल, वैभव दादा खूप घाबरला होता, मग आम्ही डॉक्टर कडे गेलो",....... राहुल
"आई बाबा कसे आहेत प्लीज खर सांग, त्यांना समजलं का संतोषचा प्रताप ",...... सोनल
" हो ते ठीक आहेत, तू काळजी करू नको, काकूंनी घेतल होत थोड टेंशन, पण आता त्या ठीक आहेत ",........ राहुल
" आईच्या आठवणीने सोनल गहिवरली, तुला खरंच खूप लागलं नाही ना राहूल",...... सोनल
" तू भेटलीस मी ठीक आहे आता",..... राहुल
सोनल परत रडायला लागली, राहुल तिच्या जवळ आला, त्याने सोनल ला जवळ घेतल,....... " सोनल तू काहीही काळजी करू नको, कसा दिसतो आहे मी आणि मला काहीही झालं तरी मी तुला सोडवायला आलो असतो",.....
" तुला माझ्या बाबतीत काही शंका नाही ना राहुल? म्हणजे मी रात्रभर संतोष आणि त्याच्या मित्रांसोबत होते, प्रशांत माझ संतोषच लग्न जमवत होता पण मी संतोषशी गोड बोलून ते लग्न पुढे ढकलल",....... सोनल
" माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सोनल, माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर, मी नेहमी तुझी साथ देईन काहीही झाल तरी, आणि अस काहीही बोलायच नाही सोनल, अशी शंका तरी मी कधीच घेवू शकत नाही ",...... राहुल
" मी काल रात्री पासून हाच विचार करते आहे की घरचे बाकीचे माझ्या बाबतीत काय विचार करतील",...... सोनल
" कोणी तुझ्या बाबतीत काहीही विचार करू दे सोनल मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, मी तुला मागेच वचन दिलं आहे, आणि मी ते पाळणार, तू माझ्या बाबतीत अजिबात काळजी करू नकोस, जर तुला नाही आणि मला कोणी पळवून नेले असत तर तू माझा असाच विचार केला असता का? अजिबात काहीच वाईट विचार मनात आणू नको? आपण दोघ सुखरूप आहोत अजून काय हव, आपण नेहमी सोबत आहोत आणि सोबतच राहू ",...... राहुल
सोनल एकदम इमोशनल झाली होती,......
..........
संतोष आणि त्याच्या मित्राने सचिनला एका खुर्चीला बांधून ठेवल, संतोषने एक जोरदार ठोसा सचिनला मारला, तू सचिन कडे लक्ष दे, मी वरती जाऊन सोनल काय करते ते बघतो, काहीही झाल तरी याला सोडू नकोस
संतोष वरती गेला त्यांने बघितले सोनल वरती नव्हती, तो चवताळून खाली आला,..... "सांग सचिन तुझ्यासोबत कोण आलं होतं?, सोनल कुठे आहे"?,....
"सोनल तुझ्या सोबतच आहे ना संतोष मी तेच बघायला आलो होतो",..... सचिन
" सोनल पळून गेली, चल लवकर याला राहू दे इथेच बांधलेला काही दूर गेली नसेल सोनल आपण याच्याशी बोलताना ती पळाली वाटतं",...... संतोष त्याचा मित्र सोनलला शोधायला निघाले, त्यांना माहिती नव्हत सोनल राहुल सोबत आहे
दोघं तिथुन निघाले दोन रस्ते जात होते, एक जंगलाकडे आणि एक मेन रोड कडे
कुठे गेली असेल सोनल, चांगला रस्ता सोडून जंगलाकडे तर नसेलच गेली ना ती, मेन रोडवरच गेली असेल, तू प्रशांत ला फोन लाव तो तिकडूनच येत असेल रस्त्यात सोनल दिसली तर बरं होईल
संतोष प्रशांत ला फोन लावला,... "प्रशांत सोनल पळाली एवढ्या तिथूनच",..
"कशी काय कुणाबरोबर गेली? राहुल आला होता का"?,... प्रशांत
"नाही पण राहुलचा मित्र सचिन आला, त्याला आम्ही खुर्चीला बांधला आहे",..... संतोष
"तुम्हा मुलांना एवढे कळत नाही का संतोष, राहुल आणि सचिन सोबत आले असतील सचिनने तुम्हाला बोलण्यात गुंतवल असेल, तेव्हा राहुल आणि सोनल पळून गेले असतील ",...... प्रशांत बरोबर अंदाज लावत होता
" अरे बापरे हे आमच्या लक्षातच आलं नाही",.... संतोष
" तुला तर काहीच लक्षात येत नाही संतोष, मी तुला कधीच सांगत होतो, कालही मी बोललो होतो की लगेच सोनलशी लग्न उरकून घे तरी तू ऐकलं नाही, आता गेली ना ती पळून, नक्कीच ती राहुल सोबत असेल, काही प्रॉब्लेम नाही, मी येतो ते जवळपासच असतील, धरू आपण त्यांना लगेच, माझ्याबरोबर अजून चार पाच मुलं आहेत सगळे मिळून शोधू त्यांना ",..... प्रशांत
" हो माझा मूर्खपणा झाला, मी सोनलवर विश्वास ठेवला, पण आता मी सोनलला सोडणार नाही, आणि तू मेन रोड वरून येताना लक्ष देऊन ये आजूबाजूच्या झाडांमध्ये ते लपलेले असतील तर दिसतील ",..... संतोष
हो चालेल...
.........
.........
बराच वेळ झाला राहुल आणि सोनल चालत होते,
" मी आता खूप थकली आहे राहुल, मला चालता येत नाही, कुठे आहे मेन रोड ",........ सोनल ने बाजूला एका दगडावर बसुन घेतल
" उठ सोनल चल लवकर, काय झालं, ब्रेक घेवून उपयोग नाही, बसू नकोस शक्य तोवर लांब जायच आहे आपल्याला ",...... राहुल
"मी खूप थकले रे ",...... सोनल
"बरोबर आहे तुला कालपासून जेवायला ही नसेल, आराम झाला नसेल ",........ राहुल
" काल रात्री जेवली होती मी, पण आता खूप तहान लागली आहे",..... सोनल
" थोडंच राहिलं आता, जवळच मेन रोड असेल, मी मॅप बघितला होता, आता इथे फोन ला रेंज नाही, थांब एकदा बघू, आपण खूप आत निघून आलो सोनल, मेन रोड त्या बाजूला राहिला, समोर गेल की एक गाव आहे, तिकडे जाऊ, एखादी गाडी करून घरी जाऊ",..... राहुल ने शर्ट पँट चे खिसे तपासले, त्याला चॉकलेट सापडलं त्याने ते सोनलला दिल, हे खा थोडं,
सोनल ने अर्ध चॉकलेट राहुलला दिल...
"आम्हीही कालपासून झोपलेलो नाहीये",..... राहुल
" हो रे, त्या संतोषच्या मूर्खपणामुळे सगळ्यांना त्रास होतो आहे",..... सोनल
बराच वेळ ते चालत होते, रस्ता काही दिसत नव्हता,
"मला अस वाटतय सोनल आपण हरवलो, काहीही करून संध्याकाळच्या आत रस्ता दिसायला हवा, समोरच गाव ही दिसत नाही, काय करू या ",..... राहुल
"अस मागे गेलो तर ",.... सोनल
" नाही आता कुठून आलो हे लक्ष्यात नाही अजून चुकू आपण",..... राहुल
आधीच फिरून फिरून सोनल खूप थकली होती त्यात रस्ता चुकला ऐकल्यावर ती खाली बसली, आता कस होणार राहुल, जंगलात प्राणी असतिल ना..
"तू घाबरू नकोस होईल काही तरी",...... राहुल
...........
...........
प्रशांत संतोष फार्म हाऊसच्या आसपास बर्याच आत जावून परत आले कुठे ही सोनल दिसली नाही सचिनला बांधल होत तिथे ते आले
"सांग तुझ्या सोबत कोण आल होत सचिन? राहुल होता ना? सोनल कुठे आहे"?,.... संतोष
"मला कस माहिती सोनल कुठे आहे ते? मी तिला शोधायला म्हणून इथे आलो",..... सचिन
"सांग लवकर नाही तर मी खूप मारेन ह तुला",...... प्रशांत
तेवढ्यात रमेश दादा वैभव दादा पोलिस जीपने तिथे आले, एकच मारामारी सुरू झाली, संतोष प्रशांत आणि त्यांच्या मित्रांजवळ काठय़ा चाकू बरेच होते, रमेश दादाने खूप मारल दोन तीन मुलांना, वैभव दादा अनुभव नसतांना चांगला प्रतिकार करत होता, हवालदार काकानी सगळ्यांना पकडल, बेड्या ठोकल्या, मागून पोलिसांची मोठी व्हॅन आली त्यात बसवल त्यांना
"सोनल कुठे आहे सचिन"?,..... वैभव दादा काळजीत होता
"ती राहुल बरोबर आहे, राहुल येवून घेवून गेला तिला, थोड्या वेळा पूर्वी ते निघाले इथून ",...... सचिन
"कुठे गेले ते दोघं माहिती नाही, मी या दोघांना बोलण्यात गुंतवल ते दोघ मागून पळाले, आम्हाला माहिती नव्हत तुम्ही केव्हा याल इथे",...... सचिन
"ठीक केल तुम्ही जर आम्हाला उशीर झाला असता तर, हे मूल डेंजर आहेत बघितल ना किती शस्त्र आहेत त्यांच्या कडे",...... वैभव दादा
" आमच असं ठरल होत ते आसपास असतिल लपलेले, पण प्रशांत ते त्यांना शोधून आले ते सापडले नाही बहुतेक आत गेले असतिल जंगलात",...... सचिन
" तुला लागल नाही ना जास्त ",..... वैभव दादा
" नाही दादा मी ठीक आहे ",..... सचिन
" जंगल किती मोठ आहे काही कल्पना आहे का कोणाला, आसपास चौकशी करा, हवालदार काका, अजून एकाला सोबतीला बोलवून घ्या, त्या दोघांना शोधायला हव",....... रमेश दादा
हवालदार काकांनी फोन लावला, पोलिस स्टेशन मधून अजून एक दोन जणांना बोलवुन घेतलं,
सगळ्यांनी आता जंगलात राहुल सोनलचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, एक आजोबा भेटले रस्त्यात,
" जंगलाच्या त्याबाजुला काय आहे काका, किती मोठ आहे जंगल "?,..... वैभव दादा
"काही नाही, त्या टोकाला एक रस्ता आहे तो पण याच गावाला येतो, पण जर रस्ता चुकलो तर खूप चालावं लागतं",..... आजोबा
"काही भीती तर नाही ना" ,...... रमेश दादा
" नाही, इथे हिंस्र प्राणी नाहीये जंगलात, तरी सावध राहावं काही सांगता येत नाही जंगल आहे हे ",..... आजोबा
" तुम्ही काय करताय इथे",...... रमेश दादा
"माझ शेत आहे पुढे, थोड्या उतारावर बरेच लोक राहतात, काळजी करू नका ",....... आजोबा
आता तर वैभव दादाला अजूनच काळजी वाटत होती काय कराव घरी आईला बरं नाही, सोनल राहुल हरवले, घरी काय सांगणार, ते परत रिसॉर्ट कडे वापस आले
बाबांचा फोन आला तेवढ्यात,.... "काय झालं सोनल सापडली का? ",...
" बाबा सोनल राहुल सोबत आहे, तुम्ही काळजी करू नका, आई कशी आहे" ?,...... वैभव
"सोनल राहुल सोबत आहे म्हणजे काय? तुझ्यासोबत नाहीये का ती? पकडलं ना संतोष आणि त्याच्या मित्रांना, काय सुरू आहे तिकडे नेमक ",...... बाबा
"पकडल आहे संतोषच्या मित्रांना, पण सोनल त्याआधीच राहुल सोबत इथून निसटली, तुम्ही काळजी करू नका बाबा, आम्ही तिचा शोध घेत आहोत, सापडतील ते, मी लगेच कळवतो तुम्हाला, तुम्ही आईला सांगून द्या की संतोष आणि त्याच्या मित्रांना पकडला म्हणजे आईला बरं वाटेल ",..... वैभव
" हो चालेल, सोनल मिळाली की लगेच कळव",..... बाबा
.......
.......
एक दोन पोलिसांना तिथे उभ करून बाकीचे निघाले,
पोलिस व्हॅन मध्ये संतोष प्रशांत आणि त्याचे मित्र बसलेले होते,
" माझं खरं चुकलं प्रशांत, सोनल वर विश्वास ठेवून",..... संतोष
" तू अजूनही ऐकूच नको आमचं संतोष, आज जर तू ऐकलं असतं तर सोनल तुझी बायको असती, आता गेली सोनल हातची, राहुल आता घरी गेला की सोनलशी लग्न करून घेईन, तोपर्यंत आपण लॉक अप मध्ये राहू",....... प्रशांत
संतोष प्रचंड चिडलेला होता,...." मी बाबांना सांगतो काहीतरी ओळख काढायला, लवकर निघु आपण जेलमधून, मग बघतो मी सोनल कडे",...
" नाही संतोष मी तुला आता मदत करणार नाही, तू आमची मदत घेतो आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तू आमचं काही ऐकत नाही, तोंडघशी पडलो ना आम्ही, पोलिसांनीही पकडलं, घरचे माहिती नाही आता काय ऍक्शन घेतील आमच्यावर, यापुढे तू जाणे आणि तुझी सोनल जाणे, मी तरी त्यात पडणार नाही ",...... प्रशांत
"असा रागवू नको प्रशांत माझं चुकलं, जाऊदे ते सोनल प्रकरण, पण आपली दोस्ती तुटायला नको",...... संतोष
तरीही प्रशांत रागातच होता, गाडी पोलिस स्टेशनला आली सगळ्या मुलांना लॉक अप मध्ये टाकलं,
..........
..........
" मी घरी जावून येतो आई बाबा काळजीत आहेत",.... वैभव
"हो जावून या ",..... रमेश दादा
" तो पर्यंत सोनल च काही समजल तर कळवा",..... वैभव
हो....
वैभव दादा घरी जात होता, निशा वहिनी चा फोन आला,...... "सापडल्या का सोनल ताई",
"हो पत्ता लागला आहे, संतोष ला अटक केली पोलिसानी, मी आता घरी जातो आहे, येईल सोनल उद्या घरी, निशा तू येशील का उद्या घरी, मला खुप बोलायचा आहे तुझ्याशी, सोनलला ही गरज आहे तुझी" ,....... वैभव
" हो येते मी उद्या",.... निशा
.....
.....
सोनल आणि राहुल आता चालून चालून खूपच थकले होते, बहुतेक आपण खूप आत जंगलात येऊन गेलो आहोत, आता काय करायचं?, दोघांच्या चेहर्यावर काळजी होती, अर्ध्या एक तासाने संध्याकाळ होईल मग तर काहीच दिसणार नाही जंगलात
" मला खुप तहान लागली आहे राहुल आणि चक्करही येत आहेत आता",....... सोनल
"धीर सोडू नको सोनल, आता दिसेलच रस्ता राहुल ने सोनल चा हात अजून घट्ट धरला, माझा आधार घेऊन चाल सोनल, समोर थोडा प्रकाश दिसतो आहे वाटतय की घर आहे पुढे, चल आपण जाऊन बघू",...... राहुल
थोडे चालून गेल्यानंतर समोर एका झोपडी सारखं घर दिसलं, ते बघ सोनल घर, चल आपण तिथे जाऊन बघु, दोघ घराजवळ गेले, राहुलने सोनलला एका झाडामागे उभा केलं,....." मी जवळ जाऊन बघतो कोण आहे तिकडे, जर समजा बदमाश गुंड असतील घरात तर आपल्याला मागच्या मागे पळून जायला बरं, मि इशारा केल्याशिवाय काहीही झालं तरी तू पुढे येऊ नकोस" ,
"ठीक आहे पण तू पण काळजी घे एकदम आत जाऊ नकोस ",..... सोनल
राहुल घराच्या दिशेने निघाला...........
.........
काय होईल पुढे, राहुल सोनल ला रस्ता सापडेल का?,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा