Jan 29, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 21

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 21

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 21

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

सोनल जरा वेळ खाली आली, आजूबाजूला बघत होती ती काय आहे, सगळीकडे शेत होतं, रस्ता कुठे दिसत नव्हता, एक म्हातारे बाबा काम करत होते,ते सोडून कोणीही नव्हत आसपास, सोनल जरावेळ जाऊन तिथे एका झाडाजवळ बसली, प्रशांत संतोष बाजूला उभे होते

सोनल हळूच ते बाबा काम करत आहे त्या साईडला गेली, बाबा तिच्या कडे बघत होते ,.... "हे कुठलं गाव आहे बाबा, तुम्ही किती दिवसापासून राहतात ईथे",...

"कोण ताई तुम्ही" ,...... बाबा

" मी काल पासुन इथे आहे या मुलांसोबत, मला घरी जायच आहे, मला माहिती हवी आहे थोडी बाबा ",...... सोनल

" हे बघ ताई, मला तुला काहीही माहिती सांगता येणार नाही, तसं मला हे पोरं ओरडतील",..... बाबा

" मी तुमच्या पोरी सारखी आहे बाबा, संकटात आहे मी, माझ्या मनाविरुद्ध मला इथे घेवून आले आहेत हे लोक, प्लीज सांगा, मदत करा, जर तुम्ही इथून बाहेर गेले तर बाहेर जावुन पोलिसांना सांगा माझ्या बद्दल , मी हात जोडते ",...... सोनल

बाबा आश्चर्याने सोनल कडे बघत होते, असे करतात का हे मुल मला माहिती नव्हत, मी जातो थोड्या वेळाने बाहेर , देतो पोलिसांना खबर, बाबांनी गावाचं नाव सांगितलं

" आम्ही जरी इथून गेलो तरी एक मुलगा मला शोधत येईल, राहुल त्याच नाव, त्याला जर वाटलं मदत करायचं तर करा, हे मूल काय बोलताय ते नीट ऐका बाबा",..... सोनल

"सोनल आत येऊन बस, काय करते आहेस तिकडे" ,...... प्रशांत ओरडला

बाबा पटकन बाजूला झाले, सोनल घाबरली

"बसू दे तिकडे उन्हात तिला",.... संतोषने लगेच बाजू घेतली

" बघितलं का संतोष किती नाटक करते आहे सोनल, तुला समजत नाही आहे का, बाबांन शी बोलते आहे ती",..... प्रशांत

" हो का...... बाबा काय बोलली सोनल",...... संतोष

"काही नाही, पोरगी बोलत होती इकडे खूप छान वाटत, मी बोललो गावाकडचा वारा छान असतो, तेवढ्यात या दुसर्‍या पोराने आवाज दिला ",..... बाबा

संतोष प्रशांत कडे रागाने बोलत होता,...... "प्रशांत तू सोनल बद्दल काहीही बोलू नकोस, ती आहेच तेवढी चांगली, ती काहीही सांगता नव्हती अस बाबांना, मुळात तिची ओळख नाही त्यांच्याशी, सोनल चा विश्वास आहे माझ्या वर, आत्ता बघितलं का तिला माझा आधार वाटला, ती हळूहळू मी सांगेल ते ऐकते आहे, लग्नाला ही तयार आहे ती, उगीच सारख बोलू नकोस तिला ",.....

" हा तुझा भ्रम आहे संतोष, सोनल दिसते तेवढी भोळी नाही ",...... प्रशांत

" काय बोलतो आहेस तू प्रशांत? मी तुला सांगितलं ना की सोनल बद्दल काहीही बोलायचं नाही, आणि सोनल माझ ऐकते हे तुला आवडत नाही का ",...... संतोष

" तू तिच्या प्रेमात पार आंधळा झाला आहे संतोष, जरा डोळे उघडून लक्ष दे सोनल कडे, नाहीतर ती केव्हाच पसार होईल",...... प्रशांत

" अशी कशी पसार होईल ती, कुठल्या गावाला आहे ती तिला माहिती नाही, आपले किती मित्र आजूबाजूला आहेत, कुठल्या साईडला गेल्यावर कुठला रस्ता लागतो हे पण तिला माहिती नाही आणि कालपासून बघतो आहेस ना तू तिने काहीही त्रास दिला नाही, बहुतेक तिला मी पसंत असेल, आता तिने मला मिठी ही मारली, होकार असेल तिचा ",........ संतोष

" तू तिच्या होकाराची वाट बघत बसू नको, दोन तासांनी तिच्याशी लग्न उरकून घे ",...... प्रशांत

हो.........

प्रशांत फोन वर सामान अरेंज करत होता

प्रशांत संतोष चा मित्र घाईघाईने आत आला, त्याने काहीतरी प्रशांत च्या कानात सांगितलं,......" संतोष आपल्याला घाई करायला पाहिजे पोलीस इकडे येत आहेत",...

" अरे पण प्रशांत त्यांना कस समजला आपला पत्ता, लग्न आहे ना आता इथे, पण आता जायचं कुठे आपण", ?..... संतोष

"इथून जवळच जंगलाच्या बाजूला माझ्या एका मित्राच्या फार्म हाऊस आहे तिकडे जाऊ, मी बोलून घेतो त्यांच्याशी, मग तिकडे ठरवू पुढचा प्रोग्राम, हे अस होत काल रात्री ऐकल असत माझ तर आता पर्यंत लग्न झालं असत तुझ आणि सोनल च ",..... प्रशांत वैतागला होता

प्रशांत ने पटकन गाडी काढायला सांगितली...

संतोष सोनल आणि इतर मित्र सगळे गाडीत बसले

सोनल त्या आजोबांकडे बघत होती, आजोबा सोनल कडे बघत होते, सोनल आजोबांच्या पाया पडायला गाडीतून उतरली, तिने आजोबांना राहुल ने दिलेल्या बांगड्या दिल्या, सोनल ने डोळ्याने आजोबांना खुणावलं हात जोडले, प्लीज मदत करा आजोबांनी डोळ्याने आश्वासन दिलं,

काय होणार आहे पुढे काय माहिती, आता तिकडे जावून लगेच लग्न आहे, देवा मला वाचव, संतोष सोबत त्याचे मित्र नको होते, त्याचे मित्र जरा जास्तच हुशार आहेत, संतोष एकटा असता तर त्याला चांगलंच गुंडाळून असतं, आताही परत कुठल्या कुठे जातो आहे आपण जंगलात , काही तरी करायला हव

रमेश दादा, वैभव दादा, राहुलला सापडेल का हे गाव? , पोलिस येता आहेत म्हणजे रमेश दादा असतिल, थोड बर वाटत होत सोनल ला, मी कधी जाणार आहे घरी वापस, मी हे असं एवढ्या मुलांमध्ये नाही राहू शकत, संतोष ठीक आहे पण प्रशांत खूपच शहाणा आहे, त्याला कळून चुकलं माझा डाव, मला कसं बोलत होता प्रशांत थोड्यावेळापूर्वी की अजिबात शहाणपणा करायचा नाही, पण अजूनही संतोषच्या माझ्या बाजूने आहे ही एक जमेची बाजू आहे, खूपच उदास होत आहे मन, कुठे आहेस राहुल, बरी असेल का त्याची तब्येत, तू खुप रडावसं वाटत आहे, देवा प्लीज लवकर या संकटातून बाहेर काढ, आई बाबा कसे असतील?

गाडी वेगाने निघाली रस्ता कुठे जातो आहे हेही समजायला मार्ग नव्हता, संतोष सोनल जवळ बसला होता, आज काल पेक्षा दोन तीन मूल कमी होते गाडीत, घरी गेले की काय ते काय माहिती.... सोनल विचार करत होती
...............

"आपल्याला लगेच निघावं लागेल वैभव फार्म हाऊस चा पत्ता मिळाला आहे",....... रमेश दादा

" मी पण येतो सोबत ",...... राहुल

"नाही राहुल तुला सोबत देणार लिहिता येणार नाही तू घरी जा, उगीच सोनल ला तू दिसला तर गडबड होईल फार सावध होवुन कराव लागेल हे काम, तू आई बाबांन कडे आणि सोनल च्या घरी लक्ष् दे ",....... रमेश दादा

" दादा प्लीज मला येवु दे मला माहिती आहे ते मुलं कसे आहेत ते",........ राहुल

" नाही म्हटलं ना राहुल तू घरी जा, खरंतर वैभव दादाला पण सोबत घेणार नव्हतो आम्ही पण घेतो आहोत",..... रमेश दादा

" तुम्ही दोघं असे करू नका मला सोबत घ्या",...... राहुल

" नको तिथे सोनल दिसली की उगीच गोंधळ घालशील आम्हाला थोडी आयडिया करायची आहे ",.... रमेश दादा

" प्रॉमीस मी अजिबात काहीही करणार नाही तुम्ही लोक जे म्हणाल ते मी आहे की मला घेऊन चला सोबत",...... राहुल

तरी रमेश दादा आणि वैभव दादाने राहुल च ऐकलं नाही

रमेश दादा वैभव दादा पोलीस जीप ने निघाले, त्यांनी मुद्दामच राहुल ला सोबत घेतला नव्हतं

राहुलला काही सुचत नव्हतं काही त्याने त्याच्या मित्र सचिनला लगेच फोन लावला, सगळं सांगितलं काय झालं ते

" मी इथे जवळ आहे येतो दोन मिनिटात, मग आपण दोघं जाऊ",...... सचिन

" लवकर ये रमेश दादा निघाला आहे, मेन रोड पर्यंत रस्ता मला माहिती आहे, नंतर त्यांच्या मागे जावे लागेल हळूहळू, लवकर ये ",..... राहुल

राहुल चुपचाप मागून मोटारसायकलवर येत होता सचिन सोबत

रमेश दादा वैभव दादा फार्महाऊस वर पोहोचली, तिथे कोणी नव्हत, आजोबा झाडाच्या सावलीत बसलेले होते

" कोण तुम्ही आजोबा, तुमच घर आहे का हे ",..... रमेश दादा

" नाही माझ ते बाजूच घर आहे, मी इथे रखवालदार आहे",..... बाबा

"आजोबा इथे काही मुल आले होते का रात्री एका मुली सोबत",...... रमेश दादा

"हो आले होते",.... बाबा

"का आले होते ",.... रमेश दादा

"ते मला माहिती नाही काही साहेब",.... बाबा

"कुठे गेले ते",..... रमेश दादा

" माहिती नाही, आता थोड्या वेळा पूर्वी गेले ते",..... बाबा

"कोणाच घर आहे हे, कुठे आहे बाकीचे घरचे, नीट सांगा बाबा नाहीतर तुम्हाला अटक करावी लागेल ",....... रमेश दादा

" मला माहिती नाही काही, मी सांगितल ना साहेब मी बाजूला राहतो, मला दर महिन्याला पगार मिळतो, इथे बरेच लोक येतात ट्रीप ला, आम्ही नाही करत त्यांची चौकशी ",...... बाबांना समजत नव्हत मदत करावी की नाही वैभव दादा रमेश दादा ला, नक्की कोण आहेत हे, पोलिस तर दिसतो एक मुलगा पण नक्की कोणाच्या बाजूने आहेत, नाही तर सोनल ला अजून त्रास व्हायचा, म्हणून बाबानी रिसॉर्ट चा पत्ता दिला नाही रमेश दादाला

" काय कराव आता",..... वैभव दादा टेंशन मध्ये होता

गल्ली च्या कोपर्‍यावर उभा राहून राहुल सगळ बघत होता

जसे रमेश दादा वैभव दादा ची जीप निघाली, तो झाडाआड लपला, नंतर राहुल आणि सचिन फार्म हाऊसवर गेले, ते आजोबा दोघांकडे बघत होते, राहुल खाली बसला, त्याने प्रेमाने आजोबांचा हात हातात घेतला,...... "आजोबा मी राहुल मला माहिती आहे की तुम्हाला सगळं माहिती आहे, माझी सोनल इथेच होती रात्रभर, जर तुम्ही मला मदत केली तर त्या मुलांच्या तावडीतुन मी सोनल सोडू शकतो, प्लीज मला मदत करा आजोबा ",.......

राहुल रडायला लागला, रात्रभरापासून त्याने आपले इमोशन्स लपवून ठेवले होते, जेव्हापासून सोनल गायब होती त्याला काही सुचत नव्हत, एवढी चांगली सोनल किती त्रास सहन करत असेल तिलाच माहिती, राहुल खूपच घाबरून गेला होता, सोनलला काही झालं तर मी जिवंत राहणार नाही, संतोष प्रशांत काही चांगली मुलं नाहीत, त्यात एक गोष्ट बरी आहे कि संतोष च सोनल वर खूप प्रेम आहे त्यामुळे तो तिला त्रास देणार नाही, हीच एक आपली जमेची बाजू आहे, ते लोक सोनल ला घेऊन जंगलाचा रिसॉर्टवर गेले आहेत,...... "कुठे आहे तो पत्ता माहिती आहे का तुम्हाला बाबा" ?,.......

बाबांनी तिकडे कसं जायचं सगळं नीट सांगितलं,

"किती मुले आहेत ते सगळे",..... राहुल

"आत्ता संतोष सोबत चार मुले आहेत, दोन मुलं सकाळीच बाहेर गेले ते अजून आले नव्हते",..... बाबा

"ठीक आहे बाबा आम्ही निघतो ",..... राहुल

बाबांनी राहुल ला सोनल च्या बांगड्या दिल्या, त्या बघून राहुल ला अजून भरून आल, एकदम गप्प झाला तो

"सोनल ठीक होती ना बाबा",...... राहुल

" हो ठीक होती ती , काळजी करू नकोस, तुमची लवकर भेट होईल, लग्न झाल की या भेटायला मला, माझे आशीर्वाद आहेत तुम्हाला",..... बाबा

"नक्की बाबा",..... राहुल बाबांच्या पाया पडल्या

राहुल सचिन तिथून निघाले, आजोबांनी सांगितल्याप्रमाणे जंगलातील रिसॉर्टच्या जवळच पोहोचले
.........

संतोष प्रशांत सोनल आणि अजून एक-दोन जंगलातील घराजवळ पोचले सगळे खाली उतरले, संतोष सोनल ला घेऊन वरच्या रूम मध्ये गेला तिला वरती बसायला सांगून संतोष खाली आला,

"या घरात काहीच नाही आहे प्रशांत" ,....... संतोष

"हो ना, आपल्याला जेवण वगैरे लागेल, मी एक काम करतो मी जाऊन थोडं खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन येतो आणि अजून मुलांनाही घेऊन येतो म्हणजे ते मेन रोड वर लक्ष ठेवतील जर समजा पोलीस वगैरे येत असतील तर आपल्याला लगेच समजेल ",..... प्रशांत

" हो चालेल लवकर ये संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करून ये म्हणजे सारखं बाहेर जायला नको, आणि लग्नाच काय करायच ",....... संतोष

" बघतो मी, इथे काही शक्य नाही, आपल्याला इथून निघाव लागेल, आजच्या दिवस राहू इथे उद्याची सोय करतो मी, छान गावत घर बघू, मग उद्या करु लग्न",...... प्रशांत

" चालेल, लवकर ये रे इथे आम्ही दोघ आहोत आणि सोनल ",...... संतोष

प्रशांत एका मित्रासोबत बाहेर जायला निघाला,....." तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या तोपर्यंत इकडे , आम्ही येतो एक दोन तासात, काही वाटल तर फोन कर संतोष ",...
..........

समोरून एक गाडी येताना दिसली, तसं राहुल आणि सचिन गाडी वर बाजूला जाऊन लपले, गाडी जवळून गेली, गाडीत प्रशांत होता आणि एक मुलगा होता म्हणजे आता रिसॉर्ट फक्त संतोष आणि एक मुलगा आहे आणि सोनल असेल,

" सचिन तू आत्ताच्या आत्ता गावी फोन कर आणि रमेश दादा ला इथला ला पत्ता देऊन त्यांना बोलवुन घे, आपण दोघं जाऊ तिकडे फार्म हाऊस वर, तू त्या दोघांना बोलण्यात गुंतव मी पटकन घरात शिरतो सोनल कुठे आहे ते बघतो",...... राहुल

" हो चालेल" ,...... सचिन ने रमेश दादा ला फोन करून येथे काय झालं आहे ते सगळं सांगितलं, इथला पत्ता दिला आणि लगेच अर्ध्या तासात या असं सांगितलं

रमेश दादा वैभव दादा रस्त्यातच होते, त्यांनी लगेच गाड्या इकडे वळवल्या

राहुल सचिन ने ती गाडी तिथेच बाजूला लावून ठेवली, दोघं लपत छपत घरापर्यंत गेले, सोनल दिसत नव्हती, संतोष हि नव्हता, एक मुलगा बाहेर बसलेला होता, राहुल आणि सचिन घरापर्यंत गेले,

"काय करायच राहुल, रमेश दादा साठी थांबायचं की जायच पुढे",....... सचिन

"पुढे जाऊ या कारण रमेश दादा ला यायला किती वेळ आहे हे आपल्याला माहिती नाही आणि जर प्रशांत काही कारणाने वापस आला तर परत आपला प्लॅन फिस्कटू शकतो, आता सोनल ला जेवढ्या लवकर या मुलांच्या तावडीतुन बाहेर काढता येईल तेवढ चांगला आहे, मी सोनल ला घेऊन पुढे गावाकडे निघतो, तू दादा येई पर्यंत ह्या मुलांना बोलण्यात गुंतवून ठेव",........ राहुल

ठीक आहे.......

" आय एम सॉरी सचिन मी तुझा जीव खूप धोक्यात घालतो आहे ",...... राहुल

"अरे असं कशाला म्हणतो राहुल, मला माहिती आहे की मी तुझ्यासोबत आलो म्हणजे थोडातरी धोका आहे आणि आपल्या मैत्रीसाठी आणि सोनल च्या चांगल्यासाठी मी काहीही करायला तयार आहे",........ सचिन

सचिन एकटा पुढे गेला........

" कोण आहेस तू काय हव आहे",..... त्या मुलाने विचारलं,

तसा संतोषही खाली आला, त्याने सचिनला ओळखलं, हा राहुल चा मित्र आहे सचिन

राहुल च नाव ऐकून सोनल जागेवरच उठली, ती सुद्धा पळत खाली आली, संतोष आणि त्याच्या मित्राच सचिनशी भांडण चाललं होतं, सचिन ने संतोष आणि त्याच्या मित्राला धरून ठेवलं, सोनल पळत बाहेर आली तिला त्या साईडला राहुल दिसला, राहुल ने तिला हात दिला, ती गुपचूप मागच्या बाजूला आली, ती आणि राहुल मागे जंगलाच्या बाजूने पसार झाले,

संतोष आणि मित्र सचिनशी भांडत बसले, सचिन ला समजल राहुल आणि सोनल निसटले, पण हे लगेचच संतोषला समजता कामा नये, नाही तर तो त्या दोघांच्या मागे गेला असता, तोपर्यंत रमेश दादा ही येईल ईथे, तोपर्यंत सचिनला या दोघांशी भांडायचं होतं

"संतोष माझा हात सोड मला राहुल ला फोन करायचा आहे, त्याला सांगायचं आहे की सोनल ईथे आहे तुमच्या सोबत",...... खोटं खोटं सचिन भांडत होता

सोनल ची आठवण आल्यावर संतोषने पटकन घराच दार लावून घेतलं, त्याला काय माहिती की सोनल आधीच पसार झाली आहे,

............

सोनल राहुल पोहोचतील का नीट घरी? की परत पुढे काही तरी संकट येईल? , संतोष आणि त्याचे मित्र शोधतील का सोनल राहुल ला? ......... काय होईल पुढे? ...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now