Jan 29, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 20

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 20
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 20

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........


सोनल च्या घरी आई ची तब्येत आता ठीक होती , राहुल ही ठीक होता, वैभव दादा खूप शांत झाला होता, संतोष काय केल हे तू माझी एवढी हुशार छान बहीण, मी काहीही करून तिला तुझ्या ताब्यातून परत आणेन,...... "आई बाबा मी बाहेर जाऊन येतो, थोडी चौकशी करायची आहे मला",

"थांब दादा, मी पण येतो मला माहिती आहेत संतोष चे मित्र",....... राहुल

"पण तुला बर वाटतय का",... वैभव दादा

"हो ठीक आहे मी, आता आराम करून उपयोग नाही",..... राहुल

दोघ घरातून निघाले

आई बाबा दोघ हताश होऊन बसले होते,....." काय झालं असेल हो सोनल सोबत ",....

"संतोष वागायला वाईट असला तरी तो सोनल सोबत अस तस काही करणार नाही तू काळजी करू नकोस येईल सोनल नीट घरी माझा विश्वास आहे",......बाबा

........

वैभव दादा राहुल सोबत संतोष च्या मित्रांकडे गेला, कोणी ही घरी सापडल नाही, बर्‍याच ठिकाणी फिरले ते

" तुला कोणावर संशय आहे का राहुल, आठव कोण कोण असायच तुमच्या आजुबाजूला ",......... वैभव दादा

"वैभव दादा तो अविनाश असायचा सारखा आमच्या पाळतीवर, बहुतेक त्याला माहिती असेल सगळ, आपण तिकडे जावून बघू या का",........ राहुल

"हो चल, तुला माहिती आहे ना त्याच घर",........ वैभव दादा

हो.......

दोघ अविनाश कडे गेले, अविनाश बाहेर बागेत कोणाशी तरी बोलत होता, तसे ते दोघ लपले

" दादा तु रमेश दादा ला फोन करून इकडे बोलवून घे,
अविनाश ला अटक करू आपण, त्याला असते संतोष ची माहिती, त्या शिवाय तो बोलणार नाही ",...... राहुल

वैभव दादा ने रमेश दादा ला फोन केला....... "लवकर या इकडे संतोष चा एक मित्र आहे इकडे अविनाश, बहुतेक काही माहिती मिळेल आपल्याला ",

" मला यायला पंधरा वीस मिनिट लागतील, तोवर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा, अविनाश कुठे गेला तर तुम्ही पाठलाग करा ",....... रमेश दादा

ठीक आहे.......

पंधरा मिनिटांनी रमेश दादा दोन हवालदार काकांन बरोबर आला, सगळे अविनाश च्या घरत गेले, पोलिसांना बघून अविनाश चपापला,......

" काय हवय तुम्हाला इंस्पेक्टर साहेब ",....... अविनाश चे बाबा

" तुम्ही घाबरू नका काका आम्हाला अविनाश शी थोड बोलयच आहे",........ रमेश दादा

हवालदार काकानी पुढे होवुन अविनाश चा फोन हातातून काढून घेतली

"काय झाल नक्की? मला समजेल का",...... काका

रमेश दादा ने सगळ सांगितल........" हा अविनाश त्या संतोष ला मदत करत होता, बघितल ना काय होवुन बसल आता",

अविनाश चे बाबा खूप चिडले होते....... "आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार करायला तयार आहोत",..

"तुमची हरकत नसेल तर आम्ही अविनाश ला आमच्या सोबत नेतो, घाबरू नका त्याला काही धोका नाही, फक्त चौकशी साठी नेतो आहोत, वाटल तर तुम्ही चला सोबत",........ रमेश दादा

"घेवून जा त्याला, काय गरज होती हे असे उद्योग करायची, माझा विरोध आहे, हे अस वागायच असेल तर या घरात राहायच नाही अविनाश, समजल का, समज ही द्या त्याला थोडी इंस्पेक्टर साहेब ",....... काका

रमेश दादा अविनाश ला घेवून गेले

राहुल, वैभव दादा ही मागून गेले

अविनाश प्रचंड घाबरलेला होता, त्याला लॉक अप मध्ये टाकल, रमेश दादा आत आला, अविनाश उठून उभा राहिला

" मला खरच काहीही माहिती नाही इन्स्पेक्टर साहेब, मी फक्त संतोष चा मित्र आहे, कधी कधी मी सोनल आणि राहुल वर लक्ष द्यायचो, काय झालं आहे नक्की",...... अविनाश

"तुला माहिती नाही का काय झालं ते, तू आम्हाला मदत करायला तयार आहे का",...... रमेश दादा

"हो मी करेन मदत, पण काय झाल नक्की, मला माहिती नाही, साहेब मला सोडा, संतोष च्या मेन ग्रुप मधे मी कधीच नव्हतो ",..... अविनाश

" जो पर्यंत काही तपास लागत नाही तो पर्यंत आम्ही तुला सोडणार नाही ",...... रमेश दादा

हवालदार काका अविनाश चा फोन आणा इकडे......

" संतोष ला फोन लाव, विचार त्याला कुठे आहे तो, सांगू नको आम्ही तुझ्या सोबत आहे ते",.......

अविनाश ने फोन लावला, फोन स्विच ऑफ येत होता..

" अजून कोणी मित्र आहे का ओळखीचे जे संतोष सोबत असतील",....... रमेश दादा

"हो आहे साहेब प्रशांत आहे, पण त्याचा ही फोन बंद आहे",...... अविनाश

" अजून कोणी आहे का जो संतोष आणि तुझ्या खूप जवळचा आहे ",....... रमेश दादा

" हो आहे एक मंगेश म्हणून",........ अविनाश

" विचार त्याला फोन करून",..... रमेश दादा

" हो बघतो",...... अविनाश

"तू आमच्या ताब्यात आहे हे कळता कामा नये नाहीतर आम्ही तुला सोडणार नाही ",....... रमेश दादा

ठीक आहे......

अविनाश ने फोन लावला मंगेश ने फोन उचलला हा मंगेश मी अविनाश बोलत आहे...

बोल अविनाश.....

"संतोष प्रशांत कुठे आहे हे माहिती आहे का तुला? तुला समजलं का काही",..... अविनाश

" हो मला समजल आहे सोनल आणि संतोष प्रकरण ना",...... मंगेश

" हो तेच, काही प्रॉब्लेम झाला का" ?,...... अविनाश

"नाही मी लक्ष देऊन आहे सोनालीच्या घराकडे आता थोड्या वेळात पूर्वी तिकडे पोलीस आले होते तेच संतोषला सांगायचं होतं की सावध रहा ",...... अविनाश

" ठीक आहे मी सांगतो त्याला ",....... मंगेश

" अरे पण एक मिनिट कुठे आहे संतोष कुठे घेऊन गेला आहे सोनल ला ",....... अविनाश

"हे बघ अविनाश हे मलाही माहिती नाही संतोष आणि प्रशांत चे फोन बंद आहेत मी बघतो काय करता येईल ते",..... मंगेश

" फोन बंद आहे तर मग तू कस काय देशील त्यांना निरोप",........ अविनाश

" बघू उद्या सकाळ पर्यंत वाट ",...... मंगेश

" अर्जंट आहे मंगेश, तिकडे संतोष च्या घरी पोलीस गेले होते आणि संतोष च्या बाबांना अटक झाली आहे",....... अविनाश

" हे काय बोलतो आहेस तू, ठीक आहे मी लगेच संतोषला सांगतो ",..... मंगेश

" कुठे गेले आहेत पण ते",...... अविनाश

" प्रशांत आहे ना त्याचे एक नातेवाईक आहे गावाकडे त्याचं फार्महाऊस आहे इथून तीस किलोमीटरवर तिथे गेले आहेत बहुतेक इथला लँडलाईन चा नंबर आहे तिथे करतो मी फोन ठीक आहे मला जरा वेळाने कळव काय झालं ते",...... मंगेश

" ठीक आहे",.....

"तो सांगणार आहे जरा वेळाने तो संतोषला फोन करतो आहे आहे ",..... अविनाश

" कुठे आहे ते लोक ",..... रमेश दादा

" प्रशांतच्या नातेवाइकांचा फार्महाऊस आहे तीस किलोमीटर गावाला तिथे गेले आहेत ते, हा घ्या माझा फोन, मंगेश फोन करेन थोड्या वेळाने तिकडे आणि मग मला सांगेल काय करायचं आहे ते",.......अविनाश

ठीक आहे......

" हवालदार काका अविनाश जवळ बसा त्याचा फोन तुमच्या हातात घ्या जर मंगेश चा फोन आला तर त्याला बोलू द्या जास्त बोलायला लागला तर फोन हिसकावून घ्या",...... रमेश दादा

ठीक आहे.....

रमेश दादा बाहेर गेला त्याने वैभव दादाला आणि राहुल ला सगळं सांगितलं

" मी जातो तिकडे",..... राहुल

" थांब राहुल एवढ्या घाईने डिसिजन घेऊ नको येतो आहे मंगेश चा फोन",..... रमेश दादा
.......
संतोष चे बाबा तिकडे पोलिस ठाण्यात बसले होते,.... काका तुम्ही जा घरी ",.

"नको मी थांबतो, जर मला अटक झाली हे संतोष आणि त्याच्या मित्रांना समजल आणि काही फायदा होणार असेल तर मी थांबतो",...... संतोष चे बाबा
........

मंगेश ने प्रशांत ला फोन केला

" अरे आता अविनाश चा फोन आला होता, संतोष च्या वडलांना पोलिसानी अटक केली",..... मंगेश

"काय बोलतोस, तुझ्या कडे आले होते का पोलिस",..... प्रशांत

" नाही इकडे नाही आले, कुठे आहात तुम्ही ",..... मंगेश

" इकडे फार्म हाऊस वर ",..... प्रशांत

"दोन दिवसाच्या वर थांबू नका एका जागी, झाल का संतोष च् लग्न ",..... मंगेश

" नाही अजून, मी करतो आहे पुढची प्लॅनिंग, तिकडे काय होत ते सांग ",..... प्रशांत

"तुला पोलिसांची भीती नाही वाटत का प्रशांत ",..... मंगेश

"असे बरेच लोकांना मदत केली आहे मी आणि माझ्या विरुद्ध काहीही पुरावा नाही त्यांच्या कडे, कश्या वरुन मी संतोष सोबत आहे, तू काळजी करू नकोस ",........ प्रशांत

" भारी यार काही लागल तर सांग",..... मंगेश

" संतोष आता मंगेश चा फोन आला होता, तुझ्या घरी पोलिस गेले होते, तू टेंशन घेऊ नकोस, तुझ्या बाबांना अटक केली",...... प्रशांत

तसा संतोष मटकन खाली बसला.....

" संतोष तू घाबरू नकोस, आयडिया असते ती त्यांची, तुझ्या विरुद्ध काही पुरावा नाही, आपण आता जरी सोनल ला सोडले तरी ती बोलली ना ती कंप्लेंन करणार नाही आपल्या विरुद्ध, नाही तरी तुला सोनल शी आता लग्न करायच नाही ना, मग सोडून ये तिला घरी ",........ प्रशांत

" एवढी रिस्क घेतली मी, ती काय तिला अशीच सोडून देण्या साठी का, त्या लोकांनी माझ्या बाबांना अटक केली, मी सोनल ला अस सोडणार नाही, मला सोनल शी लग्न करायचा आहे आता जे होईल ते, प्रशांत तू बरोबर बोलत होता तू कर आमच्या लग्नाची तयारी दोन तासात मला लग्न करायचं आहे सोनल शी",......... संतोष

"फायनली तुला समजल, मी लागतो तयारी ला तू सोनल कडे लक्ष ठेव ",....... प्रशांत

ठीक आहे....
......

जरा वेळाने मंगेश चा फोन आला अविनाश ला,........" "पोहोचले आहेत संतोष आणि ते तिकडे फार्म हाऊस वर आहेत, त्यांच्यासोबतच सोनल आहे, मी सांगितलं संतोषला की तुझ्या वडिलांना अटक झाली आहे",..

"मला पत्ता दे ना तिकडचा",...... अविनाश

मंगेशने गावाचं नाव सांगितलं बाकी माहिती नाही

" ठीक आहे ",....... रमेश दादांनी अविनाश सांगेल ते सगळं लिहून घेतलं
.........

सकाळ झाली सोनल उठली, ती विचारत होती काय करता येईल, बाहेरून दार वाजत होत, सोनल ने दार उघडल, प्रशांत आला होता चहा घेवून, त्याने चहा टेबल वर ठेवला,

" प्रशांत माझा या खोलीत जीव घाबरतो आहे, मी जरा खाली येऊन बसू का पाच मिनिट",.... सोनल

" सोनल हे जे तू काल पासुन नाटक करते आहेस ना संतोष शी नीट वागायचं ते मला समजत नाही का? असं वाटतं का तुला? , काही खाली यायची गरज नाही, पळून जायचा विचार दिसतो आहे तुझा",........ प्रशांत

"काय झालं आहे प्रशांत, तू का बोलतो माझ्याशी अस",..... सोनल

"तू संतोष समोर नाटक करू शकते, माझ्यासमोर अजिबात शहाणपणा चालणार नाही सोनल ",........ प्रशांत

"मी काय केल पण प्रशांत, मला आवडतो संतोष",..... सोनल

"हो का, मग हो ना लग्नाला तयार, काय नाटकं करते आहेस, मी सगळ सांगून देईन संतोष ला, तस ही आज आता तुझ लग्न आहे संतोष सोबत ",....... प्रशांत

कोणी सांगितल..... सोनल ला धक्काच बसला

" संतोष ने, तयार हो आता तुला आवडतो ना संतोष ",....... सोनल

" तुझी बहीण मीना आमच्या वर्गात आहे ना प्रशांत, त्या राकेश ला ती खूप आवडते, त्या राकेश ला अशी मदत करणार आहेस ना तू तुझी बहीण पळवून न्यायला ",...... सोनल

" सोनल.... माझ्या बहिणी चा विषय इथे नको काढायला, समजल का ,शहाणपणा नको करूस",...... प्रशांत चिडला होता

"का काय झाल, तुझी बहीण ती बहीण, मग मी कोण आहे? मी पण कोणाची बहीण, मुलगी, होणारी बायको आहे, लाज नाही वाटत का संतोष ला वाटेल ते सल्ले देतांना, मी आज तुला शाप देते तुझ्या घरी अस होईल, तुझ्या बहिणी च राकेश बरोबर बळजबरीने लग्न होईल ", ....... सोनल

"गप्प बस सोनल, खूप बोललीस ",....... प्रशांत

सोनल ने ऐकल जिन्यावर चपला वाजत होत्या, कोणीतरी वरती येत होत, तिने बघितलं संतोष वरती येत होता, हाच चान्स आहे,

संतोष वरती आला सोनल खूप घाबरली आहे अस दाखवत होती,
सोनलने पळत जाऊन संतोष ला मिठी मारली आणि ती रडायला लागली

" काय झालं आहे सोनल",...... संतोष काळजीने प्रशांत कडे बघत होता

"बरं झालं संतोष तू आला, हा प्रशांत मला वाटेल ते बोलतो आहे, धमकी देतो आहे, तो बोलला की मी चांगली मुलगी नाही",....... सोनल

"अरे पण झालंय काय सोनल, काय प्रशांत",....... संतोष

"असे मी काहीही म्हटल नाही तुला सोनल, आता तू माझ्यावर का एवढं चिडली आहेस",....... प्रशांत

सोनल खूप घाबरली अस दाखवत होती....

" काय झालं आहे सोनल सांग ना , कशाला नाटक करते एवढ ",...... प्रशांत

सोनल संतोष च्या मागे लपली

" काय झालं प्रशांत, तू का बोलतोस सोनल ला अस, मला मुळीच चालणार नाही तिला काही बोलल तर ",...... संतोष

"सोनलला विचार तिचेच कालपासून नाटकं सुरू आहे",..... प्रशांत

" मी प्रशांत ला फक्त म्हटले की माझा खोली जीव गुदमरतो आहे, मी खाली येऊ का पाच मिनिट तर तो मला खूप बोलला, की मी पळून जाईन वगैरे , आता तू इथे आहेस संतोष तर मी कशाला कुठे पळून जाईन, सांग ना, त्यात काय नाटकं? मला गरम होत आहे इथे, मी अशी आहे का संतोष", ?....... सोनल शक्‍य तितक्या हळव्या आवाजात संतोष शी बोलत होती

" नाही तू मुळीच नाही आहेस तशी सोनल ",..... संतोष ने तिची बाजू घेतली

" मी थोड्या वेळ खाली येऊ का",......

हो चल.....

प्रशांत रागाने खाली गेला

" प्रशांत बोलत होता आपला आता लग्न आहे आता ",..... सोनल

हो कराव लागेल .....

"पण तू बोलला होता घरी जावून करू, आई बाबांच्या सल्ल्याने ",..... सोनल

" नाही आता कराव लागेल लग्न, तुझी काही हरकत नाही ना ",...... संतोष

"नाही...... काय झाल पण ? का एवढ्या घाईत ",.?.... सोनल

" माझ्या बाबांना अटक झाली आहे तिकडे, वाटतय प्रकरण वाढल आहे, आपल्याला आता लग्न कराव लागेल, मग सगळ्यांचे तोंड बंद होतील, मग माझ्या वरची पोलिस केस ते लोक मागे घेतील ",...... संतोष

अरे पण संतोष,.......

"आता काही इलाज नाही सोनल प्लीज सहकार्य कर",...... संतोष

.......
बघु पुढे काय होतय ते

सोनल संतोष शी चांगल वागते ते अंगाशी तर येणार नाही ना तिच्या......

राहुल ला सापडेल का सोनल चा पत्ता...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now