Jan 29, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 19

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 19


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 19

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........

गाडीत सोनल संतोष प्रशांत सोबत अजून दोन तीन मित्र होते, ड्रायव्हर वेगाने गाडी चालवत होता, सोनलला समजतच नव्हतं काय सुरू आहे, सोनल मोठ मोठ्याने ओरडत होती,

"तुला माहिती नाही संतोष तू किती मोठा गुन्हा केला आहे, संतोष मला घरी जायचं आहे, सोड मला, तुला माहिती नाही राहुल चा दादा इन्स्पेक्टर आहे, अजुनही वेळ गेली नाही, तू मला घरी नेउन सोड, मी तुझी पोलीस कम्प्लेंट करणार नाही" ,....... सोनल

"सोनल तू आत्ता बघितलं माझ्या मित्रांनी राहुल ला डोक्यात मारलं तो बेशुद्ध आहे तिकडे, जर तू गाडीत जास्त गोंधळ घातला तर माझे मित्र आहेत अजून तिकडे तुझ्या घराच्या आजूबाजूला, सांगता येत नाही राहुल च काय होईल तिकडे, खूप मारतील त्याला माझे मित्र , तुझ्या वैभव दादा वर हल्ला होवू शकतो, सगळ तुझ्या हातात आहे, शांत रहा, आणि सारख माझ्या समोर त्या राहुल च नाव घ्यायच नाही या पुढे ",....... संतोष

संतोष च्या मित्राच्या फोन वर फोन आला, राहुल ला खूप लागलाय त्याला डॉक्टर कडे नेल, त्याने ती बातमी जोरात सगळ्यांना सांगितली, हे ऐकून सोनल अजून रडायला लागली, संतोष ने तिला रुमाल दिला तो तिने खिडकी बाहेर फेकून दिला

" तुला काय हवय संतोष हा काय प्रकार आहे, माझा साखरपुडा आहे दोन दिवसानी मी तुझ्यावर प्रेम करत नाही, प्लीज मला जाऊ दे" ,........ सोनल

"मला तू हवी आहेस सोनल, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, घाबरू नकोस मी काहीही करणार नाही तुला, तू फक्त मला हो म्हण, आपण लग्न करू, विश्वास ठेव मी खूप सुखात ठेवेल तुला, आणि तू त्या राहुल ला विसरशील एवढ प्रेम देईन मी तुला, आपल्या घरी काही कमी नाही, तू म्हणशील तस वागेन मी, नीट काम करेन तू म्हणशील तर पुढे शिक्षण ही घेईन, तू फक्त हो म्हण, काय हवंय तुला ते सांग, मी करेन सगळ ",....... संतोष

" मी काहीही बोलणार नाही, ओरडणार नाही , तुम्ही लोक बोलाल तेच करेन, पण राहुल ला, वैभव दादा ला काहीही जर होता कामा नये, राहुल ला सोड संतोष ",....... सोनल

सोनल विचार करत होती की हे प्रकरण बरंच डेंजर दिसत आहे, काय करायचं काही समजत नाही, घरी आई बाबांना समजलं की नाही हे ही माहिती नाही, त्यांच्या तब्येतीची काळजी आहे, राहुल कसा आहे, किती लागलाय काय माहिती त्याला, काय करावं समजत नाही, हे लोक मला कुठे घेऊन चालले आहे, माझ्या जीवाला काही धोका आहे का, सोनल देवाचं नाव पूर्ण वेळ घेत होती, जे होईल ते होईल, राहूल ची खूप काळजी वाटते आहे, काय झालं असेल राहुल ला जास्त लागलं असेल का, की या लोकांनी त्याला पळवलं असेल, की किती वेळ तो तिथेच तसा बेशुद्ध पडून असेल, चुकलंच आपल रात्री-अपरात्री बाहेर नको होत निघायला, तिच्या डोळ्यात ना अश्रू घळाघळा वाहत होते

सोनल तू रडू नको,.... संतोष ने तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला, सोनल बाजूला सरकून बसली,..... "माझ्या कडून तुला काही धोका नाही, माझ्या वर विश्वास ठेव सोनल , मी खूप प्रेम करतो तुझ्या वर",....

सोनल तरी रडत होती, संतोष काळजीने प्रशांत कडे बघत होता, प्रशांत ने डोळ्याने सांगितल बसेल गप्प ती, तू काळजी करू नकोस

पूर्ण रस्त्यात अंधार होता गाडी कुठे चालली आहे ते अजिबात समजत नव्हतं

अर्धा एक तासाने गाडी एका घरासमोर थांबली

सगळे खाली उतरले, संतोष ने सोनल ला गाडीतून जवळ जवळ ओढून बाहेर काढल, घराचा दार उघडून वर च्या खोलीत सोनल ला नेल, सोनल ने खूप प्रतिकार केला, जे दिसेल त्याने ती संतोष ला मारत होती, संतोष ने पुढे होवुन सोनल चे दोघे हात तिच्या ओढणीने बांधले, सोनल अगदी असह्य झाली होती, घाबरून गेली होती, हात बांधल्या मुळे ती अडखळून पडता-पडता राहिली, संतोषने तिला आधार दिला, ती झटक्यात बाजूला झाली, संतोष तिच्या मागे येतच होता, रूम संपली भिंत लागली, सोनल भिंतीला टेकुन घाबरुन उभी होती, संतोष तिच्या जवळ आला, सोनल घाबरून गेली होती,

" संतोष प्लीज मला काही करू नकोस, जर तू मला हात लावला तर मी जिवाच काहीतरी बर वाईट करून घेईन, मला हे अस अजिबात चालणार नाही, दूर हो माझ्या पासून ",...... सोनल थरथर कापत होती

"सोनल मी काहीही करत नाही तुला, एवढा वाईट नाही मी" ,........ संतोष ने तिचे दोन्ही हात हातात घेऊन हातावरची ओढणी सोडली, सोनल शांत उभी होती,

" हे बघ सोनल मला तुला काही त्रास पोहोचवायचा नाही, मला तुझ्यावर कसलीही जबरदस्ती करायची नाही, तू एवढं घाबरू नको, एवढच आहे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, तू हो म्हण किंवा नाही म्हण तरी मी तुझ्याशी लग्न करेल, तुझी इथून सुटका होवू शकत नाही, माझ्याशी लग्नाला तयार व्हायच काय, तुला थोडा वेळ देतो विचार करून ठेव, काहीही झालं तरी तुला माझ्यासोबतच रहायचं आहे, आता हे रडण वगैरे बंद कर, समजल का ",....... संतोष निघून गेला, त्यांने बाहेरून दार बंद केल,

सोनल काहीही बोलली नाही, तिला काही सुचतच नव्हतं, काय करावं संतोष चे शब्द तिच्या कानात घुमत होते, आपण कुठल्या संकटात फसलो आहोत याची तिला पूर्ण कल्पना आली, उद्या आपल संतोष बरोबर लग्न निश्चीत होईल,

काय कराव, सोनल तिथे खाली बसून रडायला लागली, राहुल तू कुठे आहेस राहुल....... मला सोडव इथून........ आई बाबा....... मला घरी यायच आहे.......... वैभव दादा.......... बर्‍याच वेळ ती तशीच बसुन होती,

माझ्या बाबतीत का अस झाल, का मला संतोष ने पसंत केल, मी मला जे हव ते का नाही करू शकत, संतोष ने बळाचा वापर करून मला इथे पळवुन आणलं, मला नाही राहायचं संतोष सोबत, मला राहुल सोबत राहायचं आहे, आणि मी सुद्धा यासाठी काहीही करायला तयार आहे

सोनल ला काही सुचत नव्हत, आई बाबा वैभव दादा राहुल सगळ्यांची आठवण येत होती, राहुल कसा असेल? कमी जास्त लागल तर नसेल ना, आई बाबा कसे असतील? मी गायब झाली हा ताण त्यांना सहन झाला असेल का? मला आता खूप काळजी वाटते आहे सगळ्यांची, मला संतोष शी अजिबातच लग्न करायचं नाही, काय करू, माझा मोबाईल कुठे आहे? घरी राहिला वाटत , खूप मोठ्या संकटात आहोत आपण, काय करता येईल? , अस मुळमुळीत राहून उपयोग नाही, काही तरी करून स्वतःची सुटका करावी लागेल, ती विचार करत होती.......

तिने बघितल दोन खिडक्या होत्या रूम ला त्याला ग्रिल होते, दार बाहेरून बंद होत, कुठे आहोत आपण कोणत गाव खूप अंधार होता येतांना, कोणत्या दिशेला आलो ते ही माहिती नाही, इथून सुटण मुश्किल होत, आजुबाजुला संतोष चे मित्र होते, जर मी इथून पळाली तर हे मूल लगेच मला पकडतील आणि मग संतोष काय करेल माझ्या सोबत मला सांगता येत नाही, विचार करून तिच्या अंगावर काटा आला, या पुढे आई बाबा वैभव दादा राहुल भेटतील की नाही परत कधी काय माहिती , काय होणार आपल्या सोबत इथे, विचार करून सोनल ला खूप रडायला येत होत,

काय कराव जरा हुशारीने वागाव लागेल, संतोष ला ताकदीने जिंकता येणार नाही, त्याला प्रेमाने हुशारीने जिंकता येईल, संतोष शी नीट वागव लागेल, तरच आपल्याला इथून सटकता येईल, पण मला हे जमेल का?, संतोष शी नीट वागवायच म्हणजे नको वाटत होत, पण स्वतः ची सुटका करायची असेल तर कराव लागेल अस, आता सोनल ला बर वाटत होत, निघेल काही तरी मार्ग,

अर्धा तासाने दाराची कोणी तरी कडी काढली, सोनल उठून बसली, संतोष आत आला, त्याच्या हातात जेवणाच ताट होत, त्याने जेवण सोनल ला दिल, तो सोनल कडे बघत होता, त्याला वाटल सोनल खूप रडत असेल, अंगावर धावून येईल, पण ती शांत होती, सोनल ने ताट घेतल, संतोष उभा होता

"बस ना संतोष, तू जेवलास का" ,....... तिने त्याच्या कडे बघून हलका स्माईल केल,

"नाही आता जेवेन मी",...... संतोष

"मग ये घेवून तुझ ताट, मी थांबते ",..... सोनल

संतोष ला आश्चर्य वाटल, त्याला वाटल सोनल खूप चिडलेली असेल ती भांडेल, जेवण घेणार नाही, रडत असेल, पण सोनल शांत दिसत होती, संतोष त्याच ताट घेऊन आला, समोर बसला, दोघांच जेवण झाल, सोनल ने मध्येच उठून संतोष ला पाणी दिल, संतोष खूप आनंदात होता, सोनल बोलत नव्हती काही पण ती चिडलेली ही नव्हती, आणि जेवली ही, संतोष ला समाधान वाटल

"सोनल तू ठीक आहे ना",...... संतोष

हो संतोष.......

"माझा राग आला नाही ना",...... संतोष

"आधी आला होता, पण आता मी ठीक आहे, तू एवढा ही काही वाईट नाहीस, माझी किती काळजी घेतोस तू, उलट मीच वाईट वागले तुझ्या सोबत, थोडे गैरसमज झाले होते, मला माफ कर " ,....... सोनल

" काही हरकत नाही सोनल, अजिबात कसली काळजी करू नकोस, मी आहे ना ",....... सोनल

"मी झोपते जरा वेळ, डोक दुखत आहे ",........ सोनल

" ठीक आहे",...... संतोष ताट घेवून बाहेर गेला, सोनल ने आतून दार लावून घेतल

संतोष खूप खुश होता, प्रशांत फोन वर कोणाशी तरी बोलत होता

" काय झालं संतोष जेवली का सोनल ",....... प्रशांत

" हो जेवली, मी पण जेवलो तिच्या सोबत आणि माझ्याशी चांगली ही बोलली ती, मला उठून पाणी दिल",..... संतोष

"काय बोलतोस, तिचा काही तरी डाव असेल यात",..... प्रशांत

"कसला डाव? ती आहेच चांगली, तिला बहुतेक समजत असेल की मी किती चांगला आहे ",...... संतोष

"तस नाही संतोष पण अचानक कशी चांगली वागली ती, तू लक्ष दे ह, नाही तर गोड गोड बोलून जायची पळून इथून",....... प्रशांत

" मला सोनल बदल काहीही ऐकून घ्यायचा नाही प्रशांत , ती आहेच छान राहुल ने तिला उगीच भुरळ पाडली होती, आता माझ्या सोबत आहे ती, होईल सगळ नीट बघ तू, सोनल माझ्याशी लग्न करेन",........ संतोष खुश होता

प्रशांत विचारात होता हा बदल कसा झाला तो ही चार तासात

"संतोष उद्या सकाळी तुमच दोघांच लग्न उरकून टाकू",..... प्रशांत

चालेल....

संतोष वर रूम मध्ये आला, सोनल ला झोप लागली नव्हती

सोनल....... सोनल

सोनल ने दार उघडलं

" एक मिनिट येऊ का आत मध्ये",..... संतोष

"हो ये ना संतोष",..... सोनल

संतोष आत येऊन बसला

" सोनल मला माहिती आहे की मी हे तुझ्याबरोबर अशा पद्धतीने वागायला नको होत, पण माझा नाईलाज झाला, पण आता एक आनंदाची बातमी आहे, आपल्या दोघांच उद्या सकाळी लग्न आहे, चालेल ना तुला ",...... संतोष

ही बातमी ऐकून सोनलला सुरुवातीला खूप धक्का बसला, ती विचार करत होती काय करता येईल, नकार दिला तर बळजबरीने हे लोक माझं लग्न लावतील, ती उठून संतोष जवळ जाऊन बसली

" संतोष तू वाटतो तितका ही वाईट नाही, मी तुला लहानपणापासून ओळखते, पण एवढ्यात आपलं काहीही बोलणं झालं नाही, आपण एकमेकाला नीट ओळखत नाही आपण एक काम करूया का आता चान्स मिळाला आहे तर आपण ओळख वाढवू आणि मग व्यवस्थित घरी जाऊन आई बाबा समोर लग्न करू माझी काही हरकत नाही ",....... सोनल

" तुझी हरकत नाही ना, मग उद्याच लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे ",...... संतोष

" हे बघ संतोष लग्नाचा निर्णय मोठा असतो आणि आपलं लग्न होणार आहे तर त्यासाठी मोठ्यांचा आशीर्वाद गरजेचा आहे पण तरीही जर तुला वाटत असेल तर उद्या आपण साखरपुडा करून घेऊ आणि मग घरी जाऊन तू म्हणशील तसं आपण लग्न करून घेऊ",....... सोनल

संतोष विचार करत होता काय करता येईल, सोनल ही बरोबर बोलते आहे, माझ्या लग्नाला मला आई-बाबा हवेच आहेत, त्याच्या डोळ्यासमोर आक्कांचा हसरा चेहरा येत होता, माझं लग्न सोनल बरोबर होत आहे म्हटल्यावर आईला किती आनंद होईल

" मला विचार करावा लागेल सोनल, मी माझ्या मित्रांशी बोलतो",....... संतोष

सोनल ला माहिती होतं संतोष खाली गेला तर प्रशांत त्याचे कान भरेल, संतोष खाली जातच होता, सोनलने पळत पुढे जाऊन त्याची वाट अडवली, संतोषला खूप आवडलं ते,

" हे बघ संतोष मी काय म्हणते आयुष्य आपल्या दोघांच आहे तर निर्णयही आपणच घ्यायला पाहिजे ना, तू म्हणशील ते आपण करू, तुझ्या मित्रांना कशाला मध्ये घेतो, जर तुला वाटत असेल की तुझे आई वडील सोबत नसताना आपण लग्न करावे तर उद्या करून घेऊ आपण लग्न माझी काही हरकत नाही",....... सोनल

" सोनल तू बरोबर बोलते आहे, मला सगळे हवे लग्नाला, तुझे आई बाबा माझे आई बाबा वैभव दादा",..... संतोष

सगळ्यांचे नाव काढल्यावर सोनलच्या चेहऱ्यावर दुःखाची लकीर होती, तिने ती लपवली पुढे होऊन संतोष चा हात हातात घेतला

" मला माहिती होतं तू असा चांगला निर्णय घेशील, मला तू उद्या घरी सोडशील का? मग मी आई-बाबांशी आपल्याविषयी बोलेल, उद्याच्या उद्या लग्न ठरवू",..... सोनल

संतोष सोनल कडे बघत बसला, एवढ्या प्रेमाने बोलते सोनल

"हो आपण जाऊ घरी उद्या, पण खरं ना हे तू बदलणार नाहीस ना",...... संतोष

" तुझा विश्वास नसेल तर जाऊ दे संतोष",...... सोनल

" सॉरी अस नाही माझा आहे तुझ्यावर विश्वास", ..... संतोष

संतोष खाली चालला गेला खाली प्रशांत फोनवर सामानाची लिस्ट देत होतं संतोषने त्याला हातवारे करून थांब असं सांगितलं प्रशांत आश्चर्याने संतोष कडे बघत होता,....." काय झालं संतोष",..

" उद्या नको लग्न करायला ",....... संतोष

"का? काय झालं संतोष??...... प्रशांत

" सोनल म्हणते आहे की घरी जाऊन लग्न करू ",..... संतोष

" तुला अजूनही समजलं नाही आहे का संतोष, सोनल तुला फसवते आहे ",....... प्रशांत

" नाही प्रशांत सोनल अशी नाही, ती मला बोलली आहे की जर मी बोललो तर आम्ही उद्या लग्न करू, पण मलाच आता माझ्या लग्नात माझे आई-बाबा तिचे आई-बाबा दोघेही हवे आहेत ",....... संतोष

"संतोष तू मुर्खपणा करतो आहेस, आत्ताच चान्स आहे, हा चान्स घालवू घालू नको, माझं ऐक, उद्या करून घे सोनल शी लग्न, एकदा जर सोनल तिथून निघाली तर ती तुझ्याशी लग्न करणार नाही",...... प्रशांत खूप समजवून सांगत होता

" तू नेहमी सोनल विषयी वाकड तिकडच का बोलतो प्रशांत, सोनल तशी नाही, खूप चांगली मुलगी आहे ",..... संतोष

" हो मला माहिती आहे सोनल चांगली मुली आहे, पण मी तुझ्या चांगल्या गोष्टीचा विचार करतो आहे संतोष हे तुला समजत नाही का",........ प्रशांत

"नाही मला सध्या काही समजत नाहीये, मला आता सोनल बोलेल तेच करायचं आहे, सोनल ला मी आवडतो, मला समजुतीने घ्यायच आहे",....... संतोष

" ठीक आहे मग घे तुझ्या पायावर धोंडा मारून, परत काही झालं तर मला सांगू नको ",..... प्रशांत चिडला होता

" तू कधीच नीट बोलू शकत नाही का प्रशांत? अरे जर गोडीगुलाबी लग्न होत आहे तर बळजबरी करण्यात काय अर्थ आहे ",....... संतोष

" सोनल आणि तिच्या घरच्यांना मी ओळखतो, ती तुझा वापर करून इथून पळून जाईल बघ",...... प्रशांत

" कशी जाईल पळून आपण आहोत ना एवढे सगळे, मला सोनलच मन जिंकायचं आहे मला हे नात आयुष्यभरासाठी हवा आहे ",...... संतोष

प्रशांत ने विचार केला संतोष ऐकण्याच्या पलीकडे गेला आहे, उगीच एवढी रिस्क घेतली आपण संतोष साठी, जाऊदे दोन-तीन दिवसात लक्षात येईल त्याला की सोनल त्याला बनवते आहे, मग करू या दोघांचं लग्न, त्याआधी मी एकदा स्वतः सोनल शी बोलून बघतो,.... प्रशांत रागारागाने वर च्या रूम कडे बघत होता

संतोष त्याच्या स्वप्ननगरीत मग्न होता, सोनलने धरलेला हात तो सारखा सारखा बघत होता, त्या हाताला कवटाळत होता, आता सोनल आणि माझं नक्कीच लग्न होणार, आई-बाबा किती खुश होतील, मी आई-बाबा आणि सोनल ला खूप खुश ठेवीन, उगाच बळजबरी करण्यात काही अर्थ नाही, सोनल बोलली आहे ना कि मोठ्यांच्या विचाराने लग्न करू, एक चान्स द्यायला काही हरकत नाही, वाटलं तर आई बाबांना इकडे ही बोलूवुन घेता येईल

......
पुढच्या भागात बघु काय होतय ते

राहुल ला सापडेल का सोनल चा पत्ता की त्या आधी सोनल संतोष च लग्न होईल...........ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now