Jan 26, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 18

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 18

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 18

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........


संतोष राहुल वर खूप चिडला होता,...... "किती बोलतो तो राहुल मला, नुसत सोनल ला फोन केला तरी इतक, राहुल सोनल ला स्वतःची प्रॉपर्टी समजतो की काय, अगदी दोन चार दिवसात साखरपुडा आहे त्यांचा प्रशांत आपल्याला जे काही करायचं ते आज उद्या मध्येच करावं लागेल, मला सोनल हवी आहे आणि त्या राहुल ला समजेल संतोष काय चीज आहे ",....

प्रशांतने लगेच फोन फिरवला, तो बराच वेळ बोलत होता, संतोष सगळं ऐकत होता

"संतोष आत्ताच्या आत्ता घरी जा आणि किती पैसे जमा होतात ते बघ, मी पण थोडं पैशाची व्यवस्था करतो, माझ्याकडे वीस पंचवीस हजार रुपये होतील जमा, तू किती पैसे जमा करू शकतो",....... प्रशांत

"मी पण पन्नास हजार रुपये आणतो, चालेल ना",...... संतोष

हो चालेल.......

"पण नक्की करायचं काय आहे, कुठे जाणार आपण",...... संतोष ला थोडी कल्पना होती, तरी खात्री करून घेण्यासाठी तो विचारात होता

"आपण पैशाची व्यवस्था करू, सोनल च्या घराच्या आसपास लपून राहू, चान्स मिळाला की सोनल बाहेर पडेलच खरेदीला, तोपर्यंत तिला फोन बिन अजिबात करू नकोस, सोनल ला पळवून नेऊ आणि तिचं तुझ्याशी लग्न लावून टाकू, एकदा लग्न झालं की कोणी काही करू शकत नाही, चालेल ना तुला संतोष",....... प्रशांत

संतोष एकदम खुश होता,......." अरे चालेल म्हणजे काय, मला तर तेच हवं आहे, अजून साखरपुडाही नाही झाला आहे सोनलचा तोपर्यंत हे सगळं शक्य आहे, एकदा साखरपुडा झाला की लगेच लग्न करतील ते, मग पुढची गोष्ट ठरवणं अवघड आहे",...

"हो बरोबर बोलतो आहेस तू संतोष आणि तसाही तू सोनल वर खूप प्रेम करतोस, तू चांगला ठेवशील तिला, तुमच्या कडे कसली च कमी नाहिये, थोड्या दिवसात तिचे आई-वडील आणि वैभव ही शांत होवुन जातील ",...... प्रशांत

" पण सोनाली ला घेऊन जायचं कुठे ",....... संतोष

" माझ्या मित्राच्या फार्म हाऊस आहे तिकडे जंगलाकडे तिकडे जाऊ मी करतो आहे सगळ अरेंज तू काळजी करू नको तू फक्त घरी जा आणि पैसे घेऊन ये आक्कांन समोर काही बोलू नको ",.......... प्रशांत

हो चालेल........

संतोष घरी आला, आक्का समोर बसल्या होत्या, बाबा दुकानात गेले होते, संतोष चिडलेला दिसत होता

" संतोष कुठे गेला होतास तू काय झालं ",...... आक्का

" काही झाल नाही आई, आता मला राहुल ने फोन करून धमकी दिली, आमच खूप भांडण झाल, मला भिती वाटते सोनल चुकीच्या हातात नको पडायला ",....... संतोष

"मला ही सोनल च्या बाबांन चा फोन आला होता, खूप चिडला होता तो भाऊ, जाऊदे त्यांना त्यांचं चांगलं कळत नाही तर आपण काय करणार",...... आक्का

" काय म्हटले ते",...... संतोष

" बोलले आमच्या पासून दूर रहा, दूर रहा तर दूर रहा मी पण बोलली की तुमचं आमचा संबंध संपला यापुढे",....... आक्का चिडल्या होत्या

" जाऊ दे आई आता काही अर्थ नाही या सगळ्या गोष्टीला, जेवढा आपण त्यांच्यामागे पळू तेवढे ते दूर जातात, मी आता या सगळ्या गोष्टी विसरायचं ठरवलं आहे, मला कंप्यूटर क्लास लावायचा आहे, पुढे खूप शिकायचं आहे, तुला आणि बाबांना खूप आनंदात बघायचं आहे, आई थोडे पैसे लागत आहेत मला कम्प्युटर क्लास साठी",........ संतोष

आक्का आत्या खूष होत्या..... " किती पैसे लागतील ते घे बेटा आणि आता जरा स्वतः कडे लक्ष दे, कोणीही काहीही बोलून जात आहेत मला, आता हे सगळं नको नको झाल आहे, आता हे सगळं सहन होत नाही मला, नेहमी ताठ मानेने जगली आहे मी, यापुढेही असंच रहायचं आहे मला",....

" आई सगळं तुझ्या मनासारखं होईल, मी आता बाबांकडे आणि दुकानाकडे लक्ष देणार आहे, क्लास करणार, चांगल वागणार, इतर कुठल्याच गोष्टींचा मला विचार करायचा नाही",....... संतोष

" हेच योग्य राहील आपल्यासाठी संतोष, घेऊन जा पैसे, किती आहे फी? ",.... आक्का

" मी चौकशी केली आहे क्लासची फी पंचवीस हजार रुपये आहे ",....... संतोष

"आता माझ्याकडे वीस हजार आहेत आता येवढे चालतील का संतोष",.....आक्का

"दे चालेल ",.... संतोष

"जा हात पाय धुवुन ये, मी तुझ्यासाठी चहा टाकायला सांगते",....... आक्का

" आत्ता नको आई, मला थोडं काम आहे मी जरा बाहेर जाऊन येतो",...... संतोष

संतोष ने कपाटातुन त्याची सोन्याची मोठी चेन गळ्यात घालून घेतली, जातांना संतोष आई कडे बघत होता, किती विश्वास आहे हिला माझ्यावर आणि मी काय करतो आहे, पण आई हे मी तुझ्यासाठीच करत आहे, मी सोनल शी लग्न केलं तर तुला जास्त आनंद होणार आहे, येतो आई

बाहेर प्रशांत वाट बघत होता

" झाल का काम किती मिळाले ",...... प्रशांत

"वीस हजार आहेत आणि ही चैन ",...... संतोष

"झाल ना काम गाडी अरेंज झाली , आपल्याला निघावं लागेल",...... प्रशांत

"घर कोणच आहे, सगळ सेट आहे का तिकडे, माझ्या सोनल ला काहीही त्रास होता कामा नये ",...... संतोष

" सगळ सेट आहे रे बाबा, आणि मी आहे ना, मी देईन आणून काही लागल तर, घर माझ्या एक मित्राच आहे, त्याला माहिती आहे सगळ, तू काळजी करू नकोस ",..... प्रशांत

"पण बरोबर करतो आहोत ना आपण ",..... संतोष

"तुला हवी ना सोनल ",...... प्रशांत

हो....

मग मागे पुढे बघू नकोस ",...... प्रशांत
.....


सोनल आई बाबांन सोबत खरेदीला निघणार होती , तिने राहुलला डायरेक्ट दुकानात यायला सांगितल

"आपण दोघ जाऊ या का बाहेर नंतर सोनल, मस्त डिनर डेट ",....... राहुल

" अरे मला अजून थोडी खरेदी करायची आहे आई सोबत, वैभव दादा चा ड्रेस वगैरे सगळ बाकी आहे, कस जमेल",...... सोनल

"काय अस एक तर आपण भेटत नाही तू अशी करते, प्लीज प्लीज",....... राहुल

" अंगठी घेतली की तू पण चल आमच्या सोबत शॉपिंग ला, मग ठरवू लवकर झाल तर",...... सोनल

" ठीक आहे ठरवू तस, पण आम्हाला कोणी वेळ च देत नाही ",...... राहुल

" बर बाबा ठरवू आपण मस्त",....... सोनल

आई बाबा सोनल शॉपिंग ला गेले

अविनाश होता पाळतीवर, त्याने लगेच संतोषला फोन केला, सोनल बाहेर निघाली आहे, तिचे आई-बाबा सोबत आहेत

प्रशांत संतोष त्याचे मित्र निघाले तिकडून, संतोष आता वेळ वाया घालवून चालणार नाही हीच ती संधी, परत सोनल बाहेर निघेल की नाही माहिती नाही, चल लवकर

राहुल शॉपिंग सेंटर ला आला, कपडे खरेदी झाल्यावर ते ज्वेलरी शॉप मध्ये गेले, दोघांसाठी कपल अंगठी ची डिझाईन फायनल केली, अंगठी ची अतिशय सुंदर डिझाईन सोनल च्या हातावर खूप छान दिसत होती, राहुल आणि सोनल खूप खुश होते, सोनल वेगवेगळे दागिने घालून बघत होती, आधीच खूप सुंदर सोनल ला ते दागिने छान शोभत होते, प्रेमात पडल्याच खुप छान तेज सोनल च्या चेहर्‍यावर पसरल होत, राहुल तर इतर दागिने बघण्यापेक्षा सोनलच्या चेहऱ्यावरची खुशी बघत होता, सोनल ला ते लक्षात आलं की राहुल तिच्याकडेच बघत आहे, ती पण छान लाजली होती

शॉपिंग झालं, राहुल साठी मस्त सोनल च्या पसंतीचे कपडे घेतले, सोनल ची खरेदी राहुल चे घरचे करणार होते,

"जाऊ या ना बाहेर सोनल छान",..... राहुल

"थांब राहुल, मी आई बाबांना विचारल नाही अजून",......सोनल

"विचार ना मग की मी विचारू",...... राहुल

"काय हे राहुल, नको मी बोलते आई शी ",...... सोनल

ठीक आहे.....

"आई आम्ही दोघ बाहेर जाऊ का फिरायला",...... सोनल

आई बाबा एकमेकांन कडे बघत होते,...... "हे बघा सोनल आणि राहुल, साखरपुड्याला अवघे काही दिवस बाकी आहेत आणि तुम्हाला माहिती आहे संतोष चे प्रताप, तर आमचा असा सल्ला असेल की तुम्ही दोघ घरी चला घरातच बसून काय गप्पा मारायच्या त्या मारा, म्हणजे मग आमचा पण जीव अर्धा होत नाही, आमची काही अडकाठी नाही तुम्ही भेटु शकतात, पण यात धोका जास्त आहे ",...... बाबा समजावत होते

" हो बरोबर बोलत आहेत बाबा तुम्ही, मी येतो घरी ",...... राहुल

सगळे घरी आले, आईने छान चहा केला, राहुल सोनल बोलत बसले, बाबांना काम होतं दुकानातून फोन आला होता ते बाजारात गेले

" चला मामी आता मी निघतो ",......... सोनल राहुल ला सोडवायला बाहेर पर्यंत गेली, दोघ गेट जवळच्या झाडाजवळ बोलतच बसले होते
.......

तेवढ्यात संतोष गाडी तून उतरला....... सोनल राहुल त्याच्या कडे बघत बसले, सोनल तू आत जा, पण संतोष ने पुढे होवुन सोनल ला ताब्यात घेतल........

संतोष सोड मला...... सोनल कळवळली

"काय करते इथे सोनल, किती वेळा सांगितल बोलत नको जाऊ राहुल शी समजत नाही का, माझ्या पद्धतीने सांगू का तुम्हा दोघांना, काय राहुल दूर राहायच या पुढे सोनल पासून",......... संतोष

"संतोष तू जास्त बोलू नकोस समजल ना, तुझा काही संबध नाही आमच्या शी",...... राहुल ने पुढे होवुन सोनल ला सोडवायचा प्रयत्न केला

मागच्या बाजूने संतोष चे चार पाच मित्र येवून उभे राहिले होते

राहुल ने मोबाईल वरुन रमेश दादा ला फोन करायच्या प्रयत्न केला तेवढ्यात......

मागून कोणी तरी राहुल च्या डोक्यात मारल तो खाली पडला

संतोष ने सोनल चा हात धरला तिला बळजबरीने गाडीत बसवल

संतोष सोड मला....... संतोष प्लीज...... सोनल संतोष ला मारत होती

गाडी वेगाने गावाबाहेर निघाली
.........


पाच दहा मिनिटाने राहुल शुद्धीत आला, समोर वैभव दादा उभा होता, राहुल ऐ राहुल असा काय रस्त्यात बसला? काय झाल?

सोनल..... सोनल..... राहुल ने गाडी गेली तिकडे हात दाखवला.... परत राहुल बेशुद्ध झाला

वैभव दादाने रमेश दादाला फोन केला,....... "काहीतरी झाल इथे, राहुल बेशुद्ध आहे रमेश दादा, सोनल सोनल बोलतो आहे तुम्ही लगेच इकडे या माझ्या घरी",....

"आई.. आई सोनल कुठे आहे ",.... वैभव पळत आत गेला

"इथे होती ती बाहेर राहुल शी बोलत उभी होती",...... आई

वैभव दादा परत पळत बाहेर आला, आई ही आली मागे,

"कुठे आहे सोनल , राहुल उठ, काय झाल राहुल ",....... वैभव दादा घाबरला होता

एक काका तिथे बसले होते, काका काय झाल इथे? सोनल ला पहिल का तुम्ही?

हो इथे दोन चार मुल आले होते ते, घेवून गेले वाटत सोनल ला..........

रमेश दादा आला तेवढ्यात, बाकीचे राहुल च्या तोंडावर पाणी मरत होते

" काय झाल वैभव? राहुल ला कोणी मारल? सोनल कुठे आहे?",........ रमेश दादा

"गडबड झाली रमेश दादा, राहुल बेशुद्ध आहे सोनल गायब आहे, हे काका त्यांना माहिती आहे ",......... वैभव

सोनल गायब आहे हे शब्द आई ने ऐकले, ती बेशुद्ध झाली, वैभव तिकडे पळाला........ रमेश दादा येत होते सोबत

" दादा तुम्ही राहुल कडे लक्ष द्या तो लवकरात लवकर शुद्धीवर यायला हवा, मी बघतो आई कडे ",...... वैभव

"काय झालं काका इथे थोड्या वेळा पूर्वी ",...... रमेश दादा

"मी इथे बसलो होतो तेव्हा हे दोघ सोनल आणि राहुल बोलत उभे होते झाडा जवळ, मी कामा निम्मीत आत गेलो, बाहेर आलो तर हा पोरगा पडलेला दिसला ",....... आजोबा

" सोनल शी कोण बोलत होत? कोण घेवून गेल तिला? आठवून सांगा ना नीट आजोबा",...... रमेश दादा

"मला काही माहिती नाही ",...... आजोबा

राहुल उठला त्याला पकडून आत आणला, डोक्याला थोड लागल होत त्याच्या

सोनल चे बाबा आले तो पर्यंत, ते खूप टेंशन मध्ये होते, आई रडत होती, ते जावून आई जवळ बसले,...." वैभव, रमेश तुम्ही जा बाहेर, मी देतो लक्ष राहुल कडे आणि तुझ्या आई कडे ",...

" राहुल काय झाल सांग, अरे उशीर होतोय" ,..... रमेश दादा

" संतोष घेवून गेला सोनल ला, प्रशांत होता सोबत" ,...... त्याला विशेष बोलता येत नव्हत

"काय झाल कस झाल नीट सांग",...... रमेश दादा

"आम्ही दोघ बोलत होतो, संतोष त्याच्या मित्रांसोबत आला मला मागून डोक्यात मारले आणि सोनल ला घेवून गेला",...... राहुल

"कुठे गेले ते",....... रमेश दादा

" माहिती नाही ",..... राहुल

"काही अंदाज",...... रमेश दादा

" नाही मला नाही सुचत काही आता, माझ डोक खूप दुखतंय ",...... राहुल एकदम रडायला लागला

सगळे त्याला समजावत होते.......

" माझ्या सोबत होती सोनल, मी लक्ष् द्यायला हव होत",..... राहुल
....

रमेश दादा ने संतोष च्या गावच्या पोलिस स्टेशन ला फोन केला, त्यांना सगळ सांगितल, तुम्ही आता संतोष च्या घरी जा, बघा काही माहिती मिळते का,

"हो.. खूप चुकीचा वागला संतोष",....... इंस्पेक्टर

" हो ना, सोनल आमच्या घरची होणारी सून आहे, इकडे राहुल ला मारल त्यांनी डोक्यात, सोनल च्या आई त्या ही त्रास करून घेता आहेत ",........रमेश दादा

रमेश दादा, वैभव... राहुल ला, सोनल च्या आई ला डॉक्टर कडे घेवून गेले

तिकडे इंस्पेक्टर संतोष च्या घरी गेले....

आक्का समोर बसुन भाजी निवडत होत्या,......." काय झाल इंस्पेक्टर साहेब, इकडे घरी कसे आलात तुम्ही "?,..

संतोष कुठे आहे......

"तो थोड्या वेळा पूर्वी बाहेर गेला, का काय झाल? ",....... आक्का घाबरल्या होत्या

"फोन करा त्याला, घरी बोलवून घ्या ताबडतोब ",....... इंस्पेक्टर

"काय झाल पण सांगा तर",....... आक्का

" सांगतो, तुम्ही आधी संतोष च्या बाबांना इकडे बोलवून घ्या संतोष ला ही फोन करा ",.......... इंस्पेक्टर

ठीक आहे.....

आक्कांनी संतोष च्या बाबांना फोन लावला, ते घरा जवळ होते, ते आले पाच मिनिटात

संतोष ला फोन लावला तर त्याचा फोन स्विच ऑफ येत होता

"काय झालं इंस्पेक्टर साहेब सांगा ना लवकर अस करु नका ",...... आक्का

" संतोष आणि त्याच्या मित्रांनी राहुल सोनल वर हल्ला केला, राहुल जखमी आहे त्याला आता डॉ कडे नेल आणि सोनल ला पळवून नेल, तुम्हाला कल्पना होती का या गोष्टीची ",....... इंस्पेक्टर

"नाही आम्हाला काही माहिती नाही, काय बोलताय तुम्ही इंस्पेक्टर संतोष अस करणार नाही, आज च संतोष मला बोलला तो आता घराकडे दुकानाकडे लक्ष देणार आहे ",........ आक्का

" केलाय त्याने गुन्हा , काय हो काका आता कोणाची ओळख काढणार तुम्ही? , त्या दिवशी आम्ही संतोष त्याच्या मित्रांना रमेश इंस्पेक्टर वर हल्ला केला तेव्हा धरल होत, तेव्हा तुम्ही त्याला सोडवायला नको होत, बघितल का आता काय होवुन बसल, किती मोठा गुन्हा आहे हा,
त्याने काही पैसे नेले का सोबत "?,......... इंस्पेक्टर

" हो वीस हजार रुपये नेले",...... आक्का

संतोष चे बाबा खूप टेंशन मध्ये होते,.....," मला माफ करा इंस्पेक्टर साहेब खरच तेव्हा माझी चूक झाली, आता या पुढे नाही मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करणार",.......

ठीक आहे.....

" तू दिले का त्याला पैसे",...... बाबा आक्कांन वर चिडले होते

" हो संतोष बोलला त्याला कॉम्प्युटर क्लास लावायचा आहे म्हणून दिले वीस हजार रुपये",........ आक्का

इंस्पेक्टर साहेब आता काय पुढे......

" त्याचे मित्र कोण कोण आहेत? ते आहेत का त्याच्या सोबत बघू या, तुम्ही चला माझ्या सोबत आपण चौकशी करू, काही माहिती मिळते का ते बघू ",........ इंस्पेक्टर

संतोष चे बाबा इंस्पेक्टर बर्‍याच मित्रांकडे गेले, एक दोन मित्र गायब होते, बाकीच्यांना काही माहिती नव्हत, आम्हाला काही समजल तर आम्ही जरूर सांगू त्यांनी आश्वासन दिल

" माझी चुकी झाली इन्स्पेक्टर साहेब, मी आधी संतोष ला पाठीशी घालायला नको होत, आता मी तुमच्या सोबत आहे शोधू आपण त्याला, जी शिक्षा द्यायची ती द्या त्याला, आणि मी ही शिक्षेला पात्र असेल तर मला ही अटक करा",........ संतोष चे बाबा स्वतःला मारून घेत होते

" काका तुम्ही त्रास करून घेवू नका, संतोष ला शोधू आम्ही, पण आता यात त्या सोनल चा काय दोष, या संतोष ने काही बर वाईट करायला नको तिच्या सोबत",....... इंस्पेक्टर

" तीच काळजी वाटते, मी आधी त्याला बोललो होतो तिच्या मागे फिरू नकोस, तिला त्रास देवू नकोस",....... बाबा

" अहो लग्न जमलाय तीच आणि हा काय अस करतो, नाही तिच्या मनात त्याच्या विषयी प्रेम तर बळजबरी का पण ",...... इंस्पेक्टर

" हो ना, आम्ही ही सांगून सांगून थकलो होतो",..... बाबा

" तुम्हाला माझ्यासोबत यावे लागेल काका, तुम्हाला अटक झाली आहे असं समजू नका, पण तुम्हाला जर आम्ही आमच्या सोबत नेलं तर ही बातमी संतोष पर्यंत पोहोचेल की त्याच्या वडिलांना अटक झाली आहे, थोडा फार फरक पडेल, घरी आक्कांना सांगू नका की ही खोटी अटक आहे ",....... इंस्पेक्टर

" चालेल मी यायला तयार आहे",...... बाबा आक्कांन जवळ गेले, हे बघ संतोष ने जे केलं ते तुला आवडल आहे का नाही मला माहिती नाही , पण मला अजिबातच आवडल नाही, आज मला संतोष मुळे पोलिस अटक करून घेऊन जात आहे, तू घाबरू नकोस जर संतोष चा फोन आला तर त्याला सांग की बाबांना पोलिसांनी अटक केली आहे, तू जिथे आहे तिथून ताबडतोब सोनलला घेऊन घरी ये

आक्का इन्स्पेक्टर साहेबांनी जवळ गेल्या,... "मी तुमच्या पाया पडते, यांना घेऊन जाऊ नका, आम्ही निर्दोष आहोत ",...... इंस्पेक्टर साहेबांनी अक्कांना दूर केलं

इन्स्पेक्टर साहेब संतोष च्या बाबांना घेऊन पोलीस ठाण्यात आले........

..............

बघू पुढे काय होतं ते

कथा लिहिण्याचा उद्देश हाच आहे की आपण असं तर नाही ना वागत आहोत, की आपल्यामुळे दुसऱ्याला खूप त्रास होईल, जर आपण दुसऱ्याला त्रास देत असू तर वागणं बदलायला हवं, दुसऱ्याच्या आयुष्यात प्रमाणापेक्षा जास्त ढवळाढवळ करू नये, प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील निर्णय घ्यायचा अधिकार आहे, सोनल राहुल ला किती त्रास होतो आहे संतोष चा...........
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now