Jan 29, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 17

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 17
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 17

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........

संतोष ने सगळ ऐकुन घेतल, प्रशांत चा प्लॅन छान होता, पण रिस्क ही खूप होती त्यात, पण जर सोनल मिळणार असेल तर काय हरकत आहे अस त्याला वाटल

" तुला काय वाटत आहे प्रशांत, परत एकदा बोलू का सोनल शी?",..... संतोष

"आता काही बोलून उपयोग नाही, आपल ठरल तस करायच का?, किती वेळा बोलणार तू तिच्याशी",...... प्रशांत

" बरोबर आहे, तू पाहिल आहे ना ती माझ्याशी कशी फटकून वागते, आता तर एवढं लग्न जमल आहे, आता ती बोलेल तरी का माझ्याशी",....... संतोष

" आपल आता ठरल तस करू, अस हार मानून कस चालेल, तुला सोनल हवी आहे ना, तुझ्या मना सारख होईल " ,...... प्रशांत

" अरे आई बाबांना त्रास होतो माझ्या वागण्याचा, काल मी दुकानात बसलो होतो, थोडी मदत केली तर किती खुश होते बाबा आणि आई ही ",....... संतोष

" हो ते तर आहे, पुढे जावून करायच आहे आपल्याला सगळी काम, आई बाबांन ची सेवा, तरीसुद्धा तुला सोनल शी लग्न करायचं असेल तर तुला ही रिस्क घ्यायला हवी , तिला सतत ही जाणीव करून द्यायला पाहिजे तू तिच्यावर प्रेम करतोस, तिच्या मागे आहेस, तुझी नसेल इच्छा तर मग जाऊ दे, मीच धडपड करतो आहे सगळी, ",...... प्रशांत

यावेळी पहिल्यांदा संतोषला असं वाटत होतं की असं नको करायला, पण त्याला सोनल ही हवी होती,....." अस काही नाही प्रशांत, ठीक आहे प्लॅन प्रमाणे करू ",...

" आता पुढे काय ठरवलं आहेस घरच ",...... प्रशांत

" सध्या मी बाबांच्या आमच्या दुकानात जाऊन बसतो , आईकडे पण मी पैशाविषयी बोललो आहे, थोडी पैशाची व्यवस्था झाली की नेक्स्ट स्टेप घेऊ ",...... संतोष

" मी हे उरलेले पैसे त्या गुंडांना देऊन टाकतो आणि पुढची तयारी करतो , तू थोडे दिवस आई बाबांना मदत कर, पैसे गोळा कर साधारण पन्नास हजार ",...... प्रशांत

हो...

मला सोनल हवी आहे, लहानपणापासूनच माझ्या मनात होतं, मला सोनल शी लग्न करायचं होतं, बघू आता हा प्लॅन कसा पुढे जातो, आई बाबा मला तुमच्या मनाप्रमाणे ही नीट वागायच आहे पण तरी मला सोनल हवी आहे तर ही पुढची स्टेप घ्यावी लागेल......... संतोष विचार करत होता

..........

सोनल चे बाबा घरी आले, सोनल वैभव टीव्ही बघत बसले होते, घरात वेगळीच शांतता होती

"काय झालं एवढे शांत का सगळे" ,...... बाबा

आई ही बाहेर आली, वैभव दादा ने बाबांना आज काय झाल ते सगळ सांगितल, संतोष इकडे आला होता सगळ ऐकुन बाबा ही काळजीत होते, बाबांनी लगेच आक्का आत्यांना फोन लावला

"बोल रे भाऊ, सोनल च लग्न जमल ही आनंदाची बातमी द्यायला फोन केला का मला",...... आक्का

"नाही संतोष किती त्रासदायक आहे हे सांगायला फोन केला आहे मी, आक्का तू जरा संतोष वर वचक ठेव, आज तो आमच्या घरी का आला होता, आणि सोनल च लग्न जमलं याच्याशी तुमच्या सगळ्यांचा काहीही संबंध नाही",...... बाबा

" संबंध कसा नाही भाऊ, आम्ही पहिले आलो होतो तुमच्याकडे स्थळ घेऊन, काय कमी होती माझ्या मुलात तर तुम्ही आम्हाला नकार दिला आणि त्या राहुल बरोबर लग्न जमवलं, आला असेल तो तिकडे तुझ्याकडे विचारायला की नक्की काय झालं आहे, तो आला त्याच्या मामाकडे म्हणून काय तुम्ही त्याला मारायच का ", ?....... आक्का चिडल्या होत्या

" तुला माहिती आहे का आक्का नक्की काय झाल ते? , संतोष पाळतीवर असतो सोनल च्या , तो घरी आला नव्हता, तर तो गेट वर लपून बसला होता, त्याने सोनल चा हात धरला, मग वैभव चिडला ",...... बाबा

" म्हणून काय वैभवने त्याला मारायचं का ",...... आक्का

" मी बोललो ना तुला तो सोनलच्या पाळतीवर असतो, त्याने सोनलचा हात धरला, हे तुला काहीही महत्त्वाचं वाटत नाही आहे का आक्का? सारखं तुझं आपलं संतोषला मारलं तेच सुरू आहे, यापुढे जर त्याने अजून सोनल च नाव घेतलं तर या पेक्षा जास्त मारामारी होऊ शकते, तू संतोषला समजून सांग आमच्या नादी लागू नकोस",....... आता बाबाही चिडले होते

" तुला काहीच वाटत नाही का भाऊ माझ्याविषयी आणि संतोष विषयी, घरात पोरगी द्यायची तर कुठे परक्या वर तुमचा जास्त विश्वास आहे, ठीक आहे मी सांगते समजून संतोषला, पण यापुढे तुझा आणि माझा संबंध संपला, वाटलं होतं दूरचा का असेना एक भाऊ आहे, पण भावालाच माझी काही पडली नाही, यापुढे मला फोन करू नको",....... आक्का

" मलाही काही तुझ्याशी बोलायची हौस नाही आक्का, ठीक आहे तू म्हणते तर मी तुला कधी फोन करणार नाही, पण तू संतोषला नीट वागायला सांग, लग्नाच्या गोष्टी अशा बळजबरीने होत नसतात, दोघांचंही एकमेकांवर प्रेम हवं, विश्वास हवा, मुलांच्या मना प्रमाणे व्हायला हवं, हे जर तुला समजत नसेल तर माझा नाईलाज आहे ",...... बाबांनी फोन ठेवून दिला

आई वैभव दादा सोनल सगळ ऐकत होते,

" सोनल बेटा तू सावध रहा या पुढे ते लोक चांगले नाहीत",..... बाबा आत आवरायला निघून गेले आई ही आत गेली

...................

सोनल कडे प्रोग्राम साठी आई बाबा सामान काय लागेल याची लिस्ट करत होते, सोनल राहुल सोबत फोन वर बोलत बसली होती,

"आपण बोलत होतो तेव्हा आला होता का संतोष तिकडे",..... राहुल

हो....

" मग तू मला कळवायचं ना, लगेच आलो असतो मी तिकडे, चांगलं बघितलं असतं मी संतोष कडे",....... राहुल

"मी तुलाच फोन करत होती, संतोष ने माझा हात धरून ठेवला, तेवढ्यात वैभव दादा तिथे आला आणि त्याने संतोष ला मारल ",....... सोनल

" हे प्रकरण जास्तच वाढत चालला आहे सोनल, आपल्याला आता पुढचा विचार करायला पाहिजे, साखरपुड्याच्या दिवशी आपण ठरवून घेऊ पुढे काय करायचं ते, जमलं तर लवकरच लग्न करून घेऊ, मग पुढे तू नंतर शिक हव तेवढ, मला ही स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, तुझा काय विचार होतो आहे यावर ",........ राहुल

" तू बरोबर बोलतो आहेस राहुल, हेच योग्य राहील, आपण लवकरच लग्न करून घेऊ, मला आता कुठे बाहेर निघायची ही फार भीती वाटते, माझ्या हृदयाची धडधड अजूनही थांबलेली नाही, संतोषची फारच भीती वाटते सध्या ",....... सोनल

" तू काहीच काळजी करू नको सोनल, होईल नीट सगळ, बहुतेक संतोष चे मित्र आपल्या पाळतीवर आहेत, आपण कधीही त्यांच्या जाळ्यात फसू शकतो, त्यामुळे घरातून बाहेर निघताना दोन वेळा विचार कर, नाहीतर सरळ माझ्या बरोबर नाही तर आई-बाबांसोबत बाहेर जात जा, मला माहिती आहे हे सगळं खूप अवघड आहे, पण थोडे दिवस स्वतःच्या सिक्युरिटी साठी हा डिसिजन तुला घ्यावाच लागेल, नंतर आपण शक्य झालं तर दुसरीकडे बदली करून घेऊ, हे असं दडपणात किती दिवस राहणार",........ राहुल

" राहुल मी कधी संतोष शी प्रेमाने वागले नाही की बोलले नाही, मी त्याला नेहमी हे सांगितला आहे की आपलं लग्न कधी ठरू शकत नाही, तरी तो का माझ्या मागे येत असतो",........ सोनल

" सोनल यात तुझा दोष नाही काही, संतोष तुझ्यावर एकतर्फी प्रेम करतो, तुझा नकार आहे हे त्याला जितक्या लवकरात लवकर समजेल तितकं त्याच्यासाठी चांगल आहे, उगीच सगळ्यांना त्रास होतो त्याच्या वागण्याचा",........ राहुल

" हो ना मला पण खूप कंटाळा आला आहे संतोष चा, बाकीच्यांना असंच नाही वाटणार ना की या प्रकरणात मीच दोषी आहे",...... सोनल काळजीत होती

" कोणाला काहीही वाटू दे सोनल आता मला काहीही फरक पडत नाही, फक्त तु व्यवस्थित आहे या गोष्टीशी मला देणं घेणं आहे",....... राहुल

" खरंच राहुल तू खूप समजूतदार आहेस राहुल, माझी निवड योग्यच आहे, आज बाबांनी पण आक्का आत्यांना फोन करून सगळं सांगितलं, किती फरक पडतो आहे त्या संतोष मध्ये काय माहिती, चल आई बोलवते आहे जेवायला मी फोन ठेवते",....... सोनल

" ओके, पण तू ही खूप काळजी करू नकोस सोनल, काहीही झाल तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही हे लक्षात ठेव ",....... राहुल

" माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे राहुल, love you, bye ",...... सोनल

Love you too....... Bye

.....

जेवण झालं, आई-बाबा रूम मध्ये आले, ते दोघ खूप काळजीत होते,

" काय होणार आहे पुढे काही समजत नाही, आपण असं करूया का राहुल आणि सोनल च लग्न लवकर लावून टाकू",....... आई

"हो बरोबर आहे, सोनल राहुल सोबत सुखात राहील हे असं संतोषच तिच्या मागेमागे करण मला खूप टेन्शन येत आहे, आपण साखरपुड्याच्या दिवशी सगळ ठरवून टाकू",...... बाबा

..........

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया घरी आली, सोनल आवरत होती ,.... "सोनल येते का माझ्या कडे जरा वेळ, आई बाबा नाहीत घरी, आपण बोलत बसू जरा वेळ ",..

सोनल ने आई ला विचारल,......" आई मी जाऊ का जरा वेळ प्रियाकडे ",....

" हो जा सोनल पण जरा सावध रहा, तुला माहिती आहे ना संतोष आपल्या पाळतीवर असतो",....... आई

" हो आई आम्ही आतल्या शेताच्या रस्त्यात ने जातो आहे",....... सोनल

तशी प्रिया शेजारीच राहत होती म्हणून आई निश्चिंत होते होती,

दोघी प्रिया च्या घरी गेल्या,

प्रियाने दोघींसाठी चहा केला, खूप छान गप्पा रंगात आल्या होत्या त्यांच्या, मीनल ही आली, आज बर्‍याच दिवसांनी सोनल ला छान मोकळ वाटत होत

सोनल चा फोन वाजला,..... "कोणाचा फोन आहे ग सोनल ",....

संतोष चा,.... सोनल ने फोन उचलला नाही

" काय ग का केला असेल फोन त्याने",...... प्रिया

"काही विशेष नाही, तो काल आला होता घरा पर्यंत, वैभव दादा ने त्याला माझ्याशी बोलू दिल नाही, उगीच बडबड करेन तो, काही अर्थ नाही त्याच्याशी बोलण्यात",... सोनल

"हो असे फोन टाळलेले बरे",...... प्रिया

थोड्या वेळाने परत फोन आला...... परत सोनल ने फोन कट केला, तिने राहुल ला फोन करून सांगितले की संतोष सारखाच फोन करतो आहे मला इकडे
............

प्रशांत आला भेटायला संतोष ला, संतोष टेंशन मध्ये दिसला

" काय झाल संतोष लागला का फोन सोनल ला ",..... प्रशांत

" लागतो आहे पण सोनल कट करते आहे, हे अस आहे वागण सोनल च, दोन मिनीट माझ्याशी बोलाल तर काही बिघडेल का तीच, पण अति हट्टी स्वभाव" ,........ संतोष

संतोष चा फोन वाजत होता..... त्याने फोन उचलला

"राहुल बोलतोय, कश्याला सोनल ला फोन करतोस तू केव्हा पासून, का त्रास देतोस ",...... राहुल

" तू का तिची वकिली करतो, मला काय बोलायचं तिच्याशी मी बोलेन ",...... संतोष

" अस कस? हे चालणार नाही, मी सांगून ठेवतो संतोष दूर रहा आमच्या पासून, तुला माहिती असेल ना माझ सोनल च लग्न जमल ते ",........ राहुल

संतोष आणि राहुल च खूप भांडण झाल फोन वर

संतोष फार चिडला होता, प्रशांत ऐकत होता सगळ

" काहीही झाल तरी मला राहुल ला धडा शिकवायचा आहे, स्वतःला काय समजतो काय, म्हणत होता का केला सोनल ला फोन, अरे हा कोण आहे मला सांगणारा, त्या लोकांना माहिती नाही मी काय चीज आहे ते, माझी ओळख पार वर पर्यंत आहे, कुठे ही बोलाव असा मारेन मी त्याला, तुला सांगतो ना प्रशांत ",...... संतोष खूप चिडला होता

" संतोष तू शांत हो आता आपल्याला जास्त बोलायच नाही, करून दाखवायचा आहे, पण तूच अस मधून कच खातो, माघार घेतोस ",...... प्रशांत

" नाही आता माझ पक्क ठरले मी राहुल ला धडा शिकवणार, मी करतो पैसे ची व्यवस्था ",...... संतोष

............

सोनल घरी आली वैभव दादा आला होता घरी आई बाबा बाहेर गेले होते खरेदी साठी

राहुल चा फोन आला,....." आता माझ संतोष च भांडण झाल आता, किती घाण मुलगा आहे तो ",...

हो ना...

" अजिबात त्याचे फोन उचलू नको ",..... राहुल

" नाही मला त्याच्याशी बोलायची इच्छा नाही",.... सोनल

आई बाबा घरी आले, खूप छान खरेदी झाली होती, साखरपुडयाची तारीख आता जवळ आली होती,

" उद्या अंगठी पसंत करायला तुला आणि राहुल ला याव लागेल दुकानात",..... आई

"हो चालेल ",.... सोनल खुश होती, ती साड्या खरेदी बघत होती

" किती खर्च केला बाबा तुम्ही, कश्याला एवढ्या साड्या आणल्या ",...... सोनल

" असू दे बेटा, तुझ्या साठी आहे सगळ, तू सुखात रहावी हेच हव आहे आम्हाला ",...... बाबा

सोनल जावून बाबांन जवळ बसली, आई वैभव दादा कौतुकाने त्या दोघांन कडे बघत होते

"उद्या भेटतो आहोत आपण राहुल",.... सोनल ने मेसेज केला

" अरे वा ",.... राहुल

" कपल अंगठी बुक केली ती साईज डिझाईन बघायला जायचं आहे",...... सोनल

" ठीक आहे जाऊ या उद्या शॉप मध्ये",..... राहुल

.............

दुसर्‍या दिवशी रमेश दादा तयार होता, राहुल नाश्ता करत होता,

" काय मग कुठे जायची तयारी राहुल",........ रमेश दादा

" मी सोनल सोबत अंगठी घ्यायला जातो आहे ",.... राहुल

"मजा आहे बाबा पण जरा सावध रहा ",.... रमेश दादा

" हो दादा, काय झाल काही समजल का की हल्ला कोणी केला होता ते, आणि काल ही त्या संतोष ने परत गोंधळ घातला, तो सोनल च्या घरावर पाळत ठेवतो आहे तो ",..... राहुल

"हो का, बघतो मी, तू काळजी करू नकोस, नाही काही पुरावे नाहीत, हल्लेखोर बदमाश च्या पाळतीवर आहेत आपली माणस, बघू अजून तरी ते कोणाला भेटले नाहीत ",..... रमेश दादा

ओके......

" आई बाबांना विचारल मी, ते बोलले तू जा अंगठी घ्यायला, तू येतोस का दादा सोबत",....... राहुल

" नाही मला अर्जंट केस आहे एक, तू जावून ये आज, आपण उद्या जाऊ सगळे कपडे खरेदीला ",....... रमेश दादा

ठीक आहे......... राहुल खूप खुश होता, मनाप्रमाणे होत होत सगळ, साखरपुडा मग लग्न......

...........

पण होईल का सगळ राहुल ला वाटतय तस...... काय वाढून ठेवलय पुढे.......

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now