Jan 26, 2022
कथामालिका

बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 16

Read Later
बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 16


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 16

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
........

संतोष आणि त्याचे बाबा दुपारी जेवायला घरी आले, आक्कांनी ताट केले, संतोष जेवणात लक्ष नव्हतं, त्यांनी त्याच्या आवडीचे पदार्थ केले होते, तरी तो विशेष जेवत नव्हता, हे आक्कांच्या लक्षात आले, त्यांनी बाबांना हळू आवाजात विचारले,.... "काय झालं आहे? , तुम्ही काही बोलले का त्याला, दुकानात काही झाल का? " ,

"नाही काही झाल नाही, उलट संतोष छान काम करत होता दुकानात, व्यवस्थित वागला तिथे, मला माहिती नाही तो का शांत आहे ",....... बाबा

संतोष च्या बाबांचे जेवण झालं, त्यांना महत्त्वाचा फोन आला होता, ते उठून गेले....

"काय झाले आहे संतोष आज तुझं जेवणात लक्ष नाही, कोणी काही बोललं का तुला? ",...... आक्का

" काही नाही झालं आई , काही विचार करून उपयोग नाही आता या सगळ्या गोष्टींचा, आपल काम करायचं शांत रहायच हेच ठरवल आहे मी या पुढे ",....... संतोष

"का काय झालं आहे, नीट सांग संतोष",..... आक्का काळजीत होत्या

तसा संतोष खाली बघून बोलला,....." आई आज राहुल आणि सोनल च लग्न जमल आहे, लगेच साखरपुडा आहे त्यांचा, आई मी खरच एवढा वाईट आहे का, का अस करते ती सोनल ",..

" काय बोलतोस काय, काय लोक आहेत हे, यांना काही समजत नाही की काय, चांगल वाईट समजत की नाही ",...... आक्का

"हो आई ",.... संतोष अजूनही नाराज होता

" काय करतो तो मुलगा, कुठला आहे ",...... आक्का

" आमच्या कॉलेजमध्ये चा आहे मुलगा राहुल नाव आहे त्याच ",..... संतोष

" शिकतो आहे का तो मुलगा अजून, love marriage आहे का",.... आक्का

" हो आई",..... संतोष

"कसे लोक आहेत हे? आपल्याला ना ना गोष्टी शिकवतात आणि स्वतःची मुलगी बघा म्हणा कस वागते , आपल एवढं चांगलं श्रीमंत स्थळ हातचं सोडून पळत्याच्या मागे पळता आहेत हे , तुला काय वाटत आहे संतोष? मी बोलून बघू का भाऊ शी, मला खूप वाईट वाटत आहे",........ आक्का

"काही बोलून उपयोग नाही त्या लोकांशी आई, मी सोनाल वर मनापासून प्रेम केलं आहे, एका शब्दानेही तिला कधी दुखावलं नाही, उलट तीच मला नाही नाही ते बोलायची, तरीसुद्धा मी सगळं ऐकून घेतलं",...... संतोष

"चांगल्या मुलांची किम्मत नाही त्यांना, प्रस्तावातील ते बघ, तू काळजी करू नको संतोष, आता तू पुढे काय ठरवल आहे",........ आक्का

" काही नाही, आपल काम भल आपण भल, आता आई बाबा तुम्ही बोलाल ते करेन मी ",....... संतोष

आक्काच्या डोळ्यात पाणी होत,....... "संतोष असा हताश होवु नकोस, तू सोनल शी तू एकदा बोलून बघशील का",

" हो बघतो मी काय करता येईल, नाही तर मी करतो फोन तिकडे नंतर तू त्रास करून घेऊ नकोस आई ",...... संतोष

आक्कांनी मानेने होकार दिला....

" आई मला पुढे शिकायचं आहे, कॉम्प्युटर क्लास लावायचा आहे मला, थोडे जास्तीचे पैसे लागतील, तू बोलशील का बाबांशी",....... संतोष

" हो बोलेन मी, तुला लागतील तेवढे घे, सगळ तुझ आह़े ",...... आक्का
...........

सोनल तिची आई घर आवारात होत्या, वैभव दादा ऑफिस ला निघून गेला,

" छान आहेत राहुल च्या घरचे, त्याचे आई वडील एकदम साधे आहेत ",....... आई

" हो ना किती छान झाला प्रोग्राम ",....... सोनल आनंदात होती

" सोनल तुला साखरपुडा साठी काय काय हव लिस्ट दे, मी आणि तुझे बाबा जावून घेवून येवू, का तू येतेस",....... आई

"नाही तू जा बाबांन सोबत, आई मी करते लिस्ट ",...... सोनल

" मेहंदी वाली ला सांगाव लागेल" ,....... आई

" हो पार्लर वाली ताई आहे ओळखीची तिला सांगेन सगळ",...... सोनल
...........

राहुल त्याचे आई बाबा वहिनी घरी पोहोचले, सगळे खूप आनंदी होते,

" छान आहे सोनल चा स्वभाव",..... आई

" हो ना हुशार किती आहे ती, आपल्यात लगेच मिक्स झाली ",...... वहिनी

राहुल सगळ ऐकत होता, तो खूप खुश होता, पुढच्या आठवड्यात साखरपुडा, सोनल साठी छान गिफ्ट घेवू आपण

"मी सोनल ला सांगतो की आम्ही पोहोचलो",....... राहुल ने सोनल ला फोन

सोनल आवरत होती तेवढय़ात फोन वाजला तिला वाटलच होत की राहुल चा फोन असेन

Hello सोनल,

Hello......

"पोहोचले का घरी तुम्ही लोक",........ सोनल ,

" हो" ,....... राहुल

"आज आपल्याला दोघांना बोलायलाच मिळालं नाही काही",...... राहुल

"हो ना सगळे होते आजूबाजूला काय बोलणार, पण आज मी खूप खुश आहे राहुल, बरं झालं घरच्यांनी आपलं प्रेम मान्य केल, सगळ अगदी आपल्या मनासारखं झाल ",...... सोनल

"हो ना, देवाचे खूप आभार, आज तू खूप सुंदर दिसत होती सोनल, निळा रंग तुझ्या वर छान शोभत होता, आणि बांगड्या ही ",....... राहुल

तशी सोनल लाजली......" तुझ लक्ष्य होत ",....

"हो,..... सोनल , आता पुढच्या आठवड्यात आपला साखरपुडा, खरच वाटत नाही आहे सगळं ",...... राहुल

" हो ना",...... राहुल

" तू ही छान दिसत होता आज, कुर्ता शोभत होता तुला ",....... सोनल

"हो का,.... मला आज तिकडे काही सुचत नव्हत",..... राहुल

"हो ना हळवी झाली होती मी ही",..... सोनल

" पुढे काय करू या साखरपुडा नंतर लगेच लग्न करू या की एक वर्ष थांबू या",...... राहुल

राहुल ने अस विचारताच सोनल लाजली,......" आपण भेटून ठरवू या का ",...

"तू म्हणशील तस राणी सरकार ",..... राहुल

" काहीही काय राहुल ",..... सोनल छान हसत होती

" पण जे काही ठरवायचं ते लवकर ठरव, आता मला तुझ्या पासून दूर नाही राहवलं जात ",..... राहुल

"राहुल चूप रे कोणी ऐकेल तिकडे ",..... सोनल लाजली होती

राहुल आणि सोनल बराच वेळ बोलत होती, ती बोलत बोलत बाहेर गेट जवळ आली, तिथे बोलत उभी राहिली, राहुल ने फोन ठेवला, आनंदाने सोनल घरी जायला वळाली,

समोर संतोष उभा होता....

"Hi सोनल कशी आहेस, तुझ खूप अभिनंदन",..... संतोष

सोनल काहीही न बोलता आत जायला निघाली, संतोष ने तिची वाट अडवली..

"तू कश्याला आला आहेस इथे संतोष",....... सोनल

"सोनल तू एवढी छान बातमी दिली, तुझ अभिनंदन करायला आलो आहे मी, माझ्यात काय कमी आहे सोनल तू का केल अस ",...... संतोष वेगळच हसत होता

"मला जाऊ दे संतोष मला या विषयावर बोलायचं नाही काही, तुझा काहीही संबंध नाही माझ्या लग्नाशी",........ सोनल

"एक मिनिट सोनल, संबंध आहे, मी खूप प्रेम करतो तुझ्या वर, तू का राहुल बरोबर लग्न ठरवल हे ऐकल्या शिवाय मी इथून जाणार नाही ",....... संतोष

"मी माझे निर्णय घ्यायला समर्थ आहे, वाट सोड माझी, मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही, नाही तर मी राहुल ला फोन करेन ",....... सोनल

सोनल ने राहुल ला फोन लावायला फोन हातात घेतला तो हात संतोष ने तिथल्या तिथे वर पकडला,

" माझा हात सोड संतोष",...... सोनल

" आधी सांग का केलस तू अस, माझ्या शी का वागते तू अशी ",....... संतोष

संतोष प्लीज.........

वैभव दादा आला तेवढ्यात ऑफिस हून, सोनल संतोष उभे होते तिथे तो पटकन आला, गाडी बाजूला लावून त्याने पुढे होवुन साटकन संतोष च्या थोबाडीत दिली

संतोष घाबरला त्याने सोनल चा हात सोडला....

" काय करतोस संतोष इथे तू? सोनल चा हात धरायची तुझी हिम्मत कशी झाली, काय प्रकार आहे हा, सोनल तू आत जा",....... वैभव दादा चिडला होता

"सोनल मला बोलायचं आहे तुझ्याशी ",...... संतोष

" सोनल जा घरी पटकन, तुझी ही हिम्मत संतोष नीघ इथून",...... वैभव दादा

"मी जाणार नाही, मला सोनल शी बोलायचं, सोनल माझी आहे",....... संतोष

सोनल रागाने आत निघून गेली......

" मागच्या वेळी पोलिसात केलेली तक्रार कमी झाली का संतोष, आमच्या घरा पासून सोनल पासून लांब थांब समजल",....... वैभव दादा

" मी नाही जाणार मला सोनल शी बोलायचं आहे, तुम्ही अस नाही करू शकत माझ्या सोबत ",........ संतोष

"रहा मग उभा इथे" ,......... वैभव दादा आत आला,
.........
सोनल आत आली, ती घाबरून खाली बसली होती, आई तिच्या साठी पाणी घेवून आली, वैभव दादा ही आत आला ,....

" काय झाल रे वैभव, सोनल का बसली अशी ",..... आई काळजीत होती

वैभवने आई ला सगळ सांगितल काय झालं ते,.... "बघ ना त्या संतोष ची किती हिम्मत घरावर नजर ठेवून आहे का हा आता, आपण काळजी घ्यायला हवी ",......... वैभव दादा

.......

संतोष तिथून निघाला, घरी गेला, आक्का वाट बघत होत्या,......" भेटली का सोनल? काय झालं बोलण",?

"काहीच नाही बोलण झाल आई, मी सोनल शी बोलणार तेवढ्यात वैभव आला मध्ये त्याने मला मारल",...... संतोष

" काय.... कुठे लागल तुला? तू ही ऐकत नाही अजिबात, हे सोनल प्रकरण कुठे पर्यंत जाणार आहे काय माहिती? तू मला एका गोष्टीच वचन दे संतोष सोनल चा नाद सोड, मला आधी वाटल होत तीच लग्न जमलं तेव्हा की एकदा बोलायला हव सोनल शी, पण हे अस तुला ते लोक मारणार असतिल तर जाऊ दे ना, आपण दुसरे चांगले स्थळ बघू ",....... आक्का काळजीत होत्या

" नाही आई मला सोनल हवी आहे, मी खूप प्रेम केल आहे तिच्यावर ",....... संतोष

" अरे काय अस संतोष, त्रासदायक गोष्टी सोडून द्यायच्या असतात, आपण बघू चांगले स्थळ तुझ्या साठी मी वचन देते, एक से एक मुलगी दाखवेन मी तुला ",..... आक्का

"आई मला ते जमणार नाही, मला सोनल शी लग्न करायचं आहे ",..... संतोष

संतोष आक्कांन सोबत बोलत होता तेव्हा प्रशांत चा फोन आला,....... " बोल प्रशांत",

"थोड काम होत येतोस का बाहेर जरा ",..... प्रशांत

" हो येतो मी बाहेर दहा मिनिटात",...... संतोष

" लवकर ये ",...... प्रशांत

"आई मी आलोच जावून" ,..... संतोष बाहेर गेला प्रशांतची वाटच बघत होतं,

"संतोष थांब, हे बघ डोक्यात राग घालून जाऊ नकोस, आपण बोलतो आहोत ना थांब जरा ",...... आक्का

तरी संतोष बाहेर निघून गेला..
......

"काय झालं झाली का पैशाची व्यवस्था",...... प्रशांत

"काय पैसे पैसे करतो, इथे माझी वाट लागली मला आज त्या वैभव ने मारल मला ",...... संतोष

"का काय झाल? तु गेला होता का त्यांच्या कडे"?,........ प्रशांत

हो...... संतोष

"का?? काय झाल संतोष? अविनाश सांगत होता तेच का ? शेवटी जमलं लग्न राहुल सोनल, खरं आहे का हे",..... प्रशांत

"हो खर आहे त्या साठी गेलो होतो मी सोनल ला भेटायला ",..... संतोष

" काय बोलतोस तू घरी सांगितल का काकूंना",...... प्रशांत

"हो आई बोलली बोलून बघ एकदा सोनल शी फोन वर, म्हणून मी गेलो होतो तिकडे ",...... संतोष

" मला घेवून जायचं ना मग मी बघितल असत त्या वैभव कडे ",...... प्रशांत

"नाही प्रशांत मला आता मारामारी नको आहे, सोनल ला नाही आवडत आणि आता सोनल ला जे आवडत नाही ते मी करणार नाही ",...... संतोष

" काय आवड निवड तू ही द्यायच्या दोन ठेवून त्या वैभव ला",..... प्रशांत

" नाही मी नाही करणार अस, मारामारी करतो म्हणून त्या सोनल ला मी आवडत नाही, मी आधी पासून नीट वागायला पाहिजे होत, पण अजून उशीर झाला नाही, मी सोनल च मन जिंकेल ",....... संतोष

" ती काही अशी ऐकणारी आहे का संतोष",..... प्रशांत

" प्रशांत तू प्लीज सोनल बद्दल अस बोलू नकोस ",...... संतोष

" संतोष तू त्या सोनल च्या प्रेमात आंधळा झाला आहेस",..... प्रशांत

" असू दे मला सोनल च मन प्रेमाने जिंकायचे आहे ",...... संतोष

" जाऊ दे ते पैसे ची झाली का व्यवस्था",...... प्रशांत

"हो हे घे दोन हजार रुपये, भेटले का ते लोक",...... संतोष

" नाही बहुतेक ते फोन करत असतिल मी सिम कार्ड तोडून फेकून दिल",...... प्रशांत

" मग आता भेटले नाही ते तुला कधी तर ",........ संतोष

" जर भेटले तर देवू पैसे, नाही तर वापस करेन मी तुला सगळे पैसे, हे आणि अजून तीन हजार आहेत टोटल पाच हजार आहेत",...... प्रशांत

" असू दे रे एवढ काय, त्या साठी नव्हत म्हणत मी ",...... संतोष

" पुढे पैसे लागतील जपून वापरू या आपण",...... प्रशांत

ठीक आहे.....

दोघ बर्‍याच वेळ बोलत होते, पुढचा प्लॅन प्रशांत सांगत होता, संतोष सगळ नीट ऐकत होता,
............

काय होईल पुढे संतोष ऐकेन का प्रशांत च की त्यात थोडी सुधारणा झाली आहे.........


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now