बंद दरवाजा...भाग 2

Katha eka chimuklichi

बंद दरवाजा...भाग 2

बारावी झाल्यानंतर प्रदीप इकडे तिकडे फिरायला लागला, त्यांचं बाहेर जाणं वाढलं, मित्रांसोबत जाणं वाढलं, बाहेर जाऊन टवाळक्या करायला लागला.

कमला बोलली त्याला काहीतरी काम कर, थोडे पैसे तरी हाताशी येतील. पण प्रदीप ऐकत नव्हता. बाहेर जाऊन तो टवाळक्या करायचा, धिंगाणा करायच्या. हे त्याचं रोजचं झालेलं होतं.


"प्रदीप असा उनाळक्या करत बसण्यापेक्षा बाहेर जाऊन काहीतरी काम कर रे, हाताशी पैसा तरी येईल." कमला त्याला रोज सांगत असे.


"आई मी काय आलतू फालतू नाहीये, बारावी सायन्सचा मुलगा आहे. चांगला मार्काने पास झालो आणि असे छोटे मोठे काम करेल तर लोक हसतील ना माझ्यावर."

"अरे बाळा कुठलंही काम छोटे-मोठे नसते, सगळी कामं सारखीच असतात आणि आपल्याला पैशाची अडचण आहे की नाही, मग थोडा हातभार लावला तर काय बिघडलं."

"नाही ग आई, असू दे मी नाही करणार तरीपण."

"बाळा तुला समोर शिकायचं आहे ना? त्याच्यासाठी पैसा नको का? मी प्रयत्न करते आहे रे कुठून तरी व्याजाने पैसे मिळतील तर बरं होईल, तुझं शिक्षण झाल्यावर तू फेड मग तू तुझं कर्ज." आईची बडबड सुरू असायची पण प्रदीप न ऐकताच निघून जायचा.


एक दिवस प्रीती शाळेतून आली, कमला शेतावर गेलेली होती. प्रदीप हा घरात मित्रांसोबत पत्ते खेळत बसलेला होता.

"दादा मला टोपली मधून कपडे काढून दे ना, आईने वर उचलून ठेवलंय. मला दिसतही नाहीये."


"ये थांब ग तू, आपलं मध्येच काही सांगू नको. मी खेळतोय ना दिसत नाही का तुला?"

"दादा काढून दे ना, असा का करतो?"

प्रीती त्याच्या मागे लागली म्हणून त्याने मित्राला घरी पाठवलं आणि दार बंद केला. प्रदीपने टोपलीतून तिचे कपडे काढून दिले.


"हे घे प्रीती, बदलून देऊ का कपडे?"

"नाही दादा मी बदलते."

"अग ये ग बाई बदलवून देतो." असं म्हणत प्रदीपने प्रीतीच्या अंगातून शाळेचा सदरा काढला.


क्रमशः

🎭 Series Post

View all