बंद दरवाजा...भाग 3

Katha tichya jiwachi

बंद दरवाजा...भाग 3

"अग ये ग बाई बदलवून देतो." असं म्हणत प्रदीपने प्रीतीच्या अंगातून शाळेचा सदरा काढला आणि काय कुणास ठाऊक प्रदीपच्या डोक्यात काय संचारलं, तिच्या लवचिक शरीराकडे बघून प्रदीपची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्याने त्याच्या सावत्र बहिणीवर अत्याचार केला.

सगळं करून झाल्यानंतर तो भानावर आला आणि घाबरून तिथून पळून गेला. कमला शेतावरून आली तेव्हा बघितलं तर प्रीती बेशुद्ध पडून होती, तिची अवस्था खूप नाजूक झाली होती, रक्तस्त्राव सुरू होता.


कमलाने दारात पाऊल ठेवत नाही तर तिला हे दृश्य दिसलं, कमलाने हंबरडा फोडला. धावत तिच्याकडे गेली.


"ये प्रीती उठ, काय झालं? काय झालं तुला? काय झालं तुला? कोणी केलं? कोण नराधम आला होता इकडे?कोणी केलं?"रडतडंत तिने त्या मुलीला उचललं आणि दवाखान्यात घेऊन गेली.

बऱ्याच तासानंतर प्रदीपला त्याच्या मित्रांनी सांगितले की


"तुझ्या बहिणीची तब्येत खूप खराब आहे तिला दवाखान्यात नेले जा तु, अरे थांब आम्ही पण येतो तुझ्यासोबत." असं म्हणत प्रदीपचे तीन मित्र आणि प्रदीप दवाखान्यात गेले.


दवाखान्यात डॉक्टरांची गडबड सुरू होती, प्रीतीची तब्येत खूप नाजूक होती, कमलाने प्रदीपला औषध आणायला पाठवलं आणि त्यांच्या मित्रा जवळ चौकशी केली.


"काय रे तुम्ही तर आमच्या घरीच असताना दिवसभर पडले, आज कुठे गेला होतात? कोण आलं होतं घरी? कोणी आलं होतं का? कोणी केलं माझ्या मुली सोबत असं?"


"काकू आम्ही तुमच्या घरीच खेळत होतो, प्रीती शाळेतून आली ना तिला कपडे दिसत नव्हते म्हणून तिने प्रदीपला कपडे काढून मागितले. प्रदीपने आम्हाला तिघांना घरी पाठवलं म्हणून आम्ही घरी गेलो. त्यानंतर काय घडलं माहिती नाही.

प्रदीप औषध घेऊन आला त्याच्या हातातून औषध घेताना कमलाची नजर त्याच्या मानेवर गेली. त्याच्या मानेवर नखेचे ओरबांडे होते.


क्रमशः

🎭 Series Post

View all