कधीतरी वाटत मनासारख जगाव
हव तस राहव, पुन्हा स्वच्छंदी जगाव
जबाबदारीच ओझ बाजूला साराव
रम्य त्या बालपणात पुन्हा जगाव
पुन्हा शाळेतल्या क्षणात जाव
लहानपणीच्या आठवणी तृप्त व्हाव
आकाशातील चांदण्या पाहत शांत पडाव
झाडावरील झोक्यावर स्वार व्हाव
रानमेवा गोळा करत फिराव
नदीतील पाण्यात पुन्हा पोहाव
पुन्हा लहान होऊन आईच्या कुशीत शिराव
अस वाटत पुन्हा त्या दिवसात जाव
मन भरून पुन्हा एकदा तेच जीवन जगुन याव
©®✍ अमृता