Aug 18, 2022
कथामालिका

बालमजुर भाग -१

Read Later
बालमजुर भाग -१
बालमजुर.. भाग - १


रामा!...अरे!... रामा!!.... चल लवकर!... उशीर होईल शाळेत जायला!....मोहन रामाला हाक मारत होता..


रामा व मोहन दोघे सातवीला होते... दोंघांचे वडील एका केमिकल कंपनीत कंत्राटी मजुरी करत... त्यांची परिस्थिती तशी गरिबीची होती.... पण त्यांत देखिल ते समाधानी होते...


आज त्यांच्या शाळेत वार्षिक बक्षिस समारंभ होता... मोहन खेळात तर रामा अभ्यासात हुशार होता.... बक्षिस यादीत दोघांचीही नावं होती... त्यामुळे दोघंही आज आनंदात होते....


त्यांच्या आनंदाचे आणखीन एक कारण म्हणजे त्यांच्या शाळेत शिकलेले अरविंदसर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते... आणि त्यांच्याच हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होणार होता....


अरविंदसर त्यांच्या शाळेचे माजी विद्यार्थी... अतिशय गरीब परिस्थीतीवर मात करून ते आज चित्रपट सृष्टीत नामांकित दिग्दर्शक होते..... आज पर्यत त्यांच्या चित्रपटाचे ऑस्कर साठी दोन वेळा नामांकन झाल होत... मात्र दुर्दैवाने त्यांना तो पुरस्कार मिळू शकला नाही ....वास्तव परिस्थीतीवर चित्रपट बनवणारा दिग्दर्शक अशी त्यांची खास ओळख होती.... ते त्यांच्या कामात अतिशय व्यस्त असत पण शाळेचे माजी विद्यार्थी या नात्याने त्यांनी आज बक्षिस वितरण कार्यक्रमाला वेळ दिला होता.....कार्यक्रम चालु झाला... ज्या मुलांची नाव बक्षिस यादीत होती ती सगळी पुढे बसली होती... त्यांत रामा आणि मोहन देखिल होते.....


सुत्रसंचालक मुलांची नावं पुकारत होते तशी मुलं देखिल उठून बक्षिस घेत होती....त्या सगळ्या मुलांच्या पाठीवर अरविंदसर शाबासकीची थाप देत होते......


रामाचे नावं पुकारले तसा रामा उठला.. बक्षिस घेतांना मुख्याध्यापक सरांनी आवर्जुन अरविंदसरांना संगितले की, रामाने पाहिली पासुन ते सहावी पर्यत पहिला नंबर सोडला नाही!.... हे ऐकून अरविंदसरांनी रामाचे विशेष कौतुक केले..त्यामुळे रामाला देखिल मनस्वी आनंद झाला.. ..काही वेळाने मोहनचे नावं आले.... त्याला बक्षिस घेतांना देखिल मुख्याध्यापकांनी अरविंदसरांना संगितले की, हा मोहन खेळात अतिशय हुशार आहे!....तसंच तो जिम्नॅस्टिक प्रकारात देखिल फ़ार तरबेज आहे!...फक्त आर्थिक परिस्थीतीमुळे त्याच्या कलेला वाव मिळत नाही!.....


अस!.... ठीक आहे मी नक्कीच यासाठी काहीतरी करेन.. अरविंदसरांच्या या आश्वासनाने मोहनलाही खुप आनंद झाला....मोहन व रामा आता सातवीच्या वर्गात होते... सातवीनंतर मोठ्या शाळेत जाण्याची स्वप्न पाहत होते..... एक दिवस शाळेत असताना...त्यांना प्रचंड मोठा स्पोटाचा आवाज आला... स्पोट इतका प्रचंड होता की, त्यामुळे शाळेच्या भिंती देखिल हालल्या सुरवातीला मोठा भूकंप झाला अशी सगळ्यांची धारणा झाली... मग मात्र बातमी आली ..की,... रामा आणि मोहनचे वडील ज्या केमिकल कंपनीत काम करत होते... त्या कंपनीत स्पोट झाला आहे... आणि त्यांतील बहुतेक सगळे मजूर जाळून जागीच मरण पावले आहेत.....ही बातमी समजताच दोघानाही धक्काच बसला.... त्यांनीं तडक आपल्या घरी धाव घेतली.... त्यांच्या जोडीला अजुन काही मुलं होती ज्यांचे वडील त्या कंपनीत कामाला होते.....घरी आपल्यावर पाहतात तर काय.... नुसता आरडा ओरडा.. आणि धावाधाव सुरू होती.... कारण मोहन व रामा ज्या चाळीत राहत होते ...थेथील बहुतेक लोकं त्या कंपनीत कंत्राटी कामाला होती.....


त्या कंपनीचा मालक हुशार असेल भविष्यातील हा धोका ओळखूनच त्याने .. इतकी वर्षे काम करून देखिल सगळ्या मजुरांना कंत्राटी पद्दतीनेवरच कामाला ठेवले होते.....मारणाऱ्या लोकांचा निश्चित आकडा माहीत नव्हता... पण जितके तिथे कामाला होते ते सगळेच मेले होते हे नक्की होते... कारण स्पोटच इतका प्रचंड होता.....कंपनीत आगीचा डोंब उसळला होता.... त्यांत अजुन दोन स्पोट झाले.... त्यामुळे जवळ जाण्याचीही कोणाची कि हिम्मत नव्हती.....काही वेळाने अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तेथे पोहचल्या..... तेंव्हा आणखी एक मोठा स्पोट झाला.... त्यामुळे त्यांना देखिल आग वीझवायला अडचण येत होती.......बऱ्याच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात दलाला यश आले.....


बचावकार्यात.. जवळ पास तीस मृतदेह हाती लागले...मात्र त्यातले कुणाचीही ओळख पटली नाही.... इतके ते जळालेल्या स्थितीत होते.... त्यामुळे रामा मोहन किंव्हा कुटुंबातील इतर कुणालाही... आपल्या वडिलांचे किंव्हा पतिचे अंतिम दर्शन घेण्याच भाग्य मिळाले नाही.....


कंपनीचा मालक त्याच्या सुदैवाने परदेशी गेला होता... त्याच्या वकिलानेही परिस्थीती शांत होई पर्यंत त्याला तिकडेच राहण्याचा सल्ला दिला.....


कामगार संघटनानीं जोरदार मागणी केल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना थोडीफार आर्थिक मदत मिळाली....मात्र ही मदत फ़ार तुटपुंजी होती......


या अपघातामुळे मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.... घरातला कर्ता पुरुष गेल्याने.... आता काय करायचे? हा प्रश्न सगळ्यांना सतावत होता..


रामाला तीन बहिणी एक मोठी व दोन लहान.... तर मोहनला एक लहान बहीण व भाऊ होता.... घरात आता कोणी कमावणारे नसल्याने दोघंही आपले शिक्षण ..सोडून एका हॉटेल मध्ये कामाला लागले.....हॉटेल मालक तसा चांगला होता.... दोघांचीही वय कमी असल्याने त्यांना किचनमध्ये कामाला ठेवले.... व बाहेर येण्याची बंदी केली..... कारण उगाचच कोणी तक्रार केली तर आपल्याला बालमजुर ठेवले म्हणून दंड होईल अशी त्याला भीती होती......अरे!..... आईये! आईये !! अरविंदजी...कैसे है आप?...


बस!.... आप की दुवा है।.. कपूर साब!..


तो बोलीये अरविंद जी!.... रॉनी के बारे में आप कुछ कह रहे थे फोनपर!.....


हा!... कपूर साब!..... मेरी अगली फिल्म है। जिसका टायटल है। बालमजदूर..... तो लीड रोल के लिए आपके बेटे रॉनी को लेना चाहता हूं।......


अरविंदजी!...आपके फिल्म में काम करना तो बेशक रॉनीके लिए कोई अचीवमेंट से कम नही!..... लेकिन अभी वो 7 स्टेंडर्ड में है!... उसकी पढ़ाई?...


क्या कपूर साब आप भी?.... रॉनी को पढ़ाई करके थोडी ना डॉक्टर इंजिनियर बनना है।...वो तो आप जैसा सुपरस्टार ही तो बनेगा!........


हा!.... अरविंदजी वो तो है।अरविंदसरांच्या या वाक्यावर दोघंही खळखळून हसले...तो अरविंदजी स्क्रिप्ट क्या है?...


कपूर साब!...आप तो जानते है। में थोडी रीलिस्टीक फिल्मे बनाता हूं।..... तो एक लाडका है ..जिसके माँ बाप गुजरनेके बाद वो अपनी फॅमिलीको ... मजदूरी करके कैसे संभालता है!... ऐसा सब्जेक्ट है!


अरविंदजी!..कही आपकी फिल्म आर्ट फिल्म तो नही ना?......


जी नही कपूर साब.!.. कमर्शियल है!... आप चिंता नां करे! ..थोडे इट कारखाने आदीमें काम करते रियल सीन होंगें बस!....तो अरविंदजी! ...आप कहना चाहते है की, इतने बडे सुपरस्टार का बेटा इटे उठायेगा?.. ..


आप कैसी बात करते है! कपूर साब!.... आप चिंता नां करे ..उसके लिए मैने एक डमी डुंढ लिया है!...वो..जिम्नॅस्टिक में माहिर है।.. वो सारे स्टंट कर लेगा आप के रॉनी को तो सिर्फ एक्टिंग करनी है आप के जैसी!....


या वाक्या वर पुन्हा एकदा दोघंही खळखळून हसले ...


क्रमशः...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक