बलिदान

चितोडच्या जौहरवर आधारित कविता.
डोंगराच्या मजबूत अश्या किल्ल्यावर
राजाराणीचा तो सुखाचा संसार होता
वीर त्या राजपुत तलवारीच्या जोरावर
मेवाडमध्ये सुखसमृद्धीचा निवारा होता..

पण कुठून नियतीचे काळे मेघ दाटले
दुष्ट यवनी सुलतानांची पडले ती नजरे
घेऊन टाकू मेवाडच्या स्वातंत्र्याचा घास
विनाश घडवू लावू मुंडक्याची मोठी रास

बसे यवनी वेढा पवित्र चित्तोडला
क्रूर सर्प जैसे आवळतो शिकारला
रातोरात आगीचे गोळे गडात पडे
युद्धाच्या ढगात किती प्राण गमवे

किल्ला विटांनी नाही वीरश्रीने बनलेला होता
स्वातंत्र्यासाठी शर्थ करू रजपूत बाणा होता
सुलतानही तो बाहेर क्रूर इर्षेला पेटला होता
शक्य तो प्रयत्न करून रयतेला छळत होता

शेवटी किल्ल्यातील अन्नसाठा तो संपला
सुलतान कपटी गालातल्या गालात हसला
युद्धासाठी मग किल्ल्याचा दरवाजा उघडला
रजपूत वीर हाती तलवार घेता रणी शोभला

मृत्यूचा दरवाजा दुसरीकडेही उघडला होता
जौहरकुंडचा दालन त्यागाचा साक्षीदार होता
किती रूपवान गुणवान वीर रजपूती स्त्रिया
मृत्यूसमोर असूनही किती त्या सुंदर सजल्या

माता ज्वालाची केली मनोभावे त्यांनी पूजा
सम्मान राखण्यासाठी मार्ग नसे आता दुजा
यवनाच्या हाती लागण्यापेक्षा मृत्यू स्वीकारू
रणी लढणाऱ्या पतीसाठी स्वर्गी हजेरी लावू

चंदनाच्या लाकडात मग दिवा हळूच टाकला
जय भवानी नारा परीसरात मोठ्याने घुमला
बघता बघता ज्वाला विक्राळपणे मग पेटली
पटापट क्षत्रिया स्त्रियांनी उडी त्यात टाकली..

त्या तरुण बाल गरोदर वृद्ध निष्पाप स्त्रिया
आगीत जळून क्षणभरात खाक त्या झाल्या
काल पण हे उच्च बलिदान पाहून थरथरला
का नियतीने माणुसकीवर असा वार करावा

पवित्र राख त्या जौहरची हवेत सर्वत्र पसरे
भस्म समजुनी त्यास सैनिक कपाळी लावे
रणांगणात राजपुतांनी प्रचंड शौर्य गाजवले
शीर कापले यवनांनी तरी धड लढत राहिले

गड जिंकला तरी स्वाभिमान कस हिसकावणार ?
इतिहासात आमचेही वेगळे पान राखले जाणार
हे प्राणांचे बलिदान पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणार
मातीचे सच्चे सपुत आहोत जगी गौरवीत होणार..

~ पार्थ ✍️