Nov 30, 2021
सामाजिक

बाली उमर को सलाम

Read Later
बाली उमर को सलाम

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

ती एकटीच निघाली आज. 

कुठे जायचय माहित नाही.

दिशा हरवल्याप्रमाणे झाली होती.

घरापासून दूर माळरानात आली होती.

तिच्या दृष्टीने तिने पुकारलेलं बंड होतं हे. . . कुणाच्या विरोधात. . स्वतःच्या की घरच्यांच्या?

बुद्धीच्या की मनाच्या? बंड कोण पुकारतय अन का ? याचीही स्पष्टता  नव्हती.

असं कुणी निघतं का. . कुठे जाण्यासाठी? ठिकाणाचा पत्ता माहित नसताना . . ?

हा उनाड वारा जसा. . तशीच ती पण. . बेभान !

लग्न करायचं नाही . . हा मुळी वादाचा मुद्दा असूच शकत नाही!

लग्न करायचंच  हा आग्रह का?

घरात वाद पेटला अन ती फक्त निरुत्तर होवून निघून आली. देवाने प्रत्येकासाठी य़ोग्य जोडीदार बनवलाय असं तिला कुण्याकाळी वाटायचं. . पण नाहिच!

हा तिचा भ्रम होता. . कदाचित तिच्यासाठी योग्य जोडीदार बनवायला तो विसरला किंवा मग बनवला असेल पण त्यांची भेट घालायची योजना त्याने बनवली नसावी.

घरातून निघालेली ती, बस स्टँड  किंवा रेल्वे स्टेशनकडे जाईल असे वाटले घरच्यांना !

ती आली इकडे घरामागच्या डोंगराकडे. . थोडा चढ. . उतार मग माळरान. . मग छोडीशी टेकडी आणि खाली नदी!

बरेचदा मैत्रिणीं  सोबत डबा पार्टीला वगैरे आलेली ती!  तेव्हा छान वाटायचं असं हुंदडणं , बागडणं!

आज मात्र ती खूप उद्विग्न  अवस्थेत इथे आली होती. .

जीव देणे तिला कधीच मान्य नव्हते. . पण आज मात्र मी का जगतेय ?असा प्रश्न तिला पडला होता.

घरातले ते संवाद पुन्हा- पुन्हा आठवत होते. . पण तिच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे नव्हती.

"मुलीच्या जातीने. . असं राहणं. . शोभत नाही. ."
आजीचे बोल कानात घुमत होते.

म्हणजे मुलगी नावाची एक जात पण अस्तित्वात आहे तर. . . . तिला वाटलं. . "आणि मुलगा नावाच्या जातीला चालतं का? "

"सलमान खान आवडतो ना तुम्हाला. . मग त्याने पण लग्न केलं नाही. ". छोटीशी भाची पटकन बोलली होती. . .निरागसतेने!

"त्यांचं सोडं गं ! ते सिनेमातले लोक काहीही करतात. बिट्टू जा ना गं खेळायला. . मोठ्यात कशाला बोलतेस! "

चौथीतल्या त्या भाचीला बाबांनी बाहेर पिटाळलं .

"कारण तर सांग . . मग रहा तशीच बिन लग्नाची!" बाबांचा हा सूर ऐकून ती बावरली.
तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते.

काय कारण सांगणार होती ती?

नववीत असताना बाबांनी दोन दिवस खोलीत डांबून ठेवलं होतं. . हेच का . . हेच कारण सांगावं का ? तिलाही कळत नव्हतं की असं का झालं?

"पंधरा वर्षांची होतीस तेव्हा अभ्यास सोडून नसते धंदे सुचले होते तुला. . मारवाड्याच्या दुकानात सामान घेत होतो मी. . . आणि त्याच्या पोरासोबत काय चाललं होतं तुझं?. .  मग खोलित बंद नाही करणार तर काय करेल कुठलाही बाप?"

" आता जुन्या गोष्टी किती दिवस उगाळणार तुम्ही? सोडा ना . . पुन्हा वागली का ती तसं ?" आई मधेच सोडवायला बोलली.

"तेच तर सांगतोय. . पंधरा वर्षे वय कुठे अन बत्तीशी कुठे? पुढच्या महिन्यात बत्तीस पुर्ण होतील  हिला. तरूण वयात लग्न झालं असतं तर बरं झालं असतं. .आता कोण स्थळं पाहणार हिच्यासाठी?"

"पण बेटा, असं आयुष्य  थांबत नाही  ना  कुणासाठी!

" आई अगं हा  मुद्दा हा नाहिच की कुणाशी करायचं? स्थळाच्या नावाखाली  जी माणसं घरी येतायत . . त्यांच्याशी लग्न कसं करावं अन आयुष्य  कसं काढावं ? सांग ना गं. . कुठेतरी
जोडा हवा की नको गं. . पण सोड ना! कुणाशी नाही. . मला बिना लग्नाचीच रहायची आहे. . कमावतीय ना. . माझा भार ही नाही तुमच्यावर. . !"

" ऐका आईसाहेब . . ऐका! काय संस्कार दिलेत तुम्ही लेकीला. . भार आहे म्हणून लग्न  करतोय का आपण तिचं?" बाबा आता जास्तच भडकले.

" लोकं काय काय बोलतात ना बेटा ते आम्हाला ऐकावं लागतं. . काय उत्तर देणार आम्हीतरी. . " आई कळवळून म्हणाली होती.
आता मात्र तिच्या डोक्यात दनक चढली. . माझं भविष्य  ,माझ्या इच्छा- आकांक्षा, माझे विचार , माझं सुख या सगळ्यांचा कुठेच विचार नाहीय का गं? वय झालं , कारण काय , भार नाही , मग लोक काय म्हणताय? सगळा हाच विचार! . . मला कधी जवळ घेवून विवारलं की मला काय त्रास आहे. . मला काय वाट तं . . नाहिच . . !" ती मनातलं विष ओकत गेली. बोलत बोलत बॅग भरली. सगळे ऐकत होते कुणीच थांबवलं नाही.
वडिल म्हणाले" आम्ही तर शत्रुच ना तुझे. . कशाला राहतेस इथे? जा ना जिथे तुझे विचार समजणारे लोक आहेत. . !"
इइतका होण्याचा अवकाश, ती बॅग घेऊन झटपट घराच्या बाहेर पडली.

बेभान होऊन निघाली  . चालत राहिली. .  चालत राहिली आणि आता ती एका डोंगराच्या खाली असलेल्या नदीकिनारी पोहोचली होती.
बॅग बाजूला ठेवून ती डोळे मिटून बसली. .  अगदी सगळे विचार बाजूला ठेवूण नदीची  खळ खळ ऐकत होती.
बंद डोळ्यांनी. .  अचानक ती गूण गुणायला  लागली. . " सोलह बरस की बाली   उमर को सलाम ,यार  तेरी पहली नज़र को सलाम . . सलाम. .   ऐ प्यार तेरी पहली नज़र को सलाम!
शांत वातावरणात  तिचा गोड आवाज़ घुमत होता. बंद डोळ्यांच्या आत आठवणींचा सिनेमा चालला होता. .
गाण्यात आर्तता  वाढली होती. .

जिसमें जवान होकर बदनाम हम हुए
उस गली, उस शहर, उस घर को सलाम
जिसने हमे मिलाया जिसने जुदा किया. .
उस घडी, उस वक्त ,उस गजर को सलाम. .
यार तेरी पहली नजर को सलाम!
डोळ्यातून अश्रूंच्या धारा. . .  गाणं आपोआप थांबलं. .
" का थांबलात . . पुढे गा ना!"

या पुरुषी आवाजाने ती भानावर आली.

"कोण  आहे ते. . नाही गायचं मला! तुम्ही का ऐकताय माझं गाणं ?"

ती बसली होती त्याच्या बाजूला मोठा खडक होता. हा तिथेच बसलेला होता समोरच्या बाजूला. .
"तुम्हाला कल्पनाही नसेल मिस. . . मी किती वाईट मनस्थितित इथे बसलेलो होतो। तुमच्या गाण्यमुळे मी एका वेगळ्याच जगात पोहोचलो!"

"काय झालं. . . जीव वगैरे देण्याचा विचार होता का?" त्याचा एकंदर अवतार पाहून तिला वाटले ते म्हणाली.
" . . " यो काहिच बोलला नाही पण डोळ्यात ओल होती.
" जीव द्यायचा तर सोबत बॅग का आणलीत. . तिने बाजूची बॅकपॅक  पाहून विचारलं. .

" हाच प्रश्न मी तुम्हालाही विचारू शकतो. . !"
स्वतः जवळची बॅग लपवताना ती वरमली.

"म्हणजे मी घरी भांडून व वैतागून इकडे आले मनःशांतीसाठी. . मला कळालच नाही कुठे जावं . . ?"

" आय गेस. . यू आर सिंगल. . आणि लग्न या विषयावरून. . . म्हणजे हा गेस हाँ. . !" तो बोलला पण  तिला त्या वैतागात पण हसू आलं. .
" तुमची पण सेम स्टोरी दिसतेय. . " ती खोचकपणे बोलली.

त्याने हसत केसांवरून हात फिरवला आणि ती समजायचा ते समजली.
"सॉफ्टवेअर मधे का ?" तिने त्याच्या बॅगकडे पहात विचारले. .
" करेक्ट. . मिस. . अॅक्चुअली आपण दोघे खूप पॉजिटिव्ह. . थिंकर आहोत. . तुम्ही पण बॅग घेवून घर सोडलय आणि मी तर फोर विलर तिकडे पार्क करून आलोय. . !"

दोघेही मोठ्याने हसले.

" एक झटका खाल्ला कोवळ्या वयात . . अजूनही त्यातून सावरलो नाही. . हे नाही कळत घरच्यांना. . म्हणूनच तर तुम्हाला गाणं थांबवू नका म्हणालो. . ना! माझं फेवरेट गाणं आहे. . ते
मी कितीतरी वेळा पाहतो आणि ऐकतो. . कसलं फिल्मवलंय ते.  सूर किती आर्त आहे लताजींचा. . "  तो तिच्या डोळ्यात पहात बोलला.
त्याला पहात ती म्हणाली-
"मला शब्द आवडतात त्या गाण्याचे. . मनात रुतत जातात. . त्यात लक्ष्मी - प्यारेंची धुन व तो मधला म्युजिक पीस वाह वाह!.  आणखी ैक सुरुवातीला तो हाय पीचवरती  अनूप जलोटांचा आवाज़. . "
त्याने सुरू केलं -

"कोशिश करके देखले
दरिया सारे, नदियाँ सारी
दिलकी लगी नही बुझती
बुझती है हर चिंगारी!"

त्याने सुरूवातीच्या ओळी गायल्या व ती पुढे गाऊ लागली. . . गाणं रंगत गेलं व. . .गाणं संपलं आणि ती भानावर आली.

"खूप गोड गाताय तुम्ही मिस. . . ?"

"कृष्णजा!" तिने हात पुढे केला. .

"मायसेल्फ  अर्नव!" त्याने हात मिळवला.

बराचवेळ मग ते शेअर करते राहिले. . आणि कळालं की त्यांची सेम कहाणी होते. . विचार सारखे होते, दोघांनाही लग्न नको होतं आतातरी!

"किती कमाल आहे ना. . आज माझा देवावरचा विश्वास उडाला होता. .सकाळी जेव्हा मी घर सोडलं. . पण देव असतो आणि तो सारखी माणसं बनवतो!" कृष्णजा आकाशाकडे पहात बोलली.

" कमाल आहे कृष्णा. . मी पण आईला फोनवर हेच बोललो की माझ्या त्या गर्लफ्रेंड नंतर देवंने मुली बनवल्या नाहित माझ्यासाठी. अॅरेंज मॅरेजला हो म्हणालो तर काहीही स्थळं घेवून येवू लागले. . काही मॅच असतो का नाही. . फिजिकली , मेंटली. . म्हटलं बस. . वय वाडलं म्हणून काय समझौता करणार?. .नको लग्न नको घर. . अन निघालो. . !"
" अर्णव . . मी पण! . .  आपली स्टोरी तर ैका नाण्याच्या दोन बाजू वाटतायत मला. . पण आता लग्न शब्दावरचा विश्वास उडालाय. . "
" लिव इन. . !" त्याने हात पुढे केला. . तिने टाळी दिली.
" देव आहे रे जगात. . तो आहे! " तिने वर पाहिलं व बॅग उचलली.
"तुझ्यासारखी एक पार्टनर  यार बस्स. . सबकुछ है मेरे पास . . बंगला, गाडी . . पैसा. . लेटस लिव इन हॅपिली!"
तिने हातात हात दिला.
"अगं थांब कार पार्किंगची रसीद शोधू दे. . ! सापडली. . येस्स चल!"
दोघे हातात हात घालून बोलत नदीकडून वर चढू लागले. . एका नवीन आयुष्याचं स्वप्न घेवून!

समाप्त
© सौ. स्वाती बालूरकर देशपांडे सखी
दिनांक  ३१.०१ .२१

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Swati Balurkar, Sakhi

Hindi teacher in CBSE school

I swati Balurkar, working as Hindi teacher in CBSE school in Aurangabad at present. Having 24 years of experience in teaching. worked 23 years in Hyderabad . 1990-1994 I wrote many stories n poems and got published. After break started writing in July 2018 again. I am published writer on PRATILIPI MARATHI and STORYMORROR.