बाळंतपण_ भाग_१

मातृत्व स्त्रीचा एक नवीन जन्म.

बाळंतपण_ भाग_१

विषय_ पंखात भरले बळ.

जलद कथामालिका लेखन स्पर्धा.

©® सुश.

विकास आणि कोमलच्या लग्नाला जेमतेम एखादं वर्ष होत आले होते.

विकास सरकारी नोकरी मध्ये चांगल्या पदावर काम करत होता.

विकासला कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या गाव,शहरांना तिथल्या कार्यालयाच्या भेटीसाठी व्हीसीटला अधून मधून जावे लागायचे.

      लग्नाच्या या पहिल्या वर्षात त्याला फारसे जावे लागले नव्हते.त्यामुळे कोमल त्यांच्या सरकारी क्वार्टर मध्ये एकटीला राहण्याची वेळ आली नव्हती. तशीपण कोमल थोडी घाबरट,आणि भोळी भाबडी होती.समजा,विकासला एखादे वेळेस जावे लागले तर, सासरहून किंवा जास्त करून माहेरहूनच कोणाला तरी सोबतीला म्हणून राहण्यासाठी बोलावत असे.

        त्यातच कोमल आता तिच्या पहिल्या बाळाची आई होणार होती.त्यामुळे सगळे व्यवस्थित पार पडे पर्यंत तरी विकासला बाहेरगावी मुक्कामाला जावे लागू नये अशी दोघांचीही अपेक्षा होती.

     तसे बघितले तर ,जास्त घाबरण्याचे काही कारण नव्हते, सर्व सुख सुविधांनी युक्त क्वार्टर मध्ये एकटीला ही राहण्याचे काही टेन्शन नव्हते.चोरा भामट्यांपेक्षा कोमल , किड्या किटकानाच जास्त घाबरत असे.घरामध्ये चुकून एखादी पाल दिसली तर पालीला घराबाहेर काढे पर्यंत ती शांत बसत नसायची. झुरळे, भुंगे, डंखनाऱ्या मधमाशा, कोमलला आवडत नसत.

     कोमलच्या प्रेगन्सीचे पाहिले चारपाच महिने छान आनंदात चालले होते.लागणारी सर्व खरेदी चालूच होती.

विकासने आणि कोमलने ठरवले होते की,बाळंतपणासाठी कोमलच्या माहेरी जाण्याची काही गरज नाही.बाळंतपण इकडेच करावे म्हणजे विकासलाही बाळाचे संगोपन अनुभवता येईल.असे सर्व प्लॅन ठरवत असतानाच नेमके विकासच्या ऑफिस मधून एक पत्र आले.ऑफिसच्या सेमिणार साठी त्याला एकदीड महिना बेंगलोरला जावे लागणार होते.

      हे पत्र वाचताच ,विकासला सगळ्यात पहिला विचार आला तो कोमलचा.कारण सेमिनारची तारीख आणि कोमलच्या बाळंतपणाची तारीख एकाच आठवड्यात येत होती.

         आतापर्यंत ठरवलेले सगळे प्लॅन बदलावे लागणार होते.विकासला पंधरा मे ला जायचे होते,आणि कोमलला अचानक पाच मे ला त्रास सुरु झाला.आणि अंदाजे तारखेच्या थोडे आधीच आठ दिवस ,कोमलने बाळाला जन्म दिला.

कोमलचे आई,बाबा,विकास आणि कोमल पंधरा तारखेपर्यंत विकासच्या क्वार्टर मध्येच राहतील अन् मग विकास सोबतच सगळे कोमलच्या बाळाला घेऊन दीड महिन्यासाठी ,कोमलच्या माहेरी पुण्याला जातील ,असे ठरवले गेले.

      आणि ठरल्याप्रमाणे एकदिड महिना कधी संपला ते समजलेच नाही.आणि विकासने त्याच्या परतीची तारीख कोमल आणि तिच्या आईबाबांना कळवली.

     कोमल आणि तिच्या दीडदोन महिन्याच्या बाळाला परत विकासच्या क्वार्टर मध्ये सोडण्यात येणार होते.

     

( कोमलच्या स्वभावा मध्ये काही बदल आला आहे का? वाचूया पुढच्या भाग_२ मध्ये)

©® Sush.बाळंतपण

🎭 Series Post

View all