Mar 03, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बेरीज वजाबाकी आयुष्याची... भाग २ (वर्षाराज)

Read Later
बेरीज वजाबाकी आयुष्याची... भाग २ (वर्षाराज)


मागील भागात आपण बघितले…


तेव्हाची ती आणि आताची तिची अवस्था ह्यातील फरक बघून तो अजूनच अस्वस्थ होत होता. काहीही करून तिला शुध्दीवर कसे अनाता येईल असे त्याला वाटतं होते. पण वाट बघण्या पलीकडे त्याच्या हातात काहीच नव्हते.


आता पुढे…"भार्गवी असं का केलंस? असं करताना एकदाही माझा विचार तुझ्या मनात आला नाही का?" शशांक बेड वर निपचित पडलेल्या भार्गवीचा हात हातात घेत बोलला.


नुकतीच तिच्या मेंदूवर शास्त्रक्रिया पार पडली होती. त्यामुळे डोक्याला पट्टी बांधलेली होती. एका हाताला प्लास्टर लावलेले होते. दुसऱ्या हाताला सलाईन सुरू होती. नाकावर ऑक्सिजन मास्क होते. बाजूला मॉनिटरवर तिच्या हृदयाचे ठोके मोजले जात होते. आयुष्यात एकदाही आजारी न पडलेली भार्गवी आज अशा अवस्थेत होती, जिथून ती परत येईल की, नाही ह्याची शाश्वती नव्हती."भार्गवीऽऽ, कसा तुझा जीव झाला मला सोडून जाण्याचा?" शशांकच्या डोळ्या समोरून काही तासांपूर्वी घडलेली घटना काही केल्या जात नव्हती.


"शशांक, सावर स्वतःला." धनंजय म्हणजे, शशांकचा जिवलग मित्र आणि डॉक्टर जयेशचा मोठाभाऊ खोलीत येत बोलला. त्याच्या हातातील कॉफीचा एक कप शशांकला देत, दुसरा कप घेऊन तो तिथेच त्याच्या बाजूला बसला.


"मी नेहमी अडवत होतो तिला की, त्या कठड्यावरून चालत जाऊ नकोस. पण तिने कधीच ऐकले नाही. मागील वर्ष भरापासून ती हा जीवघेणा खेळ खेळते रे आणि आज खरंच जीव द्यायला .." शशांकला पुढे बोलवत नव्हते."नक्की काय झालं सांगशील?" धनंजय बोलला.


"मी बंगल्याच्या आवारात आलो, तेव्हाच भार्गवी मला वर चालताना दिसलीस. कसातरी गाडीतून निघून आत जायला लागलो तर, माझ्यासमोर तिचा देह खाली पडला. पडला नाही, तिने मुद्दाम झोकावले स्वतः ला. तिला असे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बघून मला काही क्षण सुन्न झाल्यासारखे झाले. पण नोकरांच्या आवाजाने भानावर येत तील इथे घेऊन आलो. मरणाचा पूर्ण प्लॅन केला होता तिने तर. डोक्यावर पडली, सांगितलं डॉक्टरांनी मला. मेंदूला मार लागला आहे. पण तिने कितीही प्लॅन केला तरी, मी तिला अशी जाऊ देणार नाही. सांगून ठेवतो तुला." शशांक भावूक होऊन बोलला. डोळ्यातून पाणी वाहत होते.
"सर, तुम्ही सगळे बाहेर बसा. डॉक्टर राऊंड वर येतील आता." नर्स आत येत बोलली. सलाईन मध्ये इंजेक्शन टाकून ती निघून गेली.


"शशांक चल बाहेर बसू. डॉक्टरांना त्याचे काम करुदेत." धनंजय बोलला.


शशांकने डोळे पुसत मान डोलावली आणि धनंजय सोबत बाहेर जाऊन बसला.
तरी शशांक मात्र त्याच्याच विचारात हरवलेला होता.


"शशांक कसल्या विचारात हरवला आहेस? भार्गवी लवकर शुध्दीवर येईल. काळजी करू नकोस." धनंजय शशांकच्या पाठीवर हात ठेवत बोलला."का रे असं वागली असेल माझी भार्गवी?" ह्याच प्रश्नच उत्तर शोधतो आहे मी." शशांक भावूक झाला होता.


"तुला खरंच माहीत नाही का? तुझ्या प्रश्नाचे उत्तर." धनंजय प्रश्नार्थक नजरेने बघत होता.पुढील भागात बघू. धनंजय असे का बोलला असेल? काय रहस्य असेल त्याच्या बोलण्यात? धनंजयला माहीत असेल का भार्गवी का अशी वागली?
वाचत रहा बेरीज वजाबाकी आयुष्याची.क्रमशः
© वर्षाराज

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//