बेरीज वजाबाकी आयुष्याची...भाग १ (वर्षाराज)

"ऑपरेशन क्रिटिकल होते. पण ते पार पडले. आता पुढच्या चोवीस तासात त्यांना शुद्ध आली पाहिजे. तसे झाल??

"डॉक्टर कधी बरं वाटेल तिला? काही अंदाज? तिची ही परिस्थिती नाही बघू शकत मी." शशांक काकुळतीने डॉक्टर जयेशला विचारत होता.


"हे बघा त्यांना झालेली जखम खोलवर आहे. ती भरण्यासाठी बराच वेळ लागेल. सध्या त्या आऊट ऑफ डेंजर आहेत, असे म्हणता येणार नाही. गोळ्याऔषधांना त्यांनी योग्य रिस्पॉन्स देणे गरजेचे आहे. तसं झालं तर, पुढील काही आठवड्यात त्या पूर्ण बऱ्या होतील. पण त्यानंतर मात्र त्यांची जास्त काळजी घ्यावी लागेल." डॉक्टर जयेशने, शशांकला समजावले.



"जास्त काळजी म्हणजे? मी समजलो नाही." शाशंक बोलला.


"त्याच्या शरीरावर झालेल्या जखामांपेक्षा त्यांच्या मनावर झालेल्या जखमा जास्त खोल आहे. त्यामुळे त्यांचे मन सांभाळावे लागेल. वय वाढतं तसं माणूस लहान होत जातो. त्यांच्या बाबतीत दोन्ही गोष्टी आहेत, एक तर त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही त्यात वय देखील वाढतं आहे. त्या जितक्या भूतकाळापासून दूर राहतील तितके चांगले. पण आधी त्यांना शुद्ध येणे गरजेचे आहे." डॉक्टर जयेश बोलला.


"ती कधी शुध्दीवर येईल?" शशांकने परत प्रश्न केला.


"ऑपरेशन क्रिटिकल होते. पण ते पार पडले. आता पुढच्या चोवीस तासात त्यांना शुद्ध आली पाहिजे. तसे झाले तर आपण जिंकलो. त्यामुळे प्रार्थना करा की, त्या शुध्दीवर येऊ देत." डॉक्टर जयेश बोलला.


"थँक्यू डॉक्टर. आता परमेश्वरच वाली आहे." बोलताना शाशंकच्या डोळ्यात पाणी होते.


"दादा काळजीचे करणं आहे म्हणून स्पष्ट बोललो. डॉक्टर ह्या नात्याने परिस्थितीची जाणीव करून देणे गरजेचे आहे." डॉक्टर जयेश बोलला.


"तू तुझे काम केलेस. जे तुझ्या हातात होते, ते तू सगळे केलेस. माहीत आहे मला." असे म्हणून शशांक जयेशच्या कॅबिन मधून निघून गेला.

त्याची पावले हॉस्पिटल मधील तिच्या खोलीच्या दिशेने चालत होती. डोळ्यांसमोर मात्र ती दिसत होती. नाजूक कथ्या डोळ्यांची. तेव्हाची ती जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा बघितले होते आणि तो तिच्या प्रेमात पडला होता. विचारांच्या तंद्रीत शशांक तिच्या खोलीत शिरला आणि समोर असलेली तिला बघून एकदम भानावर आला. तेव्हाची ती आणि आताची तिची अवस्था ह्यातील फरक बघून तो अजूनच अस्वस्थ होत होता. काहीही करून तिला शुध्दीवर कसे आणता येईल, असे त्याला वाटतं होते. पण वाट बघण्या पलीकडे त्याच्या हातात काहीच नव्हते.



तर मित्रांनो,
शशांक म्हणजे शशांक देसाई. नामवंत उद्योगपती अभिमान देसाई यांचा एकुलता एक मुलगा. वडीलांसरखाच शशांक देखील हुशार, वडिलांचा उद्योग त्याने एका नवीन उंचीवर नेऊन ठेवला होता. वयाच्या पन्नाशीत असून देखील अगदी सुदृढ. जयेश हा शशांकच्या मित्राचा भाऊ आणि दोघे जिच्या बद्दल बोलत होते. ती आहे आपली नायिका भार्गवी.


भार्गवी देखील साधारण पंचेचाळीस वर्षांची स्त्री. दिसायला नक्षत्रा सारखी. गोरा वर्ण, सरळ नाक, सडपातळ बांधा. कोणी म्हणणार नाही की, ती दोन मुलांची आई आहे. इतकी मेन्टेन. मनमिळावू, कर्तबगार. उच्च शिक्षित. अशी ही आपली भार्गवी.


पण काय झालं असेल तिला? कर्तबगार स्त्रीची मानसिक स्थिती ठिक नाही! त्याचे कारण काय असेल? वयाचे म्हणाल तर पंचेचाळीस म्हणजे उतार वय नाही. मग डॉक्टर वय वाढते आहे. म्हणून काळजी घ्या, असे का म्हणाले असतील? काय घडले असेल तिच्या आयुष्यात? कुठे चुकली आयुष्याची बेरीज वजाबाकी?
सगळे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळणारच आहे. तर वाचत रहा बेरीज वजाबाकी आयुष्याची.




क्रमशः

©वर्षाराज

🎭 Series Post

View all