भांडण नको मला ,मला फक्त एक उत्तर दे का मीच नेहमी आपल्या वादात मागच्या मोड वर जाऊ ...
अरे भांडण तू काढणार..... वाद नको तिथे तू वाढवणार...
चूक समजली तर तू मला म्हणणार की तुला मी समजून घेऊ....
चूक समजली तर तू मला म्हणणार की तुला मी समजून घेऊ....
बास आता ....खूप सहन केलंय मी..... पण आता अजिबात सहन करणार नाही...... आता तू ही शिक मागच्या मोड वर जायचे.... म्हणजे थोक्यात के तर तुझा राग आणि मूड सांभाळायचा असेल तर तू काहीच करायचं नाही जे काही करायचे असेल ते मीच करायचे...
रीना आज अभय वर खूप आवाज काढून बोलत होती, इतके की सासू सासरे जे आज गावा वरून आले होते त्यांना ही त्यांच्या भांडणाचा आवाज जात होता...
अभय तिला खुणावत होता, अग शांत बस जरा, त्यांना ऐकू जात आहे ...किती वाद घालशील ... तोंडावर निदान काही दिवस आवर घाल.... नाही तरी एक दिवस असा जात नाही जिथे तू भांडण आणि वाद काढला नाही...
शुल्क गोष्ट असते पण तुला ती आभाळा एव्हडी करण्यात मज्जा येते...
शुल्क गोष्ट असते पण तुला ती आभाळा एव्हडी करण्यात मज्जा येते...
तो म्हणत होता आणि ती ऐकत होती....रोज तो तिच्या लहान मुला मध्ये शोधतात तश्या चुका शोधत आणि तिला मूर्खात काढत,आणि वाद वाढले की तो म्हणत ,माघार घ्यायला शिक जरा.....
त्याचे हे बोलणे तिला खूप टोचले ,रोज हीच तर्हा काय म्हणून मी ह्याच्या या वागण्याला, आधी हाच वाद काढणार, आणि हाच असे भासवणार की जशी चूक माझीच होती ....इतके सहन करून परत मलाच म्हणार माघार घेण्यात काय कमीपणा वटतो ग तुला .
त्यांचे हे वाद सासुबाई लांबून ऐकत होत्या, सासरे ही ऐकत होते, सुरवातीला त्यांना वाटले होईल सुरळीत, वाद कमी होईल पण नाही. ते दिघे ही मध्ये पडले नाही ,कारण शेवटी नवरा बायकोचे वाद आहेत ते..ते दोघे कधी ही गोडीत येतील आणि आम्ही मात्र वाद सोडवणार वाईट ठरू...किंवा वाळीत ही टाकून दिले जाऊ ? त्यामुळे ना लेकाची बाजू घ्यायची ना सुनेची.....तशी ही सून अगदीच काय चुकत नाही ...हा आपलाच आगाऊ आहे.
सासरे असा विचार करत असताना सासू पुढे जाऊ पहात होती,त्यांनी तिचा हात धरला, म्हणाले तू जाशील आणि लेकाची बाजू घेशील ....तसे करू नको आधी अभ्यास कर आणि मग सत्याची बाजू घे....नाहीतर आईची माया आडवी येईल ..
त्या म्हणाल्या इथे आईची माया नाही आडवी येणार ...इथे माझ्या सुनेच्या पाठीमागे मी खंबीर उभी रहाणार ....गेले काही दिवस बघते हाच काही तर खूळ काढतो आणि तिच्याशी वाद घालतो ....त्याचे वागणे जर आईला पटत नसेल तर बायकोने का पटवून घ्यावे.... का कारण नसताना ..तिची चूक ही नसताना फक्त बायको आहे म्हणून तिने माघार घ्यायची.... बायका काय माघार घेण्यासाठी त्यांच्या अर्धांगिनी म्हणून येतात का.... तिनेच का नेहमी पडत्या मोड वर जायचं ...मी आज तिच्या बाजूने आहे ...आणि हो जेव्हा जेव्हा तो चुकेल तेव्हा तेव्हा मी तिच्याच बाजूने असणार आहे.?